सुरेख व्यक्तीचित्रण :)
>> 'आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. >>
खरच साधसच वाक्य पण माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी खूप मोलाचा संदेश आहे त्यात.
माझी एक आजी मी पाहिली नाही, एक आठवत नाही. पण शेजारची आजी थोड्याबहुत फरकाने अशीच होती. माझ्या आई-बाबांनाही तिचा खूप आधार वाटायचा. तुझा लेख आवडला आणि त्या आजीची आठवण आल्यामुळे जरा जास्तच भावला.
मी आणि माझा भाऊ "आपल्याला आवडतो अमका पदार्थ, छान लागतो ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार" असाच विचार करत प्राथमिक शाळेत असल्यापासूनच काही काही गोष्टी बनवायला शिकलो. फरक एवढाच तुझ्या आजीने तुला हे सांगितलं, आमच्या घरात आईची नोकरी, शिस्त आणि आमचा उचापाती स्वभाव याच्यामुळे आम्ही दोघे आपणहून शिकलो.
खूपच छान लिहिले आहेस!
कवितेच्या ओळीही सुंदर आहेत.
आजी सबला राहिली कारण आपापल्या मर्यादा ओळखून घरातल्यांनीही वागणे तसेच ठेवले. आईच्या पिढीत सबला नव्हत्या असे नाही पण त्या नव्या पिढीलाही नियम जुनेच लावले गेले. अश्याने दमछाक लवकर होते. गृहीणी असण्यात गैर काहीच नाही पण त्याव्यतिरिक्त बाईला काही करण्यास वेळ न ठेवणे यामुळे आईची पिढी लवकर थकली असे वाटते. तुझ्या आजीने लेख, कथा कविता लिहून मन ताजेतवाने ठेवले पण तसे करण्यास पुढच्या पिढीतील स्त्रियांना वेळ पुरला नाही.
माझी आजी तिच्यावेळची मॅट्रीक तर होतीच पण संस्कृतमध्ये चक्क सुवर्णपदक विजेती होती. तिने पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त करताच तिच्या वडीलांनी सुवर्णपदक विहीरीत टाकून दिले व लगेच लग्न करून दिले. तशीही १६ वर्षाची म्हणून घोडनवरी झाली होती ती. त्यानंतर तिने माझ्या आईला चांगले संस्कृत शिकवले व आईलाही चांगले गुण मिळाले पण तेच सगळे माझ्यापर्यंत पोहोचवायला आईला संसाराच्या रगाड्यातून वेळ नव्हता. मनात नसताना जे आई किंवा काकूला करावे लागले त्याने त्या लवकर थकल्या. माझ्या चारही आत्या वयाची साठी पार करता करता गेल्या. अत्यंत अभ्यासू आणि हुषार असताना केवळ घरकाम करावे लागले. माझ्या मते त्यांनी तरीही इतकी वर्षं संसार मनाच्या शक्तीवर ओढले त्यामुळे त्याही वेगळ्याप्रकारे सबला होत्या.
>> त्यानंतर तिने माझ्या आईला चांगले संस्कृत शिकवले व आईलाही चांगले गुण मिळाले >>
ये हुई ना बात!!!!आपल्या मुलांना आपल्या गुणांचा फायदा करून द्यायचा नाहीतर कोणाला?
रेवती ते पदक खूप खूप सुरेख रीतीने वापरले आज्जीने तुझ्या. एक सुसंस्कारीत पीढी निर्माण केली. ज्या पीढीने पुढे तो वारसा चालविला.
छान अनुभव.
याच विषयावर लोकसत्ता नागपूरचे निवासी संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी रुचीच्या दिवाळी अंकात लिहिले आहे. त्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही. तुमचाही लेख तसाच मस्त आहे.
