Skip to main content

चश्मीस डोळस, बोलके मोने, शहाणे खुळे, सोनार पितळे....

लेखक मिलिंद यांनी रविवार, 02/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना ! दचकू नका. मी काही विरुध्दार्थी शब्दांच्या जोड्या लावलेल्या नाहीत. (आणी तुम्हालाही लावायला सांगत नाही) अहो ही आहेत आडनांवे आणी तीही त्या आडनावांच्या व्यक्तींच्या गुणविशेषासकट. तुम्हालाही कधी तरी असा प्रश्न पडला असेल की ही आडनांवे/उपनांमे (Family names) कशी पडली असतील कुटुंबांना? ज्यांचा वंशपरंपरागत/पिढीजात व्यवसाय आहे त्यांना त्यांच्या पेशाची नांवे पडणे हे ठिक आहे. पण म्हणून अशा विरुध्द गुणविशेषाची आडनांव का बरं समाजाने (आडनांवे कोणी ठेवली हे ज्ञात नसल्याने तुर्तास समाजाने) ठेवावीत. हा काही काल्पनिक लेख किंवा कथा नाही. रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात अशा आडनावांच्या व्यक्ती त्याच्या विरोधी आडनांवगुणविशेषाने एकत्र नांदतायेत हे आश्चर्यच मानायला हवे ना! या गावात डोळस आडनांव असलेली ४ ते ५ कुटुंब आहेत पण त्या बहुतेकशा डोळसांना चश्मे आहेत किंवा डोळ्यांचे आजार आहेत. मोने आडनांवाची ५ ते ६ कुटुंब आहेत पण ते गांवात बोलके म्हणून प्रसिध्द आहेत. या मोने कुटुंबापैकी एक मोने सर तर संस्कृतचे प्रसिध्द शिक्षक आहेत आणी ते तर त्यांनी बोलत रहावे आणी समोर बसलेल्याने त्यांचे संस्कृत प्रभुत्व ऐकत रहावे असे महान व्यक्तीमत्व होते. आता खुळे म्हटले की तुमच्या समोर तसेच व्यक्तीमत्व येणार पण तुमचा अंदाज नक्कीच चुकणार. आडनांव खुळे पण ही पण ४, ५ कुटुंब चांगल्या चांगल्या क्षेत्रात त्यांचे शहाणपण सिध्द करुन आहेत. पितळे नावाचे सोनार तर या पंचक्रोशीत प्रसिध्द, पण त्यांना त्यांच्या व्यवसायावर धोंडा पाडणारे आडनांव कोणी बहाल केले असावे हे त्यांनाच (किंवा त्यांच्या पुर्वजांनाच) ठावूक. आपल्यालाही अशी उपनामे/आडनांवे माहितीअसतील तर या माहितीत भर घालाच
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1873
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आणखी काही मजेदार जोड्या- प्रकाश अंधारे सुहास रडके तुफान आगलावे चमेली काळे

छन लेख आहे पन थोद अजुन चन्गल पहिज होत .