बाजूला स्वपत्नी (आणि रिमोट मिळाला तर स्वतःही. वोखटे का बोला..?) कट कट कट करुन चॅनेल बदलत असते. तिचा स्पीड ३० सीपीएम (चॅनेल्स पर मिनिट्) आहे. माझा २० आहे.
आता दोघांच्याही चॅनेल बदलण्यात सफाई तर खूप आलीय..पण स्पीडवर विशेष कष्ट घेणे आवश्यक आहे.
.........
लडकी है एक नाम रजनी है..
रजनी की एक ये कहानी है..
अशा काहीतरी ओळी निळ्यातून एकदम अचानक उगवतात आणि दूरदर्शनच्या शिर्वलांची आठवण होते.
तर, जेव्हा माझ्या घरी लहानपणी पहिल्यांदा टी.व्ही. आला आणि प्रतिष्ठापनेनंतर जेव्हा ऑन केला तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि "आमची माती, आमची माणसं" चालू होतं. आपल्या गावात टी.व्ही. प्रक्षेपण चालू झालं आणि घरीही टी.व्ही. आला याच्या अद्भुतरम्य आनंदात त्यानंतरचे प्रक्षेपण संपेपर्यंतचे सर्व प्रोग्र्याम नजर न ढळू देता पाहिले. रिमोटही नव्हता आणि दुसरा चॅनेलही नव्हता.
दुपारी चार वाजता ट्यँ अं यँ यँ यँ अशी सिग्नेचर ट्यून आक्रंदून सुरू झालेलं दुर्दर्शन रात्री अकराला संपायचं. मग नुसता कूं आवाज येत राहायचा.
सर्वसाधारणपणे आठवणारी नावं म्हणजे संताकूकडी, संतवाणी, ज्ञानदीप, साप्ताहिकी, आमची माती आमची माणसं, बातम्या, आणि आठ चाळीसला एकदम दिल्ली दूरदर्शनचं राष्ट्रीय प्रक्षेपण सुरु.
त्यात सिरीयल्स आठवड्यात एकच एपिसोड आणि एकूण तेरा एपिसोड अशा नियमात बसलेल्या. हक्के बक्के ही रवी वासवानीयुक्त सिरियल हिलॅरियस वाटणारी होती. एक अलीबाबा बेचारे, बाकी चालीस चोर..असं टायटल साँग होतं.
मिस्टर योगी ही शनिवारी रात्री असणारी मोहन गोखलेवाली मालिका. त्यात अमेरिकेतून एनाराय असलेला मिस्टर योगी भारतात मुली बघायला येतो.. आणि एकेका विवाहेच्छू पोरीचा नमुना एकेका शनिवारी दिसायचा.
हमलोग आणि बुनियाद या मालिकांनी मात्र लांबीचा नियम तोडला. शेवटच्या एपिसोडपर्यंत त्या "लेजंड"रूपाला पोचल्या होत्या.
बुनियाद मला वाटतं फाळणीशी रिलेटेड होती.
नंतर आठवतात वागळे की दुनिया, मालगुडी डेज.
या सीरियल्सनी एक वातावरणच तयार केलं. वागळेचे फेमस शब्द : "गुड नो.." त्याचं घर आणि पिचण्यातून, फसवणुकीतूनही आनंदात राहण्याचं स्पिरिट. आता वागळे परत टी.व्ही.वर येताहेत असं ऐकतो..(की ऑलरेडी आलेत?)
आणि मालगुडी डेज मधल्या "स्वामी" कथेतलं ते गाव मनातच वसल्यासारखं झालं. स्वामी आणि त्याचे मित्र हे गोट्याची आठवण करुन द्यायचे.
हम पंछी एक डाल के..गिरीश कर्नाडची होती..
चुनौती म्हणून कॉलेज लाईफवर आधारित सीरियलमधे राजू श्रेष्ठा या चांगल्या मुलाला ड्रगचं व्यसन लागतं. तेव्हा ड्र्ग्ज हा एक एकदम चालू सब्जेक्ट होता.
मन एक सीपी है..आशा मोती है..
हर पल जीवन का..एक चुनौती है..
असं त्या सीरियलचं खूप मेलडीयस रुमानी टायटल साँग होतं..
रजनी ही अन्यायाविरुद्ध लढणारी .. रविवारी दुपारी. ही बायकांत प्रसिद्ध.
रविवारी दुपारच्या सिरियल्समधे लहान मुलांसाठी "एक दो तीन चार" अशी एक चार उचापत्या पोरांची सिरियल होती. त्यात बहुधा ब्रुनो नावाचा कुत्राही होता.
