Skip to main content

चीनचे मनसे.

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/12/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते. मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे. गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे. अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे. कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे. सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते. हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो? बाय द वे मातृभाषेला योग्य सन्मान देणार्‍या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्‍या चीन सरकारचे अभिनन्दन.

वाचने 22602
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

चीन सरकारचे मनापासुन अभिनंदन.. मध्यंतरी चीनी लोकांनी इंग्लिश शिकावे म्हणुन सरकारी प्रयत्न पण चालू होते असे समजले. पण त्यांनी दोन्ही गोष्टित गल्लत केलेली नाही हे स्पृहणीय.

धन्यवाद विजुभाऊ माहिती बद्द्ल, हेच काम आपले राज ठाकरे करत आहे, आणि त्याला माझा पाठीबा आहे. आपले मत काय आहे?

विजुभौंच्या ह्या लेखनात कधी न्हवे ते कुठेही संघ अथवा भाजपावर टिका केलेली नसल्याने हा त्यांचा लेख फाऊल धरुन उडवण्यात यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि राम, हिंदू, धर्म, संस्कृती यावर हिंदूद्वेषप्रणित कागदपत्रे वाचून गरळ पण ओकलेली नाही... जियो ! विजुभाउ जियो !

मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी. चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते. मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे. गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे. अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे. कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे. सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते. हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो? बाय द वे मातृभाषेला योग्य सन्मान देणार्‍या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्‍या चीन सरकारचे अभिनन्दन.

In reply to by आजानुकर्ण

मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी. मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का? केवळ प्रमाणलेखनानुसारच बोलणे आणि लिहिणे म्हणजेच मातृभाषेबद्दल प्रेम का? (अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे)

In reply to by अवलिया

मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का?
एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.

In reply to by आजानुकर्ण

एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा. साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो. त्यात गर्व असणे / गर्विष्ठ असणे हा वाईट गुण आहे मानसाने गर्व करू नये. नम्र असावे अशी शिकवण दिली होती. हिन्दी भाषेने मात्र गर्वाला फार आदराचे स्थान दिले. त्यामुळे आपण गर्वाने म्हणतो मी मराठी आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. भाषा जपली संस्कृती जपली. भाषा संपली संस्कृती संपली

In reply to by विजुभाऊ

साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो.
मग पुढे काय घडले त्या धड्यात? मोठेपणी गर्वाला भाडेकरू मिळाला का?

In reply to by अवलिया

तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत आहेस की "ब्रिटिश टिंग्या" शी ? हे असं बोलतोय कारण की ह्यात जी गल्लत होते आहे ती भाषेचा अभ्यास वाढवुन कमी करता येणार नाहीये. - भेंडीश वांग्या

In reply to by अवलिया

छोटी टिंगीशी सहमत व्हावे. अवांतरः हा टारझन माझ्याशी फार वाईट वागतो. मला सारखे खाली दाखवतो (हे हिंदीतील "निचा दिखाना" चे मराठीकर्ण आहे). असो. हिंदी शब्द आले म्हणून कुठे बिघडले आहे ?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मला सारखे खाली दाखवतो
अश्लील अश्लील. अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.

In reply to by आजानुकर्ण

=)) =)) =)) =)) =)) तेरे को कितने मार्क गिरे रे ? हा इंजिनियरींग ला असतानाचा वाक्प्रचार आठवला =))

In reply to by आजानुकर्ण

अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की. ऑल हिंदी वर्डस् कमिंग टू मराठी आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल. (वाह इतके सगळे इंग्रजी शब्द पण मराठीत आले तर मराठी कशी जागतिक भाषा होईल नै!) गर्व से कहो हम हिंदी हई.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गर्व से कहो हम हिंदी हई.
सांभाळून हो! नाही म्हणजे, इथे 'हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा' याचा अर्थसुद्धा कोणी 'हिंदुस्थान हिंदीभाषकांचा, तस्मात् हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? (*बाकी या असल्या भाषांतरास प्रॉपगांडा व्हॅल्यू मजबूत आहे, नाही? ;-))

In reply to by पंगा

हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात. पंगा /पुपे हा अनुभव मलादेखील आला आहे. एकाला मी हिन्दी ही राष्ट्रभाषा नाहिय्ये असे सांगितले तेंव्हा तो म्हणाला की मग या देशाचे नाव हिंदुस्थान कशाला आहे. त्या बेण्याला तिथेच एक खॅळ्ळ खॅटॅक करून त्याच्या तोंडातले फर्निचर बाहेर काढावेसे वाटले.

