मिक्स व्हेज कटलेट (जरा हटके)
मध्यंतरी मीमराठीवर मी कुणाची तरी गोलमाल कटलेट ही पाकृ. वाचली. उरलेले पदार्थ सत्कारणी लावायला आणि काहीतरी नविन खायला मार्ग सापडला.
रात्रीचा उरलेला भात २ वाट्या (नेहमी फोडणीचा भात करुन खायचा कंटाळा आला की हा पदार्थ करावा)
अर्धी वाटी घट्ट वरणाचा गोळा (घरात होता म्हणुन मी घातला, नसल्यास काही बिघडत नाही)
एक मोठ गाजर किसुन
एक बटाटा किसुन
फ्लॉवर गरम पाण्यातुन काढुन मग किसुन
मटार असतील तर १/२ वाटी ठेचुन
(अजुन कुठल्या भाज्या दोडका/ दुधी असेल तर किसुन, माझ्याकडे नव्हत्या)
२ मोठे चमचे कॉर्न फ्लोअर
२ मोठे चमचे डाळीचे पीठ (बेसन) नसल्यास भाजणीचे पीठ
हळद १/२ चमचा (छोटा)
लाल तिखट १ चमचा (छोटा)
गरम मसाला १ चमचा (छोटा)
हिंग चिमुटभर
१/२ चमचा (मोठा) धणे भाजुन कुटुन
तीळ १ चमचा
हिरव्या मिरच्या ५-६, आल्याचा तुकडा छोटा
लसुण पाकळ्या ७-८
कोथिंबीर धुवुन चिरुन १/२ वाटी
मीठ चवीनुसार
तळायला तेल
क्रमवार पाककृती:
धणे थोडे भाजुन मिक्सरवर भरडुन घ्यावेत
मिरची+आलं+लसुण वाटुन घ्यावा.
एका मोठ्या ताटात भात चांगला कुस्करुन घ्यावा. त्यात वरणाचा गोळा,धणे पुड, मिरचीच वाटण, सगळ्या भाज्या एकत्रीत, कोथिंबीर, हिंग, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, तीळ घालुन चांगल मळुन घ्यावं. वाटल्यास थोडा तेलाचा हात लावावा.
मिश्रण एकजीव झाल्यावर कढईत तेल गरम करायला ठेवाव.
आता मिश्रणाचे लांबट गोळे करुन रव्यात अथवा ब्रेड्क्रम्स मधे घोळवुन घ्यावेत.

" alt="" />
तापलेल्या तेलात एक एक सोडुन चांगले लालसर होईतो तळावेत.

" alt="" />

" alt="" />
गरम गरम कटलेट सॉस अथवा हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावेत अथवा करता करता स्वतःच तोंडात टाकावेत कारण आपल्यापर्यंत ते कधी शिल्लक राहात नाहीत.
वाढणी/प्रमाण:
हवे तितके. आपण बास का आता? असं म्हणालो तरी खाणारा बास म्हणत नाही. :फिदी:
अधिक टिपा:
गरम गरम खावेत, गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाहीत.
माहितीचा स्रोत:
मी मराठीवरच्या एका सुगरणीच्या प्रेरणेतुन
याद्या
4983
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
हम्म्म यम्मि दिस्तेय !
हे पाहा
पाकक्रिया व फोटो छानच, पण
अधिक टिपा: गरम गरम खावेत, गार
ओक्के ! एकदा करुन बघायला हरकत
जाम हसलो.
मस्त मस्त मस्त. मी पण बनवणार.
छान दिसते कटलेट. रूपाली
जबरदस्त फोटो.
दहा पैकी दहा...मार्क