Skip to main content

ट्विट्टर वरील साहित्य

लेखक साधा_सरळ यांनी शुक्रवार, 17/09/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
(नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे! मिपा हे एक मराठी होटेल आहे, हे माहिती असूनही नवीन तन्त्रज्ञानाचा कल्पक उपयोग इतरान्बरोबर शेअर करावा ह्या हेतूने ट्विट्टर च्या एका बाजूची महिती देत आहे.) शीर्षक वाचून दचकलात? पण ट्विट्टर वर एका ट्वीटवरील १४० अक्षरान्चे बन्धन असूनही त्याचा मजेशीर उपयोग करणार्यान्ची सन्ख्या काही कमी नाही. त्यातील काही उदाहरणे - विनोदी अन्गाने ताज्या घडामोडी आणि प्रव्रूत्ती ह्यान्चा खुमासदार समाचार घेतला जातो. शिवाय काही जण कविता / अतीसूक्ष्मकथा देखील लिहितात असे वाचले, पण योग्य उदाहरणे अजून मिळाली नाहीत. (टीप - वरील पैकी कोणत्याही ट्वीट किन्वा त्यातील विचारान्शी माझा काहीही सम्बन्ध नाही. हो, नन्तर धुरळा नको....)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1479
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आमाला ट्विटर पक्षा आमचं मिसळपाव हाटेलच जादा आवडतं. लय मज्जा येती पगा त्या टिवटिव पक्षा. काही गोष्टी मराठीत करायची मजा इंग्रजीत नाही भौ. (ध.मु. , परा, पुपे, ठाण्याचे गुर्जी यांना विचारा काय ते)

तुम्ही दिलेल्या लिंक्स चांगल्या आहेत. तसंच तुमच्या लिखाणाला एक ष्टाईल आहे. वेगवेगळ्या विषयांवर आणखी लिहा.
नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे!
एवढं घाबरायची गरज नाही. पहिल्या लिखाणाचं स्वागत!

In reply to by पैसा

हा नविन लोकांचा सर्वात आवडता प्रतिसाद असावा ;)

खूप लकी आहात :)

धुराळ्याला घाबरलात तर मिपावर जगणे अवघड. टेंन्शन घ्यायचे नाही. शोले पाहिला आहे का? धर्मेंद्र टाकीवर चढुन नाटक करत असतो. अमिताभ शांतपणे चहा पित असतो. आपण अमिताभप्रमाणे वागायचं.. मिपावर अनेक धर्मेंद्र आहेत.

In reply to by अवलिया

शमत आहे. जालावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी पाहीजे अशा आशयाचे दिग्गजांचे वचन स्मरते. :)