In reply to by विजुभाऊ

देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा. अनेक हिंदू हिंदी न वापरताही हिंदू आहेत. देशाचे नाव हिंदुस्थान/हिंदीस्तान नाही. हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.

In reply to by आजानुकर्ण

देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे. वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.
हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.
वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.
देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.

In reply to by आजानुकर्ण

हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे. काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का? देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. स्तान आणि स्थान यात अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक नसल्याने आमच्या वाक्यातही फारसा फरक पडत नाही. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही. अर्थ लक्षात घेऊन वाचल्यास फारसा फरक नाही. तरीही सूचनेचा विचार करू.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?
नाही.
तरीही सूचनेचा विचार करू.
धन्यवाद.

In reply to by आजानुकर्ण

हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.
याबद्दल साशंक आहे. म्हणजे 'हिंदोस्ताँ'करिता मराठीत 'हिंदुस्थान' हा शब्द नेमका कधी वापरला जाऊ लागला, कोणी बनवला याबद्दल कल्पना नाही, परंतु जुन्या (म्ह. आमच्या आजोबांच्या वगैरे) पिढीपासूनच्या लोकांच्या तोंडून (आणि लेखी वापरातसुद्धा) हा शब्द सरसकट असाच ऐकलेला (आणि वाचलेला) आहे. असा वापर करणारांपैकी अनेकांचा 'हिंदुत्ववादा'शी दूरान्वयानेही संबंध नसावा (किंवा असलाच तर विरोधापुरता असावा). किंवा कदाचित याचे मूळ 'हिंदुत्ववाद्यां'त (म्ह. कोण? सावरकर वगैरे?) असेलही, परंतु हा शब्द मराठीतील सामान्य वापरात ('हिंदुत्ववाद्यां'मध्ये आणि इतरांमध्येसुद्धा) अशाच स्वरूपात गेल्या किमान तीनचार पिढ्यांत तरी रुळलेला आहे, आणि तो मराठीत 'हिंदुस्तान' असा कधीही म्हटलेला किंवा लिहिलेला निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही. मग म्हणणारा/लिहिणारा 'हिंदुत्ववादी' असो वा नसो. उलटपक्षी, मराठीखेरीज इतर भाषांत हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहिलेला किंवा म्हटलेला (अगदी 'हिंदुत्ववाद्यां'कडूनसुद्धा) वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. त्यामुळे हा शब्द मराठीत 'हिंदुस्थान' तर इतर भाषांत 'हिंदुस्तान/हिंदोस्ताँ' असा असावा, आणि वापरणार्‍याच्या 'हिंदुत्वा'शी (किंवा 'हिंदुत्व'वादाशी) संबंध नसावा, अशी निदान माझी तरी धारणा आहे. (कदाचित मराठीतील 'हिंदुस्थान' हे 'हिंदोस्ताँ'चे अपभ्रष्ट रूप असू शकेल. मुंबईत एकदा 'रिचर्डसन अँड क्रूडास' या कंपनीचे नाव 'रिचर्डसन अँड गुरदास' असे सामान्यजनांकडून ऐकलेले आहे, तद्वत.) (बाय द वे, माझ्याच घरातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, हा शब्द माझ्या घरात नेहमी 'हिंदुस्थान' असाच वापरण्यात आलेला आहे. माझ्या आजोबांबद्दल कल्पना नाही, परंतु माझे वडील 'हिंदुत्ववादा'चे कट्टर विरोधक होते आणि मीही 'हिंदुत्ववादी' नाही.)

