Skip to main content

मौका सभी को मिलता है

मौका सभी को मिलता है

Published on 13/01/2011 - 10:28 प्रकाशित मुखपृष्ठ
मनसे आमदाराल झालेल्या मारहाणी बद्दल औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज ठाकरे जे बोलले ते मटा ने कव्हर केलय. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7270300.cms यात राष्ट्रवादीच्य नेत्यांवर त्यानी केलेली टीका ही मुद्देसूद आहे. भाषा एकदम फटाकेबाज आहे. जनतेच्या भावनाना हाक घालणारी आहे. अर्थात राष्ट्रवादीच्या तथाकथीत नेत्याना यामुळे काही फरक पडणार नाही. पण राज च्या लोकप्रियतेत बरीच वाढ होईल.

याद्या 8593
प्रतिक्रिया 48
पण राज च्या लोकप्रियतेत बरीच वाढ होईल. अगदी सहमत, पण राज चे हे आकांडतांडव सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठीच आहे अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by स्पा

पण राज चे हे आकांडतांडव सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठीच आहे स्पा भाउ, काही का असेना, स्वताच्या आमदारास माराहन झाली म्हणुन जर राज ठाकरे तेथे सभा घेत असतील तर त्या आमदाराचा त्यांच्या बद्दलचा आदर नक्कीच वाढला असेन.. राज फक्त मुंबईत बसुन बोलले असते, किंवा त्यांनी ही या विरुद्ध कार्यक्रर्त्याना दंगा माजवायला सांगितला असता तर ते चुक होते.. पण आपल्याच आमदारा साठी तेथे जावुन बोलणे ह्याला जरब म्हणतात .. मग ती प्रसिद्धी साठी असुद्या नाहितर नसुद्या. आणि कोणता राजकारनी प्रसिद्धी मिळवत नाही ? असो .. वयक्तीक, आमदारासाठी पक्ष्याचा सर्वोच्च नेता येणे हे चांगले वाटले

In reply to by स्पा

>>पण राज चे हे आकांडतांडव सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठीच आहे स्पा साहेब; १) राजचं भाषण बघितलयं का? २) मुद्देसुद टिका करणे किंवा आरोप करणे ह्याला आकांडतांडव म्हणायचे का? ३) उदाहरण देउन आरोप करणे ह्याला आकांडतांडव म्हणायचे का? वरील २,३ प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर, तुमची आकांडतांडव या शब्दाबद्दल बरीच गल्लत झालेली दिसतेय आता ही गल्लत हेतूपुरस्सर झालेली आहे की अनवधानाने हीच फक्त उत्सुकता :) प्रश्न १ चं उत्तर नकारार्थी असेल तर प्रश्न २,३ बाबत विचार करण्याची आवश्यकता नाही.

In reply to by समंजस

ओक्के समंजस.... तुम्ही म्हणता तसं.... राज यांनी फक्त आणि फक्त जनतेसाठीच स्वताला वाहून घेतलेले आहे या पामराची चूक झाली.. क्षमा असावी

In reply to by स्पा

नाही साहेब. मी म्हणतो म्हणून तसं नाही. तर जसं आहे तसं म्हणावं/मान्य करावं. राज ठाकरेंबद्दल मी मत व्यक्त केलं नाही तर फक्त राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल मत व्यक्त केलं :) राजकारण हा पुर्णवेळचा आणि भरपूर फायद्याचा व्यवसाय आहे. जे व्यक्ती हा व्यवसाय स्विकारतात ते फायदा मिळवण्याच्या उद्देशानेच. फक्त सामान्य जनतेचं भलं करण्याच्या उद्देशाने नाही. ती अपेक्षा सुद्धा ठेवू नये.

In reply to by शिल्पा ब

अय्या! साहेब काय म्हणतेस शिल्पा! ;) से...राज! ओन्ली ....राज! :) आय लअअअअअअअव राज ठाकरे! ही इस रिअली हॅन्डसम..& डॅशिन्ग!!!!... & सोssssssss charmig!!! :) :) :) _____________________________ अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे! कुणाला कुणी काय म्हणावं..हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे! आणि याबाबतीत प्रत्येकजण आत्मनिर्भर असतो.. आणि तो असावा! :) जय हिन्द! जय महाराष्ट्र!

