साहित्यः-१)एक वाटी बेसन. २)दीड कान्दा. ३)दोन हिरव्या मिरच्या.
४)कोथिम्बिर ५)चिन्चेचा कोळ. ६)दोन वाट्या किसलेले ओले खोबरे.
७)१/२ चमचा मिरची पूड. ८)४-५ मिरी ९)चविपुरता गुळ.
१०)१/२ चमचा हळदपुड ११)मिठ १२)तेल्(खोबरेल असल्यास उतम)
कृती:- एक कान्दा,मिरच्या,कोथिम्बीर कापुन घ्यावे.त्यात बेसन्,मिठ्,थोडी हळद घालुन एकत्र करुन त्याचे छोटे गोळे
करावे.एक वाटी खोबरे,मिरी,१/२ कान्दा बारीक वाटुन घ्यावे.उरलेल्या एक वाटी खोबरयाचा रस काढावा.
एका भान्ड्यात तेल घेउन त्यात उरलेला १/२ कान्दा बारीक चिरुन फोड्णीला घालावा.चिन्चेचा कोळ्, मिरची
पूड्,हळदपूड्,चविपुरते मिठ(गोळ्यात पण मिठ घातलेले आहे याची जाणिव ठेवा)व पाणि घालून शिजत ठेवावे.
उकळी आली की त्यात बेसनाचे गोळे सोडावे.गोळे शिजून वर आले की नारळाचा रस घालुन २ मिनिटानी
आमटी खाली उतरवावी.गोळ्याची आमटी तय्यार.
मिसळपाव
ज्योती ताई, जर हेच बेसनाचे
In reply to ज्योती ताई, जर हेच बेसनाचे by पिंगू
मी तसे कधी केलेले नाहित्,पण
फोटु
गरम गरम भाताबरोबर छान लागते.
In reply to गरम गरम भाताबरोबर छान लागते. by चिंतामणी
गगनविहारीना आजीच्या हातच्या
In reply to गरम गरम भाताबरोबर छान लागते. by चिंतामणी
दुरुस्ती
गोळे आमटीत घालण्यासाठी बनवले