Skip to main content

लझिझ बिर्यानि विथ चिकन बटर ग्रेवि...............

लेखक पियुशा यांनी बुधवार, 29/12/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
बिर्याणी विथ बटर चिकन ग्रेवी बिर्याणी साठी : - अर्धा किलो तांदूळ ,अर्धा किलो चिकन , ३ चमचे दही ,तमालपत्र ,शहाजिरे ,दालचिनी , लवंग ,काळेमिरे,मोठा वेलदोडा , आल लसून पेस्ट २ चमचे , २ मोठे कांदे उभे चिरलेले ,२ मोठे टोमाटो चिरलेले ,.कोथिंबीर ,हिरवी मिरची ५-६ ,हळद ,मीठ .१-२ चमचे बिर्याणी मसाला ,१ चमचा लाल तिखट कृती :- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा , चिकन मध्ये थोडेस दही ,हळद,आणि आल लसून पेस्ट घालून कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या ,पाणी थोड जास्त असू द्या , (हे पाणी आपण ग्रेवी साठी वापरणार आहोत) आता आल लसून ,कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्सी मधून बारीक करून घ्या पातेल गरम केल कि त्यात आधी ३ चमचे (मोठे ) तूप /तेल घाला .नंतर खडा मसाला टाकून उभे चिरलेले कांदे घाला ,गुलाबी परतल्या नंतर , आल-लसून मिरची पेस्ट घाला टोमाटो घाला , छान परतून घ्या थोडी हळद ,चवीनुसार मीठ , बिर्याणी मसाला आणि लाल तिखट (जेवढ हव ) घाला फोडणीचा खमंग वास सुटला ना ,आता त्यात चिकन पिसेस घाला मस्त मिक्स करा आणि तांदूळ घाला आणि अंदाजे शिजेल एवढ पाणी घाला ,(तांदूळ घातल्यावर जास्त हलविले तर शीत मोडतात ) कोळशाची शेगडी असेल तर क्या बात हे ! गरम निखार्यावर बिर्याणी मस्त फुलून येते बिर्याणी होत आली कि त्यावर तळलेले काजू , कोथिंबीर ,घालून सजवा . बटर चिकन ग्रेवी बिरयानी करताना चिकन शिजवायला जे पाणी वापरले आहे तेच पाणी ग्रेवी साठी वापरायचे आहे ग्रेवी साठी :- पाव किलो चिकन , बटर ३ चमचे (तुम्हाला जे वापरायचे ते घ्या ) , अर्धी वाटी मगज पेस्ट (खरबूजा बी ) २ कांद्याची बारीक पेस्ट ,१ टोमाटो बारीक चीरलेल ,१ चमचा आल लसून पेस्ट , १ चमचा दही , १ चमचा लाल तिखट ,१ चमचा गरम मसाला ,१ चमच चिकन मसाला ,मीठ ,हळद बस्स.............. फोडणी :- बटर गरम झाले कि ,त्यात १ दालचिनी आणि तेज पत्ता तुकडा घाला ,कांदा पेस्ट घाला , आल लसून पेस्ट घाला ,मस्त गुलाबी रंग येऊ द्या आता लाल तिखट घाला ,मग टोमाटो घाला ,मस्त ढवळून घ्या गरम मसाला ,चिकन मसाला .मगज पेस्ट घालून छान परतावा ,तेल सुटू लागले कि चिकन पिसेस घालून ,छान हलवून घ्या ,आणि मग चिकन शिजवलेल पाणी घाला , मीठ आणि थोडी हळद घाला ५-७ मिनिट शिजल कि घट्ट रवाळ ग्रेवी तयार होईल , हव तस सजवा ..................... (टीप :- ग्रेवीला लाल भडक तरी येण्यासाठी कांदा परतला कि लाल तिखट घाला ,म्हणजे खतरनाक कलर येईल तुमच्या ग्रेविला ..) biryaani

वाचने 9122
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

ग्रेवीला लाल भडक तरी येण्यासाठी कांदा परतला कि लाल तिखट घाला ,म्हणजे खतरनाक कलर येईल तुमच्या ग्रेविला- खूप उपयोगी टिप

खरेच लजीझ आहे आता खावीशी वाटत आहे. फोटो किती आहेत मला तर १ च दिसतोय आनि तळलेले काजू , कोथिंबीर ,घालून सजवा . >>>> ह्यात कान्दा नाही घालाय्चा? का सध्या महागाइ मुळे स्किप केलाय?