नंतर जसपाल भट्टी नावाचं प्रकर्ण टी.व्ही.वर धुडगूस घालायला दाखल झालं. उल्टा पुल्टा या तीन मिनिटांच्या फिलर टाईपच्या कट्सनी सुरुवात होऊन बघता बघता "फ्लॉप शो" हा जबरी इरसाल नमुना उभा राहिला.
बब्बाब्बा बबाब्ब बब्बाब्ब बा..
झूम इन्..झूम आउट..
फेड इन..फेड आउट..
अशा शब्दांनी सुरु होणारं झाकडूमाकडू टायटल साँग. ती टायटलही जबरदस्त..
प्रॉडक्शन मॅनेजर ऐवजी प्रॉडक्शन डॅमेजर..
स्पेशल इफेक्ट्स ऐवजी स्पेशल डिफेक्ट्स..
डायरेक्शन ऐवजी मिसडायरेक्शन..
कॅमेरा ऐवजी कॅमेरा जर्क्स..
तिथेच हास्यफवारे सुरु व्हायचे. मग ठासून भरलेल्या उपरोधाचा तो धमाल प्रोग्रॅम...
त्याच्या शेवटी त्या एपिसोडच्या विषयाशी रिलेटेड एक अत्यंत विनोदी गाणं असायचं.
म्हणजे:
भाड्याची घरं मिळवणे, मालक्-भाडेकरु संबंध, घरं खाली करवण्याच्या सुपार्या यांवर असलेल्या एपिसोडमधे "जिस गली में तेरा घर न हो बालमा.." च्या चालीवर "जिस गली में मकान मालिक से झगडा न हो.."
टेलिफोन मिळणं अवघड असण्याचा काळ्..त्यात भरमसाठ चुकीची बिलं, क्रॉस कनेक्शन अशा एपिसोडनंतर "कहीं दूर जब दिन ढल जाये" च्या चालीवर. "कहीं फोन ये डेड हो जाये.. राँग नंबर भी बहुत घुमायें.."
जाली मेडिकल बिलच्या एपिसोडनंतर, "दिल का मामला है" च्या चालीवर "बिल का मामला है"
अशी कितीतरी...अजून आठवतात.
झालंस्तर..
ही मॅन्...अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स..
(सर्व फोटो जालावरुन साभार..(आमच्याकडे कुठून असायचे..?) )
स्पायडरमॅन..
(ओह रॅबिट..) यू जस्ट वेट..
चमत्कारी टेलिफोन..(शर्ली मॅक और जॉनेथन..!!)
जंगली तूफान टायर पंक्चर..
झालस्तर शिक्षणात्मक..
एक चिडिया..अनेक चिडिया.. दाना चुगने आती चिडिया..
;a href="http://gnachiket.files.wordpress.com/2010/12/ekchidiya.jpg">
सूरज एक्..चंदा एक्..तारे अनेक..
.....
स्वतंत्रता की ज्योत..
पूरब से सूर्य उगा..चलो सिखाएं..कुछ कर दिखाएं..
मराठीत चाळ नावाची वाचाळ वस्ती, असे पाहुणे येती, पैलतीर, द्विधाता (खतरनाक्..विक्रम गोखले स्प्लिट पर्सनॅलिटी..), नो प्रॉब्लेम, स्वामी (जो सर्वांचे..रक्षण करतो..पोषण करतो..पालन करतो..), गोट्या (बीज अंकुरे अंकुरे..ओल्या मातीच्या कुशीत..) आणि काय काय..
जे काही होतं ते जनरली तेरा भागात संपायचं.. रिपीट व्हायचं नाही (त्यामुळे प्रथम दर्शनाला किंमत असायची..).. ते बघता बघता बदलण्याची सोय नव्हती. त्यामुळे जे दिसतंय ते पाहिलं जायचं..
..आणि बहुधा त्यामुळेच खूप छान वाटायचं..
................
बॅक टू वर्तमान..
..................
इतके चॅनेल खटाखट बदलूनही (त्याच शंभर चॅनेल्सचं चक्र तीनदा फिरवून झाल्यावर..) "कुठेच काहीच छान नाहीये आज टी.व्ही. वर..हल्ली नसतंच..", अशा संपृक्त वैतागात आम्ही असताना हे सर्व अचानक स्मरून कधीकधी मी पत्नीला म्हणतो, "ए, आपण कोणतीही एक सिरियल अॅक्च्युअली 'बघूया'.. मग ती आवडेलही आपल्याला कदाचित खूप.."
