हा केक ,माझ्या माहेरी आणि सासरी, एकदम सुपर हिट! हा केक कधीच उरला तर काय असा प्रश्न पडत नाही - कारण केल्या केल्या लगेच त्याचा चट्टा मट्टा होतो. हि रेसिपी 'Cooking from peasants and their wives' नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकातली आहे. ह्या पुस्तकाची डिस्कवरी मला एका रद्दी च्या दुकानात झाली होती. करून बघू म्हणून अगदी पौंड चे ग्राम चे कप असे हिशोब करून मग, पहिल्यांदा हा केक करून बघितला होता. ह्या केक ची ब्युटी त्याच्या versatility मध्ये आहे. एकदा हि बेसिक रेसिपी जमली कि मग त्याचे विविध फ्लेवर्ड वर्जन करता येतात. उ.दा. त्यात लिंबाची साल किसून आणि एक चमचा लिंबाचा रस घालून, लेमन केक तयार होतो. तसाच, ऑरेंज केक पण करता येतो. चोकॉचीप्स घातल्या कि चोकलेट चीप केक झाला. आणि हो, तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव ह्याच्यात थोडे फेरफार करून एक 'लो फॅट' वर्झन देत आहे.
सामग्री:
१ १/२ कप मैदा (सेल्फ रेसिंग फ्लौर वापरत असल्यास बेकिंग पाउडर घालू नका)
३/४ कप बारीक साखर/ पिठी साखर/ कॅस्टर शुगर/ जाड साखर (जाडी साखर वापरली तर जास्त वेळ बटर आणि साखर क्रीम करत बसाव लागत)
१०० ग्राम अमूल बटर
३ मोठी अंडी
१ tsp बेकिंग पाउडर
१/४ कप दूध
१ tsp vanilla essence
कृती:
- ओव्हन १८० डिग्री ला प्रिहिट करा.
- सर्व सामग्री रूम टेम्परेचर ला असावे. आधी बटर आणि साखर नीट फेटून घ्या. साखर विरघळून ते एकदम क्रिमी दिसायला लागलं पाहिजे. मग त्यात एक एक अंड घालून फेटा.
- एका वेगळ्या भांड्यात, मैदा आणि बेकिंग पाउडर चाळून घ्या. आता हा मैदा थोडा अंड्याच्या मिश्रणात घाला आणि कालवा. मग दुधात vanilla essence घालून, ते त्या केक च्या मिश्रणात कालवा. उरलेला मैदा घालून स्मूथ मिश्रण तयार करा.
- पाऊंड केक सहसा लोफ टिन मध्ये बेक करतात. पण तुमच्या कडे दुसर्या आकाराचे केक चे भांडे असेल तरी चालेल. पसरट भांड असेल तर केक बेक करायला कमी वेळ लागेल. ज्या भांड्यात केक बेक करायचा आहे त्याला तेल,तूप, किंवा बटर ने ग्रीज करा आणि मग त्यात एक चमचा मैदा घालून तो त्या भांड्याच्या सगळया बाजूला लागेल असे पसरवा. ह्याला बेकिंग टिन प्रीपेर करणे म्हणतात.
- केक चे मिश्रण ह्या टिन मध्ये घालून त्याला १८० डिग्री ला ३०-४० मि बेक करा. पूर्ण घरात केक चा खमंग आणि वनीला चा मस्त वास सुटला कि केक ची 'done test' करा. केक च्या मध्य भागी एक सळी (skewer), सुरी घालून त्याला ओलं मिश्रण चिकटत नाही न ते बघा. जर ती सळी एकदम स्वच्छ निघाली, तर केक फस्त करनेको तय्यार!
वाचने
9768
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
खादाड ताय, अंड्याला काही
अंड्याला काही पर्याय
In reply to खादाड ताय, अंड्याला काही by पिंगू
अंड्याला पर्याय म्हणून
In reply to खादाड ताय, अंड्याला काही by पिंगू
या वर्षी १० किलोवजन कमी
काय अमिता
छान..
सॉल्टेड बटर
In reply to छान.. by स्वाती दिनेश
मार्गारीन
In reply to सॉल्टेड बटर by खादाड अमिता
अजिबात बटर न घालता केल्यास
In reply to मार्गारीन by स्वाती दिनेश
दुवा..
In reply to अजिबात बटर न घालता केल्यास by गवि
ते खरंच आहे स्वातीताई, पण ते
In reply to दुवा.. by स्वाती दिनेश
इथे मुम्बईत लो फॅट ब्रेड
In reply to मार्गारीन by स्वाती दिनेश
पाऊंड केक?
अच्छा.. पाऊंड केक म्हणजे असे
In reply to पाऊंड केक? by आजानुकर्ण
रावणपिठले (एकास एक तिखटपूड,
In reply to अच्छा.. पाऊंड केक म्हणजे असे by गवि
पाऊंड केक?
In reply to पाऊंड केक? by आजानुकर्ण
विकीबाबांच्या त्या लिंकवर तर
In reply to पाऊंड केक? by आजानुकर्ण
तुमच्या केकवर आयसिंग नाही
In reply to विकीबाबांच्या त्या लिंकवर तर by गवि
तुमच्या केकवर आयसिंग नाही
In reply to विकीबाबांच्या त्या लिंकवर तर by गवि
ओवन नसेल तर?
ओवन नसेल तर?
In reply to ओवन नसेल तर? by स्वैर परी
ओवन नसेल तर?
In reply to ओवन नसेल तर? by खादाड अमिता
कधीही रोजच्या वापरातला कुकर