उत्तम व्यक्तीचित्रण. तुमच्या आजीचं ताठ कण्याचं व्यक्तिमत्व वाक्यावाक्यातून जाणवतं. आपण कोण आहोत, आपली शक्ती काय आहे, मर्यादा काय आहे हे ओळखून घेऊन त्यात आनंदाने वावरणं ही त्यांची सकारात्मक भूमिका स्त्रियांनीच नव्हे तर सर्वांनीच अंगीकारण्यासारखी आहे. प्रत्येकच व्यक्ती इतक्या समर्थपणे, मानीपणे, डोळसपणे, व पुरोगामीपणे जगली तर खूप प्रश्न नष्ट होतील.
या कर्तृत्ववान बाईने संधी मिळाली असती तर एखादी कंपनी सहज चालवून दाखवली असती. एखाद्या स्त्रीला संधी व कर्तबगारी असूनही मनापासून घर चालवावंसं वाटत असेल तर प्रश्नच येत नाही. या बाईला कंपनी चालवण्याची संधीच मिळाली नाही हे दुर्दैव. अशी संधी अस्तित्वात असण्यासाठीच स्त्रीमुक्तीची गरज आहे.
माझी आई नेहमी हेच म्हणते आजीबद्दल.
पण आजीला कधी तसे काही वाटले नाही. तिचं आणि आजोबांचे देखिल, व्यक्तीमत्व इतके प्रभावी होते, की एकदा भेटलेला माणूस आयुष्यात त्यांना विसरणार नाही. परत परत प्रेमानी आठवण काढत राहील.
आता ती नाही, तरीही आमच्यावर सगळ्यांवर तिचा इतका प्रभाव असतो की कधीही 'अत्ता आजी इथे असती तर काय म्हणाली असती' असा विचार दिवसातून कमीत कमी एकदा तरी डोकावून जातो.
तिचा 'स्त्रीमुक्ती' या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे 'डायरेक्ट मोक्ष' हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा. मुक्त होऊन 'स्त्री' नक्की करणार तरी काय, असा प्रश्न तिला कायम पडायचा.
>>>>
पुरुष आणि स्त्री या दोघामधाला नैसर्गिक फरक संपणार नाही, तो संपवायची गरजही नाही, कारण तो फरकच त्याना पूरक असतो, याबद्दल तिची मते ठाम होती.
>>>>
बरोबर आहे. सध्या जे लेख मिपावर आले आहेत स्त्री-पुरुष मुक्ती वरचे त्याचा सुवर्नमध्य हा लेख आनि आजीची भुमिका आहे.
ज्याना कळालेय त्यानी समजुन शान्त बसावे नि बाकिच्याना वाद घालन्यासाठी सुट द्यावी.
आनि आजी आवड्ली
हॅट्स ओफ्फ !!
या आजीचं कर्तुत्व एखाद्या क्षेत्रात ठळकपणे जाणवलं नाहि, तिला तशी संधी मिळाली नाहि वगैरे ठीक पण तिनी आयुष्यभर असंख्य लोकांच्या मनात, विचारांत, जीवनात जी शाश्वत शक्ती पेरली त्याचं कलेक्टीव्ह कर्तुत्व किती प्रचंड असेल याची कल्पना करणे अशक्य आहे.
ज्यांनी ज्यांनी हा लेख वाचला त्यांना मनात काहितरी आश्वासक, सशक्त हुंकार जाणवला ना... आजीपासुन तिसर्या पिढीने केलेल्या व्यक्तीचित्रात ही ताकत असेल तर आजीचा प्रत्यक्ष सहवास किती मोलाचा असेल...
अर्धवटराव
तिच्या आयुष्याची आणि तिच्या संसाराची ती कायम 'बॉस' होती.
यात तुझ्या आजोबांचा ही मोठेपणा आहे की त्यांनी तिच्यावर 'बॉस'पणा दाखविला नसणार अन आज्जीवर आपले वर्चस्वही गाजविले नसणार.
'आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. कंटाळत बसलीस तर काम लांबेल. आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!'
हे खूपच आवडले.
Overall तुझ्या गोड आजीचे व्यक्तिचित्रण आवडले तिच्याकडून खुप काही शिकण्याजोगे !!