बर्याचदा एक लफडा आमच्यात होतो आणि तो झालाय हे बर्याचदा मला कळत नाही. मी तिने लावलेली सीरियल मनापासून बघत असतो. मधेच माझं लक्ष भिंतीवरच्या पालीकडे जातं. पाल किड्याकडे रोखून बघत असते. मी या भिंतीवरच्या उपनाट्यात ओढला जातो. किडा पटकन उडून जाईल अशी मला भीती वाटते आणि मी सावरून बसतो.. तेवढ्यात पाल अत्यंत चपळाईने झडप घालून झप्कन किडा तोंडात पकडते.
तीन मिनिटांच्या या "उल्टा पुल्टा कट" नंतर मग मी पुन्हा मूळ सिरियलकडे वळतो..
"अरे..मागितलीच का शेवटी माफी तिच्या सासूने? वा..पण इतक्यात कसं झालं सासूसुनेचं प्याचअप?, आणि तिचा नवरा तर आत्ता पिऊन आला होता ना? मग एकदम सिल्क सूटमधे कसा? ", मी विचारतो..
"ही सिरियल वेगळी आहे", बायको सांगते.."सासूसुनेचं भांडण 'लाडो'त झालं होतं..आणि ज्यात नवरा पिऊन आला होता ती तिसरीच होती. काहीच सिक्वेन्स कसा नाही रे लागत तुला?"
"पिऊन आला होता ती कुठली?" मी प्रयत्न करतो.
"नाव नाही माहीत्. नेहमीची नाहीये..", ती माहिती देते.
"पण सासूसुनेचं भांडण या चालू सिर्यलमधेच झालेलं मी स्वतः पाहिलं..", मी आत्मविश्वास दाखवतो... निदान पत्नीपुढे तरी दाखवावा..
"असेल मग..मला पुढे बघू दे..", ती म्हणते..
म्हणजे तिलाही सिक्वेन्स लागलेला नाही याची खात्री होऊन मी सुखावतो आणि पुन्हा भिंतीकडे वळतो...
मिसळपाव




प्रतिक्रिया
मस्त लेख
नॉस्टॅल्जीक
भण्णाट लेख. खरंच गवि तुम्ही
नीव, हक्के-बक्के, बूनियाद, किस्सा शांती का, कीले का रहस्य
मस्त रे.
ह्यातील बर्याच जुन्या मालिका
मला आवडायची ती दूरदर्शनवर
माझ्या मनातले बोललात
In reply to मला आवडायची ती दूरदर्शनवर by विजुभाऊ
हि पण एक मस्त होती.
In reply to मला आवडायची ती दूरदर्शनवर by विजुभाऊ
मालिका
आजकाल प्रतिसादांच्या भितीने
छ्या! बरेच लोक जूण्या आठवनीत
भूतकाळ आठवायचा असतो .तर
In reply to छ्या! बरेच लोक जूण्या आठवनीत by अवलिया
मस्तच लिहीले आहेस रे.
In reply to भूतकाळ आठवायचा असतो .तर by निनाद मुक्काम …
बरोब्बर बोल्लेत अवलियाजी. नवे
In reply to छ्या! बरेच लोक जूण्या आठवनीत by अवलिया
एकदम नॉस्टॅल्जीक करणारा धागा
अगदी
In reply to एकदम नॉस्टॅल्जीक करणारा धागा by गणपा
बोमकेश बक्षी नावाची एक मालिका
+१ बोमकेश बक्शी आणि फटीचर फार
In reply to बोमकेश बक्षी नावाची एक मालिका by स्वानन्द
येस्स... व्योमकेश बक्षी आणि
In reply to +१ बोमकेश बक्शी आणि फटीचर फार by नगरीनिरंजन
कुकु? असंच काहीतरी होतं
In reply to येस्स... व्योमकेश बक्षी आणि by यकु
तो सौरभ शुक्ला!!!
In reply to येस्स... व्योमकेश बक्षी आणि by यकु
त्याचं नाव "गोपी" होतं!
In reply to येस्स... व्योमकेश बक्षी आणि by यकु
गोपि यु आर जस्ट
In reply to त्याचं नाव "गोपी" होतं! by मी ऋचा
अरे हो ... बरोबर... मला कुकु
In reply to त्याचं नाव "गोपी" होतं! by मी ऋचा
वर न आलेले आणखी काही
बास करा की राव.
मला आठवताहेत ते हे !!
आणी १०० , कथासागर
आति उल्हासात आता बालपणीचे
In reply to आणी १०० , कथासागर by उल्हास
छान आहे धागा रविवारी हा
लेख आवडला.. पण गविंच लिखाण
वा! छानच लिहिले आहे पण एक करेक्शन आहे
स्टार ट्रेक, लॉरेल अँड हार्डी राहीले की.