भारतीय तत्वज्ञानानुसार "परा", "पश्यंती", "मध्यमा" आणि "वैखरी" ही वाणीची चार रुपे आहे.
वैखरी म्हणजे आपण जे उच्चार करुन बोलतो, दुसर्याला ऐकु जाते ते रुप. परा हे अतिशय सुक्ष्म मनात असलेल्या विचाराचे पहिले रुप. हा विचार सुद्धा विचार करता करता माघारी फिरला, म्हणजेच विचार त्या ब्रह्माच्या स्वरुपाचा विचार करण्यास असमर्थ ठरला असे "पराही परतली" या शब्दाने सांगितले आहे.
+१
'परा' या सूक्ष्म वाणीने ब्रम्हाचा जप करणारे सत्पुरुष एका कुळात होऊन गेले. त्यांचे वंशज आता परांजपे असे उपनाम धारण करतात. असे मी मराठी आडणावे या कोणीतरी लिहीलेल्या एका पुस्तकात वाचले होते. लेखकाचे नाव आठवत नाहीये.
इतके सुरेख निरुपण वाचावयास मिळाले, धन्य झालो.
अवांतर : आपण शुची यांच्या लेखनातील 'एक काळा ठिपका' काढून नाही टाकला तर त्या काळ्या ठीपक्याला अश्या प्रकारे सजविले कि आता 'तोच काळा ठिपका' एक डाग बनून न राहता त्या कथेतील एक सौंदर्य दागिना झाला. व्वा.
आता नव्याने जव्हा हि कथा वाचीन तेव्हा अजून आनंद होईन.
कथाकार शुची आणि निरुपण कर्ते अवलिया यांचे मनापासून धन्यवाद.
वेगळा धागा काढणार होते, पण इथेच लिहिते आता;
दत्तकथा: या गोष्टीची किल्ली 'भाव दृढ' ठेवा ही आहे.
पोराना मारा अशी अजिबातच नाही. ते केवळ दर्शानार्थींची परिक्षा पाहण्यासाठी 'गारुड्याने'( = स्वत: दत्तागुरुनी/ समर्थांनी) उभे केलेले गारुड होते.
दर्शनार्थींची इतर कुठली परिक्षा( सुंदर स्त्री पाठवणे वगरै) घेणे योग्य ठरले नसते, बाकीच्या मोहांपासून ते सुद्धा 'तप' करून मोकळे झाले असतील.
त्यांच्या 'बेसिक इन्स्टिन्क्ट' ला हात घातला. सरव्हायवल इन्स्टिन्क्ट!
इतके बीभत्स दृश्य समोर उभे केले की खरोखरच त्यांच्या 'भक्तीभावाच्या दृढतेची' कसोटी लागेल.
मुळात सगळेजण 'जप-तप' करायचे सोडून त्या गारुड्याच्या गारुडात अडकलेच कसे?
शिवाय समर्थांवाराच्या श्रद्धेची सुद्धा परीक्षा होईल. जर का या ब्राम्हणाना खात्री होती की समर्थ प्रत्यक्ष दत्तगुरूंचे दर्शन घडवून देऊ शकतात, मग ते आपले प्राण सहज वाचवतील, हा विश्वास का नाही ठेवला.
इथेच ती किल्ली लागते, 'भाव दृढ' ठेवा! म्हणजेच विश्वास ठेवा. स्वत:वर, गुरुवर.
ही किल्ली प्रत्येक परिक्षेसाथीच आवश्यक असते.
इथे एक किस्सा आठवतो,
युरी गागारीनची प्रशिक्षनाच्या दरम्यान एकदा परिक्षा होती. त्याला एकट्याला एका छोट्या खोलीत कोंडले, पेपर दिला, भयंकर मोठा पेपर आणि खूप कमी वेळ, असे होतंच. शिवाय पेपर सुरु झाल्यावर त्याच पेपरातल्या प्रश्नांची बरोबर व चुकीची देखील उत्तरे स्पीकरवर मोठमोठ्यानी सुरु केली.
हा देखील त्या पातळीवरचा दुष्टपणाच आहे. पण त्यांनी 'भाव दृढ' ठेवला, मन खंबीर केले, एकाग्र केले पेपर चांगल्या पद्धतीनी सोडवून पुढे गेला.
