भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील
लेखनप्रकार
शाळेत असताना आमच्या वर्गात भावड्या नावाचा वर्गमित्र होता. भावड्या पायर्या पार करत करत आमच्या वर्गात पोहोचता झाला नव्हता तर एकाच पायरीवर अंमळ जास्तच रेंगाळल्याने स्वारी आमच्या बरोबर वर्गात दाखल झाली होती. त्यामुळे भावड्या इतर वर्ग सोबत्यांपेक्षा थोराडच दिसे. वर्ण देखील महाराष्ट्र देशीच्या उन्हातान्हात तापल्याने चांगलाच रापलेला. भरीत भर म्हणून त्या अनगढ वयातल्या आम्हा सगळ्या १२-१३ वर्षीय मित्रांसाठी भावड्या म्हणजे सर्वज्ञ असे. त्याच्या पोतडीतले किस्से म्हणजे अलिबाबाची गुहाच जणू.
तर असा हा आमचा भावड्या आमच्या वर्गात असताना, त्या एका वर्षात त्याने उडवलेली ही काही धमाल. खास तुमच्यासाठी.
तर भावड्याच्या मनी आमच्या वर्गातली एक बाला भरली. तिच्याशी बोलायचं कसं ही विवंचना भावड्याला सतावू लागली. भावड्याने बराच विचार करून तिला चिट्ठी लिहिली. आणि ती चिठ्ठी आम्हाला दाखवली.
खूश्खबर खूश्खबर खूश्खबर खूश्खबर खूश्खबर
मेरी प्यारी सगुना
म्या उंद्याच्या बाजार्ला आंडी वपाया यणार हे तरी त्वा मला भेटाया बाजार्ला येने. मपली आंडी वपून झाल्यावं आपुन टाकिजात पिच्चर पघाया जावू.
तुप्लाच
भावड्या.
भावड्या-सगुना
एक दुजे के लिये
खूश्खबर खूश्खबर खूश्खबर खूश्खबर खूश्खबर
भावड्याची ही खूश्खबर आम्हाला त्याची टर उडवायला बरेच दिवस पुरली.
आम्हाला त्या वर्षी इंग्रजी शिकवायला भिंगारदिवे नावाचे शिक्षक होते.भिंगारदिवे सरांचा भावड्यावर विशेष जीव.भावड्या हे समुद्रमंथनातून निघालेलं रत्न आहे. ही सरांची धारणा.भावड्याही सरांच्या कसोटीला न चुकता खरा उतरायचा.
तर एकदा भिंगारदिवे सरांनी सगळ्या वर्गाला एक उतारा फळ्यावर लिहून वाचण्यासाठी दिला. प्रत्येकाने आपापली पाळी आली की तो उतारा उभं राहून वाचून दाखवायचा असे. It was the day of village fair .Children in the house wanted to enjoy the fair. So father told the servant Ramoo to keep the bullockkart ready असा काहीसा तो पॅसेज होता. सगळ्या मुलामुलींनी तो बहुतांश बरोबरवाचला. तोवर इकडे भावड्याची चलबिचल सुरु झाली. मुलं जसजसं वाचत गेली तसं त्याने ते आपल्या वहीत देवनागरीत उतरून घ्यायचा जमेल तसा प्रयत्न केला.
आणि एकदाची भावड्याची पाळी आली.
भावड्यापेक्षा सरांच्याच चेहर्यावर जास्त तणाव दृगोचर होवू लागलेला.भावड्याविषयी त्यांना पूर्ण खात्री.
सर भावड्याला विचारते झाले "काय रे भावड्या वाचणार काय?"
"हा सर, वाचितो ना" हा भावड्या.
"बरोबर वाचणार ना भाउराया?" सर आता भावड्यावरून भाउरायावर आले. बहुधा येउ घातलेल्या संकटाची नांदी त्यांना लागली असावी.
"हा सर.येक्दम बराबर वाचितो पघा" भाउराया उत्तरला.
झाले.
सरांचा तणाव अजूनच वाढला. मुलं काहीतरी गंमतीशीर ऐकायला मिळणार म्हणून आनंदली. तर मुली आधीच संकोचल्यासारख्या झाल्या. भावड्याची ख्यातीच तशी होती.
भावड्याने वाचायला सुरुवात केली.
