लहानपणापासून (किंवा लहानपणीच !!) नेहमी ऐकलेल्या काही कथा. त्यातली एकदोन सँपल उदाहरणं उचलून दाखवतो. यातल्या काही कथा तर उदाहरण / चांगले विचार / बोध याकरता सांगितल्या जातात..अजूनही सांगितल्या जातात का माहीत नाही. पण बर्याच कथा त्या त्या वेळी शाळेतल्या बाई किंवा आजूबा आज्जींकडून ऐकून घेतल्या. आता त्याविषयी उलट विचारही मनात येतात :
१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..? हाही उपाय जादुई शक्तिवाला आणि तो ही..
ही कथा काल्पनिक आहेच पण तरी ती सांगितली जाते एक शील / लज्जा वाचवणार्या नायकाची महती ठसवण्यासाठी. लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ?
२) युद्धात कन्फ्यूज झालेल्या "सीदन्ति मम गात्राणि" म्हणणार्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला, त्याविषयी मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार इन्व्हॅलिड नव्हतं असं म्हणून विचार केला तर..?
त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता…एकूण (पांडवांचं) नुकसान खूप होणार होतं..
सैन्याची हानी आणि युद्धाचे दुष्परिणाम कदाचित टळले असते.. पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती..
तेव्हा अशा काँटेक्स्ट मधे केलेला उपदेश आणि त्याचं मन वळवणं यात तत्वज्ञान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ??
मी संपूर्ण गीतेविषयी म्हणत नाहीये.. प्लीज गैरसमज करून घेऊ नका.. (नाहीतर "तुम्ही गीता नीट पूर्ण वाचली तरी आहे का?" असे अभिप्रायच जास्त येतील..) बाकीच्या गीतेत या युद्धातल्या डायलेमाशी संबंधित नसलेलेही खूप तत्वज्ञान आहे आणि त्याचा आदर आहेच.
सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. .. युद्धस्व .. ??!!
जे केलं ते योग्यच होतं.. पण त्याला मुत्सद्देगिरी म्हणणं योग्य..
त्याच्या बदल्यात अर्जुनाची बाजू पूर्ण झाकली गेली हेही खरंच.. त्याच्या बाजूच्या सर्व शक्यता वर आल्याच नाहीत..
३) राजीव साने यांनी त्यांच्या "युगांतर" मधे उल्लेखलेली लोकमान्य टिळकांची शाळेतली कथा आणि त्यावरची टिपणी:
"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी चहाडी करणार नाही" असे बाणेदार उत्तर दिल्याची कथा ऐकून असं नाही वाटत की "टरफले वर्गात सांडून कचरा केला जाऊ नये" या नियमाच्या पालनासाठी / शिस्तीसाठी रेग्युलेशन करणारी शाळा (मास्तर) नावाची यंत्रणा कार्यरत असताना त्यांना मदत करणे सोडून इथे नुसताच बाणेदारपणा किंवा सत्यकथनच दाखवले गेले? कोणी टरफले सांडली हे माहीत असेल तर मास्तरांना दाखवून द्यायला नको?
या जागी म. गांधी असते तर "मी माझ्या वर्गमित्रांचे घाण न करण्याबद्दल किंवा सत्य बोलण्याबद्दल मतपरिवर्तन करु शकलो नाही म्हणून जणू मीच तो कचरा केला असे समजून आपल्या हातावर छड्या घेतल्या असत्या असे विचाराअंती वाटते.
वैचारिक गोंधळ असल्याची शंका येणार्या अजून काही अशा कथा आठवतात का? अशा कथा नवीन रेफरन्समधेही तयार होत असू शकतील की ज्या पुढच्या पिढ्यांना "इतिहासातल्या" म्हणून सांगितल्या जातील.
वाचने
24799
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजून एक घ्या..
