गनप्या (भाग-४)
गनप्या
( १८ वर्षाचा गन्प्याच अन १६ वर्षाच्या बकुळीच सुत जमल हुत लपून छपून पिरेम फुलत हुत )
बकुळा लाडान ए गणपत राव ss, ये sss गणपत राव , एय गणप्या ,गणप्या गणप्या ,गणप्या रे माकडा हुठतो का न्हाई?(खपला का काय ह्यो )
बकुलीन गंप्याला गदागदा हालीवला
तसा बकुळीचा मंजुळ (?)आवाज आयकून गनप्या खडबडून जाग झालय
बकुला गनप्यास भेटाया त्येच्या शेतात आली हुती लपून छपून.....आन गणप्या बकुळीची वाट बघत बघत
आम्ब्याच्या गार सावलीत कवा झोपला झोपला कल्लाच नाही गणप्यासनी !
पिरमाचा खेळ अजुन नवानवा च हुता ,किती मनधरनी केलि तवा कुठ बकुली पटली हुती गनप्यासनी !
बकुला :- काय र गनप्या निट हैस ना ?
गणप्या :-म्हंजी मला काय झालय?
बकुला:- नै ,झोपेत हसत हुता ,लाजत बी हुता ,नाही म्हनजी .....
गणप्या :(लाजुन लाजुन ) ते व्हय, आग मी तुजच सपान बघत हुतो ही.. ही ..ही.. ही.. हिः
बकुला : अस्स, काय बघितल मला बी सांग की ?
गणप्या :ही... ही.... ही ....आम्ही न्हाई जा !
बकुला : (लटक्या रागात) राहुन्द्या तुमच्याकड, म्या जात्ये ....
ऐ बाई सांगतो ऐक,
"म्या पाहील का आपल्या दोघांच एक मोट्ट शेत हूत , सकलिकड़ हिरव मावळ डुलत हूत
धारदार काट्याची गावरान वांगी ,मेथी आन शेपूच वाफे , मळा कसा फुलला हुताहिरवागार
म्या काम करीत हुतो आन तू मला भाकरी घेउन आल्ली हुती ,म्या जेवत हुतो आन तू
वांगी खुडत हुती ,काय दिसत हुती बकुळे तू !
बकुला :-(लाजुन )कशी ?
गणपत :- म्या तुला बघून गान बी म्हनल सपनात ?
कन्च?
"मळयाच्या मळयामंदी हु इज शिट्टिंग ?
आय ऍम शिट्टिंग वांगी काटिंग.............
रावजी डु नाट टच माय बॉडी पाहिन anybody "
बकुला :-(लाजुन) अग बया, सपान तर सपान
आन हिंगलिश मधि गान ,हम्म चल्ला , कई पण बघता तुमि !
(आग बाबो ,काय सांगू गंप्या तर लाजुन लाजुन ,(नको सांगाया जावून देत )
हनाम्या आन बबन्या दूरच्या आम्ब्याच्या झाडावर माकडागत बसून टेहळनि करीत हुते ,
कोण येते का शेताकड़ दिसल तर दोगाना बी सावधान कराया
बकुलिन गणप्यासाठी मडक्यात गार गार साईच दही आन भाकरी आन त्यावर लोण्याचा गोऴा आणला होता त्याला आवडत म्हणून !
हिरव्यागार मळ्यात दोघांच पिरेम फुलत हूत .............
बकुला गनप्यासनी एक एक घास भरवत हुती ................
हिकड़ हनम्या आन बबन्या उगीचच लाजत हुती .................
तेवढ्यात हनाम्याची आरोळी गणप्याच्या कानावर पडली आन गणप्यान कचकन बकुलिचा हातच चावला
आई ग sss , ये गनप्या माकडा , डोळ गेल का खुबणित? तुज्या आयला ........................................(नक्को)
हनाम्या :- आर गणप्या, गणप्या लेका पाळ , लवकार, मारका बैल येतुया हिकडाच
मारका बैल? ,कक कक्क कक्क कुणाचा र !
