पातोळ्या.
गगनविहारी यान्च्यासाठी पातोळ्याची पाककृती.
साहित्यः-१)हळदीची पाने ७ ते ८.
२)२ वाट्या तान्दुळाची पिठी .
३)३ वाट्या ओले किसलेले खोबरे.
४)१ ते दीड वाटीकिसलेला गुळ.
५)चिमुटभर वेलचीपुड.
६)मिठ चविनुसार.
७)थोडे तेल.
कृती:-१)प्रथम किसलेले खोबरे व गुळ एकत्र करुन त्यात थोडे मिठ घालुन शिजवुन घ्यावे.
गुळ विरघळला व थोडे सुकले कि सारण झाले म्हणुन समजावे.
२)एका भान्ड्यात २ वाट्या पाणी घेवुन त्यात थोडे मिठ व एक चमचा तेल घालुन उकळत ठेवावे.
पाणी उकळले की त्यात तान्दुळाची पिठी घालवी.आच बारिक ठेवावी.व ढवळुन झाकण ठेवावे.
२ मिनिटानी आच बन्द करावी्. ह्याला उकड काढणे म्हणतात.
३)५ मिनिटानी एका परातीत उकड काढुन घेणे.त्यातील थोडी उकड घेउन त्यावर पाण्याचा हबका
मारावा व चान्गले मळुन घ्यावे.तेलाचा हात लाउन परत मळुन घ्यावे.
४)हळदीचे एक पान घेउन त्याला तेल लावणे.व त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा घेउन पानभर पातळ
थापावा.
५)नन्तर त्यावर तयार केलेले सारण पसरावे.व पान दुमडून निट बन्द करावे.
सगळया पातोळ्या तयार झाल्यावर कुकरमध्ये जाळीच्या चाळणीत शिट्टी काढून २० मिनिटे
शिजत ठेवावे.
खाताना हळदीचे पान काढ्ण्याचे भान ठेवावे.छान तुपाची धार घालुन ताव मारायला सुरुवात करायची.
आमच्याकडे हा प्रकार हरितालिका व नागपन्चमीला करतात.
वाचने
6231
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अहा... किती छान.... खूप खूप
या पातोळ्या सोप्या
वेगळच,आहे नविन, करुन बघायला
In reply to वेगळच,आहे नविन, करुन बघायला by पियुशा
पावसाळ्यात मिळतात.
In reply to पावसाळ्यात मिळतात. by कवितानागेश
दोन्ही बॅड न्यूज..
In reply to दोन्ही बॅड न्यूज.. by गवि
मुंबैत असाल तर मुलुंडला
In reply to मुंबैत असाल तर मुलुंडला by यशोधरा
दुधाची तहान ताकावर...
In reply to दुधाची तहान ताकावर... by गणपा
अगदी,अगदी
In reply to अगदी,अगदी by स्वाती दिनेश
हळदीची पानं नसतील तर करदळीची
In reply to हळदीची पानं नसतील तर करदळीची by गवि
आपण आपला पोस्टाचा पत्ता
In reply to आपण आपला पोस्टाचा पत्ता by ज्योति प्रकाश
त्या परिस पातोळ्याच द्या
In reply to हळदीची पानं नसतील तर करदळीची by गवि
तुम्ही पाठवलेली लिन्क ओपन होत
ज्योती, पातोळ्या मस्त. फक्त
फटू पहिजे बा
मी खांटोळ्या बरोबर कन्फ्युज
मस्तच.