नमस्ते मिपाकरांनो,
सर्वप्रथम मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली. नंतर मांसाहाराचे आकर्षण वाटेनासे झाले, पुढे कितीहि जन्म आले तरी मांस खायचे नाही हा निर्धार केला. म्हणून दिले सोडून. हे माहित असतानही कि मांसाहारातून सर्वात जास्त शक्ती, प्रथिने वगैरे मिळतात (घरचे सर्व मांसाहारी पण वार सण पाळून आहेत). परंतु आपण प्राण्याला मारुन खावे हे काही मनाला पटत नव्हते.
यानिमित्ताने काही कट्टर मासभक्षक नातेवाईकांचा मी मांसाहाराकडे पुन्हा वळावे म्हणून प्रयत्न सुरु झाला. (कदाचित त्यांच्याकडे गेल्यावर वेगळे जेवण करावे लागेल म्हणून असेल)
त्या निमित्ताने पुढील प्रश्न मला विचारले गेले व जातात . या पुढील प्रश्नांची उत्तरे त्यांना देणे काही जरुरीचे नव्हते परंतु, एक विचारचक्रचं जणु सुरु झाले असे का?
१. तु मांसाहार म्हणजे प्राण्यांना खात नाहीस, पण ज्या भाज्या खातोस त्यामध्येसुध्दा जीव असतोच कि?
२.तु मद्य पी म्हणजे तुला सर्दिवगैरेचा त्रास होणार नाही. नाहीतरी औषधे घेतोस त्यात मद्य असतेच कि? अरे तुझे शिवशंकर सुध्दा सोमसर पियत होते ?
३. सोमरस व मद्य एकच का? कारण बालाजी तांबे यांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते कि, सोमरस म्हणजे दिव्य/उत्तम वनस्पतीपासून बनविलेले पेय.
४. अरे, तुमच्या देवीपुराणात सुध्दा देवीमातेनी राक्षसांचा वध करण्याआधी म्हशीचे मांस खाल्लेहोते व मद्य प्राशन केले असा उल्लेख आहे.
५. श्रीरामाने वनवास भोगात मद्यप्राशन, मांसभक्षण केले होते. तु सुध्दा सुरुकर ना पुन्हा ?
६. किमान अंडे तरी खा? व्हेज आहे???? (अॅ......) दुधात सुध्दा जिवाणू असतात मग ते नॉनव्हेज नाहि का ?
७. पुर्वी आर्य लोकं गोमास भक्षण करीत असत? परंतु गोमातेचे दिव्य गुणांमुळे त्यांनी ते खायचे सोडले. तेव्हा किमान कोंबडी किंवा बकरी तरी.
८. आपल्या देवाला कोंबडा (काहिंच्या देवाना बकरा लागतो). ( देवाला नाही, पण काही ठिकाणी देवीला व देवाच्या गणांना मांस /तसेच मद्य लागते असे ऐकिवात आहे माझ्या!) तरी प्रसाद म्हणून वर्षातुन एकदा तरी खा ना!
९. अरे शहाण्या पुर्वी अथिती घरी आले कि मधुपर्क द्यायचे (घोडा/गाय यांचे मांस मधाबरोबर शिजवुन) तेव्हा पाहुण्यांबरोबर खायला हरकत नाही.
१०. मांसाचे औषधी गुण बघावेत, मांस खायला काय हरकत. प्राण्यांचा जन्मच सत्कर्मी लागतो.
११. एका महानुभावाने सांगितले कि बघ भाज्यांने सत्वगुण वाढतात असे म्हणतोस, तर त्या भाज्या खाणारे प्राणी खाल्लेस तरी सत्वगुण अजुन वाढतील. उदा. बडे वगैरे तर किती शांतताप्रिय प्राणी आहेत.
आता एवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर माझ्याकडे नाहीत परंतु मांस भक्षण करणार नाही हे पक्के. तरी तज्ञांनी आपले मतं मांडावित. यावर माहित असल्यास धार्मिक दृष्टीकोनातुनही प्रकाश टाकावा. या विषयावर विनोदही होतील हे माहित आहे. पण कृपया जास्त विषयांतर करू नये
धन्यवाद!