हनाम्या : गोदाआक्काच बैल कालपासून हूँदडतोया ,येडा ज़ालाय त्यों ,कुनालाबी हाथ लावू देत न्हाई निस्ता उचालातोया शिन्गावर
तू पळ आधी हिकडाच येतुया
"या बैलाच्या आईचा .................कधी बी माझ्यासंगच का हुतया आस ?
पिरेम राहील बाजूला भानगडीच जास्त !
१८० च्या श्पीड नि हुंदडत यम्मा बाबा च येत हुता गणप्याकड!
तसा गणप्या न बकुलिचा हाथ धरला आन दोग बी सुसाट पळत सुटली,
शेतातून वाट काढीत ,वाफ्याताला चिखाल तुडवित, चीखाल लागाल्यामुल
चपला डबल - डेकर जाल्या हुत्या पलता कुठ येताया
बकुळा लई चंट पहिल्यापासून पि टी उषा बी झक मारण आस पळन !
तिच्याबरोबर पळता-पळता गणप्याच काळीज घशाला आल, घसा कोरडा पडला हुता
पण आपली बकुळा समोर विज्जत जाऊ नै म्हणून पळत (धड्पडत) हुता गणप्या !
कधी उसाच्या शेतात तर कधी घासाच्या,
उसाची धारदार पाती कुठ कुठ घुसत हुती आन कुठ
कुठ कुठ टोचत हुती काय सांगाव ?
बैलान तर ठरिवल हूत जणू
आज गणप्याच बुड शेकवायाच, लेकाचा...." गंप्याक्के पिछूच पड़ गया साल्ला............."
बिचारा हन्म्या बबन्या,केव्हाच दानाफांग जाले हुते
आन असा हिकड़ तिकड़ पळता-पळता शेत संपल आन भिंतीच कुम्पन कधी आल दोगाना बी कळलच न्हाई
६-७- फुट भीत त्यापलिकड़ घाट, बास उडी मारायची पलिकड सुटलो एकदाच आधी गनप्यांन व्हिरोप्रमान बकुलिला भिंतीवर कशीबशी चढवली
त्यों चढणार त्योच बैल त्याच्या लै जवळ आल , मरा आता गणप्या भिंतीला चिटकत चिटकत परत पळू लागाला बकुला ओरडाय लागाली गनप्या पळ sss लवकार बैल ...बैल....बैल.....
मेल्या मुर्द्या , भुसनाळ्या सोड सोड गणप्याला , तुज शेपुट धरून गरगर फिरविन मूडदया तुला, बकुळा भिंतीवर उभ राहून कोरड़ा दम देत हुती बैलाला ,बैलच त्यों , काय एइकनार!
बिचारा गणप्या आपली प्रोपर्टी वाचवित पळत हुता
"च्या च्या हैक हैक हैक हुर्रर्र भुर्रर्र.........
हरर्र करत हुता हनाम्या आन बाबन्या लांबुन छोटे छोटे
ढेकऴ मारित हुते ,त्यांच्या ढेकऴनि एक मछर बी मेला नसता
बकुळा गळ्याच्या शिरा ताणून ओरडली "अय उसच्या चिपाडानो ,एय मुर्द्यानो , बुचकटानो, दोस्ताची काई फिकिर हाई का न्हाई ?
(लै शानी हाई है बकुला वैनी ) "तुम लड़ो हम कपडे सम्भालिंगे " वा गा वा ...................
बिचार आमच गनप्या पळून पळून लई दमल पण बैल कुठ दमतुया
ह्ये रगाट पल्तुया ........
गणप्याच काय खर न्हाई आज
गणप्यां इचार केला पळून उपेग न्हाई व्हणार झाडावर चढू ,
बैलाला चकवत आडोशान गणप्या आम्ब्याच्या झाडापशी पोचल
वर्ती चढ़तय पान पुर्या अंगाचा थरकाप हुतुया ,उरात धाड़ धाड!
