Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Sat, 12/25/2010 - 08:31
इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? मिसळपाव या संस्थळावरील ही बातमी वाचून मिपाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "काथ्याकुट " हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत ७२ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.) http://www.misalpav.com/node/16000 अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण मिपा मधून माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला मिपावर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले 'परा'न मंत्री, आपले टारुपती, आपले 'अवली' लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर मिपापासून सुरुवात होऊन संस्थळे एक-एक करून फुटतील आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथले दोन आयडी अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. मिपामध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने "जातीयवाद भडकव्णाऱ्या आयडी " देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो सदस्यांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी संपादक मंडळांना इंग्रजीत व मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा! जय मिपा !
  • Log in or register to post comments
  • 10910 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Sat, 12/25/2010 - 08:46

Permalink

हा हा हा .. ते अण्वस्त्रधारी

हा हा हा .. ते अण्वस्त्रधारी आयडी कोण रे ? बाकी लेका तु प्रेमपत्रे लिहायला लाग ,, ही इंग्रजी आणि मराठी पत्र पाठवुन ते ही संपादक मंडळाला पाठवुन काय हाशिल होणार ? त्यातल्या त्यात मंडळात कोणी उमेद्वार म्हैला नाही त्यामुळे तिथेही तुझा चाण्स लागणार नाही :) आलाचे झिंगलबेल झिंगलबेल चा सण तर सिंगल मिंगल काय करता ;) बाकी प्रतिसादांचे विडंबण वाचण्यास उत्सुक. अवांतर : ह्या विषयांतर परिकथेतिल राजकुमार आणि अवलियांचा_राजा यांचा अभ्यास खुप खोलवर आहे त्यांचे विचार वाचण्यास उत्सुक .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Sat, 12/25/2010 - 08:47

Permalink

हा हा =))

हा हा =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 12/25/2010 - 09:17

Permalink

हा हा हा .. ते अण्वस्त्रधारी

हा हा हा .. ते अण्वस्त्रधारी आयडी कोण रे ? बाकी लेका तु प्रेमपत्रे लिहायला लाग ,, ही इंग्रजी आणि मराठी पत्र पाठवुन ते ही संपादक मंडळाला पाठवुन काय हाशिल होणार ? त्यातल्या त्यात मंडळात कोणी उमेद्वार म्हैला नाही त्यामुळे तिथेही तुझा चाण्स लागणार नाही Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sat, 12/25/2010 - 09:55

Permalink

हे अण्वस्त्रधारी आयडी म्हणजे

हे अण्वस्त्रधारी आयडी म्हणजे काय हे न कळाल्यामुळे पास !! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sat, 12/25/2010 - 10:11

Permalink

आता हे इंच इंच मैलात, मोजावे

आता हे इंच इंच मैलात, मोजावे लागनार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 12/25/2010 - 11:13

Permalink

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 12/25/2010 - 11:18

Permalink

स्पा काका...मिपा तर हातचे

स्पा काका...मिपा तर हातचे जाण्याच्या स्थितीत आहे,पण 'पराक्रमी' चा धोका त्याहुन मोठा होत चालला आहे. पराक्रमी आयडी मिपात बंदर (पोर्ट) बनवणे आणि पराक्रमी ते मिपा रस्ते बनवणे इं अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले असुन मिपाला घेरण्याचे हर तर्‍हेचे प्रयत्न सध्या पराक्रमी करत असुन आता त्यांचा मिलेटरी बेस मिपास्थानात स्थापण्याचे त्यांचे मनसुबे आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 12/25/2010 - 11:21

In reply to स्पा काका...मिपा तर हातचे by परिकथेतील राजकुमार

Permalink

किती अतिरेकी.. आपलं .. खंदे

किती अतिरेकी.. आपलं .. खंदे कार्यकर्ते घुसले आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sat, 12/25/2010 - 11:23

In reply to स्पा काका...मिपा तर हातचे by परिकथेतील राजकुमार

Permalink

पराशि शेमत आहे,एकतर मिपाचे

पराशि शेमत आहे, एकतर मिपाचे सर्व लेख पनाला लाउन मिपा वाचवावे, अन्यथा सोडुन द्यावे, पन हे असेच चालु ठेउन अन्य लेखकांचा बळि देउ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 12/25/2010 - 11:53

Permalink

ह्म्म्म

बातमी चिंता वाढवणारी आहे.. मात्र अधिक तपशील मिळेपर्यंत काहिच भाष्य करता येणार नाहि त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर मिपापासून सुरुवात होऊन संस्थळे एक-एक करून फुटतील आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. हे कशावरून ठरवले? काहि तर्क आहे का आपले उगाच एक वाक्य लेखनाला भारदस्तपणा येण्यासाठी टाकले आहे? ----लांबलांबकेश
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Sat, 12/25/2010 - 13:22

Permalink

असे काही नाही रे

असे काही नाही रे स्पावल्या.. मिपाला आणि येथील लेखक, प्रतिसादकांना सध्या पठारावस्था आलीय. आणि उनाड प्रतिसादकांच्या आंगात वारं भरलंया ... हेही दिवस जातील!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 12/25/2010 - 13:24

In reply to असे काही नाही रे by यकु

Permalink

शक्यता नाकारता येत नाहि.

शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 12/25/2010 - 13:23

Permalink

पठारावस्था ???? म्हन्जे काय

पठारावस्था ???? म्हन्जे काय रे भाउ?
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Sat, 12/25/2010 - 20:03

In reply to पठारावस्था ???? म्हन्जे काय by स्पा

Permalink

पठारावस्था ???? म्हन्जे काय

पठारावस्था ???? म्हन्जे काय रे भाउ?
म्हणजे काय ते डिट्टेलमध्ये पाहायचे असेल तर त्यासाठी तुला शिक्षणशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पाहावा लागेल. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जोरात प्रगती होत जाते, नंतर प्रगतीला खीळ बसून ती ठप्प होते .. असाच काही काळ जातो.. आणि नंतर पुन्हा एकदा प्रगती सुरू होते.. त्या ठप्प होण्याच्या काळाला पठारावस्था म्हणतात असं काहीसं आठवतं...
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 12/25/2010 - 13:37

Permalink

या अर्थाची पत्रे मी संपादक

या अर्थाची पत्रे मी संपादक मंडळांना इंग्रजीत व मराठीत पाठविली आहेत ही पत्रे हिन्दीसारख्या न पाठवून तुम्ही फूट पाडायची कारस्थाने करीत आहात. अशी पत्रे पाठवताना पुण्यातील बीहारी सदस्यांचा विचार करावा. ...अजानुघोर्णं
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 12/25/2010 - 22:49

Permalink

चलो जकार्ता......काळे काका

चलो जकार्ता......काळे काका मार्ग दाखवतील
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 12/25/2010 - 22:58

Permalink

मिपा कसलं इंचाइंचाने जातंय?

मिपा कसलं इंचाइंचाने जातंय? लोकं इथल्या मोकळ्या आणि कौटुंबिक वातावरणाच्या 'तक्रारी'सुद्धा आधी भलभलत्या ठिकाणी करत आहेत; पण इथे येऊन मैत्रीपूर्ण प्रतिसाद लिहीण्यास कांकू करत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 01/31/2013 - 14:55

Permalink

प्रतिसाद दिसत नाहीयेत

प्रतिसाद दिसत नाहीयेत
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/31/2013 - 20:07

Permalink

अगग्ग्ग!

तुला मेल्या कर्णपिशाच्च नक्कीच अवगत आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/31/2013 - 20:14

Permalink

अरे देवा !

अरे देवा !
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 02/01/2013 - 04:19

Permalink

चिंताजनक

चिंताजनक परिस्थिती! 'युनो'सारखी एखादी संस्था समस्त मराठी संकेतस्थळांसाठी असणे अतिशय आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 02/01/2013 - 05:22

Permalink

स्पा हा उघडाहेर आहे का?

स्पा हा उघडाहेर आहे का? (गुप्त च्या विरुद्ध उघडा अश्याअर्थी)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Fri, 02/01/2013 - 09:11

In reply to स्पा हा उघडाहेर आहे का? by स्पंदना

Permalink

(गुप्त च्या विरुद्ध उघडा अश्याअर्थी)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/01/2013 - 11:09

In reply to स्पा हा उघडाहेर आहे का? by स्पंदना

Permalink

हाहाहाहा

हाहाहाहा =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 02/01/2013 - 13:56

In reply to स्पा हा उघडाहेर आहे का? by स्पंदना

Permalink

संधीविग्रह !!

मी उघड+आहेर असा संधीविग्रह केला.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/01/2013 - 14:06

In reply to संधीविग्रह !! by सूड

Permalink

बरीक संधीसाधू हो सुडक्या

बरीक संधीसाधू हो सुडक्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 02/02/2013 - 23:14

In reply to स्पा हा उघडाहेर आहे का? by स्पंदना

Permalink

स्पा उघडा उभा राहिला तर

स्पा उघडा उभा राहिला तर (शत्रू पळून गेल्यामुळे) युद्धाचा चान्सच नाही राहणार! काय समजलात?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com