आपला नम्र
रो.म.ना.
वाचने
11327
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्याला जे पटते ते करावे ,
बाकी..............
In reply to ज्याला जे पटते ते करावे , by टारझन
एकदम बरोबर रे टार्या...
In reply to ज्याला जे पटते ते करावे , by टारझन
आता एवढ्या सर्व प्रश्नांची
+१ कन्क्लूजन ठरले आहेच. या
In reply to आता एवढ्या सर्व प्रश्नांची by अवलिया
डुप्लिकेट
In reply to आता एवढ्या सर्व प्रश्नांची by अवलिया
धन्यवाद
१. तु मांसाहार म्हणजे
तांबेच रोज संध्याकाळी एक
In reply to १. तु मांसाहार म्हणजे by विसोबा खेचर
सहमत
In reply to तांबेच रोज संध्याकाळी एक by Nile
आपल्या धार्मिक
In reply to १. तु मांसाहार म्हणजे by विसोबा खेचर
बायबल
आता एवढ्या सर्व प्रश्नांची
धार्मिक साधना...
हॅ हॅ
एक दुवा:
नंतर मांसाहाराचे आकर्षण
हाहा!
In reply to नंतर मांसाहाराचे आकर्षण by परिकथेतील राजकुमार
खी खी खी! अरे किती वाट
In reply to नंतर मांसाहाराचे आकर्षण by परिकथेतील राजकुमार
तशीही कुणी कुणाची किती वाट
In reply to खी खी खी! अरे किती वाट by रेवती
गेल्या जन्मातील
In reply to नंतर मांसाहाराचे आकर्षण by परिकथेतील राजकुमार
ठ्ठ्यॉ!!!! वात्रट पर्या! =))
In reply to नंतर मांसाहाराचे आकर्षण by परिकथेतील राजकुमार
क्या बोल्या!
In reply to नंतर मांसाहाराचे आकर्षण by परिकथेतील राजकुमार
मग कुपोषनाने मृत्यु ठरलेला आहे
माझीपण आहुती...
मांसाहार !!
सहमत.
In reply to मांसाहार !! by अर्धवटराव
काय सांगावं ...
In reply to सहमत. by आत्मशून्य
.
In reply to काय सांगावं ... by अर्धवटराव
अपवाद !!
In reply to . by आत्मशून्य
जॉन अब्राहमला वीसरू नका या लीस्ट्मधे अशिया'स मोस्ट आकर्शक मेल
In reply to अपवाद !! by अर्धवटराव
मुद्दा !!
In reply to जॉन अब्राहमला वीसरू नका या लीस्ट्मधे अशिया'स मोस्ट आकर्शक मेल by आत्मशून्य
सहमत!
In reply to मुद्दा !! by अर्धवटराव
मला वाटते..
In reply to मांसाहार !! by अर्धवटराव
असेल असेल !!
In reply to मला वाटते.. by विकास
सहमत
In reply to मांसाहार !! by अर्धवटराव
लग्नाआधी शाकाहारी होते.
मस्त प्रतिसाद!
In reply to लग्नाआधी शाकाहारी होते. by शुचि
'पॉझिटिव्ह'?
In reply to लग्नाआधी शाकाहारी होते. by शुचि
चवीने खाणार त्याला देव देणार
प्रयोग करा
आपले काय मत
तुमच्या ज्ञानात भर घालावी म्हणतो...
Good info. Thanks. Just in
In reply to तुमच्या ज्ञानात भर घालावी म्हणतो... by योगप्रभू
नमस्कार.
धन्यवाद
In reply to नमस्कार. by अमित देवधर
शाकाहारी
धन्यवाद
In reply to शाकाहारी by ऐक शुन्य शुन्य
जाणकार काय आज प्रकाश टाकणार
शाकाहारी लोक अतीरेकी
शाकाहारी लोक अतीरेकी
In reply to शाकाहारी लोक अतीरेकी by विजुभाऊ
+१
In reply to शाकाहारी लोक अतीरेकी by परिकथेतील राजकुमार