दाल,बाटी..
दाल,बाटी..
गव्हाची जाड कणीक (४ वाटी),मका पीठ (१ वाटी)..
पुर्ण ओवा..
ओवा-जिर्याची जाड पुड,हळद,मीठ,हिंग...गरम तेल टाकुन कालवुन घ्या..आणि मग थोडे थोडे पाणी टाकत भिजवा..(जास्त कडक नको..)
भिजवल्यावर चांगले मळुन घ्या..
त्यानंतर त्याचे ५-६ समान गोळे करुन घ्या..
त्यातील एक गोळा घेउन पोळपाटावर लाटुन घ्या..
आणि त्यावर तेल पसरुन घ्या..
आणि त्याची एकावर एक पुड करुन चौकोनी बट्टी करुन घ्या..खालीलप्रमाणे..
अशाप्रकारे सर्व बट्टी तयार करुन घ्या...
आणि त्यानंतर चाळणीत किंवा ईडली पात्रात बट्ट्या वाफवुन घ्या.. वेळ १५-२० मि.
(चाळणीत वाफवताना चाळणी मावेल एवढी पातेली घेउन त्यात पाणी टाकुन त्यावर चाळ्णी त्यात बट्ट्या..आणि वर झाकण)
ते वाफवुन होते तोवर..
आमसुल आणि गुळ पाण्यात उकळवुन घ्या..
आणि तुरदाळ पण शिजवुन तयार ठेवा..
वाफवुन झाल्यावर थोड्या निवल्यावर त्याचे तुकडे करुन घ्या..
तुकडे करण्याची पद्धत..
व्यवस्थित तुकडे झाल्यावर तेलात तांबुस-सोनेरी रंगावर तळुन घ्या..
कच्च्या बट्टीत आणि तळलेल्या बट्टीत साधारण एवढा फरक दिसला पाहिजे...
वरण-
फोडणीला जिरे,मोहरी,कढीपत्ता,तेल...
नंतर त्यात लाल तिखट व थोडा मसाला घाला...हे थोडे परतुन झाल्यावर...
बट्टी वाफवत असताना तयार केलेले गुळ-चिंचेचे पाणी त्यात घाला.. आणि एक मिनिटानंतर त्यात पुर्वी शिजवलेली थोडी दाळ टाका...आणि बाकीची दाळीचे वरण ब्लेंडर/रवीने घोटुन घ्या...
नंतर हे घोटलेले मिश्रण फोडणी व मसाल्यात ओतुन घ्या..आणि थोडेसे ढवळुन घ्या मग त्यात चवीपुरते मीठ..आणि ताजी कोथिंबिर..(सुगरण)..
हे झाले दर्शनी ..पण खायला बसल्यावर कसले काय..
मस्तपैकी बट्टी मोडुन घ्या...
दाल-बाटी...आणि शुद्ध देसी गावराणी तुप..
याखेरीज..कैरीच्या लोणच्या सोबत किंवा गार झालेली बट्टी दुधात मोडुन पण चांगली लागते..
- खाद्यलालसा
वाचन
14646
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
मस्त दिसत्ये डिश. यम्मी आहे
हाण्ण! जबराट! मायावतींच्या
रेडी टु सर्व्ह मिळत नाही का?
मेहनतीचे काम आहे
In reply to मेहनतीचे काम आहे by सहज
हे माहीत आहे हो..ह्याचे खुप
एवढे कश्ट करुन परत चुराच
In reply to एवढे कश्ट करुन परत चुराच by पर्नल नेने मराठे
अहो आत्याबाई
झ का स ! छत्तीसगडला असताना
मस्त पन ही खानदेशी वाटतेय लय
In reply to मस्त पन ही खानदेशी वाटतेय लय by मुलूखावेगळी
हो
फोटूंमुळे समजण्यास सोपे
मी बाट्या अवन मध्ये बेक करते.
बाट्या मस्त कुरकुरीत दिसत आहेत!
मस्त पाकृ. जरा कष्टाची आहे पण
छान..
व्वा ! चविष्ट आणि थंडीसाठी
बट्टी ओवन मधे पण बेक करतात
लालासा, ही बट्टी मी एकदा
लालसा - छान छान.
In reply to लालसा - छान छान. by चिंतामणी
बट्टीचे पिठ
अतिशय धन्यवाद डिटेल पाकक्रुती
पाक कृती आवडली , बनवुन
लाल्सा भौ ह्याला आम्हि बाफले
वॉव
मस्तच् ......
In reply to मस्तच् ...... by चटोरी वैशू
दाल्-बाटी.... कर्वे रोडला एक
शेणाच्या गोवर्या
सहमत
In reply to सहमत by ढब्बू पैसा
जळगाव-धुळे व्यंजन...!!
हो आत्ता आठवलं की यातल्या
आमच्या सारख्या नवशिक्याना छान
मस्तंच झाली आहे दाल - बाटी
मस्तंच झाली आहे दाल - बाटी
खायची आहे एकदा. आजवर नुसतच
रोचीन बट्ट्यांचे ईतके प्रकार
फोटोवरून अत्यंत टेस्टी असणार
जीव घ्या तुम्ही...
In reply to जीव घ्या तुम्ही... by चिगो
आमच्याकडे विदर्भात असाच
बाटी शेणाच्या गोवर्यावर
रोडगे ही म्हणतात
लालसा!!! जमवा एखादा बेत
`संपादक मंडळ