मासे १९) खुबे
खुबे हे खाडीच्या दलदलीत (चिखलात) सापडतात. खुबे पकडण्यासाठी खुबे पकडणारी माणस लाकडी फळी घेउन चिखलात उतरतात. फळीवर गुडगे ठेउन फळीचा आधार घेउन हे खुबे गोळा केले जातात. ह्या खुब्यांची शिंपली सारखी पांढरी शिंपली आपल्याला समुद्र किनारी सापडतात. कदाचीत ते समुद्रातील खुबे असतील. त्याच्या बाहुल्या, तोरणे बाजारात मिळतात. दलदलीच्या ह्या टाकलेल्या शिंपल्यांना आम्ही लहानपणी भातुकलीच्या खेळात चुल करण्यासाठी घ्यायचो. तसेच भांड म्हणूनही खेळ करायचो. तिन शिंपल्या तिन टोकांना एकत्र लावुन ह्याची चुल करायची व वरती एक शिंपलि भांड म्हणून ठेवायची.
लागणारे साहित्य:
खुबे
२ कांदे चिरुन
लसुण सात-आठ पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला १ ते दोन चमचे
अर्धा चमचा गरम मसाला
१ टोमॅटो चिरुन
थोडी कोथिंबीर
मिठ
तेल
पाककृती:
चिखलात सापडल्यामुळे ह्याच्या कडांमध्ये थोडी माती असते म्हणून खुबे ६-७ पाण्यांतुन स्वच्छ धुवुन घ्यावेत . वरुन दिसायला काळे, चिखल भरलेले असले तरी आतील गोळा स्वच्छ व चविष्ट असतो.
खुब्यांच्या लेवलच्या थोड कमीच पाणी घेउन ते उकडून घ्यावेत. नातीतर महापुर येईल ओट्यावर.
पाणी एवढ्यासाठी कमी टाकतात की उकळल्यावर भाताप्रमाणे ह्याचा फेस वरती येतो व पाणी जास्त झाले तर भांड्यातुन खाली जातो. आणि आपल्याला ओटा पुसण्याचे अजुन कष्ट ताबोडतोब करावे लागतात.
खुबे उकडले की काही खुब्यांची तोंडे आपोआप उघडतात. हा गर असाचही खाता येतो. (लहानपणीचे स्वानुभव, अजुनही मी लहानच आहे. बर्याचदा उकडलेले तोंडात टाकते)
आता उकडलेल्या खुब्यांमधिल पाणि काढुन टाकायचे व थोड्या वेळाने खुब्याचा गर काढुन घ्यायचा. (ह्यांच्या जागी मोती असते तर ?)
जे मिटलेले असतात त्यांना दोन बोटांनी बाजुला सारुन त्यातील गर काढता येतो. थोडे कडकच असतात शिंपले. पण जे जोर लावुनही निघत नसतील असे खुबे खोलण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा (नाहीतर उगाच वरवंट्याने फोडाल)कारण त्यात माती भरलेली असते. जर खुबे मोठे असतील तर ते विळीवर चिरुन घ्यावेत. कधी कधी ह्या खुब्यांमध्ये चिंबोर्याच पिल्लुही असत त्याच्या सोबतीला ते असेल तर काढुन टाकायच.
आता भांड्यात तेलावर लसुण फोडणीला घालायचा व त्यावर कांदा घालुन चांगला बदामी रंग येउ द्यायचा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घातुन थोड परतवुन टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतवुन खेब्यांचे गर, गरम मसाला, मिठ, कोथिंबीर घालुन परतायचे.
झाकण ठेउन टोमॅटो थोडा शिजु द्यायचा (खुबे आधी उकडतो तेंव्हाच शिजलेले असतात). मग परत एकदा परतुन गॅस बंद करायचा. अजुन तिखट हवे असल्यास टोमॅटो घालताना मिरची मोडून घालायची. वासही चांगला येतो. लहान मुलांना तर हे खुपच आवडतात.
अधिक टिपा:
खुब्यांमध्ये कॅल्शियम भरपुर असते. तसेच हे पचायलाही थोडे जडच असतात. खुब्यांचे कालवणही करतात. त्यात आलकोलही घालतात. पण सुकेच जास्त चांगले लागतात.
याद्या
13243
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
चविष्ट दिसतोय पदार्थ..
प्रयोग
+१ एकदम सही. पण घेवडा नको
In reply to प्रयोग by सहज
जागु तै तुमच्या कडे क्लास
वा!
नंदनच्या आवांतराशी
ह्याची पूर्वेकडे एक फर्मास
पाकक्रुती एकदम फर्मास...
गगनविहारी तिसर्यांच्या
एक मात्र नक्की की याची
पाहिलय पण खाल्ल नाही
झकास ग जागू! इथे कधी दिसले
गगन विहारी म्हणून मी लेखात ती
अप्रतिम
धन्य आहेस जागु!! हे सगळे
एकदम झकास! नक्की करून पाहणार.
नाही.. मोत्यांचीही रेसिपी
In reply to एकदम झकास! नक्की करून पाहणार. by नगरीनिरंजन
शुभांगी , नगरीनिरंजन
मुळात मोती मोडेल का अशीच शंका
In reply to शुभांगी , नगरीनिरंजन by जागु
गगनविहारी मोच्याचा सोनाराकडून
जागुतै आता बास की प्राणीहत्या
खुप छान मला हे खुबे नुसते