हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे.
नमस्कार संपादक,
या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? वरच्यासारखे घाणेरडे आणि गलिच्छ प्रकार साधूसंतांच्या नावे खपवणारे आणि आपल्या तुंबड्या भरणारे लेखक होते. ते भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या नादी लावून आपले खिसे भरत होते परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? आपल्या मुलांना कापून टाकण्याच्या भाकड कथांना प्रसिद्धी देणार्या या सदस्येला मिपावर काही स्पेशल स्टेटस आहे का, असल्यास ते आम्हा इतर सदस्यांना सांगावे. जर तसे नसेल तर हे असे लेख मिपावर का राहावेत याचे कारण मिळावे.
धन्यवाद,
संकेत.
>> परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? >>
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहे. त्यात जर मुले कापण्याचा संदर्भ आला असेल आणि अनेकांच्या मनावर परिणाम झाला असेल तर काढून टाका हा लेख.
एका पांढर्या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले.
माझा यावर निरुपाय आहे. कारण दोन्ही प्रकारची माणसं मिपावर येणार. गोष्टीतला काळा ठीपका अधोरेखीत करून , लेख उडवायचा असेल तर उडवा. पण हे लक्षात ठेवा तुम्ही पांढरा कागद पहायला विसरताय.
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहेम म्हणून आम्ही मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय? निष्काम भक्तीसाठी तुमच्या स्चतःच्या मुलांना हंडीत शिजवाल का?
एका पांढर्या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले.
काही लोकांना पांढरा कागद आणि काळा ठिपका - दोन्ही दिसत असतील ..
फक्त एका कथेला प्रसिद्धी मिपावर दिल्याने सारखं आपलं अंधश्रद्धेला खतपाणीची, अंधश्रद्धेला खतपाणीमाळ का ओढली जात आहे ते कळत नाही. कथेमधनं बोध घ्यायचा असतो. कथेतील काही बाबी जरी टोकाच्या वाटल्या तरी त्या (सहसा)सांगोपांगी असुन त्या खर्या की खोट्या याची शहनिशा करण्यापेक्षा कथेतुन भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो, तो घेणे जास्त श्रेयस्कर. कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना?
भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो
म्हणजे काय व हा संदेश कसा मिळतो ?
व्यावहारिक गोष्टींसाठी भक्ती, नवस करणारे बाजूला ठेवू.
भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ?
(आयला.. कशाला या वादात पडतोय मी..)
>>भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ?
नाहि. या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्या आनंदासाठीही भक्ती करतात... किंबहुना ति भक्तीची परमोच्च स्टेट असावी (हा आमचा निष्कर्श बरका... अनुभव नाहि) संदर्भ द्यायचाच तर तुकारामांचे (त्यांनिच रचले असतील तर) "आनंदाचे डोही आनंद तरंग" आणि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालासे आम्हासी" हे अभंग.
(अभक्त) अर्धवटराव
कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना?
त्याच महाभारतात त्यांच्या लहानपणीच्या गोष्टीत, धनुर्विद्येच्या परि़क्षेत, तुम्हाला काय दिसते अस प्रश्न द्रोणाचार्य विचारतात. सगळे जण झाडे, फळे, डोंगर इ. उत्तरे देतात त्यांना धनुष्याला हातही लावून दिला गेला नाही.
अर्जुन म्हणाला, त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय.
आपल्याला काय हवे हे माहिती पाहिजे, आणि ते शोधण्याची ज्वलंत इच्छा पाहिजे, तरच ते शोधता येईल.
टेक्निकली येस !! प्रेमानंदाची कामना हि पण एक प्रकारची इच्छाच आहे. पण त्याकरता भक्ती "करता" येत नाहि... ति "होउन जाते". तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते... तसलच काहितरी. हे प्रेम का? तर तो स्वभाव आहे... एकदा हा अमृतदंश झाला तर त्याला औषध नाहि.
(प्रवचनकार) अर्धवटराव
नाही. इतकी महत्त्वाची गोष्ट इतकी बेभरवशाची किंवा "झाली तर होणारी" असू शकत नाही, असल्यास त्याला काही अर्थ नाही.
ज्यांना होत नाही त्यांनी वाट बघत बसायची का ? जे हे करायचे ठरवतात, ते निश्चायाने तडीला नेतात.
मुळात कोणतीही क्रिया निष्काम असूच शकत नाही हे मान्य का होत नसावे सर्वत्रांस ?
ईश्वराने जग निर्माण केले असे धरले तरी इतक्या पसार्याची आणि तो घडावा याची ईषणा (म्हणजे कामनाच ना एका प्रकारची) त्याने केली आणि तसे घडवले ही.
(ईश्वराचे अस्तित्व मानून...) ईश्वरालाही जे चुकले नाही ते आपण का चुकवू पाहतोय..?
निष्काम अशी कोणतीही क्रिया जगात अस्तित्वात असेल तर पर्पेच्युअल मोशन (ऊर्जेच्या इनपुट शिवाय अनंत चालत राहणारे अक्षय यंत्र) ही अशक्य समजली गेलेली कल्पनाही शक्य म्हणावी लागेल.
तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते
इत्यादि सुद्धा काव्यात्मक पातळीवरची उदाहरणे झाली. त्यात (प्रेम या कल्पनेच्या ) खोलात जाण्याचे धाडस आपण करत नाही, पण त्यातही कामना, कार्यकारणभाव, सकाम प्रयत्न वगैरे असतातच..
तुम्हाला त्यात बेभरवशाचं काय वाटलं बरं... आपल्या स्वभावात स्थीर राहणं अर्थहीन कसं? आणि निश्चयाने तडीने नेण्याचं म्हणाल तर त्याकरताच हा साधनेचा वगैरे प्रपंच... निश्चयाने तडीस नेण्यासाठी.
अर्धवटराव
एक अद्भूत कथा म्हणुन हि गोष्ट वाचनीय आहे. बाकी भक्ती वगैरे विषयापासुन आम्हि चार हाथ लांब आहोत. आयला... इथे प्रत्येक क्षणाला काहितरी प्राप्त करण्याचि, उपभोग घेण्याचि ईच्छा मनात येतेय... कसली निष्काम भक्ती नि काय..
जे काहि थोडंफार भक्ती वगैरे विषयावर वाचन झालय त्यावरुन तरी असं वाटतं कि भक्ती एक फार सुंदर, सहज अशी प्रेमभावना आहे. प्रेम तर स्वाभावीक असतं, आणि ते अनुभवल्याशिवाय जाणवत देखील नाहि. मग या प्रेमानुभवाला अद्भूततेची जोड का द्यावी लागते बरं ?? म्हणजे कसं कि भक्ती अनुभवायची आहे काय... तर मग काहितरी गूढ-अद्भूत्-विचित्र-विवेकाला न पटणार्या, फँटसीयुक्त गोष्टीला तयार रहा. हा मेळ बसत नाहि. तुकोबांचे अभंग कुठेच गूढ वगैरे वाटत नाहि. समर्थांचे श्लोक अविवेकी जाणवत नाहित. एक मात्र कळते कि या लोकांनी जो प्रेमानुभव घेतलाय तो अजुनतरी आपल्याला आलेला नाहि. बाकि काहि विशेष नाहि...
अवांतर : कथेचं तात्पर्य असं दिसतय कि फायनल सत्य जाणण्यासाठी काय काय बघायची, सहन करायची आणि तरिही डोकं शांत ठेऊन विचार करायची तयारी लागते याचा हा एक नमुना. आपापल्या वकुबाप्रमाणे मार्ग चालायचा.
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय?
म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय?
नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी?
संपादक मंडळाला विनंती: कृपया हा लेख अजिबात उडवू नये. फक्त तात्पर्याकडे पाहा म्हणत मुलांना हंडीत शिजवण्या विषयी लेख लिहिणार्य लेखिकेचा विकृतपणा इथे कायम स्वरुपी ठेवला पाहिजे.
त्या स्वत:च हा धागा उडवतील. मागे पण त्यांनी असे केलेले आहे.