In reply to by मृगनयनी

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by मृगनयनी

से...राज! ओन्ली ....राज! आय लअअअअअअअव राज ठाकरे! ही इस रिअली हॅन्डसम..& डॅशिन्ग!!!!... & सोssssssss charmig!!!
आपली करामत पाहिली, अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले.

राज चे हे अकांडतांडव नाही. ते जे बोलतात ते मनापासून बोलतात. बाळासाहेबांप्रमाणे त्याना देखील लोकांच्या र्‍हदयास हात घालण्याची कला अवगत आहे. राज जे बोलले ते सर्वसामान्यांच्या मनात कधीतरी येवून गेलेले असते. राज जे बोलले त्यात काही चुकीचे नाही

बाळासाहेबांप्रमाणे त्याना देखील लोकांच्या र्‍हदयास हात घालण्याची कला अवगत आहे. अहो विजुभाऊ नुसतं इकडे तिकडे हात घालून काय होणार आहे? आता हातून कृती होऊन्देत पण इतर राजकारण्यांपेक्षा राज नक्कीच श्रेष्ट आहे हे मी नक्कीच मान्य करेन.. कारण राज व्यक्तिश: माणूस उत्तम असला तरी त्यांचे अनुयायी तसे नाहीत.. असो जास्त बोलत नाही... कल्याण डोंबिवलीत जो काही मनसेने धुमाकूळ घातला... त्यावरून आमचा विकास होणार अशी स्वप्ने आम्ही डोम्बिवलीकर पाहू लागलो... पण इथेही, भ्रमनिरासच झाला त्यामुळे मोका सभिको मिलता हे.. और सभी अपनी "तुम्ब्दीया"भरके लेते हे

In reply to by स्पा

>>>>>आता हातून कृती होऊन्देत च्यायला कृती केली की "तुमच्यासारखे" शांतताप्रिय लोक बोंब ठोकतात.... कशी करणार ते काम आणि विकास.... >>>त्यामुळे मोका सभिको मिलता हे.. और सभी अपनी "तुम्ब्दीया"भरके लेते हे एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व म.न.से.वासी हे पुर्वाश्रमीचेच श्रीमंत आहेत. म.न.से. मध्ये येउन कोणी श्रीमंत झाल्याचे ऐकिवात नाही. ईतरांचे न सांगणेच योग्य... >>>बाळासाहेबांप्रमाणे त्याना देखील लोकांच्या र्‍हदयास हात घालण्याची कला अवगत आहे. १०००००% सहमत.

In reply to by नन्दादीप

च्यायला कृती केली की "तुमच्यासारखे" शांतताप्रिय लोक बोंब ठोकतात.... आम्ही शांतताप्रिय हे तुम्ही कोण ठरवणारे सामान्य जनतेने आंदोलनाविरुद्ध आवाज उठवला नव्हता,सर्व राज यांच्याच बाजूने होते.. (शांतता प्रिय सुद्धा) , त्यामुळे जो काही आवाज होता तो, विरोधी पक्षांचा आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांचा होता शिवाय अनेक अमराठी मिडिया न्युज चायनाल या आगीत तेल टाकत होतीच एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व म.न.से.वासी हे पुर्वाश्रमीचेच श्रीमंत आहेत. म.न.से. मध्ये येउन कोणी श्रीमंत झाल्याचे ऐकिवात नाही. ईतरांचे न सांगणेच योग्य... हा डेटा तुम्ही कुठून मिलाव्लात हो????? असो असो अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by स्पा