एकत्र का ठेवले असेल असा विचार
In reply to आजून एक घ्या.. by योगी९००
एक आख्याईका ऐकलि
In reply to आजून एक घ्या.. by योगी९००
पण वाईट लोकांचा फायदा
महाभारताबद्दल चर्चा करताना
In reply to पण वाईट लोकांचा फायदा by युयुत्सु
विश्वनाथ मेहेंदळे
In reply to महाभारताबद्दल चर्चा करताना by विश्वनाथ मेहेंदळे
इतर काही लिहिण्यापूर्वी, मी
In reply to विश्वनाथ मेहेंदळे by Pain
द्रौपदीने पांडवांशी लग्न
In reply to इतर काही लिहिण्यापूर्वी, मी by विश्वनाथ मेहेंदळे
वस्त्रहरणापेक्षा द्युतात पणाला लावणे
In reply to द्रौपदीने पांडवांशी लग्न by मृत्युन्जय
एक प्रश्न माझा पण...
In reply to वस्त्रहरणापेक्षा द्युतात पणाला लावणे by मैत्र
अशी लग्ने सर्रास होत नसत, हा
In reply to द्रौपदीने पांडवांशी लग्न by मृत्युन्जय
तात्पर्य .. कथा .. वगैरे
मला वाटते की या कथा म्हणजे..
महाभारतातली नाही, पण वाचुन
प्रयत्ने वाळुचे कण रगडीता
In reply to महाभारतातली नाही, पण वाचुन by अभिषेक पटवर्धन
युयुत्सु धन्य्वाद ज्ञानात फर
In reply to प्रयत्ने वाळुचे कण रगडीता by युयुत्सु
अवश्य!
In reply to युयुत्सु धन्य्वाद ज्ञानात फर by डावखुरा
चला धर्म, संस्कृंती आणी
अगदी अगदी. अर्थात धाग्याचे
In reply to चला धर्म, संस्कृंती आणी by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to अगदी अगदी. अर्थात धाग्याचे by अवलिया
हेहे..
In reply to +१ by टारझन
पुनर्वाचन आणि पुनर्विचार यानंतर
In reply to चला धर्म, संस्कृंती आणी by परिकथेतील राजकुमार
'मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड
इरावती कर्वे ह्यान्च्या युगान्त
अमिता ताई युगांत च्या दुव्या
In reply to इरावती कर्वे ह्यान्च्या युगान्त by खादाड अमिता
टरफले
१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या
ग.वी. साहेब
लॉक किया जाये?
In reply to ग.वी. साहेब by आत्मशून्य
मला भोपळ्यातल्या म्हतारीची ती
होय तीने त्यांचे भक्ष बनायला हवे होते म्हणजे ते प्राणी
In reply to मला भोपळ्यातल्या म्हतारीची ती by नरेशकुमार
इतके टोकाचे मला अपेक्षित
In reply to होय तीने त्यांचे भक्ष बनायला हवे होते म्हणजे ते प्राणी by आत्मशून्य
:-)
In reply to इतके टोकाचे मला अपेक्षित by नरेशकुमार
:)
In reply to इतके टोकाचे मला अपेक्षित by नरेशकुमार
संकटकाळी प्रसंगावधान राखून
In reply to :) by आत्मशून्य
"चर्चासत्रात चेंगरलेली
In reply to संकटकाळी प्रसंगावधान राखून by नरेशकुमार
जरुर वाचेन, आभारी आहे.
In reply to "चर्चासत्रात चेंगरलेली by विश्वनाथ मेहेंदळे
तात्पर्य
मी शेंगा खाल्ल्या नाहीत (आणि
agreed..न केलेल्या
In reply to मी शेंगा खाल्ल्या नाहीत (आणि by पक्या
मी शेंगा खाल्ल्या नाहीत
In reply to agreed..न केलेल्या by गवि
http://balsanskar.com/marathi
तुमचा मुद्दा (ज्याची चूक
In reply to http://balsanskar.com/marathi by गवि
लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे
हे बाकी भारी होतं!!!!!!
In reply to लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे by भारी समर्थ
हा हा! तुम्ही ती
In reply to लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे by भारी समर्थ
गवि, तुमचा गीतेबद्दलचा शेवटचा
फर्मास
??
In reply to फर्मास by सोनल कर्णिक वायकुळ
महाभारतातील सर्वात इनोदी कथा
फक्त 'देवकी'चा अमुकवा पुत्र
In reply to महाभारतातील सर्वात इनोदी कथा by विजुभाऊ
दोघांच्या ...