विचारायचे कारण एकच , माझी अम्मी पण तेथेच हिंगण्याला शिकली होती. माझ्या अम्मी अन तुझ्या आज्जीमध्ये वयाचं अंतर आहे तरीपण आज अम्मी असती अन तिने हा लेख वाचला असता तर केवढी आनंदली असती !!
माझ्या अम्मीच्या शाळेतल्या(हिंगणे) व्यक्तीचे चित्रण परत परत वाचले.
मध्यंतरीच विक्रम कर्वेंशी (धोंडो केशव कर्वेंचे पणतू ) बोलणं पण झालं होतं.
अम्मीसाठी मला कधीपासून जायचं आहे ग हिंगणेला पण वेळच मिळत नाही
तुझ्या आज्जीच्या या व्यक्तिचित्रणाची लिंक त्यांना मी आजच पाठविते
खंबिर भक्कम आधार देण्यार्या स्त्रिया हिंगण्यातच घडू शकतात
अतिशय परिणामकारक व्यक्तिचित्र.
एक गोष्ट विचारावीशी वाटते. एखाद्या स्त्रीचा आत्मसन्मान, तिला मिळणारे योग्य ते स्थान हा तिचा अधिकार आहे यात शंका नाही. आपल्या समाजव्यवस्थेत शतकानुशतके तो तसा उपलब्ध नव्हता म्हणूनच , ही मूलभूत गोष्ट आवर्जून सांगायची वेळ येते हेही खरेच. मात्र, ज्या घरात (लेखिकेच्या आजीसारख्या ) स्त्रियांना स्वतःची ओळख पटवून घेणे आणि कुटुंबात नि समाजात ती योग्य रीतीने मांडणे शक्य होते , त्या घरातल्या व्यवस्थेलाही थोडे श्रेय देता येईल. लेखिकेच्या आजीचे व्यक्तित्व सोन्यासारखे झळाळते आहे यात शंका नाही; परंतु ते तसे व्हावे म्हणून तसे वातावरण घरात होते; आजोबांनीही ऐन संसाराच्या काळात योग्य ती पावले उचलली असतील असे म्हणता येईल का ?
कुटुंबव्यवस्था समजूतदार असणे ही काही फार मोठी अचीव्हमेंट नव्हे हे खरे; परंतु अनेक दशकांपूर्वी जर का एखादे कुटुंब घरातल्या स्त्रीला सन्मानाने वागू देत असेल तर त्या कुटुंबातले वातावरणही उल्लेखनीय होते असे मानायला हरकत नसावी.
अगदी सहमत.
माझ्या वर दिलेल्या प्रतिसादात हेच लिहिले आहे. आपापल्या मर्यादा ओळखून कामे केली तर बघता बघता निपटतात. त्याचप्रमाणे विचारही मोकळे ठेवले तर घरातल्या 'बाई' या प्राण्यावर अतोनात काम पडत नाही. तसेही घरकाम करण्याचा उरक 'शक्यतो' बायकांना जास्त असतो पण ते कामही मर्यादीबाहेर दिले गेले म्हणूनच ओरडा सुरू झाला ना! आजोबांच्या मोकळ्या विचारसरणीलाही बरोबरीने श्रेय द्यायला हवे.
प्रश्न आहे साथ देण्याचा. जर तुमचा जोडीदार तुमच्या इच्छेला तुमची साथ देत असेल तर सबल होण्यात अधिक मदत होते. जेव्हा दोघांपैकी एकजण आडमुठेपणा करायचे ठरवतो तेव्हा दुसर्याला उसळावे तरी लागते किंवा दबावे तरी लागते.
सहमत. तसेच विचारांनी सुधारक आईवडिल किंवा इतर मिळालेल्या संधी यांचाही परिणाम होत असावा.
नाहीतर घरच्यांच्या /बाहेरच्यांच्या (आईवडिल, नातेवाईक) दबावाखाली एकतर उसळावे लागते नाहीतर दबावे लागते असे वाटते.
सन्मान बाहेरुन नन्तर मिळतो. आधी 'आतमध्येच आत्मसन्मान' असावा लागतो.