जसजशी परिक्षा वरची, तसतसा परिक्षकांचा 'दुष्टपणा' अधिक!
आता अंधश्रद्धा:
इथे कुठेही 'पोरे मारल्यामुळे दत्तगुरू दिसले' अशा प्रकारचा संदेश येत नाहीये. कशाला साप समजून भुई धोपटायाची!
'अंधश्रद्धा पसरतील' असा आरडाओरडा करणार्यांच्या 'भोळेपणा'बद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते! ;)
एकंदरीत माणूस ( शिक्षित/अशिक्षित) हा इतका इरसाल प्राणी आहे, की खरोखरच असे कुणी कुणावर विश्वास ठेऊन कुणालाही मारेल असे वाटत नाही.
माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. स्वत:च्या 'सोयीची' जी तत्वे असतील, ती तो अंगीकारतो.
जीव वाचावायचाय, लेकाराबाळाना खायला मिळेल, थोडा मान मिळेल, चला 'धर्म' बदला! अशी माणसाची वृत्ती असते. ( इथे 'धर्म' चा अर्थ 'कुठलीही तत्वप्रणाली' - कम्युनिझ्म सुद्धा- असा आहे.)
शेवटी माणूस स्वत:ला सोयीचे असेल तेच 'आदर्श' म्हणून घेतो. या श्रद्धा-अंधश्रद्धा वादाला काहीही अर्थ नाही!
जाता जाता,
आपल्या स्वत:च्या 'स्टेटस च्या भूकेपायी' स्वत:च्याच मुलांवर (कधी कधी आत्महत्या करेपर्यंत) अभ्यासाचा ताण आणाणारे पालक/समाज अंधश्रद्ध नसतात, पण क्रूर नक्कीच असतात! सगळीच माणसे आपापल्या 'कपॅसिटी' प्रमाणे कधी न कधी कमी-जास्त क्रूरपणा करतच असतात.
त्यामूळे ही गोष्ट ( दत्तकथा) बिभत्स जरी असली, तरी २ जागतिक महायुद्धे बघितलेल्या अत्ताच्या मानवसमाजाने 'बोम्बाबोम्ब' सुरु करण्याइतकी भयानक नक्कीच नाही.
छान प्रतिसाद, अनुमोदन.
अजून एक म्हणजे खेड्यातली आणि शालेय शिक्षण कमी झालेली लोकं मूर्ख असतात असा काहींचा प्रचंड गैरसमज असतो.
माझ्या माहितीतली या कॅटेगिरीत (खेडूत आणि कमी शिक्षित ) येणारी सगळी लोकं साधी आहेत पण त्याचबरोबर अत्यंत प्रॅक्टीकल आणि चतुर आहेत.
त्यांच्या 'बेसिक इन्स्टिन्क्ट' ला हात घातला. सरव्हायवल इन्स्टिन्क्ट!
इतके बीभत्स दृश्य समोर उभे केले की खरोखरच त्यांच्या 'भक्तीभावाच्या दृढतेची' कसोटी लागेल.
मुळात सगळेजण 'जप-तप' करायचे सोडून त्या गारुड्याच्या गारुडात अडकलेच कसे?
आयुष्यात सर्वसंगपरित्याग करून देवभक्तीला लागणे सगळ्यांना जमतेच असे नाही ( आणि जमावे असेही नाही). जर या लोकांनी ते एकदा केले असेल, आणि जर देव भेटायच्या आत मेले, तर पुढच्या आयुष्यात ते जमेलच याची काहीच खात्री नाही. तेव्हा हे कसोटीच चुकीची आहे. अर्थात देव नेहेमीच बरोबर नसतो, त्यामुळे फारसे आश्चर्य वाटले नाही.
आता अंधश्रद्धा:
इथे कुठेही 'पोरे मारल्यामुळे दत्तगुरू दिसले' अशा प्रकारचा संदेश येत नाहीये. कशाला साप समजून भुई धोपटायाची!
'अंधश्रद्धा पसरतील' असा आरडाओरडा करणार्यांच्या 'भोळेपणा'बद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते!
एकंदरीत माणूस ( शिक्षित/अशिक्षित) हा इतका इरसाल प्राणी आहे, की खरोखरच असे कुणी कुणावर विश्वास ठेऊन कुणालाही मारेल असे वाटत नाही.