चढ़ता कुठ येतय ? चढ़तोय नि घसरतुय, चढ़तोय नि घसरतुय
आस करी करीत त्यों येउन हुभा राहिला न माग
फूस फुस्स करीत आगा गा गा गा.....................
काय त्या नाकपुड्या आन काय ते शिंग!
देवा र देवा ..................
पोसिशान घेतली बैलान ,
फुड्चा पायाने जमीन उकिरली
आन आशी दनकान
गणप्याच्या बूडावर एक जोरदार शोट (सिक्सर) मारलाय म्हणून सांगू
समदी ओरडली गणप्या र गणप्या sssssssssssssss
गणप्या चव्ताळला ,
गणप्यान सेकण्डभर बैला कड़ खुन्शिन पाहिल त्या दोगंची नजरानजर जाली
जणू बैलाचा शिंग धरून त्याला आडवा करीन आता (व्हिरो हाय का त्यों ! कै तरीच तुमच! )
गणप्या फ़ूड आन त्यों सांड माग , दोगामदल अंतर कमी गनप्याला परत एक दणका !
असे छोटे मोठे दनके खात गणप्या वावरात बैलाबरुबर शिवानापनी खेळत हुता
कधी झाडामाग कदी हौदमाग ! कधी मळ्यात कधी खळ्यात !
त्या दोगंच्या खेलात तिसर्या कोणाची बी डिशटर्ब करायची हिम्मत नव्हती ब्वा ...
बैलान लै अवघड करुन टाकल ब्वा ! उठा बसयाच सम्द्याच गोष्टीच वांद न्हाई का
बैल लै मज्जा घेउन नेम धरून धरून शेकवित हूत चांगल
गणप्या चिखलान ,धुलीन माखला हुता, विजार बी नको तित टरकलि हुती
शेवटी बैलच दमला फुटब्वाल खेलुन,
ढुसना-ढुसनि थांबली पळत पळत
बैल रानात गायब झाला ,
गणप्याच्या आन समद्याचा जिवात जिव आला
तसे समादे गणप्याव गणप्याव .... करीत त्येच्याकड़ आल ,बरा हैस कुठ लागल का?
"न्हाई बा म्या तर कबड्डी खेलत व्हतो ना"
गनप्या::मादारचोतानो, तुमच्या ..................................
झाडावर बसून बघाय लै मज्जा वाटत हुती न्हाई का ?भडव्याहो तुमच्या .....................
दोन चार मानस बोलिविली का न्हाई? मज्जा पाहत बसले निसते दोगबी सटवे....
हनाम्या :- वा र वा गणपतराव , बोलाविली आस्ति मानस , पन बकुला वैनी ला शेतात पाहून बैलान सोडल तुला पण बकुलिच्या बान उलट झाडाला कोलडांडा करून मिरचीची धुरी दिली आस्ति तुमाला बी ,आन आमाला बी ,मंग..................
गणप्या : ते बी खरय,बैल परवडला त्या सैतानापेक्षा नको र बाबा ...........
तेवढ्यात बकुळा बी आली " गनप्या लै लागल कार, असा का चलातुया वाकडा तिकड़ा,"
ये सांग ना आंबे हळदिचा गरम लेप लावून देती सांजच्याला ,सांग तरी कुठ लागलाया
आता काय सांगायच बकूळीला किती लागलाय? आन कुठ कुठ !
(टरबुज किती शेकली त्ये)
Book traversal links for गनप्या (भाग-४)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरी! पियुषा यांना पुलेषु!
हा हा हा मस्त जमलाय हा भाग
कडक... ह ह पु वा
खुप जबरी ...
नेहमीप्रमाणेच गावरान धुमशान.
तुज्या आयला
हो , बर्याच जनाना , "तुझ्या
रापचिक!
मस्त अप्रतिम
हाहाहा... सगळे हसत आहेत
"म्या पाहील का आपल्या दोघांच