आजोबा मनानी मोकळे होते यात वादच नाही. पण मूळात आजी स्वतःला कधी स्त्री म्हणजे 'कमी प्रतीची' असे कधी समजलीच नाही.
स्त्रियांकडेच जास्त पात्रता असते, त्यामूळे त्यांच्यावर जास्त जबाबदारी पडते, असे तिचे मत होते.
'स्त्रियाच समाज घडवतात' याबद्दल तिला पूर्ण खात्री होती.
तिनी तिच्या मुलींच्या केलेल्या 'बॉबकट' बद्दल तिला घरातुनच 'काय रुपाचे बेरुप केले पोरींचे!' अशी प्रतिक्रिया ऐकावी लागली होती. तिनी ती मनावर घेतली नाही. ती प्रतिक्रिया देणार्या व्यक्तीवरही राग ठेवला नाही.
>>तिच्या 'टिन एज' मध्ये तिनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकाना भाकर्या पोचवणे, त्याच्या पिस्तुली गोठ्यात लपवून रोज स्वच्छ करणे वगरै कामे केली होती. ती मेट्रिक झाली, हिंगण्याला होस्टेलवर राहून देखील शिकली. तिला मराठी इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि कानडी या भाषा वाचता, लिहिता, बोलता यायच्या. तिला उत्तम पोहता यायचे. गाण्याची, नृत्याची, नाटकाची उत्तम जाण होती. सुग्रणपणाला तर तिच्या पिढीत ऑप्शनच नव्हता!
तुमच्या आजीचे व्यक्तीमत्व खरोखरच लखलखीत आहे, आणि तुमच्या आजीच्या माहेराबद्दलही लिहायला हवे होते असे परत वाचताना जाणवले. पोहता येणे, लिहीता-वाचता येणे, मॅट्रिक होणे हे फार कमी बायका तेव्हा करू शकत असाव्यात. एकवेळ लिहीतावाचता येणार्या बर्याच असतील, पोहता येणार्या बायका खरोखरच कमी असाव्यात. हिंगण्याला त्या होत्या, त्या कशा तेथे गेल्या? तेथे कोणाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले?
काही लोकांचा आत्मसन्मान आतूनच असतो हे जसे खरे, पण तसे ज्यांना तो नसतो त्यांना अशी लखलखीत उदाहरणे बघून, शिकून कल्पना येऊ शकते.
हिंगण्याला माझ्या मते महर्षी कर्व्यांची शाळा होती...कदाचीत त्यामुळे थोडा मोकळेपणा असेल.
लेख छान. मीही हेच म्हणेन कि जोडीदाराची साथ असावीच लागते...नाहीतर घरात तेच बाहेर तेच.
अगदी माझ्या मनातील माझ्या आजीचेच हे थोड्याबहुत फरकाने चित्रण केले आहे, लीमाउजेट यानी. तसे म्हटले तर प्रत्येक मुलाला मुलीला आजोबापेक्षा आजीच का हवीहवीशी वाटते त्याचे प्रत्यंतर वरील लेखातून स्पष्टपणे जाणवते इतके ते आपलेसे झाले आहे.
"....पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते. ..."
~ हे तर फार विशेष आहे. ही समज सर्व दु:ख आणि कष्ट निश्चितच हलके करते. जगण्याचे सुरेख तत्वज्ञानच आहे एक प्रकारे.
वैयक्तिक पातळीवर मला भावले ते तुमच्या आजीला 'उत्तम पोहायला यायचे' हे. मला माझा मामा पहाटे उठवून सक्तीने पंचगंगा नदीकडे न्यायचा त्यावेळी मी आईच्या कुशीत लपलो तरी मला तिथून आजी बाहेर काढायची आणि मामापेक्षा तीच जास्त पोहायला जाण्याची सक्ती करत असे. "पुढील आयुष्यात मासा खाल्ला नाहीस तर चालेल, पण आता माशासारखे पोहायला मात्र शिकलेच पाहिजे..." अशी तिची सक्त ताकीद आणि मी योग्य तितके पोहून आलो याची खात्री झाल्यावरच न्याहारी....मग मात्र ती अगदी ढीगभर, अगदी मायेने ओथंबून. सायकलवरून पडून आलो तरी ती अजिबात रागवत नसे, अगदी ओली जखम जरी दिसली तरी, "काय लागल्ये तरी...चिमणीच्या चोचीएवढं आणि दंगा बघा वाघ चावल्यासारखा...!"...म्हणजे जखम झाली ती झालेलीच नाही असे ती वातावरण आपल्या बोलण्यातून करत असे आणि खरंच तिच्या शब्दांनी त्या जखमेचा विसरच पडून जायचा.
