वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०).
(१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते.
(२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते. :P
(३) घुमेपणा - अभिव्यक्तीची किमान गरज असणे.
(४) ऊठ्सूठ युद्ध चित्रपट पाहणे आणि घरातल्यांचे डोके त्यातील कर्णकर्कश्श आवाजाने उठविणे.
(५) "मेल बाँडींग" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत उनाडगिरी करणे.
(६) मॉलमध्ये पाय टाकल्याच्या ५ मिनीटाच्या आत हवी असलेली वस्तू घेऊन बाहेर पडणे आणि एवढा तीर मारून काय करणे तर घरी येऊन ढाराढूर झोपणे.
(७) एखादा सामान्य पदार्थ बकवास बनवून, दुप्पट सांडलवण करून, आरडाओरड करून घर डोक्यावर घेऊन, शेवटी बायकोकरता तिप्पट काम वाढवून ठेवणे.
(८) रस्ता चुकल्यास पृथ्वी प्रदक्षिणा घालून पेट्रोल वाया घालविणे पण पत्ता न विचारणे.
(९) क्रिकेट्/फूट्बॉल आदिची मॅच असल्यास जगबुडी का होइना पण आंघोळ/दाढी वगैरे न करता टी व्ही ला चिकटून बसणे आणि फर्मान (ऑर्डरी) सोडणे.
(१०) आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
या यादीमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या परीने भर घालावी ही विनंती.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>आपल्या आईच्या हातचं खाणं
>>आपल्या आईच्या हातचं खाणं साक्षात अन्नपूर्णा आली तरी बनवू शकणार नाही असा अंधविश्वास बाळगणे.
आता असते एखाद्याची आई सुगरण, सुनेने हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर काय बिघडलं !! :D
तु म्हणतोस तो मुद्दा मान्य.
In reply to >>आपल्या आईच्या हातचं खाणं by सूड
आता असते एखाद्याची आई सुगरण, सुनेने हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर काय बिघडलं !!
परन्तु हे positively त्या पात्रतेपर्यन्त पोहोचलेले उदाहरण आहे. तीने मान्य केल आणि तीने करून दाखवले.
नव्हे ती गेले (२६ पैकी) २३-२४ वर्षे करून दाखवत आहे.
बिचारे नवरे
एक गाणे ऐकले होते रेडिओ वर
" जब से हुई हे शादी,आसु बहा रहा हु,
आफत गले पडी है,उस्को निभा रहा हु"
हौस्टेल लाईफ बरी आहे...महिनाभर रूम झाड्लेली नसणे, आन्घोळील सुट्टी,वास मारणारे मोजे....लग्नानन्तर खरी गम्मत असेल्....तरी मिपाकारा कडुन बरीच माहिती मिळत आहे...धन्यवाद
शुची - काय देऊ प्रतिक्रिया.
शुची - काय देऊ प्रतिक्रिया. मनापासून लिहिले. आवडले असे कसे म्हणू ..?
सरळ बाण मारलात. आता खरेच स्वताचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे .
मी पण घरी मला हवे तसे काम करतो .माझ्या पद्धतीने. चूक आहे कबूल
पण काम करीत नाही असे होत नाही . बायकाच नवरोबाला लाडावून ठेवतात मग उलटे टांगता.
आहेतना अशा बायका ..?
असो छान लिहिलेत. खूप शुभेच्छा.