काय??? तुम्ही शांतताप्रिय नाही???? पत्ता सांगा तुमचा....दया तुम वहा जाव और गिरफ्तार करो उस्को... और देख लेना कही वो भाग ना जाय.... >>>>अहो विजुभाऊ नुसतं इकडे तिकडे हात घालून काय होणार आहे? >>आता हातून कृती होऊन्देत कसली कृती म्हणायची आहे तुम्हाला....ईतकी वर्ष काढलीत ना खितपत....मग आताच का काटे टोचतायत???? Wait & Watch...... >>आवाज होता तो, विरोधी पक्षांचा आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांचा होता..शिवाय अनेक अमराठी मिडिया न्युज चायनाल या आगीत तेल टाकत होतीच तेव्हा तुमचा घसा बसला होता वाटत....तरी सांगत होतो भोगी सुंठिका वापरा... >>हा डेटा तुम्ही कुठून मिलाव्लात हो???? समोर दिसत असताना मुद्दाम कशाला शोधु??? चष्मा पण लागला वाटत

In reply to by नन्दादीप

तेव्हा तुमचा घसा बसला होता वाटत....तरी सांगत होतो भोगी सुंठिका वापरा... सगळी तुम्हीच वापरात होतात न तेव्हा ,(उपयोग झालाच नाही...) कसली कृती म्हणायची आहे तुम्हाला....ईतकी वर्ष काढलीत ना खितपत....मग आताच का काटे टोचतायत???? Wait & Watch..... बरं झालं हे मान्य केलंत.. म्हणजे बाळासाहेब इतकी वर्ष नुसता हातच घालत बसले..(हृदयात) इतके बिहारी येईपर्यंत काहीच कृती नाही.. तेव्हा का नाही केली तोडफोड...?. सगळे पक्ष म्हणजे "बोलाची कढी बोलाचा भात" समोर दिसत असताना मुद्दाम कशाला शोधु??? चष्मा पण लागला वाटत समोर बरंच काही दिसत साहेब... पुराव्या शिवाय काहीच सिद्ध होत नाही... तुमच्या डोळ्यावरचा " राज प्रेमाचा" चष्मा उतरावा आधी

In reply to by स्पा

>>इतके बिहारी येईपर्यंत काहीच कृती नाही.. तेव्हा का नाही केली तोडफोड...?. त्या काळच्या पक्षांमधे "दम" नव्हता आवाज उठवायचा....त्यांचे हात पण दगडाखाली अडकले होते ना. आत्ता कुठे एक "स्वच्छ"* प्रतिमेचा नेता ऊभा राहू पहतोय...तर झाली पाय खेचणी सूरु....हो क्की नाय वो विजूभौ.... >>तुमच्या डोळ्यावरचा " राज प्रेमाचा" चष्मा उतरावा आधी "राज प्रेम" वगैरे काही नाही हो....पण ब-याच वर्षांनी पाठिंबा द्यावा अस वाटतय...बाळासाहेबांनंतर..... आता त्यतल्या त्यात चांगल्याला पाठिंबायच सोडून तुम्ही विरोध करताय....कसा होणार तुमच्या क.डों.चा...... पाठिंबा नाय तर नाय निदान विरोध तरी करू नका.....

अशीच एक अजुन घटना. एका घरकाम करणार्‍या महीलेने , जिच्यावर मंगळ्सुत्र चोरण्याचा आळ घेतला गेला होता , तिला आणि तिच्या १३ वर्षाच्या मुलिला , पोलिसानिं अतिशय क्रुर पणे मारहाण केली , इतकि मारहाण की , तिने आत्महत्या केली. अतिशय करुण घटना. वाचल्यावर खुप सुन्न झालो. ह्या असाह्य कुटुंबाचि कोणत्याही राजकीय पक्षाने दखल घेतल्याचे वाचले नाही. पण शिवसेनेने , मनसे शी मतभेद असताना सुध्दा , औरंगाबाद प्रकाराचा निषेध केल्याची टीव्ही वर पाहीले. सामान्यांचा कोणी वाली नाही हेच खरे.

पोलीस काही कायद्याने कामे करत नाहीत याचा हा पुरावा आहे. अंगठी तुटेपर्यंत मारणे हे कोणत्या कायद्यात बसते. अतिरेक्यांना कशी वागणूक देतात ते?

