ही चर्चा भाजपाने ध्वजारोहण करावे का अथवा त्यांच्या एकता यात्रेसंदर्भात नसून, तो हक्क सर्वांना असायला हवा का या संदर्भात आहे, हे कृपयात ध्यानात ठेवावे.
धन्यवाद!
ही चर्चा भाजपाने ध्वजारोहण करावे का अथवा त्यांच्या एकता यात्रेसंदर्भात नसून, तो हक्क सर्वांना असायला हवा का या संदर्भात आहे, हे कृपयात ध्यानात ठेवावे.
माध्यमांमधे आणि राजकारणी ज्या पद्धतीने श्रीनगरमधे ध्वजारोहणाचा राजकीयच इश्यू करत आहेत त्यामुळे हा प्रश्न पडला की हे जर एका राजकीय पक्षास करणे म्हणजे गैर समजले जात असेल तर ते कुणासाठीही बंदी असलेलेच कार्य आहे का काय. म्हणून हा प्रश्न मिपावरील विविध विचारांच्या सन्मान्य सदस्यांना विचारावासा वाटला.
दोन्हीही तुमच्याच प्रतिसादातुन
हे ते मूह मे राम बगलमे नथुराम तसले काही तर नाही ना?
तिरंगा फडकावणे आणि ध्वजारोहण हे दोन्हीचे अर्थ एकच आहेत. पण त्या अर्थात कुठलाही पक्ष आणायची गरज नाही इतके आधीच्या स्पष्टीकरणावरून आपल्याला समजेल असा गैरसमज झाला होता. पण नथुराम अथवा अजुन कसला किडाच असला की असे होत असावे. असो.
माझे आणि श्री. आमोद शिंदे यांचे काही रक्ताचे अथवा इतर नाते नाही. त्यामुळे ते येथे (कदाचीत येथेपण) खोटे बोलत आहेत. त्यांनी "काका" म्हणले म्हणून त्यांना असे बोलायला आवडते म्हणून मी "मामा" म्हणले इतकेच. तेंव्हा जर त्यांनी कुणाला खाजगीत अथवा जाहीरपणे आमचे नाते आहे असे सांगितले तर ती दिशाभूल समजावीत.
'ह.घ्या' चा फाँट साईझ वाढवायला हवा का काकांसाठी?
नाही हो मामा. तसे काही करायची गरज नाही. ह.घ्या. चा अर्थ नक्की प्रत्येकाला समजेलच असे समजता येत नाही. म्हणून स्पष्टपणे सांगितले इतकेच.
काय दिवस आलेत. टारुशी सहमती दर्शवावी लागतेय. ;)
मस्करी जाउदेत, पण खरच जर काश्मिर भारताचा भाग आहे अस आपण मानतो तर मग हा प्रश्न पडावाच का?
की काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे फक्त आपणच मानतो ?
काय दिवस आलेत. टारुशी सहमती दर्शवावी लागतेय.
खरच की! :-)
पण खरच जर काश्मिर भारताचा भाग आहे अस आपण मानतो तर मग हा प्रश्न पडावाच का?
माध्यमांमधे आणि राजकारणी ज्या पद्धतीने श्रीनगरमधे ध्वजारोहणाचा राजकीयच इश्यू करत आहेत त्यामुळे हा प्रश्न पडला की हे जर एका राजकीय पक्षास करणे म्हणजे गैर समजले जात असेल तर ते कुणासाठीही बंदी असलेलेच कार्य आहे का काय. म्हणून हा प्रश्न मिपावरील विविध विचारांच्या सन्मान्य सदस्यांना विचारावासा वाटला.
उत्तर जरी होय असे दिले असले तरी , हक्क दाखवलाच पाहीजे असं काही आहे का?
अमेरीकेत वाहतूकीचे काही नियम असतात जे पाळायचे असतात आणि लोक पाळतात. पण एक असं बोललं जातं - Do not insist on your right-of-way if it will help to avoid an accident.
जम्मू आणि कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे मानणार्या प्रत्येक भारतीयास देशातील उर्वरित भागांप्रमाणेच श्रीनगरमध्ये तिरंगा स्वतःच्या जबाबदारीवर फडकावण्याचे स्वातंत्र्य तसे आजही असावेच.
अपेक्षा एवढीच आहे, की फडकावणार्याने परिणामांची जबाबदारी टाळू नये - तितक्याच हक्काने स्वीकारावी. आणि तिरंगा फडकावण्यासाठी सरकारकडून कोणत्याही मदतीची (सुरक्षेची वगैरे) अपेक्षा करू नये - ती जोखीम (असल्यास) स्वतः उचलावी.
(बाकी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जो काही बंदोबस्त करणे किंवा जे काही निर्बंध घालणे प्रशासनास इष्ट वाटत असेल, तो बंदोबस्त करण्याचे किंवा ते निर्बंध घालण्याचे स्वातंत्र्य प्रशासन राखून ठेवतेच. ते निर्बंध योग्य न वाटल्यास त्याविरुद्ध वाटले तर जरूर सत्याग्रह अथवा सविनय कायदेभंगाची चळवळ करावी - पण घडतील ते परिणाम भोगण्याची आणि प्रशासनास दोष न देता परिणामांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेण्याची तयारी ठेवूनच. अन्यथा नाही.)
बाकी, जम्मू आणि कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे ज. आणि क.बाहेरील सामान्य भारतीय नागरिकास कितीही वाटो, पण सामान्य श्रीनगरवासीयास तसे जर वाटत नसेल, तर केवळ श्रीनगरमध्ये तिरंगे फडकावून भारतीयत्वाची भावना त्याच्यावर लादता येणार नाही. ज. आणि क.बाहेरील सामान्य भारतीयास काहीही वाटो, सामान्य श्रीनगरवासीयाच्या त्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत हेही विचारात घेणे गरजेचे आहे. त्याच्यावर तिरंगा लादण्यापेक्षा तो उत्स्फूर्तपणे स्वतःच (ज. आणि क.बाहेरच्यांची मदत न घेता) तिरंगा फडकावेल अशी परिस्थिती कशी निर्माण होऊ शकेल, ते बघणे फायद्याचे ठरेल. अन्यथा केवळ हक्क आहे म्हणून स्वतःच्या गल्लीत फडकावण्याऐवजी जबरदस्तीने श्रीनगरात तिरंगा फडकावण्याने, मुंबईत केवळ हक्क आहे म्हणून गाजावाजा करून छटपूजा करण्याने जे होते, तेच श्रीनगरात होईल, आणि कदाचित एक दिवस आपल्याच दांडगाईने आणि मूर्खपणाने जम्मू आणि कश्मीर कायमचे हाताबाहेर घालवून बसू.
उत्तम प्रतिसाद.
आपल्या जबाबदारीवर करावे हे आवडले.
ऑन सेकंड थॉट्स, आपल्या जबाबदारीवर कोणी ध्वजारोहण केले आणि काही भडकले तर अफेक्ट होणार्यात फक्त एकटा तो करणाराच नसेल. तर तिथली सामान्य जनताही असेलच.
त्यामुळे तुमचाच (योग्य) विचार मी थोडी भर घालून लिहितो.
कोणा नागरिकाला (इन्डिव्हिज्युअल) झेंडावंदन करायचे असेल तर त्याच्या हिमतीची दाद देऊन शक्य तेवढी सुरक्षा पुरवणे सरकारचे कर्तव्य आहे.
जर एखादा पक्ष, गट, मॉब मिळून देशाच्या इतर भागातून रॅली, यात्रा, एकजूट, जमवाजमव इ इ करत तिथे येणार असेल आणि या पार्श्वभूमीवर (किंवा या पार्श्वभूमीमुळेच ) काही झाले तर जबाबदारी त्या पक्षाची /गटाची.
पण एक प्रश्न अनुत्तरित राहतो.
