ही पाककृती नाही. हा प्रकार मी पहिल्यांदा कुठे खाल्ला होता आठवत नाही; पण अत्यंत चविष्ट असतो. आणि करायला अत्यंत सोपा. हिवाळा संपताना मटारच्या शेंगा निबर होऊन बाजारात येणे बंद होईपर्यंत हा प्रकार सतत आमच्याकडे चालू असतो. या संकरीत मटार ऐवजी गावरान मटार जर मिळाली तर क्या कहने!
साहित्य १. किलोभर मटारच्या शेंगा २. तेल दोन चमचे ३. मीठ
सर्वप्रथम मटारच्या शेंगांची देठे काढून टाकावीत. फक्त हिरव्या असणार्याच शेंगा निवडाव्यात, निबर बाजूला काढाव्यात. या शेंगांमध्ये बिलकुल ओळखू न येणार्या हिरव्या आळ्या असू शकतात. त्यामुळे एक एक शेंग लक्ष देऊन निसणे मस्ट आहे.
 |
|
 |
|
एक कढई किंवा पातेले गॅसवर तापवत ठेवावे. गरम झालेल्या पातेल्यात निसून झालेल्या शेंगा टाकून वरून झाकण ठेवावे. दहा मिनीटांनी झाकण काढावे. शेंगांना वाफ सुटते. एकदा खालीवर करून घ्याव्यात. आता दोन छोटे चमचे तेल शेंगांवर टाकून पुन्हा एकदा खालीवर कराव्यात. पुन्हा एकदा झाकण लावून पंधरा मिनीटे वाफवू द्यावे.
पंधरा मिनीटांनी गॅस बंद करावा आणि आणखी पाच मिनीटे वाफ दबू द्यावी. गॅस बंद केल्यानंतर शेवटच्या पाच मिनीटांत मीठ टाकावे आणि वाफ दबायला ठेऊन द्यावे. आधीच मीठ टाकले तर मीठ विरघळून भांड्याच्या तळाशी चिकटते आणि नंतर पुन्हा एकदा मीठ टाकत बसावे लागते. पाच मिनीटांनंतर झाकण उघडले की शेंगांच्या सुगंधाने किचन भरून जाईल.
या शेंगा सबंध जशाच्या तशा ओरपून आत वाफवलेले वटाणे खायला खूप मजा येते.
छान आयडीया!
तूरीच्या शेंगा अशाच वाफावून
सहीच आहे हे..
निसणं म्हणजे नक्की काय
In reply to सहीच आहे हे.. by मस्त कलंदर
शेंगा सोलू नयेत..
In reply to निसणं म्हणजे नक्की काय by यकु
(विषय दिलेला नाही)
In reply to शेंगा सोलू नयेत.. by मस्त कलंदर
मस्त रे यशवंता..
अतिशय सुंदर आणी चविष्ठ प्रकार
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म ऊकडीचे मटार्स
एकच नं....एकनाथ राव उद्याच
लालसा, आमच्याकडे पण
In reply to एकच नं....एकनाथ राव उद्याच by डावखुरा
छान
मटारच्या शेंगा लोखंडी चाळणी
मस्त!
करुन बघेल
मस्त आणी सोपी रेसिपी.
मसाल्याच्या मटारच्या शेंगा ....
तेज्यायला ! एक दिवस आधी तरी
याचीच
In reply to तेज्यायला ! एक दिवस आधी तरी by परिकथेतील राजकुमार