तसे नाही. पण पुराणात असे बळी दिल्याचे उल्लेख आहेत असा हवाला देउन व्यवसायवृद्धी, अपत्यप्राप्ती या समस्येने पीडलेल्या लोकांना भोंदू लोक बळी देण्यास प्रवृत्त करू शकतात, केल्याची उदाहरणे आहेत. लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत. अशा गोष्टी डीलीट करू शकत नसलो तरी निदान पसरवू तरी नये असे अनेकांना वाटते.
माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. स्वत:च्या 'सोयीची' जी तत्वे असतील, ती तो अंगीकारतो.
कुठला प्राणी नाहीये ? आणि स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः कष्ट करण्यात कसला आलाय स्वार्थीपणा ?
जीव वाचावायचाय, लेकाराबाळाना खायला मिळेल, थोडा मान मिळेल, चला 'धर्म' बदला! अशी माणसाची वृत्ती असते
त्यात काहीही चूक नाही. स्वसंरक्षण, अपत्यांची काळजी या आदिम आणि योग्य अशा नैसर्गिक प्रेरणा आहेत. बर्याचदा गोष्टी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत राहिले तर केव्हाच संपून जाउ. लाखो वर्षांपूर्वी आपले पूर्वज पर्वतकाय टायरॅनोसोरसच्या अंगावर धावून न जाता गुहेत लपून राहिले म्हणूनच आज मानवजात शिल्लक आहे.
त्यामूळे ही गोष्ट ( दत्तकथा) बिभत्स जरी असली, तरी २ जागतिक महायुद्धे बघितलेल्या अत्ताच्या मानवसमाजाने 'बोम्बाबोम्ब' सुरु करण्याइतकी भयानक नक्कीच नाही.
(स्वतःची) लहान मुले कापून चुलीत घातली ही दारू/ सिगरेट/ ड्रग्स प्रमाणे कालातीत, वादातीत वाईट गोष्ट आहे. तुम्हाला जर त्यात फारसे वावगे वाटत नसेल तर तो तुमचा आणि आसपासच्या मुलांचा प्रश्न आहे. इंटरनेटवर फक्त आक्षेप घेता येतो आणि लोकांनी तेच केले आहे.
जर देव भेटायच्या आत मेले, तर पुढच्या आयुष्यात ते जमेलच याची काहीच खात्री नाही.>>>
अग्गो बाय,
कित्तीदा सांगू, ते स्वप्न असतंय ग!
खरें नसतंय.
ललू नको, उगी उगी! ;)
अवांतरः मेल्यानन्तर पुढचे आयुष्य म्हणजे काय?
तुम्ही पुनर्जन्म मानता की काय???
सगळ्या अंनिसकाकांनो, वाचवा वाचवा! ;)
पुराणात असे बळी दिल्याचे उल्लेख आहेत असा हवाला देउन व्यवसायवृद्धी, अपत्यप्राप्ती या समस्येने पीडलेल्या लोकांना भोंदू लोक >>
पुराणातल्या कथांचा इथे उल्लेख कशाला? आणि पुराणातल्या सर्व कथा रूपकात्मक आहेत हे कुणीही शहाणा माणूस सांगेल. तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै)
लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत.>>
तेच तर मी सांगतेय, माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी कशाचाही काहीही अर्थ लावू शकतो. पुराणे, समाजव्यवस्था, कायदा, ........इ.
एकदा ठरवले की सगळ्याचे वाट्टेल ते अर्थ काढले जाऊ शकतात.
वकील देखील कायद्यातून पळवाटा काढतात, तिथे अश्या रूपकात्मक गोष्टी तर काय, माकडाच्या हाती कोलितच!
पण आपण 'माकड' व्हायचे की 'माणूस' हे मात्र त्या त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी किती जागी आहे त्यावर ठरते.
भावार्थ बघायचा की शब्दार्थ हे आता प्रत्येकानी आपले आपण ठरवा.
लहान मुले कापून चुलीत घातली ही दारू/ सिगरेट/ ड्रग्स प्रमाणे कालातीत, वादातीत
>>>
पुन्हा तेच . तो 'भास' होता. या भयानक गोष्टीचे 'समर्थन' कुणीही कुठेही केले नाहीये.
