Skip to main content
लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 21/12/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज पौर्णिमा... काल आणि आज असे दोन्ही दिवस चांदोबाला टिपले,कालचा चंद्र पांढरा तर आजचा चंद्र पिवळसर दिसत आहे... सुचना समाप्त... ;) कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (फोटो फक्त रिसाईझ केले आहेत, सॉफ्टवेयर वापरुन प्रोसेसिंग केलेले नाही.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7373
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हो आज.. मस्त पिवळा धम्मक दिसतोय चांदोमामा.. स्टेशन वर असताना टिपायचा प्रयत्न केला. पण मोबिल च्या कॅमेरात तो एखादा 'बल्ब' दिसावा तसा दिसत होता.. मग डोळे भरभरून पाहून घेतला... बाकी बाणा फोटू तर खासच

कालच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. ३७२ वर्षांनी विंटर सॉलस्टाईस (अवष्टंभ?)च्या दिवशी उत्तर गोलार्धातून ग्रहण दिसलं. फोटो छानच.

मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते . फोटो नक्कीच चांगले आले असतील पाहावेशे वाटत आहे,

In reply to by गणेशा

मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते . ह्म्म...जर तुमच्याकडे पिकासा ब्लॉक असेल तर माझे फोटु तुम्हाला दिसणार नाही... मागे फ्लिकरवरवर फोटो चढवु नका असे मला सांगितले होते... (बर्‍याच जणांच्या हापिसात हे बॅन आहे म्हणुन) म्हणुन मग हल्ली पिकासावर चढवतो आहे.