काल कलादालनात दुधी हलव्यावरुन एक पांचट विनोद केला. काही दर्दी मिपाकरांनी निषेधही नोंदवला. सर्वप्रथम त्या बद्दल सर्वांची माफी मागतो.
त्या दुष्कृत्याच ( म्हणजे मी केलेल्या विनोदाच.... त्यांच्या निषेधाच नव्हे) प्रायश्चित्त घ्याव, अस मनापासुन वाटु लागल. हा प्रपंच केवळ त्या दुखावलेल्या मनांसाठीच.
साहित्यः
पाऊण ते एक किलो कोवळा दुधी
१०० ग्रॅम खवा / नसल्यास बर्फीचे २-४ तुकडे.
१/२ वाटी दुध
१ छोटा डबा (७५ ग्रॅम ) कंडेंन्स्ड दुध
चिमुटभर वेलची पुड.
मनुका, काजु, बदाम, पिस्ते, अक्रोड जे आयत्या वेळी हाती लागेल ते.
१०० ग्रॅम साखर.
(जोडीला कंडेंन्स्ड दुध आहेच. तरीसुद्धा जर गोड खाऊ असाल तर साखरेच प्रमाण वाढवल तरी चालेल.)
२ चमचे बटर (लोणी/तुप)
कृती:
दुधी सोलण्याने सोलुन घ्यावा. (सालं बाजुला ठेवुन द्यावी.) आतल्या बिया काढुन मग दुधी खिसणीवर खिसुन घ्यावा. जितकं शक्य होईल तितक हाताने पिळुन दुधीतला रस काढुण तो बाजुला ठेउन द्यावा.
एका पसरट कढईत २ चमचे बटरवर दुधी ७-८ मिनिटं परतुन घ्यावा.
नंतर त्यात दुध आणि कंडेन्स्ड दुध टाकुन मध्यम आचेवर सतत ढवळत रहावं.
मनुका, वेलची पुड टाकावी.
२-३ मिनिटांनी सुका मेवा बारिक तुकडे करुन टाकावा. खवा टाकावा. दुध आटे पर्यंत मध्यम आचेवर परतत रहावं
आवडी प्रमाणे गरमागरम वा थंड करुन कसाही खावा.
आता हे एवढं गोड खाल्ल्यावर कॅलरी च्या नावाने बोंबच ..
हा त्यावरचा उतारा. सकाळी उठल्या उठल्या हा दुध्याचा पौष्टिक रस पिऊन दिवसाची सुरवात चांगली करा :)
दुधीरस : दुधीच्या खीसातुन काढलेलं पाणी + ४ चमचे खीस + ५-६ पुदिना-तुळस पाने + चिमुटभर काळ मीठ. + १/२ पेला पाणी. हे सगळ मिक्सरमध्ये फिरवुन गाळुन घ्यावं.
दुधी रसा बद्दल कालच जागुतै कडुन टिप मिळाली. थोड खोदकाम केल्यावर हा रस हृदयासाठी चांगला असतो असं कळलं.
- लाडोबा ;)
वाचने
11887
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपा इज ब्याक!
उगाच काय ब्याक? गेला कुठे
In reply to गणपा इज ब्याक! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हलव्याचा रंग
खवा नव्हता मझ्याकडे. मी बर्फी
In reply to हलव्याचा रंग by प्रियाली
अरे पण चांगली बर्फी होती
In reply to खवा नव्हता मझ्याकडे. मी बर्फी by गणपा
+१
In reply to अरे पण चांगली बर्फी होती by पिवळा डांबिस
सहजकाका!
In reply to +१ by सहज
+१
In reply to सहजकाका! by पिवळा डांबिस
आधी कलादालनात...
मस्त
तुझ्या सगळ्या पाककृत्या
तुझ्या सगळ्या पाककृत्या
In reply to तुझ्या सगळ्या पाककृत्या by रेवती
भुललास वरलिया रंगा???
In reply to तुझ्या सगळ्या पाककृत्या by प्रभो
रंगही मॅटर्स....
In reply to भुललास वरलिया रंगा??? by प्रीत-मोहर
हा दुधी भोपळा म्हंटला की
In reply to रंगही मॅटर्स.... by प्रभो
हो रे गणपा भौ..! हलव्याचा
+१
In reply to हो रे गणपा भौ..! हलव्याचा by प्राजु
कालचा विनोद बरा होता..
गणपाने परत एकदा मेन्दी कालवुन
(विषय दिलेला नाही)
स्पष्टपणे चुका दाखवुन कान
रजा वगैरे काही नाही.
In reply to स्पष्टपणे चुका दाखवुन कान by गणपा
दुधीची साले
गणपाभौ आपल्याला तर आवडला बॉ
अरे वा गणपा तु तर छानच रस
बहुमताचा आदर करत सध्या
गणपाने बर्फीबरोबर चांदीचा
रजा नको
In reply to गणपाने बर्फीबरोबर चांदीचा by मराठे
सखी तै=मांडवली बादशाह..
In reply to रजा नको by सखी
हा हा
In reply to सखी तै=मांडवली बादशाह.. by डावखुरा
रजा नामंजूर!!! विषयच मिटला!