आणि ती भितीदायकच गोष्ट होती. म्हणून तर तपस्वी देखिल पळाले.
अवांतर: 'चिकन' ला गुलाबी फ्रॉक शोभून दिसेल नै?! ;)
लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हेच शिबीर करायला आम्ही देखील रवाना होणार आहोत.
तेव्हा आमचा इंटरनेटवरील स्नेह जरा कमी होईल अशी आशा बाळगतो! ;)
(आणि श्री पेन यांच्या सारख्या एकाच गोष्टीवर दीर्घकाळ अडुन बसण्यार्या मंडळीशी देखील प्रतिसादरूपी युद्ध खेळण्याची ताकद येईल अशी देखील आशा बाळगतो!)
तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै)
च्या मारी. कसे सुचले हे?
लै भारी. ह.ह.पु.वा.
ह्यामुळे तरी कुठेही बालके, बोकड, हल्या कापायच्या गोष्टी चालू आहेत त्या कमी होतील अशी भाबडी आशा आहे.
अवांतरः मेल्यानन्तर पुढचे आयुष्य म्हणजे काय?
तुम्ही पुनर्जन्म मानता की काय???
सगळ्या अंनिसकाकांनो, वाचवा वाचवा!
मी काय मानतो किंवा काय मानत नाही याचा इथे काहीच संबंध नाही. विषय त्या तप करणार्या लोकांचा आणि श्रीदत्ताचा आहे. ज्याअर्थी ते देवदर्शनासाठी (धर्म/ पुराणातल्या प्रमाणे) तप करत होते, त्याअर्थी त्यांच्या त्यातील सर्व किंवा किमान महत्त्वाच्या गोष्टींवर विश्वास असणारच. तो होता म्हणून तर ते तपाला बसले.
अग्गो बाय,
कित्तीदा सांगू, ते स्वप्न असतंय ग!
खरें नसतंय.
गोष्टीत ते स्वप्न होते असे कुठेही म्हटलेले नाही. दत्तगुरु रुप घेउन आले असे लिहिलेले आहे. तुम्हाला गोष्टीचे सांगितले गेलेले तात्पर्य वाचून तो आभास/ माया होती हे कळत असले तरी त्या परिस्थितीत असणार्याला ते खरेच वाटणार (सापेक्षतावाद), त्याच्यासाठी ते खरेच असेल. (देवाने निर्माण केलेली सृष्टी खरी वाटते तर त्याचीच बनवलेली माया का वाटणार नाही?)
पुराणातल्या कथांचा इथे उल्लेख कशाला? आणि पुराणातल्या सर्व कथा रूपकात्मक आहेत हे कुणीही शहाणा माणूस सांगेल. तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै)
लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत.>>
तेच तर मी सांगतेय, माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी कशाचाही काहीही अर्थ लावू शकतो. पुराणे, समाजव्यवस्था, कायदा, ........इ.
एकदा ठरवले की सगळ्याचे वाट्टेल ते अर्थ काढले जाऊ शकतात.
वकील देखील कायद्यातून पळवाटा काढतात, तिथे अश्या रूपकात्मक गोष्टी तर काय, माकडाच्या हाती कोलितच!
पण आपण 'माकड' व्हायचे की 'माणूस' हे मात्र त्या त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी किती जागी आहे त्यावर ठरते.
भावार्थ बघायचा की शब्दार्थ हे आता प्रत्येकानी आपले आपण ठरवा.
मला किंवा कुठल्याच मिपा वाचकाला यात शब्दश: अर्थ काढायचा नाही. प्रश्न भोळ्या भाबड्या जनतेचा आहे जी या आणि अशा कुठल्याही भूलथापांवर विश्वास ठेवून फसते. अनेक लोक असे फसलेले आहेत आणि मुलांचे बळीही गेलेले आहेत. वृत्तपत्र वाचत असाल तर माहिती असेल. ते थांबवण्यासाठीच अं.नि.स. चा जन्म झालेला आहे. आक्षेप घेणार्यांचे असे म्हणणे आहे की जर याचा प्रसारच थांबवला तर पुढे होउ शकणारा गैरवापर टळेल. अशी वर्णने वाचवतही नाहीत.
तुम्हाला माझे प्रश्न किंवा म्हणणेच समजलेले नाहीये. असो. ज्यांना ते जमू शकेल अशी मंडळी आहेत, त्यांची वाट बघेन.
