Skip to main content

सान्डग्याची आमटी

सान्डग्याची आमटी

Published on 17/01/2011 - 21:58 प्रकाशित मुखपृष्ठ
ही सान्डग्याची आमटी माझी फेवरेट आहे मह्नुन मी ती इथे शेअर करत आहे सान्डगे- वाळवनातला १ प्रकार आहे बाहेर किराना दुकानात पन मिळतात. साहित्य- १ कान्दा मध्यम चिरुन घ्यावा. १०-१५ लसनाच्या पाकळ्या निवडलेल्या आनि बारीक केलेल्या किन्वा पेस्ट आनि १/२ इन्च आले ठेचलेले १ वाटी सान्डगे २- मोठे डाव तेल जिरे,मोहरी,हिन्ग्,तिखट्,मीठ्,मसाला. जेवढे लागेल तसे १ वाटी सान्डगे त्यात १ मोठा डाव तेलात तळुन घ्यावे. मन्द आनि थोडे हाय गॅस्वर आनि रन्ग ब्राउन होइपर्यन्त परतावे. आता गॅस ऑन करुन छोटा कूकर ठेवा .त्यामधे १ डाव तेल टाकुन तेल तापु द्या. तेल तापल्यावर त्यात जिरे-मोहरी टाकुन तडतडु द्या मग त्यात हिन्ग टाका. आता लसुन बारिक/पेस्ट केलेला टाका, आल्याची पेस्ट टाका. रन्ग ब्राउन झाल्यावर त्यात कान्दा टाकुन परता. कान्दा गुलाबि झाल्यवर त्यात तळलेले सान्डगे टाका. आनि तिखत्,मीठ्,मसाला काळा टाकुन हलवा थोडी झाकन्टाकुन वाफ काढा. आता ३ वाटी पानी टाका आनि कूकर् चे झाकन बन्द करा गॅस हाय करा. (ह्याला शिजाय्ला वेळ आनि पानि जास्त लागते) तुम्हाला जर थोडेस कच्चे चालत असेल तर ५ शिट्ट्या झाल्यावर बन्द करा नाहीतर ७-८ शिट्ट्या होउ द्या. आता कूकर थन्ड झाल्यावर सर्व्ह करा. ही भाकरी, पोळी, तसेच भातावर पन छान लागते.

याद्या 7671
प्रतिक्रिया 24
छान पाक्रु उत्तम पण एकच फोटो का हो ? इथे प्रत्येक स्टेपचा फोटो लागतो आणि तयार पदार्थाचा तर लागतोच, नाही तर करणा-याला कळणार कसं एंड प्रॉडक्ट कसं आहे ते. आता पुन्हा एक्दा करा आणि बोलवा खायला. हर्षद.

माफ करा तयार फोटो पण दिसला, भाकरी पण भाजलेली आहे छान. आता हे खाण्यासाठी बायको / आईला पॉलिश करावं लागेल आणि उद्या संध्याकाळ पर्यंत थांबावं लागेल. नुसते फोटो टाकुन व पाक्रु लिहुन प्रत्यक्ष जेवायला न बोलवणा-या छळ्करी मिपाकरांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय आहे. हर्षद.

भन्नाट आवडता प्रकार आहे. माझ्या मावससासूबाईंच्या हातची कांदा सांडग्याची आमटी आणि तळणीच्या दही लावून सुकवलेल्या मिरच्या जेवणात असल्या कि दुसरे तोंडीलावणे नसले तरी चालते. फोटू बघून इनो घ्यावाच लागणार.

नुसते फोटो टाकुन व पाक्रु लिहुन प्रत्यक्ष जेवायला न बोलवणा-या छळ्करी मिपाकरांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय आहे. +१

In reply to by वाहीदा

ख प लो !!
सांडग्याची भाजी / आमटी अन ज्वारीची भाकरी आहाहा !! पण गावासारखे सांडगे इथे नाही मिळत
हेच बोल्तो. आणि दुकानात जे सांडगे मिळतात ते इतके भिकार चवीचे असतात कि काय सांगायचे.

@शेखर चिन्चेची काडी कळले नाही. @ सुहास किराना दुकानात मिळतात आजकाल. @टार्या,लालसा,हर्शद इतक्या लोकाना बोलवायला जास्त तयारी लाग्ते ना. तयारी झाली कि सान्गतेच मी प्लीज सान्डगे नक्कि काय असतात कशाचे असत्तत ते जरा कोनि सान्गु शकाल का? वरील सर्वान्चे प्रतिक्रियेबदद्ल/वाचनाबद्दल आभार.

मुगाची डाळ घालूनही सांडग्यांची वेगळ्या प्रकारची कांदाविरहीत भाजी करता येते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही सध्या कांदाविरहीतच सांडगे खाल्ले. कांदे स्वस्त झाल्यावर वरील पद्धतीनेही करून पाहू.

स्स... स्स... स्स... सांडग्यांची आमटी होय? धागा आला तेव्हा 'लांडग्यांची आमटी' असं वाचलं चुकून... असो. हा पदार्थ (म्हणजे सांडग्यांची आमटी) लहानपणी (मिटक्या मारत) खाल्ल्याचं चांगलं स्मरतं. उत्तम पदार्थ! पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आभार!

सांडग्याची आमटी, भाजी खुप आवडते. शेंगदाण्याच्या आमटीत पण छान लागते. बाजरीची भाकरी हवी. :-)

@ आजानुकर्ण तशी ट्राय करुन बघते. @वहिदा, परा अरे आमच्या कडे तर किराना मधे मिळनारे लोकल ग्रुहउद्योग वाल्याच ठेवतात तर ते चान्गले असतात. आनि @ ज्योतिप्रकाश हे कोहळ्याचे नसतात हो हे वेगळे आहेत. बाकि सर्वान्चे आभार