शाही अंडा बिर्याणी
काल ३१ डिसेंबराला 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' भेटायला आला होता, तेव्हा पुन्हा एकदा राकलेट आणि चॉकलेट मूस चा बेत आणि भरपूर गजाल्या झाल्या..
नवीन वर्षाची सुरुवात वजन करून करावी अशी अभिनव कल्पना आमच्या डोक्यात आली.
मुक्काम पोस्ट फ्रँकफर्टला हालवल्यानंतर पहिले ३-४ आठवडे, ब्राझील मध्ये बसून स्वातीताईंच्या पाककृतींची बनवलेल्या यादीची यथेच्छ वसुली आणि आमच्या ब्राझील मध्ये केलेल्या पाककृतीची स्वाती व दिनेश यांना प्रात्यक्षिके करून दाखवण्यात गेले होते.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झालाच होता.. ६ किलो वजन ३० दिवसात कमावले आहे अशी आनंदाची बातमी वजन काट्याने दिली... सकाळी निनादला टाटा बाय केल्यानंतर पुन्हा आमची आणि दिनेशची चर्चा वजनावर घसरली.. ह्या वजनाचे काही तरी केलेच पाहिजे असा एकमताने निर्णय झाला आणि ७ जानेवारीला दिनेश पॅरिसहून परत आला की डायेट आणि व्यायामशाळा सुरू करायचा संकल्प कॉफी पीतपीत सोडण्यात आला. थोड्या वेळ व्यनि, चेपू चाळाचाळी झाली आणि नव्या वर्षातली पोटातल्या कावळ्यांची पहिली कावकाव सुरू झाली.. काय करावे चा काथ्याकूट सुरू केला. नवीन वर्षाचा संकल्प सुरू करायला अजून ७ दिवस आहेत काही तरी फर्मास करूया असे दिनेशचे अनुमोदन मिळाले आणि अंडा बिर्याणी बनवायचा प्रस्ताव दोनमुखानी मंजूर झाला.
चला तर मंडळी शाही अंडा बिर्याणी बनवायला.
घ्या साहित्य लिहून ...
साहित्य:
सर्व साहित्य ४ माणसांना पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
८ अंडी
३ वाट्या तांदूळ
३-४ मध्यम कांदे
१ मध्यम टोमॅटो
२ मध्यम बटाटे
६-७ लसुणाच्या पाकळ्या
२ पेरं आलं
१ टेबल चमचा कांदालसूण मसाला
३ टेबल चमचा तयार बिर्याणी मसाला
२ इंच दालचिनी
१-२ दगड फुल
४-५ तमालपत्र
७-८ लवंगा
१०-१५ मीरे
१ मसाला वेलदोडा
५-६ वेलदोडे
१ वाटी दही
१/४ वाटी दूध
४-५ काड्या केशर
१५-२० काजू
हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आवडीनुसार
जिरे, हळद, तेल(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
रायत्याचे साहित्य
२ कांदे
१ टोमॅटो
१-२ टेबल चमचा चाट मसाला
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
पोटातल्या कावळ्यांची कावाकावी मुळे सर्व पदार्थांचे फोटो काढायला वेळ नव्हता.
कृती :
तांदूळ स्वच्छ धुऊन, ४५ मिनिटे भिजवत ठेवा. केशर चुरडून दुधात भिजवत ठेवा.
१ १/२ कांदा बारीक उभा कापा, बाकीचे कांदे, टोमॅटो कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या बारीक कापून घ्या.
बटाट्याचे जाड काप करा. (एका बटाट्याचे फक्त ८ काप)
आलं लसूण मिक्सर मधून वाटून घ्या.
एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल तापले की त्यात उभा चिरलेला कांदा आणि बटाट्याचे काप तळून बाजूला ठेवा.
