पास्ता म्हंटल कि कायम 'यमी' असे उदगार कानावर पडतात. पण आमची आई, पास्ता करू न आई, असं आम्ही कितीही केविलवाणे चेहरे करून सांगितलं तरी म्हणायची 'काय ते मेले मैदे, पोटात चिकटून बसतात आणि जाडी वाढवतात'. तेव्हा वाटायचं, आमचीच आई आम्हाला कधी ही पास्ता खाऊ देत नाही! पण आता आई नाही असं म्हणत. कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते. हल्ली पुण्या मुंबई कडे तर होल व्हीट पास्ता विकत पण मिळतो. जर पास्ता घरी करायचा नसेल, तर विकतचा पास्ता आणून, त्याले शिजवून, टोमाटो किंवा चीज सोस मध्ये घालावा आणि छान सजवून पेश ए खिदमत करावा. ममी भी खुश और टमी भी खुश!
हॉटेल मध्ये पास्ता खाण्या पेक्षा घरीच खाल्लेला चांगला ह्याच कारण असे कि घरी कुठला हि पदार्थ करताना त्यात किती तेल, तूप, चीज घालायचं हे आपल्या हातात असतं.
सामग्री:
२५० ग्राम पास्ता, उकडलेला (उकळत्या पाण्यात पास्ता आणि मीठ घालून त्या पास्ता ला सुरी अथवा फोर्क ने शिजल्याची खात्री करून, गाळून बाजूला ठेवावा)
२५० ग्राम (४-५) टोमाटो, मिक्सर मध्ये ह्याची प्युरी करून घ्या
२ कांदे, बारीक चिरलेले
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
१ चमचा साखर
१ चमचा ओलिव्ह ओईल अथवा बटर
१ चमचा द्रायीड मिक्स्ड हर्ब्स
६ लसूण पाकळ्या, बारीक कुटलेल्या
कृती:
- एका नोन स्टिक भांड्यात बटर किंवा ओलिव्ह ओईल गरम करून, त्यात लसूण, मिरपूड, कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा. मग त्यात टोमाटो प्युरी घालावी आणि मंद आचेवर शिजवावा. टोमाटो सोस जरा दाट झाले कि त्यात पास्ता, मीठ, साखर, हर्ब्स घालून चांगले मिक्स करावे. सोस ची चव बघून गरज असल्यास मीठ मिरपूड घालून, सर्व्ह करावे.
आहे न किती सोप्पी कृती? मग वाट कसची बघताय - हो जाये?
वाचने
3880
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
द्रायीड मिक्स्ड हर्ब्स कुथे
हर्ब्स
In reply to द्रायीड मिक्स्ड हर्ब्स कुथे by पियुशा
धन्यु
In reply to हर्ब्स by कवितानागेश
धन्य धन्य जाहले
तुमचा ब्लॉग पण खूप छान आहे
In reply to धन्य धन्य जाहले by कच्ची कैरी
मलाही मारिनारामधला होल ग्रेन
धन्यवाद रेवती ताई
In reply to मलाही मारिनारामधला होल ग्रेन by रेवती
हा पास्ता पट्ट्यांसारखा दिसतो
कारण आता मी साध्या गव्हाच्या
पास्ता बनवण्याची कृती लवकर
जागूशी सहमत! मला इथला होल
In reply to पास्ता बनवण्याची कृती लवकर by जागु