तुम्हाला माझे प्रश्न किंवा म्हणणेच समजलेले नाहीये. असो. ज्यांना ते जमू शकेल अशी मंडळी आहेत, त्यांची वाट बघेन.>>
कुणाचीही वाट बघताना 'भाव द्रुढ ठेवा' ही गोष्ट विसरु नका! ;)
तरीसुद्धा पुन्हा एकदा,
लोक भोळे नसतात!!
शिवाय आभास, माया, सत्य, सत, असत, भास स्वप्न वगरै गोष्टींविषयी इथे बरेच गोंधळ दिसतायत.
(स्वगतः आणि त्याबद्दलची 'शिक्रेट्स' मी इथे कशाला फोडू? ;))
असो, अनुभवाशिवाय श्रद्धा नाही हे मी स्वानुभवानी सांगू शकते, त्यामूळे मीसुद्धा इथे कळफल़क बडवत माझा वेळ वाया घालवत नाही.
दुसरे बकरे शोधत असल्याबद्दल धन्यवाद!
माझा पास!
<<<शिवाय आभास, माया, सत्य, सत, असत, भास स्वप्न वगरै गोष्टींविषयी इथे बरेच गोंधळ दिसतायत.
(स्वगतः आणि त्याबद्दलची 'शिक्रेट्स' मी इथे कशाला फोडू? Wink)
अशा गोष्टी शिक्रेट ठेवायच्या असतात हे माहीती नसल्याने घोळ झाला असेल...ते शिक्रेट माहीती करुन घ्यायला कोणाच्या शिबीराला जावे लागेल? का ते पण शिक्रेटच ?
तुम्ही एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिलेले नाही. फक्त फाटे फोडणे आणि विषयाशी संबंध नसलेल्या गोष्टी आणून त्यांची सरमिसळ करणे (सायकोबॅबल) एवढेच करता येते असे दिसते.
प्रत्य्क्षात घडलेल्या गोष्टी (गेलेले बळी, अंनिसचे कार्य वगैरे) नाकारून श्रद्धेबद्दल बोलणे अयोग्य.
सगळ्यांना सगळे येत नाही. स्वत:ला एखादी गोष्ट येत नसेल तर तसे कबूल करण्याचा प्रांजळपणा दाखवा आणि अपरिचित लोकांशी बोलाताना किमान शिष्टाचार पाळायला शिका.
हे बघा मास्तर, इतरांची 'ऑन सावरकर' पुस्तके वचून सावरकर 'कळले' असा ग्गोगोड गैरसमज करुन घेण्यापेक्षा सरळ 'फ्रॉम सावरकर' वाचून चिन्तन करा.
भले होइल.( अर्थात आमचे सगळ्यांचे! तुमचे मला माहित नाही.)
या कवितेपासून सुरुवात करा.
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
अवांतरः जरा बीभत्सच वाटते नै ही कविता!!
आता रडतील की काय इथली भित्री, भोळी पोरे?!
वा! सावरकरांची ही कविता आणि इथली भाकड कथा तुम्हाला एकाच पंक्तित बसवासे वाटलेले पाहून धन्य झालो.
पोरे कापून शिजवायची कथा वाचून सावरकर काय म्हणाले असते हो? भाव दृढ करा??
माहीत असण्याची शक्यता कमी वाटते म्हणून त्यातील काही ओळी येथे देतो.
धन्य अपुला वंश/सुनिश्चये इश्वरी अंश
की रामसेवा-पुण्य-लेश/ आपुल्या भाग्यी लाभला
(उदा. म्हणून एव्हडे पुरे असावे)
आपण स्वा.सावरकरांचे नाव वापरुन कोणाचिही खिल्ली उडवताना त्यांचे विचार आणि लेखनाचा पुन्हः अभ्यास करावा.
या प्रकारच्या कथा अशा निरुपणासहितच सांगितल्या जाव्यात. कारण सर्वसामान्यांना आगोदरच ते गर्भितार्थ कळतील न कळतील.. आणि जे अर्थ घेतले जातील ते वेगळेच / चुकीचे समजले, घेतले जाण्याची शक्यता मूळ गूढार्थ समजण्यापेक्षा अधिक असेल.