"ईट वाज द डे आफ व्हिलेज फेअर. चिल्ड्रेन एन द हाउस वान्टेड टू एंजॉय द फेअर. सो फादर टोल्ड द सर्वंट रामू टू कीप द ..." इथवर येवून भावड्या थबकला.वहीत उतरवलेलं काही ,काही प्रयत्न करून भावड्याने बरंचसं नीट वाचलं.पण बुलककार्ट काही भावड्याला झेपणारी नव्हती.भले घरी तो दिवसरात्र बैलगाडीवरच असायचा.पण तीच बुलककार्ट हे त्या सर्वज्ञाला ज्ञात नव्हतं. भावड्या इथं अडखळला.पण क्षणातच त्याने स्वतःला सावरलं. आणि वाक्य पूर्ण केलं
आणि ते वाक्य उच्चारून त्याने सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण केल्या.सरांच्या रागाला पारावार राहिला नाही. मुलांनी वर्ग डोक्यावर घेतला तर मुली संकोचत का होईना पण हसू लागल्या.
भावड्यानं वाचलेलं शेवटचं वाक्य होतं
"सो फादर टोल्ड द सर्वंट रामू टू कीप द बलात्कार रेडी."
सर भावड्याला प्रेमळ सुरात म्हणाले"भाउराया पुन्हा वाचा शेवटचं वाक्य"
परत एकदा "सो फादर टोल्ड द सर्वंट रामू टू कीप द बलात्कार रेडी."भावड्या वाचता झाला. वर्गातल्या हशा आणि किंकाळ्यांचा आवाज एव्हाना छप्पराला भिडला होता.
या बलात्काराचं अजून एक आवर्तन झालं
मग मात्र भिंगारदिवे सरांचा संयम संपला आणि त्यांनी त्यांच्या हातातल्या छडीने भावड्याच्या पाठीवर बुलककार्ट केला.
आणि आम्ही वर्गमित्रांनी सुद्धा वर्षभर........
वाचने
4584
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
बेष्ट!!!
=))
हा हा हा मस्त किस्सा :)
गंमत आहे खरी.
पण तरी माझ्या स्वतःच्या अनुभवातली थोडी वाईट आठवण आली.
माझ्या कॉलेजात एका ज्युनियराचे रॅगिंग होत असताना मी जवळपास उभा होतो. मुलाचे इंग्रजी उच्चार फार विचित्र होते म्हणून रॅगिंग करणारे सीनियर लोक फार खिदळत होते. ("मांडी" अर्थाने इंग्रजी उच्चार "थाय" करण्याऐवजी तो मुलगा "थिग" करत होता, हे आठवते.)
त्या मुलाच्या पुढच्या शिक्षणात काय झाले ते माहीत नाही - पण ज्यूनियर वर्षात फाडफाड इंग्रजी न येणारे माझे अनेक वर्गमित्र कुशल डॉक्टर आणि उत्कृष्ट सैन्याधिकारी झाले, त्यांची आठवण येते. सैनिकाच्या मांडीला भळाभळा जखम झाली तर "थिग" उच्चार करूनही योग्य उपचार करणारा डॉक्टर सैन्याला हवा. "थाय" उच्चार कळतो, पण उपचार कळत नाही, असला उपयोगाचा नाही.
- - -
तुमच्या उदाहरणात शाळेतला तास इंग्रजी शिकवायचा होतो, हा मोठाच फरक आहे - मान्य. पण शेवटी तुम्ही म्हणता "आम्ही वर्गमित्रांनी सुद्धा वर्षभर..." त्यावरून माझ्या वर्गातील रॅगिंगचा प्रसंग आठवला.
मला या शब्दाचा उच्चार अजूनही करताना पाचावर धारण बसते की न जाणो चूक होऊन बसेल. मी आपली चँट्स हाच शब्द मग वापरते.
धमाल...अजुन येउ द्या.
हा हा हा मस्त किस्सा =))
माझ्या एका मित्राला "शिष्यव्रुत्ती" नीट म्हणता येत नसे...तो "शि षु व्रुत्ती" असे म्हणे...
किस्सा वाचून त्याची आठवण झाली....बाकी लेख मस्त.....
In reply to शिष्यव्रुत्ती... by नन्दादीप
>शि षु व्रुत्ती जबराच
> बाकी लेख मस्त..... धन्यवाद
शि षु व्रुत्ती या वर नवा धागा निघायला हरकत नाही. शब्दांच्या चुकीच्या उच्चारावर.
किस्सा जाम आवड्ला आखो येउद्या भाउ...
३ ईडियट सारखेच..चमत्कार... लोल
In reply to किस्सा जाम आवड्ला आखो येउद्या by डावखुरा
>>किस्सा जाम आवड्ला धन्यवाद लालसा.