आजी पाहिजेच !! थॅन्क्स लीमा
इन्द्रा
ही 'पुर्ण स्त्रि' . खंबिर भक्कम आधार देणारी.
ती बॉस होती कारण तीच्या कडे निर्णय क्षमता होती अन घेतलेले निर्णय तडीस नेण्याची खमक ती बाळगुन असावी.
आजी आवडल्या.
लीमाउजेट
हॅट्स ऑफ...
एका सशक्त मनाच्या व्यक्तीमत्वाचे तेवढेच सशक्त चित्रण केलेय.
मिपावर वाचलेल्या सर्वोत्तम लेखांपैकी एक लेख.
करारी /प्रेमळ/आयुष्यावर प्रेम करणारी अशी आज्जी मलादेखील लाभली होती.
तुम्ही फोटो न देतादेखील डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
व्यक्ती आणि व्यक्तीचित्रण दोन्ही आवडले.
प्रत्येक कालात अशा स्वतंत्र स्त्रिया असतात. स्वातंत्र्य ही मनाची अवस्था आहे. ती सर्वस्वी लिंगाबरहुकूम ठरते असे म्हणवत नाही.
उदा. माझ्या आईकडून पणजी असलेली स्त्री १८९०-१९०० सालाच्या आसपास (दररोज घोड्यावरून फिरून) पंचक्रोशीतील (तिच्या मालकीच्या) शेतजमिनींचा व्यवहार पहात असे. तालुकाभर तिला मान होता. बंदुकीचा धाक दाखवून तिने काही दरवडेखोरांना पळवून लावले होते. इ. इ.
प्रतिक्रिया
सुंदर लेख लीमाउजेट!
सुरेख व्यक्तीचित्रण >>
चित्रण आणि आजी आवडले.
चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही
अप्रतीम आणि ओघवतं लिहीलं आहेस
खूपच छान लिहिले
मस्त अनुभव.
मस्त
उत्तम व्यक्तीचित्रण
खरंय..
वा..
छान!
+१
चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही
सुंदर
सुंदर!!!
तिचा 'स्त्रीमुक्ती' या
आजी !!
अतिशय सुरेख व्यक्तिचित्र!
अतिशय उत्तम आणि मनाला भिडणारे
सगळ्यांसाठी आजी!
Hats off !
कसली सुंदर आहे आज्जी दिसायला
भास्करराव कर्वे होते का ग त्यावेळी त्यांना शिकवायला ??
उत्तम व्यक्तीचित्रण
अगदी सहमत. माझ्या वर दिलेल्या
सहमत
+१
सन्मान.
अगदी
हिंगण्याला माझ्या मते महर्षी
तुमच्या आजीची ओळख आवडली
आजी....!
आजी आवडली.
ही 'पुर्ण स्त्रि' . खंबिर
छान ओळख !
माऊ झकास लिहिले आहेस
छान!
लीमाउजेट हॅट्स ऑफ... एका
मस्त
आजी आवडली. -सुप्रिया
आजी तर आवडलीच. पण लेखनही
माउताई, तुमची आजी खुप आवडली,
छान व्यक्तिचित्र
सुरेख
मस्त. माझ्या आजिबद्दल वाचते
सुरेख व्यक्तीचित्रण
व्यक्ती आणि व्यक्तीचित्रण
सुंदर लेखन. आजी एकदम आवडून
आजी खूपच आवडली. कधीही न