In reply to by पंगा

विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण हिंदुस्तान/हिंदुस्थान आणि हिंदीस्तान याचा संबंध नसावा हा मुख्य मुद्दा आहे. (पूर्वपदस्थ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बाय द वे, हिंदुस्थानाकरिता तुर्की भाषेत 'हिन्दिस्तान' असा शब्द असावा असे वाटते. हवे तर तुर्कस्थानातील* भारतीय वकिलातीच्या वेबसाइटीस भेट देऊन खात्री करून घ्यावी. *पुन्हा स्थान! तसेही 'हिंदी' या शब्दाचा अर्थ 'हिंदचा (म्ह. हिंदुस्थानचा) रहिवासी' असा आहे, आणि योगायोगाने हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागात बोलल्या जाणार्‍या भाषेचेही ते नाव आहे, असे वाटते. तसेही भौगोलिकदृष्ट्या 'हिंदुस्थान' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी, कधी 'आसिंधुसिंधुपर्यंत' अर्थाने, कधी 'ब्रिटिश इंडिया' अशा अर्थी, कधी 'भारतीय गणराज्य' अशा अर्थी तर कधी केवळ उत्तरेकडील मैदानी प्रदेशासाठी (पहा: 'हिंदुस्थानचे मैदान') वापरला जातो, असे वाटते. तसेही 'हिंद' किंवा 'हिंदोस्ताँ'चा मूळ अर्थ 'उत्तरेकडील गंगायमुनांच्या खोर्‍यांतील मैदानी प्रदेश'** असा काहीसा लक्षात घेता, ऐतिहासिकदृष्ट्या 'हिंदची (किंवा हिंदोस्ताँची) भाषा ती हिंदी (किंवा हिंदोस्तानी)', यात काहीही गैर नाही. 'हिंदोस्ताँ'(या संज्ञे)ची व्याप्ती नंतर वाढली, त्याला कोण काय करणार? ** दख्खनचे पठार हे 'हिंदोस्ताँ' संज्ञेच्या मूळ व्याप्तीच्या बाहेर होते असे विकीवरून कळते. चूभूद्याघ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.
माझा रोख 'हिंदी इतर भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'-छाप अपप्रचार करणारांकडे होता. अशा अपप्रचारकांकरिता अशा (मुद्दाम लावलेल्या) अर्थास बरीच प्रॉपगांडा-व्हॅल्यू आहे, असे म्हणायचे होते. बाकी उत्तर भारतवासी हिंदीभाषक बांधवांच्या याबद्दलच्या (आपण म्हणता तशा) विचारांबद्दल बोलायचे झाल्यास, होय, याचाही थोडाफार अनुभव आहे. (म्हणजे अगदी बिगर-हिंदीभाषकांनी हिंदुस्थानात राहू नये वगैरे इतकी नव्हे, पण बिगरहिंदीभाषकांबद्दल - विशेष करून हिंदी पट्ट्याच्या दक्षिणेकडील रहिवाशांबद्दल - एकंदर तुच्छतेची भावना वगैरे पाहिलेली नाही असे नाही. दिल्लीच्या बसेसमध्ये 'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं' अशी 'सरकारी' घोषणा मुद्दाम लावावी लागते हे चित्र पुरेसे बोलके आहे. अर्थात ही परिस्थिती सार्वत्रिक नाही, पण नाही असेही नाही.) पण त्याची दखल घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. भारताच्या एका छोट्या भागातील मर्यादित लोकांना उर्वरित भारतीयांबद्दल काय वाटते यावरून त्या उर्वरित भारतीयांचे भारतीयत्व ठरू नये, आणि त्या उर्वरित भारतीयांनी तर ते तसे मुळीच ठरवून घेऊ नये. गेले उडत! आणि तशीही इतरप्रांतीयांबद्दल तुच्छता ही एकंदर भारताचीच (किंवा कदाचित मानवजातीची) खासियत असावी. खुद्द महाराष्ट्रात, दक्षिणेकडील हेल काढून बोलणार्‍या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषांबद्दल विनाकारण तुच्छतेची - किमानपक्षी टिंगलटवाळीची - भावना परवापरवापर्यंत - अगदी आमच्या आईवडिलांच्या पिढीपर्यंत किंवा कदाचित आमच्याही पिढीपर्यंत - होती, आणि कदाचित अजूनही असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, (केवळ भाषेच्याच नव्हे, तर इतरही बाबतींत) भक्कम परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीवर भारत टिकून आहे, असे म्हटल्यास बहुधा वावगे ठरू नये.

In reply to by अवलिया

अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे
+१ सहमत आहे बॉस. विजुभौंच्या मराठी प्रेमाबद्दल पुर्ण खात्री आहे. मात्र आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.

In reply to by अवलिया

मी या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेले परखड उत्तर संपादित झाले. मात्र हा एकांगी आरोप संपादित झाला नाही याचे आश्चर्य वाटते. वर मी हिंदी शब्द आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला आहे. तो सल्ला आणि वरील प्रतिसाद संपादित व्हावा ही संपादन मंडळाला विनंती.

