पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन
समस्त मिपाकर मायबाप,
लेखनाचा पहिलाच प्रयास आहे,कृपया सांभाळून घेणे.
साहित्य:
१. स्वछ तुकडे पापलेटाचे हवे असतील तितके.
२. लसूण आवडीनुसार.
३. आले आवडीनुसार.
४. लाल तीखट आवडीनुसार.
५. हळद चीमुटभर.
६. लिंबू.
७. गरम मसाला आवडीनुसार.
८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे
९. तेल तळन्या पुरते.
१०.मीठ चवीप्रामाणे.
कृती:
प्रथम मासा धुऊन घेणे. मग त्याला साहित्यातिल सगळे(तांदळाचे पिठ सोडुन) ईतर सगळे चोळून ठेवणे १०-१५ मीनिटस.
मग तांदळाचे पिठ एका ताटात घ्या आणि त्यात पीसेस घोळवून तव्यात तळुन घेणे.
फीश करी.
साहित्य:
१. नारळ १/२
२. लसुण ३-४ पाकळी.
३. आले थोडेसे.
४. चिंच थोडीशी.
५. गरम मसाला.
६. लाल तीखट
७. मीठ चवीप्रामाणे.
कृती:
प्रथम नारळ,आले,लसुण व गरम पाण्यात भीजवलेली चिंच,थोडेसे पाणी घालुन,मिक्सर मधुन वाटून घेणे.
कढई मध्ये थोडेसे तेल घालुन मग त्यात वरील वाटलेला मासाला, चवी नुसार मीठ,तीखट,गरम मसाला व हळद घालुन छान उकळी आल्यावर त्यात मासे हलकेच सोडावे.२-३ मि शिजवावे.
मासे जास्ती वेळ शिजवू नयेत.
फ्राय प्रॉन
साहित्य:
फिश फ्राय प्रमाणे फक्त चाट मसाला चवीनुसार.
कृती:
प्रॉन साफ करुन घेणे. मग सगळा मसाला लावुन वरुन तांदळाचे पिठ भुरभुरावे आणी तव्यावर १-२ मि तळावे. जास्ती वेळ तळल्यास रबरी लागते.
आता गरम गरम भाता बरोबर ताव मारणे.
फोटो आहेत पण दिसत नाहीत काय करावे?
:)
वाचने
10605
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
फटू? आम्ही पाककृती कशी आहे हे
फोटो
"
"
"
"
"
"
"
वा!
सहमत. जवळपास राहता का हो
In reply to वा! by नंदन
असेच म्हणतो
In reply to वा! by नंदन
"
अरे वा! छान! अवांतरः तुम्ही
In reply to " by दीविरा
>> पानात २-२ प्रकारचे कांदे
In reply to अरे वा! छान! अवांतरः तुम्ही by विंजिनेर
पानासमोर बसण्याचा मोह अनावर
In reply to " by दीविरा
मेलो ! मेलो ! ठार मेलो !!
बरं
In reply to मेलो ! मेलो ! ठार मेलो !! by अवलिया
अभिनंदन
कान्दे
त्यांनी कार घेतली तर ४ कांदे
In reply to कान्दे by दीविरा
वाह वा. छान छान.
अहाहा!
अत्याचार
फोटो छानच आलेत.
धन्यवाद
मनापासून धन्यवाद !!!
In reply to धन्यवाद by दीविरा
जबरदस्त!!! मस्त फोटो.
आई ग! कसले जीवघेणे फोटो आहेत!
प्रॉन्झ फ्राय !
खल्लास.. ए - वन...
बेस्ट!
ह्या..... हे जीवघेणे फोटो
ह्या..... हे जीवघेणे फोटो
नानाचं मशिन उसन मागुन आणलत कि
In reply to ह्या..... हे जीवघेणे फोटो by विजुभाऊ
इनो घ्या !
In reply to ह्या..... हे जीवघेणे फोटो by विजुभाऊ
बर झाले हा धागा मी उघडला नाही
जबराट.
......!!!!!!!!
तुकड्या पुरतिल पण एवढासा भात
मस्त फोटो !!!!
वाह!!! मस्त... अजुन काय बोलु?
मस्त