फॅमिली फिक्शन - सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन
सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या मुंबईत भरलेलं आहे. भारतीय कुटुंबव्यवस्थेतले काही समकालीन पैलू यात दिसतात. त्याचा थोडक्यात परिचय या लेखात करून दिलेला आहे.
नागरी जाणिवा व्यक्त करणारी ठाशीव व्यक्तिचित्रणं आणि समकालीन शहरी भूभाग निराळ्या नजरेतून दाखवणारे देखावे अशा गोष्टींसाठी मुंबईचे चित्रकार सुधीर पटवर्धन विख्यात आहेत. त्यांच्या नव्या चित्रांमध्ये ही वैशिष्ट्यं दिसतातच, पण शिवाय काही वेगळ्या जाणिवा उठून दिसतात.
अनेक चित्रांत खिडक्या आणि त्याच्या आसपास माणसं दिसतात. कधी ती माणसं आत राहून बाहेरचं दृश्य पाहताना दिसतात, तर कधी बाहेर दिसणारं दृश्यच दिसत राहतं.
बाहेरचं दृश्य पाहणाऱ्या नजरेत काहीशी हुरहूर जाणवते. कदाचित ती जाणाऱ्या माणसाविषयी असेल, कदाचित गेलेल्या दिवसांविषयी असेल. ते स्मरणरंजन वाटत नाही एवढं मात्र खरं.
काही चित्रांमध्ये बाहेरचं दृश्य आपल्याला दिसतं पण चित्रातल्या व्यक्तीला काही वेगळंच दिसत/जाणवत असतं.
झोपेत जी स्वप्नं दिसतात त्यांत आपल्या सुप्त इच्छा, स्मृती आणि जाणिवा यांचं अजब मिश्रण झालेलं असतं. यातूनही कशाचीतरी हुरहूर पण स्मरणरंजनाचा अभाव जाणवतात.
'पूर्ण वर्तुळ' या चित्रात काहीतरी वेगळी जाणीव होते.
आजारपण, त्यानं ग्रासलेलं घर, व्यक्तींमध्ये आलेला दुरावा किंवा संवादाचा अभाव अशा साध्या नित्यानेमाच्या, कुणाला न टळलेल्या गोष्टी चित्रकाराला वेगळ्या पध्दतीनं पकडता येतात.
'फॅमिली फिक्शन' या चित्रात कुटुंबाचा वेगळा पैलू दिसतो.
'पल्प फिक्शन' या गाजलेल्या चित्रपटातल्या प्रतिमा वापरून कुटुंब आणि टीव्ही यांचं अनोखं, अपरिहार्य पण विचित्र नातं दाखवलं आहे असं दिसतं. यातही कष्ट करून थकलेल्या एका बाईचा एक निर्बुध्द कंटाळा, घरातल्या थोरल्या मुलाचा एक काहीसा त्रासिक कंटाळा आणि या सर्वावर उपाय म्हणून हिंसक अॅक्शन घरबसल्या पाहत राहणं दिसतं. त्यातला उदास सूर विलक्षण आहे. आपल्यात रमलेलं लहान मूल आणि आजोबा दोघांची पाठ असणं यातही एक विसंवाद, एकटेपण जाणवतं.
इतर चित्रांमध्येही अनेक वेगवेगळे पैलू दिसतात - कधी मुलगी आणि आई (किंवा सून आणि सासू) घराच्या बाल्कनीत एका भावविभोर मुद्रेत दिसतात, तर कधी बाळ नातवाच्या आगमनानंतर आजी-आजोबा काहीसे बाजूला राहून आपल्या मुला-सुनेला नवीन जिवात गुंगलेले पाहताना दिसतात. कधी वृध्द नवरा-बायको एकमेकांशी भांडताना दिसतात, तर कधी मुरलेल्या लोणच्याप्रमाणे ते सहजीवन जगत असावेत असं वाटतं. याशिवाय 'जॉगर', 'इमिग्रंट'सारख्या व्यक्तिचित्रांमध्ये कुटुंबाबाहेरच्या नागर व्यक्ती दिसतात.
समकालीन आशय व्यक्त करण्यासाठी चित्रकाराने साध्या, नेहमीच्या, परिचित गोष्टींचा आधार घेतला आहे. त्यामुळे चित्रकलेत विशेष गती नसतानाही सहज आस्वाद घेता येतील अशा या कलाकृती आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर प्रदर्शनाला भेट द्यावी अशी शिफारस करेन.
प्रदर्शन २७ जानेवारीपर्यंत आहे. वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळः साक्षी गॅलरी, तन्ना हाऊस, नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा
(रीगल सिनेमाजवळ; सहकार भंडार आणि कॅम्पिअन स्कूल यांच्या मध्ये)
संपर्कः साक्षी गॅलरी

संपर्कः साक्षी गॅलरीवर्गीकरण
प्रतिक्रिया
दोनेक महीन्यापूर्वी
अल्टि !! हेवा वाटला
चीत्रे छानच आहेत
खुप छान आणि वेगळीच चित्रे
छानच! चित्रकला कोणीतरी
हेच म्हणतो
परिचय आवडला.
शेवटच्या चित्रातली पलंगावरची
मियाव मियाव.
अगदी-अगदी!
'पल्प फिक्शन'
छान
सुपर्ब!!
धन्यवाद आणि काही तपशील
पोस्टर मध्ये उमा
मूळ धाग्यात दिलेली चित्रे
+१ चित्रे आणि त्याचे
चित्रभाषा
धन्यवाद. चित्र १ व २ चे
लेखातील तसेच प्रतिसादातील
पुनश्च फॅमिली फिक्शन
धन्यवाद. छान विवेचन केलं आपण.
सहमत ! अतिशय सुंदर विवेचन
खूपच सुंदर चित्र काढली आहेत.
माझंही अस्संच मत आहे.
+१
धन्यवाद