अशक्य! पियुशा, जाव...तुला कुतुबमिनार, चारमिनार, ताजमहाल सगळं गिफ्ट देऊन टाकलं :) अवांतरः पा.कृ.झक्कासच. जेवायला कधी येऊ? :D

In reply to by धमाल मुलगा

गाववाले, एकट्यासाठीच काय विचारता आहेत . आम्ही पण येतो की बोलावल्यावर तुमच्या संगतीनं.. बाकी : पा.कृ.. झक्कास .. हे पाककला मधेय येवुन अवांतर मध्ये लिहायला कोंबडीचे जीगर लागते ..

In reply to by गणेशा

बास का द्येवा? पियुशानं आमंत्रण तर देऊ द्या...सगळी मिपाची ग्यांगच जाऊ की सोबत. :D >>हे पाककला मधेय येवुन अवांतर मध्ये लिहायला कोंबडीचे जीगर लागते .. आँ? कोंबडीचे जीगर? म्हणजे काय ओ गाववाले?

In reply to by धमाल मुलगा

आँ? कोंबडीचे जीगर? म्हणजे काय ओ गाववाले?
हेच विचार्तो. आपल्या करिश्मा आणि महादेव देवगणची जीगर माहिती आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जीगर असेच म्हणायचे होते .. आता वरती बिर्यानी होती म्हनुन तेथे चुकुन कोंबडीचे जीगर आले .. असो .. तात्पर्य असे होते की : च्या मारी , पाककृती वाचायची आणि ती झक्कास झाले हेच अवांतर असते ?

In reply to by पियुशा

सर्वाना आमंत्रण कधी ही या खादाडयाला >>>> कुठे? कधी ? अशी मुद्द्याची माहिती न देता तोंडभर आमंत्रण देणारे लोक कोणत्या शहरात असतात हे सांगणे न लगे. आता फक्त पेठ कोणती आणि घर नं सांगा. तारीख आणि वेळ सांगा. किती लोक येणार हे कळलं म्हणजे बनवायलाही अंदाज येतो नं.. आम्ही येतोय.

एकदम छान , आताच बिर्यानी खाल्ली आणि येथे येवुन रेसेपी पण मिळाली काय बात आहे .. फोटो जरी दिसत नसले तरी वरील रिप्लायवरुन अंदाज आला आहे .. अवांतर : कॉलेजला असताना तोडकी मोडकी बिर्यानी करत असु , चिकन मध्ये दही मिसळतात हे मला माहित नव्हते तेंव्हा ही .. तसे अजुनपर्यंत माहित नव्हतेच, पण मध्ये हैद्राबादी बिर्यानी खाल्ली तेंव्हा तेथील मोठे मोठे चिकन हाडापासुन कसे काय अलगद बाजुला निघते आणि तसेच ते इतके सुंदर कसे शिजते येव्हडे मोठे असुन हि , आम्ही तर पार लहान तुकडे करायचो तरी शिजायचे नाहि म्हणुन मग शोध घेतला तर असे कळाले दह्यामुळे ... बरोबर आहे का ते दह्यामुळे हा परिनाम होतो का ? आमच्या घरी मी सोडलो तर भात कोणी जास्त(जवळ जवळ नाहीच) खात नाही त्यामुळे बिर्यानी जास्त नसतेच .. त्यामुळे घरी कधी ही माहिती मिळाअली नाहीये..

In reply to by पियुशा

अरे पर्या हा फोटो मुद्दाम नव्हता टाकला रे क्लिअर नाहिये ना म्हनुन असो धन्यु
ते महत्वाचे नाही. लोकांची जळजळ होणे महत्वाचे.

यम्मि..... पण ,, खरबूजा बी , कुठे मिळेल ? आणि ते काय असतं???

मस्त जेवन बनवतेस तु. आत जेवायला कधी बोलवतेस बघुया.

झक्कास! ३१ चा मेन्यू ठरला! फक्त चिकनऐवजी मटण बिर्याणी!

पियुशा तु पियुशा नाहीस तर लझिझा आहेस्,मस्त रेसेपी.

मी अगदी तृप्त झालो. असा सुरेख फोटो नि डिशमधला लाल तरंग .मस्त पुलाव . बाईगे तुझ्यात साक्षात अन्नपूर्णा वसली आहे. आंणी अप्रतीम मांडणी. खूप शुभेच्छा