एखादे महाराज नेहमी थोबाडीतच मारतात, किंवा मिठी मारतात, हाच त्यांचा प्रसाद असतो (पर्टिक्युलर महाराजांची नावे माहीत नाहीत याबद्दल क्षमस्व..उदाहरण म्हणून गृहित धरावे..) पण तो प्रसाद आहे हे काही भक्तांना माहीत असते तर बर्याच नव्या सामान्य अनोळखी लोकांना ते माहीत नसू शकते. त्यामुळे आपल्यातला वाईटपणा, खलत्व घालवणे अशा प्रतीकात्मक उद्देशाने जरी महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी कोणा नागरिकाच्या थोबाडीत मारली तर तो त्याला "थोबाडीत"च समजेल, तो "प्रसाद" आहे /ते महाराज आहेत हे कोणीतरी तिथल्यातिथे उलट हात उठायच्या आत त्याला सांगावे लागेल कारण बोलूनचालून तो सामान्य आहे.
समर्थचरित्र पूर्वीच वाचले आणि त्यात गळू चोखण्यापासून कफदाणी पोटात थारा देउन मोकळी करण्यापर्यंत शिष्यत्वाच्या परीक्षेच्या कथा / उल्लेख आहेत. (अशा अनेक आवृत्त्या असल्यास आणि त्यातल्या काही जेन्युईन नसल्यास माहिती नाही पण कॉमनली वाचली जाणारी एक आवृत्ति वाचली होती.) कफ, गळू यातही प्रतीकात्मक अर्थ असतीलही पण ते तिथल्या तिथे समजावून सांगणारी आवृत्ती असावी. अन्यथा एका चांगल्या विचाराबद्दल अकारण किळस अज्ञानी वाचकांना (भक्त नव्हेत) वाटू शकते.
वाद उत्पन्न करायचा म्हणून नाही तर फक्त वरील पहिले वाक्य अधिक स्पष्ट व्हावे म्हणून उदाहरण दिले.
उलट लेख आवडला आहे आणि हीच काही समजावून सांगण्याची योग्य पद्धत आहे हे आधीच म्हटले आहे.
सुरेख! निरूपण फार सुरेख केले आहे.
लिमाउजेट, चा प्रतिसादही अतिशय सुंदर आहे.
मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे.
हे वाचताना, संत ज्ञानेश्वरांच्या कानडा ओ विठ्ठलू, कर्नाटकू या गाण्यातील भाव आठवला. :)
प्रतिक्रिया
_____/\______
जबरदस्त रे नाना
मस्त
खुप छान . धन्यवाद अमोल केळकर
धन्य...
फारच छान
भारतीय तत्वज्ञानानुसार "परा",
धन्यवाद
+१ 'परा' या सूक्ष्म वाणीने
अतिशय सुंदर!!! सिद्धहस्त
इतके सुरेख निरुपण वाचावयास
छान निरुपण. आवडले.
४ शब्द
छान प्रतिसाद, अनुमोदन. अजून
सुरेख प्रतिसाद. अवलिया
अतीशय उत्तम धागा आणी तितकाच
माउ तुझा प्रतिसाद # १
त्यांच्या 'बेसिक
परत एकदा....
भारी
शिबीराचा बराच फायदा झालेला
लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या
लै भारी. ह.ह.पु.वा.
अवांतरः मेल्यानन्तर पुढचे
+१
++
पास
<<<शिवाय आभास, माया, सत्य,
तुम्ही एकाही प्रश्नाचे सरळ
लिमाउजेट
कमाल आहे!
वा! सावरकरांची ही कविता आणि
स्वा. सावरकरांची "सांत्वन" ही कवीता माहीत आहे का?
काय हो अमोदमामु, उगाच
@ लीमाउजेट : फार खोलवर्चे ४
तुम्हाला माउली ही पदवी द्यावी
@टार्झण : कोण बॉ???
_____/\______
या प्रकारच्या कथा अशा
छानच हो नाना!!! अवांतर:
अतिशय सुंदर
दत्तात्रय हरे
वा नाना! सुरेखच हो, प्रसन्न
सुंदर निरुपण
_____/\______
नाना एकदम मस्त................
मनुष्य योनीत याला निरुपण असे
:)
धन्यवाद
सुरेख! निरूपण फार सुरेख केले