In reply to by पाषाणभेद

>>>अतिरेक्यांना कशी वागणूक देतात ते? त्यांना तर पेश्शल वागणूक असते....बघताय ना कसाब कडे.....

ड्वायल्वाक आवडला. त्यात काही नवल नाही. तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. ;)

In reply to by स्पा

संघ बदलला? कधीच नाही. अभ्यास वाढवा. मागचे काही धागे अभ्यासा. अभ्यास न करता दिलेली प्रतिक्रिया पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. :)

मागचे काही धागे अभ्यासा नानासाहेब.. तुमचे बहुतांशी धागे उद्लेलेच दिसतात.. आता काय बघू.. हे म्हणजे बर्याच वादानंतर "महत्वाचे सीन कापलेला "झेंडा" पिक्चर' पाहण्यासारखे आहे

In reply to by अवलिया

थोडक्यात अभ्यास वाढवा
स्पा ने कसला अभ्यास वाढवावा हे सांगण्याचा हक्क आपल्याला नाही , आपण फक्त आपले निरिक्षण नोंदवावे.

हिंदीभाषीकाना मराठी लोकांबद्दल काहिशी आसूया जाणवते. पूर्ण बीहार लुटणार्‍या लालूला ते काहीच दोषदेत नाहीत. मायावती मुलायम याना काहीच नावेठेवत नाहीत पण महाराष्ट्राचा विकास इथल्या नेत्यानी केला असे म्हणालो की ते म्हणतात की महाराष्ट्र पुर्वीपासूनच विकसीत होता. त्यात तुमच्या नेत्यांचेकाय कर्तृत्व? महाराष्ट्रातले नेते किती खातात ? महाराष्ट्रातील लोक केवळ कॉलेजेस काढून स्वतःची तुम्बडी भरतात. वगैरे वगैरे. त्याना पश्चीम महाराष्ट्राचा विकास कसा झाला ते सांगितले की ते म्हणतात की बीहारचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्राने मदत करायला हवी. तुमच्या कडे पैसे आहेत म्हणून बिहारी इकडे येतात. ते त्यांच्या कष्टावर जगतात. तुम्हाला कष्ट करायला नको असते म्हणून ते येतात. वगैरे वगैरे. मराठी संस्कृतीबद्दल बोललो की म्हणतात महाराष्ट्राची सम्स्कृती गनपतीविसर्जनाच्या दिवशी सगळ्याना दिसतेच ना. मराठीचा आग्रह धरला तर म्हणतात की त्यांची काय चूक आहे. तुम्हा मराठी लोकांना एवढा स्वतःच्या भाषेचा आग्रह असेल तर मग महाराष्ट्र भारतापासून स्वतन्त्र का करुन घेत नाही? हे मी अनुभवलेले आहे. चीड येते त्यांच्या उद्दामपणाची

In reply to by अभिज्ञ

मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर आबा पाटलांनी जे हिंदी वाक्य वापरले होते त्या हिंदी वाक्याला प्रत्युत्तर म्हणुन राजने हिंदी वाक्य वापरले. ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे या मराठी पद्धतीशी सुसंगत ती कृती होती, त्यामुळे त्यात फारसे आश्चर्य किंवा गंमत मला तरी वाटली नाही. कुणाला जर वाटली तर कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. अवांतर - मी मनसेचा कार्यकर्ता किंवा नेता, प्रवक्ता नाही.

In reply to by अवलिया

अवांतर - मी मनसेचा कार्यकर्ता किंवा नेता, प्रवक्ता नाही.
आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत आहे. ह्या पुर्वीही राज यांनी अमिताभ चा एक डायलॉग मारला होता " हम ने एक ही मारा .. लेकिन क्या सॉलिड मारा " .. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. नाना, आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले.

In reply to by गणपा

बिपिनदा आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

राजकीय नेत्यांची भाषणे, त्यावरील धागे, त्यावरील प्रतिक्रिया या सगळ्या घटनांमुळे चांगली करमणुक होत आहे असे मत आम्ही नोंदवू इच्छितो. बाकी चालू द्या.