>> आखो येउद्या भाउ यनार न भौ . नक्कीच यनार. खात्रिन यनार. लौकर्च यनार.
अवांतर खव ची सोय अजून मिळाली नाही का?
झक्कास किस्सा...
शाळेत होतात असे किस्से.. आम्हाला दहावीत मराठीच्या धड्यात एक वाक्य होतं ,"आत्याबाय, आत्ताच धुणं धुवून आल्यायंस. जरा वेळ लवंडा..." आमच्या मॅडमनी एका मित्राला धडा वाचायला लावला, आणि त्यानी नेमक्या शेवटच्या शब्दातला अनुस्वार खाल्ला ! ;-) मग काय इचारता...
In reply to आमचा पण येक... by चिगो
__/\__
हसून हसून डोळ्यात पाणी आले..
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
अगदी,,,,
हाच जोक आमच्या वर्गातील मुले 'ऑफ द रेकॉर्ड' ( आपापसात) करायची. त्यामुळे जो कोणी धडा वाचायला घेई त्याची चांगलीच पंचाईत व्हायची.
- ओंकार.
In reply to +१ by मी_ओंकार
अगदी अगदी. 'धुणं' नाव होतं बहुतेक त्या धड्याचं. मला वर्गातल्या एका मित्राने ते तसं वाचून दाखवलं. अस्मादीक 'सज्जन' क्याटेगरीत मोडत असल्याने' मला काही अर्थ माहीत नव्हता त्या शब्दाचा! तो काही सांगेना.मग हसत तो म्हणाला सरांनाच विचार त्याचा अर्थ. त्डोक्यात इशार्याची घंटा वाजली. मी गेलो टीचर्स रूम पाशी. दोन मिनीटं इकडे तिकडे केलं. आणि तसाच परत वर्गात येऊन बसलो. त्या मित्राने विचारलं, खरंच विचारलं का काय?? मी म्हटलं,"हो तर!. सरांना सांगितलं की तु सांगितलं आहेस म्हणून. आणि सर पाच मिनिटात येत आहेत वर्गात." पुढचा अर्धा तास तो फुल्ल टेन्शन मध्ये, की सर आत्ता येतील आणि आपली गच्छंती होईल :) शेवटी मी त्याला खरं सांगितल्यावर, त्याने या या गूढ शब्दाचा अर्थ प्राकृतात सांगून आमच्या शब्दसंग्रहात भर घातली :D
In reply to आमचा पण येक... by चिगो

एकदा Physics च्या lecture ला मॅडमनी "Huge" चा उच्चार "हग" असा केला होता ...
सगळे हसताना पाहून मग "कुणाचे उच्चार वेगळे नसतात का" असं बोलून सर्वांना झापलं होतं
In reply to huge by संग्राम
:D
एकद मस्त आजच पाहिला हा धागा ..
बेस्ट
माझ्याकडुन थोडी भर,
माझा एक मित्र असाच काहीतरी भलता उच्चार करतो. (तो ७ वि शिकलेला आहे)
हायवे वरुन -> हवेवरुन
फ्लायओव्हर -> फ्लायवर
स्पीड ब्रेकर -: स्पीड मेकर
सीडी रॉम -> सीडी ड्रम
(गाडी) ओव्हर हॉलीग -> वर ऑयलींग
मुड ऑफ -> मुड हाफ
(यावरुन आम्हि मित्र त्या माझ्या मित्राला नेहमी चिडवत असु, पन त्याला कळायचेच नाही. जसे कुठे जायचे असेल तर तो म्हनायचा की 'जाउंदे यार, मुड हाफ झालाय' मग आम्ही म्हनायचो कि अरे अजुन हाफ शिल्लक आहे ना, मग चल. त्याला कळायचेच नाही कि असे मुड हाफ झाला असे का म्हनतात.
(मोबायील) इनकमींग आउट्गोइंग - इनकमींग आउटकमींग
आत हे आउटकमींग काय असतं मला अजुन कळले नाही.
अजुन पुष्कळ आहेत , पण आठवत नाहीये इतक्यात......
In reply to माझ्याकडुन थोडी भर, माझा एक by नरेशकुमार
अजून एक....
ल्यापटोपात शिडी घाल..
In reply to माझ्याकडुन थोडी भर, माझा एक by नरेशकुमार
भारी!
मस्तं किस्सा. आवडेश.
In reply to मस्तं किस्सा. आवडेश. by llपुण्याचे पेशवेll
खरच मस्त लेख.
अवांतर : आवडेश... टिपिकल पुणेरी! :)
मस्तं लेख .
हाहाहा!!!