तो पक्ष किंवा गट जबाबदारी घेणार म्हणजे काय करणार..?
हो आमच्या लोकांनीच केले हे कृत्य..त्याचा आम्हाला अभिमान आहे.. असे डिक्लेअर करणे म्हणजे जबाबदारी घेणे असं मानलं जातं ..पण ते खरं आहे का?
तिथे राहणार्या लोकल जनतेलाही झळ लागेल, त्यांचे जीव जातील, किंवा पुन्हा त्यांचे पर्यटनाधारित धंदे काही काळ ठप्प होतील..त्यांची जबाबदारी हे कसे घेणार?
गहन आहे विषय..
कोणा नागरिकाला (इन्डिव्हिज्युअल) झेंडावंदन करायचे असेल तर त्याच्या हिमतीची दाद देऊन शक्य तेवढी सुरक्षा पुरवणे सरकारचे कर्तव्य आहे.
"कर्तव्य" कशापायी?
आधीच सुरक्षा यंत्रणेवर एवढा ताण असताना केवळ कोणाला वाटले म्हणून एखाद्या व्यक्तीला (इंडिव्हिज्युअल अशा अर्थी) संरक्षण देत बसायला सुरक्षा यंत्रणांना दुसरे उद्योग नाहीत काय? ही काय सहल आहे काय?
शक्य असेल तर सरकारने सुरक्षा पुरवावी इथपर्यंत ठीक आहे. पण परिस्थितीचा विचार न करता (किंवा परिस्थितीच्या नाकावर टिच्चून) जर कोणाला केवळ आपला मुद्दा दामटण्यासाठी (स्वतःच्या घरी न करता) जाहीर झेंडावंदन करायचे असेल, तर त्याला इतर सर्व कामधाम सोडून सुरक्षा पुरवत बसणे हे सरकारचे "कर्तव्य" कसे ठरते बुवा? इतर आगी काय कमी लागल्या आहेत काय, की एखाद्याला दिवाळीची खाजगी आतषबाजी करायची तर चुकून आग लागू नये म्हणून अग्निशामक दलाने सज्ज रहायला?
मुळात खाजगी आतषबाजी करणार्याचाही ती पेट्रोलपंपावरच करण्याचा अट्टाहास का असावा?
मुळात खाजगी आतषबाजी करणार्याचाही ती पेट्रोलपंपावरच करण्याचा अट्टाहास का असावा?
यावरुन एक किस्सा आठवला, हि एक सत्य घटना आहे.
आमचि एक पेट्रोल पंपाची जागा आमच्या ताब्यात घ्यायचि होति, पेट्रोल पंपाचा मालक ति सहजा सहजी ताब्यात देत नव्हता, कोर्टात निकाल लागला, जागा आमच्या ताब्यात आली. पन मालकाने एक युक्ती केलि, त्याने त्या जागेवर खाली टाकित काही पेट्रोल शिल्लक आहे असे सांगुन ति जागा तात्पुरति ताब्यात ठेवली. त्याची युक्ति अशी होति कि पुढे हाय कोर्टात अपिल करुन अगोदरच्या निकाला वर स्थगिति मिळवुन पुन्हा ति जागा वापरन्यास सुरुवात करने. आता आम्हाला काय कळेना काय करायचे ते. तिथेच एक बाजुला छोटेसे मंदिर होते. मग आम्हि पन एक होम करनार आहे, असे जाहीर केले. (खरे तर करनार नव्हतो, पन असे केवळ जाहीर केले. आनि त्याचे सगळे सामान तिथेच पडुन होते.) जागा धड न त्याच्या ताब्यात होति न आमच्या. पेट्रोल मालकाला घामच फुटला. अग्निशामक दलाला सविस्तर कळवुन वगेरे आम्हि पत्रिका पन वाटल्या. खरेच करंत आहे असे समजताच त्याने एका दिवसांत सगळे खाली करुन टाकले. आम्हि सर्वांनि आपापल्या गाड्या आनुन पेट्रोल भरुन घेतले, ते संपवुन मग जागा आमच्या ताब्यात. कोर्टात केस अजुनही चालू आहे, पन जागा आता आमच्या ताब्यात आहे. निकाल काय कधि लागेल तो लागेल. (गेलि १५ वर्शे केस चालु आहे. ).
हे पटले.
त्यामुळे सरकारने इन्डिव्हिज्युअल आणि गट असा काही फरक करावा हा मुद्दा मागे घेत आहे.
फक्त जबाबदारी घेतली तरी कशी घेणार हा मुद्दा व्यक्ती / पक्ष / गट / नेतृत्वाखाली जमा झालेला संघटित समूह यांच्याबाबतीत खुला ठेवतो.
आधीच सुरक्षा यंत्रणेवर एवढा ताण असताना केवळ कोणाला वाटले म्हणून एखाद्या व्यक्तीला (इंडिव्हिज्युअल अशा अर्थी) संरक्षण देत बसायला सुरक्षा यंत्रणांना दुसरे उद्योग नाहीत काय?
अनेक राजकीय नेते/मंत्री यांना त्यांच्या कुटुंबियाना सुरक्षा कवच पुरवले जाते त्याचे काय? सामान्य माणसाला जिव नाहीये का? की त्यांनी किडामुंगीसारखे मरावे.हे सुरक्षा काश्मीरसारख्या ठिकाणीच पुरवण्याची अपेक्षा आहे. कारण विरोधी गटाला सिमेपलीकडुन रसद मिळते हे विसरता कामा नये.
मुळात खाजगी आतषबाजी करणार्याचाही ती पेट्रोलपंपावरच करण्याचा अट्टाहास का असावा?
तो पेट्रोलपंप आहे हे कुणी सांगीतले? तेथे परदेशातुन स्फोटके आणुन ठेवण्यात आली आहेत याची माहिती नाही का आपल्याला?
तो पक्ष किंवा गट जबाबदारी घेणार म्हणजे काय करणार..?
हो आमच्या लोकांनीच केले हे कृत्य..त्याचा आम्हाला अभिमान आहे.. असे डिक्लेअर करणे म्हणजे जबाबदारी घेणे असं मानलं जातं ..पण ते खरं आहे का?
हो नक्कीच. कारण त्यात पुढच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची "तयारी" दिसते.
(नंतर आपल्या पक्षाच्या खर्या/काल्पनिक दहशतीचा बागुलबुवा दाखवून ती कारवाई होणार नाही अशी व्यवस्थाही करता येते).
परंतु सध्याच्या चर्चेतील पक्षाचा करून झाल्यावर ही आयुष्यातली सर्वात दु:खद घटना आहे असे म्हणण्याचा आणि गृहमंत्रीपदावर राहून स्वतःचे नावच आरोपीच्या यादीतून गाळून घेण्याचा इतिहास आहे.
देण्यासाठी सोय नसल्याने इथे देत आहे.
बर्याच बाजु आहेत या प्रश्नाला.
सर्वप्रथम श्रीनगर किंवा काश्मीरमधे झेंडावंदन करावे का असा प्रश्नच नाही. लाल चौकात ते करावे का हा प्रश्न आहे. (माझ्या माहितीप्रमाणे श्रीनगरमधे तिरंगा बक्षी स्टेडियममधे फडकावला जातो, श्रीनगरचा केंद्रबिंदु असलेल्या लाल चौकात नाही. अपवादात्मक परिस्थितीत पुर्वी ते झालेले आहे. पं. नेहरुनी देखील तेथे झेंडावंदन केले आहे.)
मुळात श्रीनगरमधील झेंडावंडनाचा प्रश्न अनेकपदरी असण्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे जम्मु व काश्मीर हे स्वतःचा झेंडा असलेले भारतातील एकमेव राज्य आहे. जम्मु आणि काश्मीरमधे फक्त झेंडाच नाही तर कायदे देखील वेगळे आहेत. तेथे अन्य कुठुन जाऊन मालमत्ता देखील खरेदी करता येत नाही. त्या अर्थी ते संपुर्ण स्वायत्त आहे. भारताचा राष्ट्रध्वज हे त्या राज्याला भारताशी बांधुन ठेवणारे प्रतिक आहे.