बातमीतून...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ७० च्या दशकातील व्हिलनप्रमाणे दिसतात
तेव्हा सरकार शेपूट घालतं, लेंड्या टाकतं,
सही. एकदम समुदायाच्या काळजाला हात घालणारी ओघवती भाषा.

राज ठाकरे यांचे कालचे भाषण अतिशय उत्कृष्ठ वक्तृत्वाचा नमुना होते यात शंकाच नाही. त्यांची कालच्या भाषणासाठी तरी कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. निषेध सभा असूनही कमालीच्या कौशल्याने गुंफलेल्या कड्या अतिशय परिणाम कारक पणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. संयम हा एकमेव शब्द त्यांनी अत्यंत थंड डोक्याने वापरला. पोलीस आणि मनसे अशी जुंपून देवून मजा बघत बसायचा आणि नंतर पुन्हा राडे करणारे म्हणून बदनाम करायचा बेत त्यांनी सरळ सरळ हाणून पाडला. पण तसे करतानाही मौका सभीको मिलता है सांगत त्यांनी झाकली मुठ सव्वा लाखाचीच ठेवून अप्पर हैन्ड घ्यायला ते विसरले नाहीत. त्यांनी मांडलेले सर्वच मुद्दे इतके बिनतोड होते कि आज दिवसभरात कोणीही त्याचा एक एक मुद्दा घेऊन प्रत्यवाद करू शकले नाही. एक कमालीची सुसूत्रता त्यांच्या भाषणात होती.भाषण हा शब्द चुकीचा आहे - महाराष्ट्रातील जनतेशी केलेले संभाषण हा योग्य शब्द होईल. आणि त्यांनी ही संधी पुरेपूर वापरली. १)पोलीस संघर्ष होऊल म्हणून फिल्डिंग लावून होते त्याना त्यांनी चुचकारून संघर्ष तुमच्याशी नाही तर तुम्हाला नको त्या आज्ञां देवून गुंतावानार्यांशी आहे हे प्रथमच सांगून टाकले. २) त्याच बरोबर आपण ४ दिवस इकडे फिरकलो नाही तो असा अनावश्यक संघर्ष होऊन जनतेचे हाल होऊ नये म्हणून हे सांगून आपली केवळ राडेबाज ही माध्यामाना आवडणारी प्रतिमा न बनवता एक संयमित व्यक्ती आहोत हे दाखवून दिले. ३) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यांनी केलेली टीका थोडीच होती पण त्यात मुख्यामान्त्रांचे राज्यातील सध्याचे स्थान काय आहे ते स्पष्ट करणारी होती. एक अजिबात जनाधार नसलेला पण नेता बनलेला मुख्यमंत्री स्वत:च्या मंत्रिमंडळातील बलदंड सदस्यांवर काय अंकुश ठेवू शकत असेल , ते बलदंड लोक त्यांना न जुमानता कसे अधिकार वापरतात आणि मुख्यमंत्री कसे हतबल आहेत हे दाखवून दिले. व्हिलन सारखे दिसणे - वागणे ची उपमा त्यांनी इतकी अचूक मांडली की स्वत: काही करायचे नाही पण हाताखालच्या गुंडाना वाटेल ते करायचा फ्री पास द्यायचा आणि नामानिराळे राहून फायदा मात्र लाटायचा अशी मुख्यमंत्र्यांशी प्रतिमा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणजे एका अर्थाने आघाडीचे सरकार असूनही ते एकट्या राष्ट्रवादीचेच कसे आहे हे कोन्ग्रेस मधील मुख्याम्त्रीपद न मिळाल्याने दुखावलेल्या बलीश्ठाना आठवून दिले. त्यासाठी त्यांनी लावासा , पुतळा प्रकरणाचा उल्लेख केला. इतकाच काय तो कोन्ग्रेसचा या प्रश्नाशी संबंध त्यांनी दाखवला. पुढचे सगळे मुद्दे राष्ट्रावादिची गुंडगिरी, दडपशाही , अतिरेक ,स्वत:च्या पुरस्कृत संघटनाना हवे ते करू द्यायला दिलेली मोकळीक असे होते. ४)हर्षवर्धन जाधव याचे आई वडील कोन्ग्रेस चे माजी आमदार असूनही तो मनसे कडे आला. एक मराठा राष्ट्रवादी कडे न जाता दुसरीकडे कुठेतरी जातो म्हणून त्याच्यावर राग - हे पहिले कारण त्यांनी दिले. ५) हर्षवर्धनने दारूबंदी आणायला गावातील महिला घेऊन मुंबईला गेला असताना आर आर आबानी त्याला भेट सुद्धा दिली नाही उलट त्यांच्या गाड्या जप्त केल्याचे सांगून हे का स्वच्छग्राम योजना ? असे प्रश्न चिन्ह निर्माण करून एकूणच धान्य किंवा जे मिळेल ते गाळून दारू बनविणे आणि गावेच्या गावे दारुडी करण्यावर आक्षेप घेऊन त्यांनी ग्रामीण महिलांच्या मनाला हात घातला. ६)हर्षवर्धन जाधव चुकला होता तर त्याला तिथेच ४-२ थपडा मारून अक्कल शिकवायची होती, पोलीस स्टेशनवर ४५ मिनिटे बसवून ठेवून नंतर नागडे करून मारल्याचा उल्लेख करून त्यांनी सामान्य जनतेला सरकारी दडपशाहीची आठवण करून दिली. जेंव्हा जेंव्हा सरकार स्वत:ची प्रतिमा गमावून बसते तेंव्हा तेंव्हा नो निषेध / नो आंदोलने अशी बंधने सरकार आणते दाखवून जुन्या पिढीला आणीबाणीची आठवण करून दिली. ७)जर एखाद्या चुकीपायी आमदाराला इतके मारतात तर सामान्याचे काय ? त्यापेक्षा अधिक मोठी चूक शिवनेरीवर करणार्याना मात्र मोकाट सोडले जाते का ? अशी शंका सामान्य माणसाच्या मनात उभी करण्यात ते यशस्वी ठरले. ८) जातीयतेचे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणारे हेच राष्ट्रवादी हे पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावर बिम्बावान्यात यशस्वी झाले असे म्हनाता येईल कारण डॉ. बाबासाहेबांचे शिक्षक ब्राह्मण होते मग तो हि इतिहास बदलायचा का स्वत:च्या सोयीने हे उदाहरण लोकांनी प्रचंड उचलून धरले. एक अर्थाने राज्यातील जातीयवादी राजकारणाने उबगलेल्या सर्वाना आणि विशेषत: मोठ्या तरुण वर्गाला त्यांनी आपलेसे केले . ९) करायचे तर विकासाचे राजकारण करा जातीचे नको हे सांगायला ते विसरले नाहीत. राडेबाजीच्या प्रतिमेला छेद देत आपण एक अतिशय संयमित , लोकांच्या हिताचे राजकारण मनात ठेवून आहोत अशी प्रतिमा निर्माण करण्यात आणि राष्ट्रावादिची जातीय राजकारणी ते सुद्धा फक्त एकाच जातीचे ही प्रतिमा दृढ करणे हे कालच्या सभेचे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने फलित म्हणता येईल.

In reply to by विनायक बेलापुरे

विनायक भाऊ, भाषणाचे सुंदर विश्लेषण केलेत. राज ठाकरे हुशार माणूस आहे यात वादच नाही. त्याच्या प्रत्येक भाषणावर नजर ठेवून त्याला कायदेशीर पेचात पकडण्यासाठी फिल्डिंग लावली जाते म्हणे. अजून तरी तो त्यात अडकला नाही.

राज नी काहीतरी विधायक कार्य करून दाखवावे. त्यासाठी 'मौक्याची' वाट पहात बसू नये. सत्ता आल्यावर हिशेब चुकते करू असं म्हटल्यास त्यांचे हिशेब (जर सत्ता आली तर !) जरूर चुकते होतील पण मग विधायक कार्य करणं जमणार नाही!