In reply to by आजानुकर्ण

सहमत आहे. सदर सदस्याची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा संपादक मंडळ करेल काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले. + १ मला तर गदगदुन आले आणि माझे डोळे पाणावले तात्पर्य काय : मिपा उपक्रमी आनि मनोगती होणार

शुद्धलेखन आनि मातृभाषेला योग्य सन्मान देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक सांगा व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा? अवांतर" आणि हा शब्द टंकताना तो आनि असा टंकला गेला यात शुद्धातेपेक्षा कळफलक आणि घाई गडबड जबाबदार आहे. टिळकानी संत हा शब्द सन्त सनत असा तिन्ही प्रकारे लिहीला होता. सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची

In reply to by विजुभाऊ

व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?
हा फुलराणीतला डायलॉग आहे वाटतं. बरं हे देशद्रोही नक्की कोण ठरवते? महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.

In reply to by आजानुकर्ण

>>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम असा आहे की पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे. मुंबईत येऊन बघा. आणि पुण्याची आजची स्थिती पाहता आपण काही नाही केले तर आज जे मुंबईत होते आहे ते १०-१५ वर्षात पुण्यात होणार(If not earlier)

In reply to by विजुभाऊ

इतके सगळे प्रकार पुण्यात दिसत असताना मग तुम्ही नेहमी घाऊक द्वेष करता तो नक्की 'कुठल्या' पुण्याचा?

In reply to by विजुभाऊ

सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !! अजून वरिजनल विजुभौ हायेत. त्यांनी नवीन वर्षापासुन (म्हणजेच २०११ आहे हे गृहीत धरले आहे) पुणे आणि पुणेकरांना नाव ठेवणार नाही असा "पण" केला आहे. जाउ देत परा. शेवटचे ४-५ दिवस राहीलेत. त्यामुळे दुर्लक्ष कर आत्ता.

In reply to by विजुभाऊ

" कुठे " चे "कुढं" किंवा "फुडं" झाले तरी किंवा येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले तरी पुण्यात मराठीचाच वापर होतो हे तुम्ही सिध्द केल्याबद्दल मंडळ आभारी आहे. (बंबईया भाषेबद्दल न बोलणे चांगले) बाकी लो.टिळकांबरोबर स्वत:ची तुलना करण्याचा प्रयत्न करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार भारी होता.

पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे. महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?

In reply to by विजुभाऊ

महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?
मी पुण्यात राहतो. :-) गेले अनेक दिवस याबाबतीत काही बातम्या वाचनात आल्या नाहीत त्यामुळे हा वाद मिटला असावा असे वाटले. मला वाटते पाट्या-फलक मराठीत - पक्षी देवनागरीत - आल्याने हिंदी भाषकांचा फायदाच होणार आहे. पुरेसे शिक्षण न मिळाल्याने अनेक युपी बिहारी लोकांना इंग्रजी वाचता येत नाही मात्र देवनागरीतल्या पाट्या मात्र त्यांना चोख वाचता येतील. किंबहुना मराठी देवनागरीतल्या पाट्या या त्यांच्या हिताच्याच आहेत हे लाई चना वगैरे कार्यक्रमात श्री. ठाकरे (ठाकरे कुटुंबियांपैकी सध्या जे कोणी पदावर असतील त्यांनी) हिंदी भाषकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मला तर वाटते हा मराठी पाट्यांच्या विरोधातला कट हा हिंदी भाषकांचा नसून गुजराती भाषकांचा आहे. विरेन शाह वगैरे शाह मंडळी या कटाच्या अग्रभागी आहेत. (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन व रूपम ग्रुप) (तुम्ही मुंबई असा मराठमोळा शब्द असताना बम्बईपासून प्रेरणा घेऊन मुम्बई असा शब्द का बनवला? मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)

In reply to by आजानुकर्ण

मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.) तुमचे व्याकरण कच्चे असावे असा संशय होता. आतातर इतिहास देखील कच्चा आहे असे वाटायला लागलेय. लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता. व्याकरणदृष्ट्या तीनही शब्द बरोबर आहेत. मुंबई हा शब्द मुम्बई किंवा मुम्बै असा लिहीला तरी बरोबर आहे. देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.