जम्मु काश्मीरमधे परिस्थिती काय आहे याचा वस्तुनिष्ठ अंदाज बाहेर बसुन घेणे अवघड आहे. माझ्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमधे तेथील परिस्थिती बरीच बदलली आहे. परंतु जर तिरंगा फडकावण्याने तेथे परिस्थिती संपुर्णता बदलणार असेल तर हे गंभीरच आहे. अश्या परिस्थितीत तेथे तिरंग्याचे राजकारण होणे गैर आहे यात शंकाच नाही.
पण तिरंग्याचे राजकारण दोन्ही बाजुंना करायचे आहे असे मला वाटते. जर फुटीरतावादी तेथे झेंडावंदन करु देणार नसतील तर केवळ लांगुलचालन न करता एका बाजुला काश्मीरमधील जनतेचा विश्वास मिळवण्याचे प्रयत्न व तेथे भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्याचा प्रयत्न एकसमयावच्छेदे व्हायला हवा. त्यासाठी पक्षभेद, प्रांतभेद, धर्मभेद विसरुन सगळ्यांनी एकत्र यायला हवे.
"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" या विषयाला समांतर हा कौल आहे. तेथे मी हेच विस्ताराने लिहीले होते. (दुर्दैवाने त्या पोस्टवर कोणिही प्रतिक्रीया दिली नव्हती)
http://www.misalpav.com/node/16180#comment-275069
काश्मीर समस्येचे मुळ यात आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत.
हे असे होउ नये म्हणून डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ साली काश्मीरमधे देह ठेवला. परन्तु अजून पर्यन्त काश्मीर समस्येचा शेवट करता येत नाही याचे वाईट वाटाते.
पण ही माहितीच खूप जणांना नाही असे दिसत आहे.
बाकी, जम्मू आणि कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे ज. आणि क.बाहेरील सामान्य भारतीय नागरिकास कितीही वाटो, पण सामान्य श्रीनगरवासीयास तसे जर वाटत नसेल, तर केवळ श्रीनगरमध्ये तिरंगे फडकावून भारतीयत्वाची भावना त्याच्यावर लादता येणार नाही. ज. आणि क.बाहेरील सामान्य भारतीयास काहीही वाटो, सामान्य श्रीनगरवासीयाच्या त्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत हेही विचारात घेणे गरजेचे आहे.
विस वर्षापुर्वी ज.आणि का. मधील लाखो रहीवाश्यांना बाहेर घालवुन दिले आहे. ते आता ज. आणि क.बाहेर सामान्य भारतीय (खरेतर निर्वासीत हाच शब्द योग्य) म्हणून रहात आहेत. त्यांच्या भावना कुठल्या कॅटेगरीत टाकणार????????
विस वर्षापुर्वी ज.आणि का. मधील लाखो रहीवाश्यांना बाहेर घालवुन दिले आहे. ते आता ज. आणि क.बाहेर सामान्य भारतीय (खरेतर निर्वासीत हाच शब्द योग्य) म्हणून रहात आहेत. त्यांच्या भावना कुठल्या कॅटेगरीत टाकणार????????
हिम्मत असेल तर त्यांनी स्वतः श्रीनगरला आपल्या घरी परत जाऊन झेंडावंदन करून आपल्या भावना जरूर व्यक्त कराव्यात. दिल्लीत बसून बोलून काहीही उपयोग नाही.
त्यांनी बोलून दाखवले (प्रत्यक्ष कृती केली तर उत्तमच!) तरीही समजू शकतो. पण त्यांचे नाव पुढे करून स्वतःचीच पोळी भाजू पाहणार्या उपटसुंभांचे काय काम?
हिम्मत असेल तर त्यांनी स्वतः श्रीनगरला आपल्या घरी परत जाऊन झेंडावंदन करून आपल्या भावना जरूर व्यक्त कराव्यात. दिल्लीत बसून बोलून काहीही उपयोग नाही.
हिम्मत असेल तर भारत आणि काश्मीर सरकार तिरंगा यात्रेत भाग घेणा-यांना परत पाठण्यासाठी जसा फौजफाटा वापरत आहेत, त्या फौजफाट्याच्या संरक्षाणात काश्मीरपंडीना परत श्रीनगरला घेउन जावे.
सरकारची हिम्मत नाही त्यांना परत नेउन त्यांचे हक्क परत देण्याची. त्या बिचा-यांची कशाला हिम्मत काढता. त्यांच्यापाठिशी कुठलेही (भारत अथवा पाकीस्तानचे) सरकार नसल्यानेच त्यांना पळ काढावा लागला ना. शक्य असेल तर त्यांच्याबद्दल चांगले बोला.
अगदी योग्य भाषेत चिंतामणी ह्यांनी आपले मत मांडले आहे .
तेथील जनतेच्या हाती केंद्र सरकारच्या योजना व निधी (जो सामान्य भारतीय करातून देतो ) तो पोहचतो का ?
त्यांना भडकवणारे नेमका कोणत्या मुद्याचा वापर करतात .
लष्कर विरुध्ध त्यांना राग आहे .तर काश्मीर पोलीस नागरिकाच्या मध्ये विश्वास का निर्माण करत नाही .
आज पाकिस्तान मधील धर्मांच्या नावावर यादवी (वर्षभर कराचीत झालेली जातीय दंगल पश्तून पठाण व मुजाहीर (भारतातून गेलेले व काराचीस्थित ) ) ह्या व अनेक गोष्टी दिसत नाही का ?
ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात शिरवून त्या मानाने भारतात शांतता आहे .आज खलिस्तान मागणारे ह्या देशात सुखात आहेत प्रगतीचा हिस्सा बनू पाहत आहे ह्या गोष्टी सांगणे महत्वाचे आहे .
भावनेचे राजकारण करून जनतेला भूलावायाचा जमाना गेला हे सर्व पक्ष लक्षात घेतील अशी आशा करूया .
जम्मू आणि कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे मानणार्या प्रत्येक भारतीयास देशातील उर्वरित भागांप्रमाणेच श्रीनगरमध्ये तिरंगा स्वतःच्या जबाबदारीवर फडकावण्याचे स्वातंत्र्य तसे आजही असावेच.
जर कोणी स्वतःच्या जबाबदारीवर फडकवत असेल तर सरकारने त्यावर बंदी घालावी का? मग हक्क कुठे उरला? हाच तर मुद्दा आहे.
म्हणून स्वतःच्या गल्लीत फडकावण्याऐवजी जबरदस्तीने श्रीनगरात तिरंगा फडकावण्याने, मुंबईत केवळ हक्क आहे म्हणून गाजावाजा करून छटपूजा करण्याने जे होते, तेच श्रीनगरात होईल,
अगदी... ते राजकारणी करतात आणि त्यांना पाठींबा द्या असे कोण म्हणतयं? मी म्हणतोय की राजकारण्यांना विरोध करण्याच्या नादाता झेंडावंदनाच्या हक्कालाच विरोध होत आहे का? आणि ते देखील जो भाग आजही स्वतंत्र भारताचा भाग आहे अशा भागासंदर्भात? प्रश्न केवळ इतकाच आहे.
आणि कदाचित एक दिवस आपल्याच दांडगाईने आणि मूर्खपणाने जम्मू आणि कश्मीर कायमचे हाताबाहेर घालवून बसू.
सहमत. पण त्यातील मुर्खपणा हा तमाम भारतीय बुद्धीवादी विचारवंत जे काश्मीरच्या बाबतीत "वेगळा" विचार करणे जनतेत विविध मार्गाने पसरवतात त्यांच्याकडून होत आहे आणि तेच काळजीचे कारण आहे.
