नवलकोल आणि मुळ्याच्या पानांचा भगरा/झुणका
काल मी नवअलकोल आमटीसाठी आणि कांदेमुळा सॅलेडसाठी आणला होता. आणि हा जिवनसत्ववाला पाला टाकुन देण जिवावर आल. म्हणुन दोन्हींचा मिळून भगरा केला.
नवालकोलचा पाला
कांदेमुळ्याचा पाला
साहित्य :
नवअलकोल चा पाला चिरुन
कांदेमुळ्याचा पाला चिरुन
कांदा १ ते २
राई, जिर
हिंग
हळद
बेसन
मिरच्या चिरुन २-३
मिठ,
चिमुटभर साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
१ चमचा लिंबाचा रस
तेल
पाककृती :
भांड्यात तेल गरम करुन त्यावर राई जिर चांगल तडतडल की त्यावर कांदा, मिरची घाला. (कधी कधी मिरची दिसत नाही आणि तोंडात येते आणि वयस्कर व लहान असे दोन्ही गट घरात असल्याने मी मिरची न घालण्याची खबरदारी घेतली. )
कांदा परतवुन त्यात हिंग, हळद घालुन नवअलकोल व मुळ्याचा पाला घाला. मिरची ऐवजी मी मसाला घातला आहे.
झाकण ठेउन थोडा शिजु द्या. मग त्यावर बेसन, गोडा मसाला घाला.
ढवळून शिजु द्या. शिजत आले की त्यावर मिठ, साखर व लिंबाचा रस पिळून वाफ आणा. करत असतानाच खमंग वास सुटतो आणि भुक लागते.
मी मुळा आणि गाजर सॅलेड साठी कापले होते. त्याचेच ह्यावर डेकोरेशन केले. त्यामुळे एक प्लेटही वाचली.
वाचने
4777
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह वा. छान छान.
In reply to वाह वा. छान छान. by चिंतामणी
+१ सहमत
In reply to +१ सहमत by sagarparadkar
सागर हा पाला जाड असतो. पण हा
जागु ताई , पाकृ छान आहे
वाह!!!! मस्त प्रकार असतो हा.
मस्त
खमंग लागते ही भाजी! मला
छान पाककृती... उरलेल्या
फारच छान
In reply to फारच छान by धनंजय
अंदाज
In reply to फारच छान by धनंजय
मसाल्याची रेसिपी देणार आहे
ही आयडिया मस्तच आहे. आणि अशा
आँ !!