Skip to main content

दुधी हलवा

लेखक गणपा यांनी सोमवार, 10/01/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुसते बघता काय करा हात लांब आणि दुधी हलवा
लेखनविषय:

वाचने 12533
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

दुधी हलवा,- हलवला दुधी !@! छान विनोद #@!

In reply to by टारझन

आपले निरिक्षन पाहुन धन्य झालो, अर्थात कोनाला काय निरिक्षन करायचे ते सांगन्याचा माझा हक्क नाही, मि आप्ला फक्त टाईमपास केला.

च्यायला... आज गणपाला फुल्ल शिव्या द्यायच्या मूडमधे धागा उघडला... आणि गणप्याने पचकाच केला!!! =))

In reply to by पर्नल नेने मराठे

पर्नल दिदि, गणपाकडुन असल्या .आचरटपणाची. अपेक्शा मला पण नव्हती. पण आपन काय शकतो.

घात झाला घात झाला, कोणितरी दुधि तोडला, पळा पळा. अवांतर - नकुंनि तर नेला नाही ना भेट द्यायला. हर्षद.

अत्यंत प्रगल्भ धागा. जोडीला विकीवरुन दुधीची माहिती मराठीकरण करुन टाकली असती तर हलव्याचा स्वाद अजुन वाढला असता. दुधीची भाजी करण्यापेक्षा हलवा केल्याने त्याची किंमत वाढते अर्थात जीडीपी वाढतो. असा विश्लेषणात्मक माहितीचा मसाला टाकला असता तर सोने पे सुहागा !

काय हे गणपाभाऊ!! किती अपेक्षेने उघडला होता मी हा धागा... आणि हा असा पीजे :(

कलादालनमध्ये गणपाचा धागा पाहून शंकेची पाल चुकचुकली होती पण इतका पोपट होईल असे वाटले नव्हते.

फार पूर्वी पाहिलेल्या एका व्यंगचित्राची आठवण झाली. दुकानाबाहेर पाटी असते - "एक रुपयात भरपूर दुधी हलवा". दुकानाचा प्रवेश उजवीकडे तर डावीकडून बाहेर जाण्याचा मार्ग. प्रवेशाजवळ प्रचंड मोठी रांग. एका वेळेस एका व्यक्तीस प्रवेश. आत एक दुधी टांगलेला आणि तो दुधी हवा तितका वेळ हलवण्यासाठी केलेल्या विनंतीची पाटी. आणि डावीकडे खजील होऊन बाहेर पडणारी व्यक्ती!

हा हा... छान विनोद गणपा भौ! अवांतर - हाच धागा अविनाशकुळकर्णी ह्यांनी काढला असता तर कश्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या असत्या?

In reply to by अनामिक

अवांतर - हाच धागा अविनाशकुळकर्णी ह्यांनी काढला असता तर कश्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या असत्या?
चांगल्या आल्या नसत्या. गणपा हा मिपावरचा लाडोबा आहे हे आम्ही मागेच ओळखले होते.

In reply to by अनामिक

अवांतर - हाच धागा अविनाशकुळकर्णी ह्यांनी काढला असता तर कश्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या
असत्या? हॅ हॅ हॅ हो हो हो खी खी खी खी खॅ खॅ खॅ खॅ खॅ खॅ हि हि हि हि हि हि हि

आज दुधीने मला दुसर्‍यांदा चकवले आहे. सकाळी दुधीची भाजी करावी म्हटले तर बाहेरून छान दिसणारा आतून सडका निघाला मेला! त्यातून गणपानं असा केलेला पचका!

थंडीमुळे आज तब्येत थोडीशी नरमच होती, म्हणुन गणपाभाऊंच्या खवयै पोतडीतील काही "व्यंजने" पाहून तबियत दिलखुलास करून घ्यावी म्हटले आणि दुधी हलवा खायाला मिळाला नसला तरी चित्र (आणि चित्रे) पाहून समाधान करायला म्हणून आलो आणि चक्क "भरवश्याच्या म्हशीला टोणगा" झाल्याचे पाहिले. वेल, वेल....एप्रिल अजून साडेतीन महिने लांब असूनही भाऊनी सर्वाना तडका दिला....पण छानपैकी ! इन्द्रा

In reply to by नरेशकुमार

पवार काका ह्या प्रश्नालाही ७ पानी उत्तर देऊ शकतील असा माझा कयास आहे. बाकी कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

टार्‍या कुणाचा बाजार कसा उठवेल हे सांगता येत नाही. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. या मताशी काही जण असहमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही