टूटीफ्रूटी केक
शाही अंडा बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद घेता घेता दिनेश आणि केसुने टूटीफ्रूटी केक हवा आहे असे जाहीर केले, त्या दोघांना कामाला लावून हा केक बनवला.
साहित्य- २५० ग्राम बटर/लोणी/मार्गारीन, २०० ग्राम साखर, ५ अंडी, २५० ग्राम मैदा,२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी टूटीफ्रूटीचे तुकडे, पाव कप दूध, १ चिमूट मीठ
कृती- बटर भरपूर फेटून घेणे, साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क, लिंबाचा रस घालून फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे व फेटणे. मिश्रण एकजीव झाले की थोडे दूध घालून फेटणे.
टूटीफ्रूटीचे तुकडे त्या मिश्रणात घालून ढवळणे.
केक मोल्डला बटर लावून घेणे व केकचे मिश्रण त्यात ओतणे.
प्रिहिटेड अवनमध्ये १८० अंश से ला ४० ते ४५ मिनिटे बेक करणे.केक तयार झाला आहे की नाही ते (केकच्या)पोटात
सुरी खुपसून पाहणे.
केक तयार झाल्यावर जाळीवर काढणे.
केसु आणि दिनेशने कितीही "आता बास..किती वाट पहायची? कापा आता केक.." असे म्हटले तरी केक रुमटेंपरेचरला येईपर्यंत त्या दोघांकडे लक्ष न देता मिपा मिपा खेळणे आणि केक कक्षतपमानाला आल्यानंतरच तुकडे करणे.
व्हिप्ड क्रिम घालून खाणे.



वाचने
7434
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
आवडला...
स्वाती...........मस्तच
तोंडाला पाणी सुटले
या वर्षाचा संकल्प
In reply to या वर्षाचा संकल्प by प्रियाली
हा संकल्प आम्ही नित्यनेमाने
In reply to हा संकल्प आम्ही नित्यनेमाने by Nile
+१
काय बोलु ? छ्या... जाउंदे !!!
फोटू नेहमीप्रमाणेच छान. सात
माझा वाटा कुठाय?
In reply to माझा वाटा कुठाय? by गणपा
तुझा वाटा खाल्ला......रे
In reply to माझा वाटा कुठाय? by गणपा
गणपा
बरं झालं फोटु
वाचलो
In reply to वाचलो by सहज
सहजशेठ..
अत्याचार आहे ...
वा
छे ! सगळे फाँट फॉल्टी दिसत
केक मस्तच दिसतोय. एक शंका -
जबरदस्त दिसतोय केक. आवांतर:
वॉव!!
तोंपासु
धन्यवाद
केक पाहुन भुक लागली.