आज्ञार्थी वाक्ये आणि व्यक्तीस्वातंत्र्य
खूपदा एका गोष्टीचे कौतुकमिश्रीत नवल वाटले आहे - जर आपण एखाद्या अमेरीकन व्यक्तीस विचाराल "मी अमूक एक गोष्ट करू का?" तरी त्याचे उत्तर तू हे कर अथवा हे करू नकोस असे न मिळता " I will do so & so" किंवा "No. I will not do so & so" असे मिळते. विशेषतः या अशा दाखल्याचा भरपूर (व्यक्तीगत)विदा माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा प्रश्न विचारला आहे तेव्हा तेव्हा अमेरीकन (जन्म/संगोपन आदिने अमेरीकेत असलेल्या) व्यक्तीने मला बहुधा याच अर्थाचे उत्तर दिले आहे.
बालसंगोपनाची काही उदाहरणे पहाण्यात आली -
एका मध्ये मुलगा त्याच्या बॅगकडे लक्ष देत नव्हता. भारतिय आपण करवादून किंवा शांतपणे पण "आज्ञार्थी" सांगीतले असते की "बॅगकडे लक्ष दे" याउलट अमेरीकन गोर्या आईने त्याला सांगीतले की "जॉन तू बेजबाबदार वागतो आहेस. तुझी बॅग चोरीस जाईल" ...... "John your bag is going to get stolen I am telling you right away. you are being irresponsible." म्हणजे तिने घटना आणि परीणाम फक्त एका संवादात समोरासमोर मांडले. त्यांचा अन्वयार्थ/सांगड लावून अनुरूप कृती करण्याचे स्वातंत्र्य मुलावर सोपविले.
स्वतःचे मत असे दुसर्यावर न लादणे हा यांच्या भाषिक वैशिष्ट्याचा नमुना म्हणावा लागेल काय?
मला मांडायचा मुद्दा हा आहे की - मूळच्याच कमी आज्ञार्थी वाक्यांमुळे आज हा समाज अधिक व्यक्तीस्वातंत्र्याच्या आहारी गेलेला दिसत असेल काय? याच्याउलट आपण मुलांना काय करावे काय करू नये हे अति सांगतो का?
बरेच दिवसांपासून हा प्रश्न माझ्या मनात होता. येथे त्याचे उत्तर मिळेल असे वाटते.
याद्या
3581
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
काहीच कळले नाही..
+१
In reply to काहीच कळले नाही.. by इंटरनेटस्नेही
सहमत आहे...आमच्या ऑफशोर च्या
त्यांचे काही तोटे सुध्धा
In reply to सहमत आहे...आमच्या ऑफशोर च्या by अंतु बर्वा
माझा प्रतिसाद
शुचिताई अगदी योग्य निरीक्षण
बाकी ह्या अमेरिकन लोकांचा
होय, निरिक्षण मान्य आहे. आज
जगात सर्वत्र थोड्याफार फरकाने
लेखात मांडलेला विचार आवडला
लहान मुलांशी बोलताना त्यांना
In reply to लेखात मांडलेला विचार आवडला by मनीषा
त्या बॅगेकडे लक्ष न देणार्या
हेच विचारतो. लेखातले विचार
In reply to त्या बॅगेकडे लक्ष न देणार्या by अवलिया
लहान होता - ८ वय असावे.
In reply to त्या बॅगेकडे लक्ष न देणार्या by अवलिया
वा!
In reply to लहान होता - ८ वय असावे. by शुचि
काय म्हणता?
तुम्हाला भलतेच प्रश्न पडतात
In reply to काय म्हणता? by प्रसन्न केसकर