पोळीचे लाडू (चुरमा)
साहित्यः आदले दिवशीच्या उरलेल्या पोळ्या :-)(किंवा सकाळी केलेल्या पोळ्यांची संध्याकाळी ही पाककृती होऊ शकेल.), चिरलेला गूळ, तूप, वेलची पूड
क्रुति: एका बाउलमध्ये पोळ्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग बारीक चुरा करावा. त्याचे ४ भाग करून १ भागाएवढा गूळ १ बाउलमध्ये घ्यावा. कढईत थोडे तूप घेऊन ती मंद गॅसवर तापत ठेवा. (तूपाचे प्रमाण आपापल्या अंदाजाने घाला. २-३ प्रयोगानंतर अंदाज येईल.) त्यात चिरलेला गूळ घालून हलवत रहा. चवीपुरती वेलची पूड घाला. गूळ छान पातळ झाला की लगेच त्यात पोळीचा चुरा घाला. गॅस बंद करा. आणि मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे लाडू वळा. लाडू न वळता पदार्थ तसाच खाल्ला तर त्याला चुरमा म्हणतात.
मला हे पोळीचे लाडू अतिशय आवडतात. विशेषतः आई/आजीच्या हातचे तर खूपच आवडतात. शिळ्या पोळ्या खाण्यात कोणालाही interest नसतो. पण हे लाडू मात्र चटाचटा मटामटा खाल्ले जातात :-)
टिपः- ताज्या पोळ्यांपासून ही पाककृती बनवता येत नाही :)
वाचने
4378
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रतिक्रिया
खुप छान लागतो पोळीचा लाडू
फोटो ?
वा आठवण करुन दिलीत
>>>>विशेषतः आई/आजीच्या हातचे
मी कधी चुरमा लाडू खाल्ले
मस्त.
फोटो दिल्यास बरे
एका बाउलमध्ये पोळ्यांचे
In reply to एका बाउलमध्ये पोळ्यांचे by परिकथेतील राजकुमार
मी तर गूळ, पोळी नि तूप एकत्रच
सदर लाडूंसाठी लहाण असतांना
In reply to सदर लाडूंसाठी लहाण असतांना by टारझन
टारझन नावाचा प्राणी
वेलची पूड
मला हे लाडू खूप आवडतात.
In reply to मला हे लाडू खूप आवडतात. by प्राजु
मग ह्यावेळी का नाही लिहीलंस ?
In reply to मग ह्यावेळी का नाही लिहीलंस ? by टारझन
लहाण असताना मी माणुस होतो
मस्त..