शुचि मॅडम, प्रतिसाद आवडला..
मी काय म्हणतो, परिस्थिती नियंत्रणात वगैरे ठेवण्यासाठी नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा वगैरे आणण्याचा सरकारला हक्क असतो का ? का जळून खाक झाले तरी चालेल पण नागरिकांना मुलभूत हक्क बजावता आलेच पाहिजेत यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ?
हो.
शुचि यांच्या प्रतिसादाशी साधारण सहमत.
नरसिंहराव पंतप्रधान असतानाच्या काळात तेव्हाचे भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनीही अशीच (म्हणजे मी ध्वज फडकवणार अशी) घोषणा केली होती. त्यांची हौस तत्कालीन सरकारने त्यांना (बहुधा एकट्यांनाच) कडेकोट बंदोबस्तात श्रीनगरला नेऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पुरवली होती असे स्मरते.
श्रीनगर जर भारताचा भाग असेल तर असायलाच हवे.
मात्र श्रीनगर जर भारताचा भाग नसेल तर जसे बुद्धीवादी विचारवंती भुमिका मांडणारे जे प्रतिपादित करतात त्यानुसार महाराष्ट्र सुद्धा भारताचा भाग मानता येणार नाही. यासाठी विचारवंतांनी मांडलेल्या भुमिकेत जिथे जिथे काश्मिर असा उल्लेख आहे तिथे महाराष्ट्र किंवा मराठा साम्राज्य करा. अजुन आवश्य्क ते वाक्यात बदल करा. भुमिका तयार होईल. मग पूण्यातल्या अलका चौकात किंवा शनीवार वाडा किंवा इतरत्र कुठेही ज्यांना तिरंगा फडकावयाचा आहे त्यांनी आपल्या जबाबदारीवर फडकवावा असे विधान मुख्यमंत्री (म्हाराष्ट्राचे) करु शकतील आणि त्यांना विचारवंतांनी पाठींबा नक्की द्यावा. कसे?
नागपुर मधील "रेशम बाग " भागात भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते याचा तज्ञानी खुलासा करावा
या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. कुणाचीच परवानगी लागत नाली जसे तुमच्या-आमच्या घरावर अथवा अजून कुठल्याही इमारतीवर झेंडा फडकवायला परवानगी (मला वाटते प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी तर नक्कीच) लागत नाही. आपल्याला सर्वांनाच राष्ट्रध्वज फडकवण्याचे अथवा न फडकवण्याचे स्वातंत्र्य आहे. पण तेच स्वातंत्र्य श्रीनगरमधील लाल चौकात चालू शकते का ह्यावर मौन न पाळता खुलासा करू शकलात तर बरे होईल.
रेशीम बाग भागात राष्ट्र ध्वज फडकवायला कोणाची परवानगी लागत नसेल पण तेथली एक राष्ट्र सेवी संघटना मात्र त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर कधीच राष्ट्रीय ध्वज लावत नाही. त्याचे कारण देखील कोणाला सांगत नाहीत.
इदगाह मैदानावर राष्ट्रध्वज लावायला मात्र ते सदैव उत्सूक असतात.
तुम्हाला अशा अंतस्थ बातम्या कशा कळतात कोण जाणे! आम्ही आपले टाईम्स सारखी वृत्तपत्रे वाचत असतो.
TNN, Jan 27, 2002, 11.16pm IST
bangalore: the rss will hoist the national flag at its shakas every year from now onwards. the rss, which has set for itself the goal to induce nationalism in every citizen of the country, had till now not followed the national practice of hoisting the tricolour at its shakas every august 15 and january 26, except for a few exceptions. they, however, hoisted the tricolour on this republic day at its nagpur headquarters. rss national executive member k. suryanarayana rao told reporters at the samarasata sangam (social harmony meet) here on sunday that the rss did not biannually hoist the flag because till a few days ago, there were stringent rules restricting the hoisting of the flag only on government buildings.of the flag only on government buildings. ``now that the rules have been relaxed, we will also hoist the flag,'' he said. queried about the rss insistence that the national flag should be hoisted at the idgah maidan in hubli which led to communal tension there for three years in a row, rao claimed: ``the concerned maidan is a public ground, where they used to come and pray once a year. it does not belong to them and there is nothing wrong in insisting that the flag should be hoisted at a municipal maidan.'' rao said the rss had also been reluctant to hoist the flag at their shakas because the swayamsevaks wanted to participate in the general republic day and independence day functions with the mainstream. ``if we hold the function at the shakas, naturally all of them have to be present there and will miss out the functions at schools and offices,'' he pointed out. according to rao, the rss had earlier flown the national flag at all the shakas in the first year after the indian republic was formed in 1950. ``that year, the then chief m.s. golwalkar himself hoisted the flag at nagpur. last independence day, rss chief k.s. sudarshan hoisted the flag at udupi, while general secretary mohan g. bhagavath hoisted it at nagpur. it is wrong to say that this is the first year that the rss has flown the tricolour,'' he maintained, adding that the swayamsevaks carried the tricolour in all their agitations and fights.
असो. एखादी गोष्ट सतत सांगितली की ती खरी वाटायला लागते, मग ते वास्तव असो अथवा नसो...विस्तव तयार करता येतो.
१. बातमीत २००२ पूर्वी झेंडा फडकवत नव्हतो हे मान्य केले आहे.
२. बातमीत २००२ पूर्वी झेंडा न फडकवण्याचे जे कारण (म्हणे झेंडा फडकवण्याविषयी कडक नियम) सांगितले आहे ते खोटे आहे.
पूर्वीच्या नियमांप्रमाने फक्त सरकारी इमारतीवर रोज झेंडा फडकवता येत असे. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला कोणालाही अनिर्बंध झेंडा लावण्याची मुभा होती. झेंडा फडकवताना काळजी घेण्यासंबंधी नियम होते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा न फडकवण्याविषयी नियम कधीही नव्हता.
येथे दिलेल्या माहिती नुसारः
According to flag code of India citizens of India did not had the right to hoist the Indian flag except for some important days like Republic day, Independence day and Mahatma Gandhi's birthday. A renowned industrialist Naveen Jindal challenged this in the court as when he hoisted the flag on his office building he was told not to do so as it may be taken as a breach of code of Indian flag. Then he lodged a PIL (Public Interest Litigation) in the court now the decision of the court is pending in this regard but a temporary permission has been granted to Indian citizens to hoist the flag on any day but in a respectable manner.
नव्या नियमांनुसार सर्व दिवशी झेंडा फडकवण्याची मुभा आहे. पूर्वी सुद्धा २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी सर्वांना झेंडा फडकवण्याची मुभा होती.
बातमीत २००२ पूर्वी झेंडा फडकवत नव्हतो हे मान्य केले आहे.
अर्थातच मी कुठे म्हणतोय नाही म्हणून. पण आधी आरोप काय होता? : "पण तेथली एक राष्ट्र सेवी संघटना मात्र त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर कधीच राष्ट्रीय ध्वज लावत नाही. त्याचे कारण देखील कोणाला सांगत नाहीत."
आता दिलेल्या बातमीत काय दिसते?
``if we hold the function at the shakas, naturally all of them have to be present there and will miss out the functions at schools and offices,'' he pointed out. according to rao, the rss had earlier flown the national flag at all the shakas in the first year after the indian republic was formed in 1950. ``that year, the then chief m.s. golwalkar himself hoisted the flag at nagpur. last independence day, rss chief k.s. sudarshan hoisted the flag at udupi, while general secretary mohan g. bhagavath hoisted it at nagpur. it is wrong to say that this is the first year that the rss has flown the tricolour,'' he maintained, adding that the swayamsevaks carried the tricolour in all their agitations and fights.
आधी म्हणणार, "कारण" कोणाला सांगत नाहीत, मग म्हणणार कारण पटत नाही, मग अजून काही... काही करून एक संशयाचे जाळे तयार करत रहायचे...
