२०१०: एक उत्तम वर्ष
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा:
क्रिडा:
क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती. केवळ याच खेळांत नाही तर क्रिकेटमधील अव्वल कसोटी संघ बनणे, डेव्हिस कपात विश्व गटात खेळणे वगैरे सांघिक यश मिळवतानाच सचिन, सायना, मेरी, अखिलकुमार वगैरे नेहमीच्या यशस्वी कलाकारांपासून ते सोमदेव किंवा अनिशा सय्यद सारख्या दोन सुवर्ण पटकावणार्या तरीही काहिशा अपरिचित असणार्या गुणी खेळाडूंसाठी हे वर्ष भरभराटीचं ठरलं
आंतरराष्ट्रीय राजकारणः
यशस्वी राष्ट्रकूल आयोजन तर भारताने केलंच पण याच वर्षी जागतिक रंगमंचावर भारताने दमदार पावले टाकली. संयुक्त राष्ट्रांमधले पाचही स्थायी सदस्य यावर्षी भारताला भेट देऊन गेले व त्यातील चौघांनी भारताच्या स्थायी सदस्यत्त्वाला जाहिर पाठिंबा दर्शवला हे भारतासाठी यावर्षाने दिलेलं आशादायक फळ आहे. त्याच बरोबर जपानसारख्या अणुबाँम्बचे थेट परिणाम भोगलेल्या देशाने अणूस्फोटानंतर लावलेले निर्बंध उठवणे, दक्षिणध्रूवावर भारताने वेधशाळा उभारणे, जागतिक वित्तपरिषद, पर्यावरण परिषदेत भारताने आपली भुमिका ठामपणे मांडणे, अमेरिकेने ड्युएल तंत्रज्ञानाच्या भारतात होणार्या निर्यातीवरील बंदी उठवणे, चीनच्या नाकावर टिच्चुन नोबेल पारितोषिकास उपस्थिती तसेच जाहिरनाम्यात तिबेटचा उल्लेख टाळण्याचे धैर्य दाखवणे या व अश्या अनेक प्रसंगांतून भारताची जागतिक राजकारणातील प्रबळ उपस्थितीची जाणिव या वर्षाने करून दिली आहे.
भ्रष्टाचारः
आदर्श, राष्ट्रकूल, २जी वगैरे भ्रष्टाचाराने देशाला दणाणून सोडले. मात्र हे भ्रष्टाचार झाल्याचे याच वर्षी उघड झाले. भ्रष्टाचार गेले अनेकवर्ष चालु होता आणि लोकही तो सहन करत होते मात्र भ्रष्टाचार विरोधी जनमत तयार होणे हे यावर्षाचे मोठे क्रेडीट आहे असे मला वाटते.
इतरः
राजकारणः बिहार निवडणूकीने प्रगतीचे राजकारण करणे अनिवार्य असल्याचे अधोरेखित केले. बिहार सरकार आणू पाहात असलेला "राईट टू सर्विस" कायदा देशातील भ्रष्टाचारावर आळा घालेल हा आशावाद याच वर्षात जागवला गेला.
अवकाशः केवळ स्वतःचेच नाहि तर इतर अनेक देशांचे उपग्रह हवेत सोडून या क्षेत्रातील मास्टरी सिद्ध केलीच पण बक्कळ पैसाही कमावला.
आरोग्यः मागच्या वर्षीच्या H1N1 नंतर यावर्षी त्यावरील लस शोधणे, विंचुदंशावर औषधाचा शोध व पेटंट वगैरे घडामोडी याच वर्षातील. शिवाय मेडिकल टुरीझम मधे प्रचंड वाढ.
थोडक्यात काय तर हे वर्ष परफेक्ट होतं आणि यात फक्त चांगल्याच गोष्टी घडल्यात असं नाही. मात्र वाईट गोष्टी सतत होतच असतात. यंदा गेल्या अनेक वर्षांशी तुलना केली तर या वर्षीच्या जमाखर्चात जमेच्या बाजुला अनेक घटना वाढल्या होत्या हे निश्चित.
१-१-११ अश्या वैशिष्ट्यपूर्ण तारखेने सुरू होणारे येते वर्ष भारतासाठी व पर्यायाने तुमच्यामाझ्यासाठी अनेक चांगले बदल घडवणारे असो हीच सदिच्छा!!
HAPPY NEW YEAR!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ठळक घटना
जाहीर निषेध !! संपादकाना सूचना.
जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत.
देवाक काळजी...!
बेष्ट! लै भारी जोक
२०१० चा चांगला आढावा नवीन
चांगला आढावा...
गतवर्षाचा चांगला आढावा घेतलात
नवीन वर्षाच्या सर्वांना
'सामना' हा पेपर काही वेगळेच
नवीन वर्षाच्या सर्वांना
आढावा
आणि हे काय नवे?
अरेरे!!
आढावा..
बाबरी मशिद वादविवाद निर्णय