अंडी कडकडीत उकडून घ्या. उकडलेली अंडी अर्धी कापून थोड्याश्या तेलात शॅलोफ्राय करून बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवायला ठेवा, त्यात जिरे आणि सर्व खडा मसाला घाला. थोड्या वेळाने त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण वाटण आणि मिरच्या घाला. कांदा गुलाबी होई पर्यंत परता. मग त्यात काजू, थोडी कोथिंबीर, कडीपत्ता आणि पुदिना घाला. आणि सर्व मिश्रण २ मिनिटे ढवळा. आता त्यात कांदा लसूण मसाला, तयार बिर्याणी मसाला घाला. सर्व मिश्रण एकजीव करून त्यात एक वाटी दही घालून परता.दोन मिनिटे शिजू द्या. आता ह्या मसाल्यात भिजवलेले तांदूळ घालून २ मिनिटे परता. नंतर ४ वाट्या पाणी घालून पातेल्यावर घट्ट झाकण ठेवून तांदूळ ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ थोडे शिजले की त्यात तळलेले बटाटे घालून पुन्हा घट्ट झाकण ठेवून ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
तांदूळ पूर्णं शिजल्यावर, वरचा थोडा थर बाजूला करून त्यात शॅलो फ्राय केलेले अंड्याचे काप घाला, दुधात भिजवलेले केशर मिसळा, वर तांदुळाचा बाजूला केलेला थर पुन्हा लावा. वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर पेरा आणि झाकण घट्ट बंद करून अतिशय मंद आचेवर अंदाजे १० मिनिटे वाफाळू द्या.
झाली शाही अंडा बिर्याणी तयार...
रायत्याची कृती=
कांदा, टोमॅटो उभे चिरून घ्या. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, दही आणि चाट मसाला टाका. चवी नुसार मीठ मिसळा. झाले रायते तयार.
आता पुढे काय हे सांगायला हवे का? एन्जॉय..
चला आता दुपारी कॉफी बरोबर टूटीफ्रूटी केक करायचा आहे..त्याच्या तयारीला लागतो..;) (७ जानेवारीला आजून बराच वेळ आहे)
रायत्याची कृती=
कांदा, टोमॅटो उभे चिरून घ्या. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, दही आणि चाट मसाला टाका. चवी नुसार मीठ मिसळा. झाले रायते तयार.
वाचने
22449
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
खतरनाक दिसतेय बिर्याणी. आता
In reply to खतरनाक दिसतेय बिर्याणी. आता by विलासराव
खतरनाक
वाह वा.
खतर्नाक..........
फोटू छान आलेत. पाकृही चांगली
In reply to फोटू छान आलेत. पाकृही चांगली by रेवती
रेवतीतै
आवडीचा पदार्थ
In reply to आवडीचा पदार्थ by सन्जोप राव
+१
वोव ,मस्त दिस्तेय्,करुन
वेलकम बॅक
डायरेक्ट फोटोच बघितले.. पाकृ
आकडा
In reply to आकडा by श्रावण मोडक
श्रामो
In reply to श्रामो by केशवसुमार
खूण
आऽऽऽऽऽऽऽहाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
वा!
वा
In reply to वा by आजानुकर्ण
अंडा बिर्याणी आहे होय ही
वाआआआआआआआअव
अरे कोणीतरी ती हैद्राबादी मटण
In reply to अरे कोणीतरी ती हैद्राबादी मटण by विजुभाऊ
हलीम
कातील..
In reply to कातील.. by स्वाती दिनेश
आता हे म्हणजे दुसर्यांच्या
In reply to आता हे म्हणजे दुसर्यांच्या by रेवती
चॅक्क!
In reply to चॅक्क! by धमाल मुलगा
धम्या..
In reply to आता हे म्हणजे दुसर्यांच्या by रेवती
खरंच
In reply to कातील.. by स्वाती दिनेश
माहितीकरिता
In reply to माहितीकरिता by पंगा
अगदी अगदी!!!
In reply to माहितीकरिता by पंगा
सहमत आहे
अंडा बिर्याणी 'शाही' कधीपासून
खत्तरनाक हो ! काही
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by केशवसुमार
केसु भौ- निरोपाचे भाषण कशासाठी हो???
भन्नाट पाकक्रुती
आहाहा फोटो पाहुनच वास घुमला.
तात्काळ
In reply to तात्काळ by निनाद
तमाल वगैरे कागदपत्रांना फाट्यावर मारण्यात आले.
पुढच्या वेळी मला अशीच चमचमीत