बातमीत २००२ पूर्वी झेंडा न फडकवण्याचे जे कारण (म्हणे झेंडा फडकवण्याविषयी कडक नियम) सांगितले आहे ते खोटे आहे.
जर त्यांना खोटेच बोलायचे असते तर नंतरच्या विधानात, "rao said the rss had also been reluctant to hoist the flag at their shakas because the swayamsevaks wanted to participate in the general republic day and independence day functions with the mainstream." असे म्हणलेच नसते (आणि परत हे कुठेही आधीच्या आरोपाप्रमाणे लपवलेले नाही आणि त्यांचे मत, पक्षी: कारण देखील सांगितले आहे).
त्यामुळे कदाचीत आधीचे वाक्य हे कायम (फक्त दोनच दिवसांसाठी नाही) संघाच्या मुख्य कचेरीच्या इमारतीवर ध्वज फडकवण्यासाठीचे असेल. तसे ते करतात का हे माहीत नाही कारण मी संघाच्या इमारतीला पाहीलेले देखील नाही. तुमचा काही अनुभव/निरीक्षण असेल तर अवश्य सांगा.
झेंडा न फडकवण्याचे पहिले कारण
rss national executive member k. suryanarayana rao told reporters at the samarasata sangam (social harmony meet) here on sunday that the rss did not biannually hoist the flag because till a few days ago, there were stringent rules restricting the hoisting of the flag only on government buildings.of the flag only on government buildings. ``now that the rules have been relaxed, we will also hoist the flag,'' he said.
हेच दिले आहे. आता नियम शिथिल झाले आहेत तर आता आम्हीही फडकवू. म्हणजेच न फडकवण्याचे कारण कडक नियम हेच सांगितले आहे. पण असे तथाकथित कडक नियम कधीच नव्हते.
>>त्यामुळे कदाचीत आधीचे वाक्य हे कायम (फक्त दोनच दिवसांसाठी नाही) संघाच्या मुख्य कचेरीच्या इमारतीवर ध्वज फडकवण्यासाठीचे असेल.
नाही. तेही स्वच्छच लिहिले आहे.
the rss will hoist the national flag at its shakas every year from now onwards. the rss, which has set for itself the goal to induce nationalism in every citizen of the country, had till now not followed the national practice of hoisting the tricolour at its shakas every august 15 and january 26,
म्हणजे बोलणे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी विषयीच चालू होते.
इतर ठिकाणच्या झेंडावंदनात सहभागी होणे ही शुद्ध सारवासारव.
या वादात पडायची फारशी इच्छा नाही.तरीही एक प्रश्न पडतोच. २००२ मध्ये समजा २६ जानेवारी रोजी झेंडावंदन केले.पण त्यानंतर दर वर्षी केले जात आहे का?२६ जानेवारी आणि १५ ऑगस्टनंतर कुठेकुठे कोणीकोणी झेंडावंदन केले याचे वृत्तांत येतात त्यात रा.स्व.संघाच्या नागपूर कार्यालयात झेंडावंदन झाले अशी बातमी मी तरी वाचलेली नाही. चू.भू.दे.घे. रेफरन्स मिळाल्यास द्यावेत ही विनंती.
बाकी झेंडावंदन कोणत्या संघटनांनी करावे यासाठी काही नियम आहेत का?सरकारी कचेऱ्या (मंत्रालय, जिल्हा परिषदा इत्यादी),शाळा, राजकिय पक्षांची कार्यालये याठिकाणी झेंडावंदन करतात.पण रा.स्व.संघासारख्या संघटनांनीही झेंडावंदन करावे असे अपेक्षित असते का?
"...त्याचे कारण देखील कोणाला सांगत नाहीत."
आता कारण देखील सांगितले पण ते तुम्हाला हवे तसेच असले तर "देखील सांगितले" मधे बसते नाहीतर बसत नाही असे दिसते.
बरं, मूळ मुद्दा ना भाजपासंबंधीत ना संघा संबंधीत तर फक्त भारतीय नागरीकाला श्रीनगर मधे ध्वज फडकवण्याच्या हक्का बाबत... त्याला तुम्ही म्हणजे श्री. थत्ते यांनी स्पष्टपणे "हो" असे उत्तर दिले. अनेकांनी माझ्यावर योग्य टिका केली की असा प्रश्नच कसा पडतो म्हणतो आणि अर्थातच "हो" असे उत्तर देत. श्री. धनंजय यांनी देखील व्हर्च्युअल टपलीत मारायचा प्रयत्न करत का होईना, "हो" असे उत्तर दिले. श्री. हृषिकेश यांनी स्पष्टपणे कौल आवडला नाही असे म्हणत त्यांना हवे ते "इतर" असे उत्तर स्पष्टपणे (unequivocally) दिले. असेच इतरही आहेत ज्यांनी मूळ कौलाबाबत मत मांडले.
पण त्या मूळ कौलाच्या मुद्यावर (भारतीय नागरीकाचा हक्क) काहीच न बोलता चर्चेतील उपस्थिती कशातून जाणवली? : "नागपुर मधील "रेशम बाग " भागात भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते याचा तज्ञानी खुलासा करावा" या एका प्रश्नाने. त्याला स्पष्टपणे "कुणाचीच नाही" असे उत्तर दिल्यावर आणि त्यातच "पण तेच स्वातंत्र्य श्रीनगरमधील लाल चौकात चालू शकते का ह्यावर मौन न पाळता खुलासा करू शकलात तर बरे होईल. " असे विचारल्यावरही त्यावर उत्तर देण्याचे टाळले जाते. यातून काय दिसते? त्याचे कारण कळू शकेल का?
पण ते कारण न सांगता, मग अजून घोळात घेत अजून पुढे संघाचा ध्वजारोहणाशी संबंध लावायचा... मग त्यांनी का केले नाही हे त्यांचे कारण सांगितले की त्याला "सारवासारव" म्हणायचे. आता एक प्रश्न विचारतो की तुमचे या संबंधात नक्की काय विश्लेषण आहे? जर संघाने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कधीच ध्वजारोहण केले नसले तर त्यातून तुमचा निष्कर्ष काय आहे ते स्पष्ट पणे सांगाल का?
बातमीत तरी तसे दिसले नाही कारण "`that year, the then chief m.s. golwalkar himself hoisted the flag at nagpur. last independence day, rss chief k.s. sudarshan hoisted the flag at udupi, while general secretary mohan g. bhagavath hoisted it at nagpur. it is wrong to say that this is the first year that the rss has flown the tricolour,'' हे देखील म्हणलेले आहे. शिवाय अजून अगदी हौसच असेल तर, Sarsanghachalak hoisting national flag on republic day ही गेल्या वर्षीची भुवनेश्वरची चित्रफीत देखील बघू शकाल. तसेच गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाची डेक्कन हेरॉल्ड मधली बातमी पण वाचू शकता.
बाकी (वर विचारलेल्या प्रश्नाव्यतिरीक्त) अजून एक प्रश्न पडला, की सरसंघचालकांनी ध्वजारोहण केल्याची बातमी वृत्तपत्रात दिसते तशी काँग्रेसच्या कचेरीवर काँग्रेसाध्यक्षांनी ध्वजारोहण केल्याची बातमी दिसते का? तसे ते करतात का?
>>जर संघाने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कधीच ध्वजारोहण केले नसले तर त्यातून तुमचा निष्कर्ष काय आहे ते स्पष्ट पणे सांगाल का?
तो निष्कर्ष दुसर्या धाग्यावर बर्याच जणांनी सांगितला. श्रीनगरमध्ये मुद्दाम ध्वजारोहण करायला जाणे म्हणजे खाजवून खरूज काढणे असा निष्कर्ष होता.
[आता श्रीनगरमध्ये झेंडा भाजप फडकावणार होते- संघ वेगळा आणि भाजप वेगळे असे उत्तर कृपया देऊ नये].
संघाच्या ध्वजारोहणाचा मुद्दा हा कौलाचा विषय नसला तरी आणि कौल अगदी निरागस प्रश्न विचारल्यासारखा काढला असला तरी हेतू इतका सरळ नव्हता हे तर उघड आहे. कौलाचे सरळ उत्तर सगळ्यांना स्वातंत्र्य हवे असेच आहे. पण त्यापुढचा अध्याहृत प्रश्न तुम्ही नाकारला तरी तो सगळ्या वाचकांना कळलाच. म्हणून हे काही मुद्दे चर्चेत पुढे आले.
>>बाकी (वर विचारलेल्या प्रश्नाव्यतिरीक्त) अजून एक प्रश्न पडला, की सरसंघचालकांनी ध्वजारोहण केल्याची बातमी वृत्तपत्रात दिसते तशी काँग्रेसच्या कचेरीवर काँग्रेसाध्यक्षांनी ध्वजारोहण केल्याची बातमी दिसते का? तसे ते करतात का?
काँग्रेस बहुतेक वेळा सत्तेत असल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष/पदाधिकारी सरकारी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात असतात. काँग्रेसच्या कचेरीवर कोणीतरी दुसरे ध्वजारोहण करत असावेत. मला माहिती नाही.
ता. क. - मघाच्या प्रतिसादात एक लिहायचे राहून गेले होते. माझ्या आधीच्या प्रतिसादात २००२ पर्यंत झेंडा फडकवत नव्हते हे मान्य केले आहे असे वाक्य होते. विजुभाऊंनी ऐकीव माहितीवर आरोप केला असेल अशी एक शंका होती ती फोल ठरल्यामुळे ते वाक्य लिहिले होते.
ता. क. - मघाच्या प्रतिसादात एक लिहायचे राहून गेले होते. माझ्या आधीच्या प्रतिसादात २००२ पर्यंत झेंडा फडकवत नव्हते हे मान्य केले आहे असे वाक्य होते. विजुभाऊंनी ऐकीव माहितीवर आरोप केला असेल अशी एक शंका होती ती फोल ठरल्यामुळे ते वाक्य लिहिले होते.
त्यांची माहीती एकतर ऐकीवच होती अथवा कळत-नकळत वाढवून सांगितलेली होती ज्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे अथवा केले आहे:
>>>एक राष्ट्र सेवी संघटना मात्र त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर कधीच राष्ट्रीय ध्वज लावत नाही.
आता बातमीत आल्याप्रमाणे, "according to rao, the rss had earlier flown the national flag at all the shakas in the first year after the indian republic was formed in 1950. ``that year, the then chief m.s. golwalkar himself hoisted the flag at nagpur. last independence day, rss chief k.s. sudarshan hoisted the flag at udupi, while general secretary mohan g. bhagavath hoisted it at nagpur." म्हणजे १९५० ला केले होते हे नक्की. २००१ मधे केले हे देखील, "मागच्या वर्षी" या भागातून दिसते (बातमी २००२ ची आहे).
आता श्रीनगरमध्ये झेंडा भाजप फडकावणार होते- संघ वेगळा आणि भाजप वेगळे असे उत्तर कृपया देऊ नये
मग भाजपाने त्यांच्या दिल्लीतल्या आणि इतर ठिकाणच्या कचेर्यांवर नक्कीच ध्वजारोहण केले असावे. म्हणून मग संघाचे ध्वजारोहण झाले असे का समजत नाही? का तेंव्हा मात्र, "भाजप आणि संघ कृपया वेगळा समजा", असे म्हणणार?
कौलाचे सरळ उत्तर सगळ्यांना स्वातंत्र्य हवे असेच आहे.
हो पण तरी देखील ३ मते "नाही" आणी २ मते "इतर" ला पडली आहेतच.
काँग्रेस बहुतेक वेळा सत्तेत असल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष/पदाधिकारी सरकारी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात असतात. काँग्रेसच्या कचेरीवर कोणीतरी दुसरे ध्वजारोहण करत असावेत. मला माहिती नाही.
ठिक आहे. मग ती जर बातमी वृत्तपत्रात आली नाही, जर छायाचित्र उपलब्ध नसले तर काँग्रेस पक्षाने ध्वजारोहण केलेच नाही असे म्हणले तर चालेल का?
आता सरते शेवटी:
श्रीनगरमध्ये मुद्दाम ध्वजारोहण करायला जाणे म्हणजे खाजवून खरूज काढणे असा निष्कर्ष होता.
अहो काश्मीर प्रश्नाचे खरूज काय मी या कौलाच्या निमित्ताने अथवा त्यापेक्षा वेगळे म्हणजे भाजपाने ध्वजारोहणाच्या निमित्ताने खाजवले म्हणून निघणार होते का? अजून काय झाले म्हणजे खरूज आहे असे वाटेल? एकवेळ भाजप नुसते राजकारण करत आहे असे म्हणालात तर समजू शकतो अगदी सहमत आहे असे देखील म्हणेन (अर्थातच, तुम्ही नक्की काय म्हणता त्यावर सहमती अवलंबून असेल ;) ). पण जणू काही काश्मीर मधे अगदी नंदवनासारखे वातावरण आहे असे समजणे योग्य वाटते का? आणि नसले तर या जुन्या खरजेला काय भाजपाचे ध्वजारोहण कारण आहे का?
>>जर संघाने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कधीच ध्वजारोहण केले नसले तर त्यातून तुमचा निष्कर्ष काय आहे ते स्पष्ट पणे सांगाल का?
तो निष्कर्ष दुसर्या धाग्यावर बर्याच जणांनी सांगितला. श्रीनगरमध्ये मुद्दाम ध्वजारोहण करायला जाणे म्हणजे खाजवून खरूज काढणे असा निष्कर्ष होता.
पण तो धागा सोडुण कौलावर का पोस्ट करीत आहात????
या तेथे आणि चालवा तलवर.
इतरला मत दिले आहे. कारण प्रश्न ज्या कंटेक्स्टमधे विचारला आहे त्यावरून मुळात ही खाजवून काढलेली खरून 'अकाली' आहे असे माझे मत आहे.
अर्थात म्हणूनच विरोधीपक्ष दिशाहीन झाला आहे का? असे मिपाकरांना इथे विचारले आहेच.. बघुया काय म्हणतात मिपाकर
इतरला मत दिले आहे. कारण प्रश्न ज्या कंटेक्स्टमधे विचारला आहे त्यावरून मुळात ही खाजवून काढलेली खरून 'अकाली' आहे असे माझे मत आहे.
हा कौल "खाजवून काढलेली खरूज" असे वाटले म्हणून आक्षेप नाही अथवा व्यक्तीगत वाटले नाही. ज्याचेत्याचे मत. मात्र तसे म्हणत देखील भारतीय नागरीकास श्रीनगर मधे झेंडावंदनाचा हक्क आहे का याचे स्पष्ट "हो" अथवा "नाही" असे उत्तर देता येऊ नये याबद्दल मात्र निश्चित खेद वाटला.
अर्थात म्हणूनच विरोधीपक्ष दिशाहीन झाला आहे का? असे मिपाकरांना इथे विचारले आहेच.. बघुया काय म्हणतात मिपाकर
येथे प्रश्न विरोधी पक्षाचा नसून सामान्य जनतेचा आणि त्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि त्या संदर्भाने भारतीय सार्वभौमत्वाच्या सीमा कुठपर्यंत आहेत याचा आहे. या संदर्भात, कदाचीत तुम्हाला काश्मीर आपले वाटत नसेल इतकेच आपल्या प्रतिसादावरून वाटले. असो.
इतरला मत दिले आहे. कारण प्रश्न ज्या कंटेक्स्टमधे विचारला आहे त्यावरून मुळात ही खाजवून काढलेली खरून 'अकाली' आहे असे माझे मत आहे.