In reply to by विजुभाऊ

माझे व्याकरण कच्चेच आहे त्यामुळे मराठी संकेतस्थळांवर येऊन मी व्याकरण शिकायचा प्रयत्न करतो. असो. संत, सन्त किंवा सन्‌त असे शब्द पुलंनी 'आम्ही सूक्ष्मात जातो' मध्ये वापरल्याचे आठवते. (त्यात या शब्दांच्या जोडीला नम्र, नम्‍र, नम्‌र हेही होते) मी माझ्या वाक्यात 'शक्यतो' हा शब्द वापरला होता. मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की.)
देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.
हा हा म्हणजे प्रत्येक शब्द हे 'अक्शर्चिन्ह' असते असे सतीश रावले म्हणतात तसे का?

In reply to by आजानुकर्ण

मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की "मुम्बअ‍ि" शब्दात " अ" अक्षरावर्ची वरची वेलान्टी दीर्घ हवी

In reply to by विजुभाऊ

लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.
अहो पण टिळकांनी तो शब्द तसा केवळ दिपोटींशी पंगा घेण्यासाठी लिहिला होता. (शेवटी मूळचे पुण्याचे नसले तरी रेट्रोअ‍ॅक्टिव इफेक्टने वाण नाही पण गुण लागायचाच. असो.) त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात (म्हणजे, महाराष्ट्राचा बसलेला इतिहास पाहिलेला नाही. तसेही आपण इतिहासतज्ज्ञ नाही. असो.) तो तसा तीन वेगवेगळ्या प्रकारे (एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी सुटा) लिहिला गेल्याची उदाहरणे (वर आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे पु.लं.चा अपवाद वगैरे वगळता) फारशी नसावीत. (नाही म्हणायला हा शब्द 'सन्त' असा लिहिणारे तुरळक खाजाळू असतीलसुद्धा, परंतु 'सन् त' - मधली रिकामी जागा वगळून - असा लिहिणारे महाभाग टिळकांअगोदर किंवा नंतर झाल्याचे ऐकिवात नाही.) असो. (अवांतर: बाकी, टिळकांची संतत्रयीची किंवा 'मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत'वाली गोष्ट काय किंवा गांधींची 'केट्ल'च्या स्पेलिंगची गोष्ट काय, या गोष्टी या कोणीतरी उठवून दिलेल्या वावड्या असाव्यात, अशी मला दाट शंका आहे.)

पण खरच मराठी जपलीच पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी तसेच निमसरकारीही कामांचे दस्ताऐवज मराठीतुन केले पाहीजे.

भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती, कायदे असे काही करुन सोवळ्याचे फडके बांधून लोणच्यागत टिकवली तरी फार काळ तग धरेल असे नाही. लवचिक भाषा जगतात. बाहेरच्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा काळाच्या धुरळ्यात गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम / ऐतिहासिक व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत. जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे. टिकण्यायोग्य असते ती भाषा टिकतेच. मराठीचे तरी काय?: अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः "चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले" नंतर बखरींमधे.. "जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.." या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची आणि प्रतिक्रियांची धरुन) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे? त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे.

चीनचे एवढे कौतुक नको. काही वर्षांनी आपल्या इथे पण सगळ्या पाट्या चायनीज भाषेतच लागणार आहेत. आणि त्या सक्तीने वाचाव्या पण लागतील.

धाग्याचे जे मूळ कारण आहे "चिनी भाषेची प्युरिटी राखण्यासाठी त्या सरकारने उचललेले पाऊल...", त्याविषयी मत व्यक्त करीत आहे. त्या बातमीवरून (तसेच या धाग्यावरून) असे वाटण्याची शक्यता आहे की चीनची इंग्लिश भाषेशी दुश्मनी आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून तो आदेश काढण्याचे कारण "लिपी" आहे. म्हणजे असे की, चिनी वर्तमानपत्राला आता बातमीत वा लेखात English Word वा Phrase द्यायची असेल तर ती 'चिनी लिपीत' देता येणार नाही. उदा. आपण महाराष्ट्र टाईम्स वा सकाळ या वर्तमानपत्रात असे वाचू शकतो की "वर्ल्ड कप फूटबॉल" साठी आयोजनासाठी भारत उत्सुक. चीनचे वर्तमानपत्रही ही बातमी देणार असेल तर या शीर्षकातील "वर्ल्ड कप फूटबॉल" त्याला 'चिनी लिपी' त देता येणार नाही. हा एवढाच शब्द World Cup Football असा देऊन त्याचा चिनी भाषेत कंसात अनुवाद द्यावा लागेल. चिनी लिपी ही खरे तर चित्रलिपी असल्याने वर्तमानपत्रांना बातमीमध्ये एखादेवेळी इंग्लिश संक्षिप्त रूपे UNO, GDP, WTC, NBA द्यायची असल्यास ते चिनी लिपी वापरत (जसे आपण मराठीत 'युनो, जीडीपी, एनबीए' वापरली असती), त्यामुळे त्या लिपीतील इंग्लिश शॉर्टफॉर्म्सचे अनेकविध अर्थ निघू शकतात (इथे भाषेच्या Purity चा प्रश्न आला होता).....हे त्या सरकारच्या The General Administration of Press and Publication या विभागाच्या लक्षात आल्याने त्यानी "इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपे देऊ नयेत" असा जरी आदेश जरी जारी केला असला तरी त्यात 'If necessary' ची एक पळवाट ठेवली आहेच अन् ती म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे शब्दाचे पूर्ण रूप देऊन त्याचा चिनी भाषेतील अनुवाद कंसात देणे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

दुर्दैवाने मराठी आणि हिंदीची लिपी एकच असल्याने विजुभौंना भीती वाटणारे हिंदी शब्द ओळखण्यास अंमळ अडचण येणार आहे.

In reply to by आजानुकर्ण

अडचण येणार नाही असे वाटते. सम मोअर इक्वल शब्द लगेच ओळखता येतील की? जसे की एखाद्याला तू किती बिझी आहेस हे विचारताना मी त्याला "तेरा व्यस्त प्रमाण काय आहे?" असे विचारीन. हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते. "गर्वाने सांगा हम मराठी आहे"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.
चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.

In reply to by आजानुकर्ण

चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो. यू सेड इट. वर कोणीतरी हिंदी शब्द मराठीत आल्यामुळे काय बिघडतं असे विचारले होते. तिथे हा चोप्य पस्ते करावा असा विचार करतो आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अहो महाशय, स्वतःला पटणारे सोयीस्कर उदाहरण घेऊन सिद्धता होत नसते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी हिंदी काय अगदी संस्कृत शब्द घातला तरी तिथे बिघडणारच. याउलट योग्य ठिकाणी हिंदी शब्द चालूनही जाईल. थोडा विचार करा.

In reply to by आजानुकर्ण

तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय. जसे फारसी, अरबी आणि संस्कृत शब्द मराठीत आले तसे काही हिंदी शब्द आले तर काहीच हरकत नाही हे तत्वतः मान्य आहे. परंतु तुम्ही जर आजकाल वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर दिसणारी आणि बर्‍याच लोकांच्या तोंडी असणारी भाषा पाहिलीत तर योग्य तेच हिंदी शब्द मराठीत येत आहेत असे म्हणाल? शिवाय मराठीत आधीच त्या अर्थाचे अनेक शब्द असताना (भले ते पुर्वी इतर भाषेतून आलेले असो) विनाकारण नवीन प्रतिशब्द आयात करून जुने शब्द विस्मरणात घालवायची किंवा त्यांचे अर्थ बदलायची गरज काय? वरती पुपे म्हणाले तसं, "मी व्यस्त आहे", "मला गर्व आहे", "माझी मदत कर"इत्यादी चुकीचे वाक्यप्रयोग आणि प्रेक्षकांसाठी दर्शक असे चुकीचे शब्द आजकाल सर्रास वापरले जातात. इतकाच जर हिंदीचा सोस आहे तर हिंदीच बोलूया ना. कशाला पाहिजे मराठीतरी? ज्याला शब्दांचा पोत, छटा आणि रुप पाहता येते त्याला थोड्या छटेच्या फरकानेही खडा लागल्यासारखे होते. इथे तर ढळढळीत काहीही शब्द वापरले जातात आणि वर भावना पोचल्या म्हणजे झाले ना अशी रंगसफेती केली जाते. जर भावना पोचणेच फक्त महत्त्वाचे असेल तर माकडेही एकमेकात संवाद साधतात त्या आणि इतर भाषांमध्ये फरक काय?

In reply to by इन्द्र्राज पवार

हे जपानी भाषेने ह्यापूर्वीच अंगिकारले आहे. जपानीत मूळ जपानी शब्द हे कांजी ह्या चीनकडून आयात केलेल्या लिपीत लिहिले जातात तर, जपानीबाह्य शब्दांसाठी काताकाना ही लिपी वापरली जाते. सुनील-सान