पाटोडीची भाजी
अस्सल झणझणीत विदर्भातली भाजी येथे देत आहे.
साहित्य : चनादाळ पिठ दिड वाटी, आले लसुन पेस्ट २ टीस्पुन, कीसलेले सुके खोबरे २० ग्राम, तेल १०० ग्राम, कडीपत्ता, हिरवि मिर्चि २, कोथी॑बीर, तिखट, मिठ, हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार.
कृती : चनादाळ पिठात तिखट, मिठ, हळ्द, जिरे स्वादानुसार घालुन भिजवावे. जाडसर पोळी लाटून चौकोनी काप करावेत. कढईत तेल घालुन का॑दा परतावा. त्यात चिरलेली हिरवी मिर्ची ,कडीपत्त,तिखट, मिठ, कीसलेले सुके खोबरे ,आले लसुन पेस्ट ,हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार घालून फोडणी द्यावी. त्यात दिड ग्लास पाणी घालुन दोन उकळ्या येवु द्याव्या. शेगडी म॑द आचेवर करुन घ्यावी. रस्स्यात चौकोनी काप घालावेत व म॑द आचेवर दोन उकळ्या येवु द्याव्यात. वरुन कोथि॑बीर भुरभुरावी.
भाकरीसोबत ही भाजी छान लागते.
फोटो खाली दिला आहे.


याद्या
5111
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
फोटो
आपली खरड्वही पहा.
In reply to फोटो by रुपाली प्रा॑जळे
फोटो आधी पिकासा किंवा फ्लिकर
हा घ्या फोटो
शॉलेड!!
क्या बात है ! उद्याच करुन
ढब्बू असतील
In reply to क्या बात है ! उद्याच करुन by परिकथेतील राजकुमार
ही मिपा सदस्या " ढब्बु पैसा"
In reply to ढब्बू असतील by शुचि
किसलेले सुके खोबरे तसेच
खोबरे
In reply to किसलेले सुके खोबरे तसेच by ज्योति प्रकाश
याचे रेडी टु कुक पाकिट मिळते
सुंदर आहे पाकृ. मला काही शंका
पाटोडी
In reply to सुंदर आहे पाकृ. मला काही शंका by जागु