हा कौल "खाजवून काढलेली खरूज" असे वाटले म्हणून आक्षेप नाही अथवा व्यक्तीगत वाटले नाही. ज्याचेत्याचे मत. मात्र तसे म्हणत देखील भारतीय नागरीकास श्रीनगर मधे झेंडावंदनाचा हक्क आहे का याचे स्पष्ट "हो" अथवा "नाही" असे उत्तर देता येऊ नये याबद्दल मात्र निश्चित खेद वाटला.
अर्थात म्हणूनच विरोधीपक्ष दिशाहीन झाला आहे का? असे मिपाकरांना इथे विचारले आहेच.. बघुया काय म्हणतात मिपाकर
येथे प्रश्न विरोधी पक्षाचा नसून सामान्य जनतेचा आणि त्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि त्या संदर्भाने भारतीय सार्वभौमत्वाच्या सीमा कुठपर्यंत आहेत याचा आहे. या संदर्भात, कदाचीत तुम्हाला काश्मीर आपले वाटत नसेल इतकेच आपल्या प्रतिसादावरून वाटले. असो.
>>देशातील उर्वरीत भागांप्रमाणेच श्रीनगरमधे देखील सर्वांना तिरंगा फडकवण्याचे स्वातंत्र्य असायला हवे का?
विकासराव, क्षमा करा परंतु आपल्या मूळ प्रश्नच आम्हाला आवडला नाही..
श्रीनगर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही तेथे अर्थातच तिरंगा फडकवणार..!
दूध मांगोगे तो खीर देंगे,
काश्मिर मांगोगे तो चीर देंगे..!
आपला,
(गोळवलकरगुरुजी प्रेमी) तात्या.
देशातील इतर भागा॑प्रमाणे श्रीनगरमध्ये तिर॑गा फडकवण्याचे स्वात॑त्र्य असायला हवे का हा प्रश्न पडतो तरी कसा?
भारतात तिर॑गा नाही फडकवायचा तर काय कराचीत फडकवायचा का?
हक्काचा प्रश्न येतोच कुठे?उलट तिर॑गा फडकविण्याचे आपले कर्तव्य का समजू नये?
आणि परिणामा॑चा काय स॑ब॑ध?कर्तव्य म्हणून समजले तर परिणामा॑ची जबाबदारी घेण्याचा प्रश्नच उरत नाही.
स्वत॑त्र भारतात तिर॑गा फडकवण्यासाठी जोखीम उचलावी लागते हे ला॑छनास्पद वाटत नाही का?
यात दा॑डगाइचा प्रश्नच येत नाही.दा॑डगाइ करूनच काश्मिरी प॑डिता॑ना विस्थापित केले गेले हे कसे विसरणार?
मूर्खपणाने काश्मिरचा काही भाग घालवला आहेच्.याहून दूसरा मूर्खपणा कोणता बाकी राहिलाय काय ?
सामान्य भारतिया॑स काहिही वाटो सामान्य श्रीनगरवासिया॑च्या भावना लक्षात कशाला घ्यायच्या?तोच विचार स्वत॑त्र
खलिस्तान कि॑वा द्रविडीस्तानच्या वेळी केला का?आवश्यक वाटल्यास सैन्यदलानी कारवाइ केलीच ना!
ही खाजगी आतषबाजी तर नाहीच नाही.राष्ट्रध्वज हा राष्ट्राचा मानबि॑दू होय.
काश्मिरी प॑डित विस्थापित झाले म्हणून गळे काढण्यापेक्षा तिथे उरलेल्या जनतेला तुम्हीही विस्थापित होउ शकता,
हे कोण बेडरपणाने सा॑गणार यावर चर्चा करणे योग्य होइल.
येवढेच नव्हे तर राष्ट्रध्वज उभारण्यास विरोध करण्याराला राष्ट्रद्रोही का म्हणू नये?
संडासात, गर्दीच्या चेंगराचेंगरीमध्ये वगैरे झेंडा फडकवण्याचा अट्टाहास नको, असे वाटते.
किंवा ज्या ठिकाणी या क्षणी संडास नाही, पण घाण होणार असे दिसते आहे; किंवा ज्या ठिकाणी या क्षणी झेंडा कोणाच्या पायदळी नाही, पण लवकरच दंगल-गर्दी-चेंगराचेंगरीमुळे तो पायदळी तुडवला जाण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी झेंडा फडकवण्याबाबत काळजीपूर्वक विचार करावा, असे वाटते.
हे काश्मिरातच नव्हे तर देशभरात लागू असावे.
(हा अतिशय थियोरेटिकल-हायपोथेटिकल विचार श्री. विकास यांना कसा काय सुचला? अशी कुठली घटना झालेली-व्हायची आहे काय? कुठली घटना या संदर्भात त्यांच्या विचारात नव्हती, ते त्यांनी सांगितलेलेच आहे. पण तपशील माहीत असल्यास अधिक लागू करता येईल. फारच सर्वसामान्य तर्हेचा प्रश्न विचारला, तर उत्तर इतके मोघम-उथळ होते, की ते कुठेच लागू करता येत नाही. म्हणजे "बाळाला तहान लागल्यास आईवडलांनी घरच्याप्रमाणे परगावीसुद्धा पाणी द्यावे का?" या प्रश्नाचे मोघम उत्तर "होय" असेच आहे. पण कधीकधी अस्वच्छ पाणी टाळून आईवडील अन्यत्र जाऊन बाळाला पाणी पाजतात. कधीकधी पाण्याऐवजी कोकाकोला पाजतात. वगैरे.)
अशी कुठली घटना झालेली-व्हायची आहे काय? कुठली घटना या संदर्भात त्यांच्या विचारात नव्हती, ते त्यांनी सांगितलेलेच आहे.
धनंजय यांचा जरा गैरसमज झालेला दिसतोय. थोडा खुलासा. मी माझ्या विचारात घटना नव्हती असे म्हणलेले नव्हते. माझे (पहील्याच प्रतिसादातील) वाक्य खालील प्रमाणे आहे.
ही चर्चा भाजपाने ध्वजारोहण करावे का अथवा त्यांच्या एकता यात्रेसंदर्भात नसून, तो हक्क सर्वांना असायला हवा का या संदर्भात आहे, हे कृपयात ध्यानात ठेवावे.
यात स्पष्ट केले आहे असे मला वाटते, की सध्या भाजपाच्या ध्वजारोहणावरून चर्चा होत आहेत त्याचे कारण केवळ राजकारण आहे. माझे ते म्हणजे भाजपाला करायला द्यावे का नाही, त्यांनी करावे का नाही असे नसून कुणालाही (भारतीय नागरीकास) करायचा हक्क आहे का नाही हा आहे. उत्तरे पाहीली तर समजते (आत्ताप्रमाणे): ८७% हो, ४% नाही आणि ९% इतर अशी मते दिली गेली आहेत...
यावर (कौलावर) अधिक खुलासा नंतर करेन.
धन्यवाद
असे वाटते की त्या ८०-९०% "होय" उत्तरांपैकी काही "तहानल्या बाळाला पाणी पाजावे का? - होय!"? अशा प्रकारची असावीत.
त्यावरून "घरी गेल्यावर बाळाला पाणी देऊया" म्हणणार्या आईवडलांच्या परिस्थितीबद्दल काहीच सांगता येत नाही. इतकेच काय, स्वच्छ पाणी मिळत नाही अशा परिस्थितीत बाळाला कोकाकोला वगैरे पाजणार्या आईवडलांना "छी! तुम्ही बाळावर कसले संस्कार करता" असे हिणवणार्या लोकांना बालसंगोपनाबाबत काहीच कळत नाही, असे म्हणावेसे वाटते.
