मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झेंडा

प्रसाद_डी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लाल चौकात तिरंगा फडकवल्य मुळे त्या अशांत कश्मीराची शांती भंग होइल त्यमुळे तीथे तीरंगा नको फडकवायला म्हनुण हे ओमर साहेब(मुख्य मंत्री आहे म्हनुन नहितर कसला सहेब अन कस्ल काय) बोंबलत आहेत. का कश्मीर भारताचा भाग नाही का? बर ईतीहास बघता कश्मीरी रजा ने त्याचे राज्य हिंदुस्थानात विलिन केले होते. मग आता तिथे सत्ता आपली, सुवीधा आपली (ज्या कही कगदा वर असतील नसतील त्या.... च्यायला या राजकारनी लोकांनी अस काही बोलायची सोयच ठेवली नाही) , सुरक्षा व्यवसस्था आपली , अजुन बरेच काय काय ते तीथे आपलच मग ती लोक का नको का म्हणतात ध्वजारोहनाला? हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत. च्यायला कोणा सोबत जाव कळत नाही....

वाचने 3499 वाचनखूण प्रतिक्रिया 20

नरेशकुमार 21/01/2011 - 11:46
हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.
एवढ्याश्या कामासाठि ते MIcrowave का विकत घेत नाहीत, तेच कळत नाही. त्यात पोळ्या छान शेकुन निघतात.
च्यायला कोणा सोबत जाव कळत नाही....
कोनासोबतही जौ नये, घरात बसने, बायकोसोबत, मस्त पैकि बायकोला छान काहीतरी खायला करायला सांगने, आनी निवांत एखादा मस्त हिन्दि कॉमेडी सिनेमा बघत बसने. नाहीतरी आज शुक्रवारच आहे ........

In reply to by प्रसाद_डी

नरेशकुमार 21/01/2011 - 13:09
मग shaadi.com, matrimonial web sites, धोंडाळा घेने. काहिच नाही जमले तर, स्वतःच्या जबाबदारीवर एक गर्ल फ्रेंड गटवीने, आनी तीला घेउन मस्त चौपाटीला हींडने
तुम्ही त्या विधानाचा संदर्भ तपासला नाहीत असं वाटतंय. नुसते "तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" इतकेच विधान वाचून तुमची अशी प्रतिक्रिया होणे साहजिक आहे. पूर्वी या विषयावर झालेली प्रदीर्घ चर्चा एका थ्रेडवर आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. ती वाचावी अशी विनंती. त्यात सगळे संदर्भ आले आहेत. "तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" असेच टायटल आहे.

परिकथेतील राजकुमार 21/01/2011 - 13:15
ह्या विषयावर एक धागा ऑलरेडी सुरु असताना तुम्ही अजुन एक धागा काढून ह्या विषयाला जी दुहेरी वाचा फोडली आहेत त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

विजुभाऊ 21/01/2011 - 13:44
नागपुरात देखील काश्मीर पेक्षाही भयन्कर परिस्थीती आहे. एका संघटनेने त्यांच्या भारतातील मुख्य कार्यालयात जे नागपूरात मध्यवर्ती भागात आहे इतकी वर्षे तेथे झेन्डावन्दन केलेले नाही. त्या संघटनेशी काहीच संबन्ध नसलेला त्यांचा एक राजकीय पक्ष आहे... त्या पक्षाने आता काश्मीर मध्ये झेन्डा फडकवायचा विचार केला आहे. त्या राजकीय पक्षाला आपल्या मातृ सम्घटनेच्या कार्यालयावर इतकी वर्षे राष्ट्रध्वज फडकवायला जमलेले नाही . नागपूरच्या मानाने काश्मीरची परिस्थिती बरी असावी .

ढब्बू पैसा 21/01/2011 - 15:33
निदान स्पष्टपणे नाव तरी घ्यावं संघटनेचं! लोकशाही आहे भारतात :P संघकार्यालयातलं झेंडावंदन आणि काश्मीर ह्यातला परस्पर संबंध समजावून सांगाल का विजुभाऊ? स्वयंसेवकांना वेगळं झेंडावंदन करायची काय गरज आहे? ते समाजाचा एक भागच आहेत आणि त्यामुळे चौका-चौकात होणार्‍या झेंडावंदनाला उपस्थित राहून एकात्मता वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो :) असो. मी काय सांगावं तेच पुन्हा पुन्हा! काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे. "काश्मीर मधे राष्ट्रध्वज फडकावला तर खबरदार" अशी विधानं आपण खपवून घेतो आणि त्यांचं अप्रत्यक्ष समर्थनही करतो ह्याहून मोठं एखाद्या देशाचं दुर्दैव ते काय!

In reply to by ढब्बू पैसा

काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे. "काश्मीर मधे राष्ट्रध्वज फडकावला तर खबरदार" अशी विधानं आपण खपवून घेतो आणि त्यांचं अप्रत्यक्ष समर्थनही करतो ह्याहून मोठं एखाद्या देशाचं दुर्दैव ते काय! एवढ्या भागाविषयी पुन्हा असंच म्हणतो की तुम्ही संदर्भ सोडून काढलेल्या वाक्याने प्रभावित झाला आहात.

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 15:57
असं कधीच असू शकत नाही. "कोणत्याही संदर्भात अयोग्य" असं काही असूच शकत नाही. या सरसकट विधानानेच हे सिद्ध होतं की तुम्ही प्रभावित (इन्फ्ल्युएन्स) झालेले आहात.. http://www.misalpav.com/node/16180#comment-275095

In reply to by गवि

ढब्बू पैसा 21/01/2011 - 16:18
त्यानंतरही मी तेच म्हणेन. भारताच्या भूमीवर तिरंगा फडकविल्यास हिंसाचार उफाळेल हे स्टेटमेंट कसं योग्य आहे? तो भाग संवेदनशील आहे हे मान्य पण अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि तिरंगाच ना, कुठल्या धर्माचा ध्वज तर तिथे कोणी फडकवत नाहीये ना!

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 16:30
भारताच्या भूमीवर तिरंगा फडकविल्यास हिंसाचार उफाळेल हे स्टेटमेंट कसं योग्य आहे? तिरंगा फडकवण्यापूर्वीच हिंसाचार उफाळेल याची खात्री करून घेण्यात येत आहे असं असेल तर?? तो भाग संवेदनशील आहे हे मान्य पण अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि तिरंगाच ना, कुठल्या धर्माचा ध्वज तर तिथे कोणी फडकवत नाहीये ना! अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत आहे हे महाचूक गृहीतक. भाजप "यात्रा" "चलो" असे शब्द वापरून जो रंग दाखवत आहे त्याने तुम्हाला अखंडता, एकात्मता हा हेतू दिसत असेल तर तातडीने फेरविचाराची गरज आहे. संघ, भाजपच्या परिवारात घट्ट मुरलेल्या घरात वाढूनही हे माझं असं स्पष्ट मत आहे. उद्देश नक्कीच भडकवण्याचा आणि राजकीय फायदा उठवण्याचा आहे. राजकीय फायदा सगळेच घेतात. पण हा मार्ग दुरित वाटतो.. कोकणात गणपतीची मिरवणूक मशिदीशेजारून मुद्दाम न्यायची आणि त्यावेळी कर्णे आणि लेझीम सर्वात जोरदार दणकवायचे.. हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. आता मिरवणूक कुठूनही जाऊ शकते तशी ती मशिदीवरूनही जाऊ शकते. त्यात टेक्निकली काही चूक दिसत नसलं तरी कुरापत काढण्याचा स्वभावहेतू दिसतोच. रोज कर्ण्यावरून प्रार्थनेचा आवाज करता.. मग घ्या एकदाच स्कोअर सेटलिंग.. असा उद्देश भडकावू नाही तर काय म्हणायचा ? शेवटी भडकले की भोगणार आहे तिथली जनता... काडी लागली की भडका उडायच्या आत हे चलो वाले येणार चलो वापस करुन लगेच घरी पुण्या-मुम्बईस... आपण इथे बसून गप्पा मारणार..

In reply to by गवि

सुनील 22/01/2011 - 21:56
अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत आहे हे महाचूक गृहीतक. भाजप "यात्रा" "चलो" असे शब्द वापरून जो रंग दाखवत आहे त्याने तुम्हाला अखंडता, एकात्मता हा हेतू दिसत असेल तर तातडीने फेरविचाराची गरज आहे. उद्देश नक्कीच भडकवण्याचा आणि राजकीय फायदा उठवण्याचा आहे. राजकीय फायदा सगळेच घेतात. पण हा मार्ग दुरित वाटतो.. सहमत. वास्तविक विकासाच्या मार्गानेही सत्ता मिळू शकते हे गुजरात्-बिहारच्या उदाहरणावरून लक्षात यायला हवे होते. पण भावना भडकावणे हा सोपा (पण नतद्रष्ट) मार्ग ही मंडळी का निवडतात, हे समजत नाही.

In reply to by ढब्बू पैसा

परिकथेतील राजकुमार 21/01/2011 - 15:38
काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे.
विजुभौंसाठी संघ हा एकमेवच विषय असतो आणि ते संघाची तुलना कशीही आणि कुठेही करु शकतात. स्वयंसेवक करत नसतील येवढा संघाचा विचार विजुभौ करत असतात ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 21/01/2011 - 15:50
>>विजुभौंसाठी संघ हा एकमेवच विषय असतो आणि ते संघाची तुलना कशीही आणि कुठेही करु शकतात. सहमत ! मात्र त्यांनी वर केलेले तुलना अप्रस्तुत आहे इतकेच म्हणतो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार 21/01/2011 - 15:55
मात्र त्यांनी वर केलेले तुलना अप्रस्तुत आहे इतकेच म्हणतो.
+१ सहमत आहे. मात्र विजुभौंच्या मताचाही आदर ठेवलेला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 22/01/2011 - 18:25
सहमत आहे. त्याचबरोबर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की विजुभाऊ त्यांच्या घरावर तिरंगा फडकावतात का? असल्यास कधी पासून आणि नसल्यास का नाही ? त्याचबरोबर त्यांच्या कंपनीत तिरंगा फडकावला जातो का? असल्यास कधीपासून आणि नसल्यास का नाही ? ते रहातात त्या परिसरात कुणी तिरंगा फडकावतात का? असल्यास कधीपासून आणि नसल्यास का नाही?