जम्मूमध्ये भारतीय तिरंगा शानदारपणे फडकताना मी चक्षुर्वै बघितलेला आहे, आणि श्रीनगरमध्ये तिरंगा फडकतानाची प्रकाशचित्रे बघितली आहेत. ते बघून डोळ्यांना सुख, आणि राष्ट्रभावनेस दिलासा दोन्ही मिळू शकतो.
राजकीय राडा करण्यासाठी जर कोणी तिरंगा वापरणार असेल - म्हणून वर "संडासात" किंवा "चेंगराचेंगरीत पायदळी तुडवला जाईल असे ठिकाण" ही तिरंगा न-फडकवायची ठिकाणे म्हणून सांगितली आहेत - तर सर्वांना हक्क आहे हा सामान्यनियम कसा वापरता येईल?
- - -
(टीप : येथे "तिरंगा सन्मान होईल अशा तर्हेनेच फडकवावा" हा भारतीय मानस गृहीत धरला आहे. अमेरिकन लोक त्यांच्या तारेपट्ट्यांची अंतर्वस्त्रे करतात, आणि पायपुसणी करतात. अमेरिकन झेंड्याच्या पॅटर्नची फडकी संडासात वापरली तरी काही फारसे बिघडणार नाही. अमेरिकनांच्या संस्कृतीमध्ये झेंडा जाळण्याबाबत राडा होतो - किंवा होत असे. देशादेशांत राष्ट्रचिह्नांबाबतच्या भावनांमध्ये असले तपशीलवार फरक असतात. माझे वरील उत्तर फक्त झेंड्याबाबतच्या भारतीय मानसाच्या संदर्भात आहे.)
- - -
अवांतर - सहीमधील ड्वायलॉक एकदम नामी!
माझे ते म्हणजे भाजपाला करायला द्यावे का नाही, त्यांनी करावे का नाही असे नसून कुणालाही (भारतीय नागरीकास) करायचा हक्क आहे का नाही हा आहे.
भारतीय नागरिकांस तसा हक्क नाही असे कुणीही म्हणालेले नाही. मग असा प्रश्न पडायचे काय कारण? आणि तोही श्रीनगर विषयी. (भाजपा खरंच तुमच्या मनात नव्हतं असं धरुन चालू!)
भाजपने काँग्रेसचा कात्रज करण्यासाठी लाल चौकात बराचसा साधर्म्य असलेला काँग्रेसचा झेंडा फडकवावा .
उत्तर नाही असे दिले आहे कारण माझ्या मते काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे दर्शवणारे कुठलेही वर्तन केंद्र सरकारकडून होताना दिसत नाही.
म्हण्जे आता १४ फेब्रुवारीला कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यास सरकार कडून बंदी घातली जाइल.
'माय नेम इज खान' सारखा सिनेमा भविष्यात आल्यास त्यावर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सरकारकडूनच बंदी घातली जाइल.
'हो' ला मत दिलं आहे.
प्रतिक्रिया
एक स्पष्टीकरण
ओ विकास काका एक काय ते
In reply to एक स्पष्टीकरण by विकास
अहो आमोदमामा,
In reply to ओ विकास काका एक काय ते by आमोद शिंदे
मग हा संदर्भ कशासाठी?
In reply to अहो आमोदमामा, by विकास
अहो मामा
In reply to मग हा संदर्भ कशासाठी? by आमोद शिंदे
तर्कक्रिडा %#४३५$%$
In reply to अहो मामा by विकास
डिसक्लेमर
In reply to तर्कक्रिडा %#४३५$%$ by आमोद शिंदे
खोटे??
In reply to डिसक्लेमर by विकास
नाही
In reply to खोटे?? by आमोद शिंदे
श्रिनगर भारतातंच आहे ना ?
सोप्पे!
In reply to श्रिनगर भारतातंच आहे ना ? by टारझन
काय दिवस आलेत...........
In reply to सोप्पे! by विकास
म्हणूनच
In reply to काय दिवस आलेत........... by गणपा
होय
प्रतिसाद पटला
In reply to होय by शुचि
+१
In reply to होय by शुचि
बराचसा सहमत
In reply to होय by शुचि
उत्तम..
In reply to बराचसा सहमत by पंगा
तो पुढचा प्रश्न
In reply to उत्तम.. by गवि
"कर्तव्य" कसे काय?
In reply to उत्तम.. by गवि
आवडले
In reply to "कर्तव्य" कसे काय? by पंगा
सहमत आहे
In reply to आवडले by मी_ओंकार
मुळात खाजगी आतषबाजी
In reply to आवडले by मी_ओंकार
पटले..
In reply to "कर्तव्य" कसे काय? by पंगा
हे कुठले तर्कशास्त्र???????
In reply to "कर्तव्य" कसे काय? by पंगा
नक्कीच
In reply to उत्तम.. by गवि
स्वतंत्र प्रतिसाद...
In reply to उत्तम.. by गवि
एक देश दो विधान, दो प्रधान दो निशान
In reply to स्वतंत्र प्रतिसाद... by प्रसन्न केसकर
बाकी, जम्मू आणि कश्मीर हा
In reply to बराचसा सहमत by पंगा
क्याटेगरी
In reply to बाकी, जम्मू आणि कश्मीर हा by चिंतामणी
हिम्मत असेल तर
In reply to क्याटेगरी by पंगा
अगदी योग्य भाषेत चिंतामणी
In reply to बाकी, जम्मू आणि कश्मीर हा by चिंतामणी
प्रतिसाद आवडला
In reply to बराचसा सहमत by पंगा
एक प्रश्न
In reply to बराचसा सहमत by पंगा
शुचि मॅडम, प्रतिसाद
In reply to होय by शुचि
हो
श्रीनगर जर भारताचा भाग असेल
नागपुर मधील "रेशम बाग " भागात
In reply to श्रीनगर जर भारताचा भाग असेल by अवलिया
कुणाचीच नाही...
In reply to नागपुर मधील "रेशम बाग " भागात by विजुभाऊ
रेशीम बाग भागात राष्ट्र ध्वज
In reply to कुणाचीच नाही... by विकास
मग हे काय आहे?
In reply to रेशीम बाग भागात राष्ट्र ध्वज by विजुभाऊ
खोटे कारण
In reply to मग हे काय आहे? by विकास
कोण खोटे आहे?
In reply to खोटे कारण by नितिन थत्ते
ट्विस्टिंगचा प्रयत्न
In reply to कोण खोटे आहे? by विकास
प्रश्न
In reply to ट्विस्टिंगचा प्रयत्न by नितिन थत्ते
अरेच्चा!
In reply to ट्विस्टिंगचा प्रयत्न by नितिन थत्ते
१
In reply to अरेच्चा! by विकास
ऐकीवच
In reply to १ by नितिन थत्ते
निष्कर्ष दुसर्या धाग्यावर
In reply to १ by नितिन थत्ते
इतर
खेद
In reply to इतर by ऋषिकेश
खेद
In reply to इतर by ऋषिकेश
दिलगिरी
In reply to खेद by विकास
>>देशातील उर्वरीत
सहमत
In reply to >>देशातील उर्वरीत by विसोबा खेचर
>>दूध मांगोगे तो खीर
In reply to >>देशातील उर्वरीत by विसोबा खेचर
तिर॑गा
संडासात, चेंगराचेंगरीमध्ये वगैरे नको
थोडा खुलासा
In reply to संडासात, चेंगराचेंगरीमध्ये वगैरे नको by धनंजय
पैकी काही उत्तरे "तहानल्या बाळाला पाणी पाजावे - होय!" असावीत
In reply to थोडा खुलासा by विकास
माझे ते म्हणजे भाजपाला करायला
In reply to थोडा खुलासा by विकास
कात्रज
म्हण्जे आता १४ फेब्रुवारीला
म्हण्जे आता १४ फेब्रुवारीला
In reply to म्हण्जे आता १४ फेब्रुवारीला by पुष्करिणी