माझा पर्सनली या गोष्टीला काही एक विरोध नाही. हिंदू पुराणात अशा कितीतरी गोष्टी भरलेल्या आहेत (जशा की इन्सेस्ट, बळी देणे ई ई). पण जर का कुणाला तरी ते पटले नाही तर त्याला महामूर्ख आणि बावळट ठरवणे म्हणजे मत स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणे आहे. त्याला माझा नेहमीच विरोध राहील.
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय?
म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय?
नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी?
अगदी खरे. पूर्वीपासून असेच सुरु आहे. यांना थांबवणे इतके सोपे नाही.
इथे जुन्या जाणत्या लोकांनीही उदा. केशवसुनीत, राजेश घासकडवी वगैरे लोकांनीही त्यांना हेच सांगितले आहे पण काही उपयोग झाला नाही. मी १-२ महिने मिपापासून दूर होतो पण सध्या येउन पाहिले तर काँग्रेस गवतासारखे ते फोफावलेले दिसते.
सगळे जण लेखक नसतात, किंवा काही खरोखर सगळ्यांबरोबर शेअर करावेत असे अनुभव प्रत्येकाला येत नाहीत. साधारणपणे आपले आयुष्य नॉर्मलच असते.
नुसते कागद पेन किंवा सध्याच्या काळात काँप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असले म्हणजे आपण लेखक होत नाही.
आपण कुणाबद्दल वैयक्तिक (आणि इथे असंबंद्धही) आरोप करतांना एक रेषा ओलांडली आहे हे आपणास समजले नाही, ह्यात नवल नाही.
माझा आक्षेप संपादकांना उद्देशून आहे. ते असल्या आक्षेपांना 'काडीपेक्षा' जास्त किंमत देतील असे वाटते.
आणि स्वतःची चूक दुसर्यांनी ( ज्यांनी लहान मुले कापण्यावर तुमच्याही आधी टीका केली आहे ) दाखवून दिली तरी ती मानण्याची तुमची तयारी नसेल, तर तुम्ही आमच्या प्रतीसादाची केअर करता की नाही ते, हू केअर्स?
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! ;)
असो...
जाता जाता :--- शिबी राजाची कथा मात्र आठवली !!!
(दत्तात्रेयांचा दास)
तुम्हाला नाही, मदनबाण यांना दिलेला प्रतिसाद आहे. तुमच्या प्रतिसादाच्या खाली आहे म्हणजे तुम्हाला दिलाय अस नसतं.
प्रेषक मदनबाण दि. सोम, 20/12/2010 - 08:29.
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!!
असो...
ह्म्म्.. आता लक्षात आलं. इतका वेळ मोबाईलवरून चालू असल्याने तो कॉमेंटबॉक्सच्या वगैरे लेआउटचा अंदाज आला नाही, म्हणून मलाच आहे असं समजून दिलं ठोकून उत्तर..
आता लक्षात ठेवीन.
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!!
होय! अशा अनेक कथा अहेत .... पण अशा प्रकारच्या कथांचा वाचक वर्ग वेगळा आहे . ज्यांना अशा गोष्टी वाचायला, ऐकायला
आवडतात तेच लोक अशी पुस्तके विकत घेतात अथवा अशा कथा जिथे सांगीतल्या जातात अशा व्याख्यानांना हजेरी लावतात.
पण ज्यांना अशा कथांमधे रूची नाही ते त्या पासून दूर राहतात.
मराठी संस्थळांवर, जिथे असे साहित्य वाचायला मिळण्याची अपेक्षा नसते तिथे येणार्या सभासदांकडून असे धागे चुकुन का होईना उघडले जातात, वाचले जातात ... जे सर्वसामान्यांच्या अभिरूचीला पात्र नाहीत.
भक्ती, धर्म . . इ. ला विरोध नाही पण त्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याला विरोध आहे..
कशावर विश्वास ठेवायचा आणी कशावर नाही ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे ... पण आपले विचार न पटणार्या लोकांना अश्रद्ध, पाखंडी वगैरे ठरवणे गैर आहे.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय बोलायचे/वाचायचे/ऐकायचे ही तुमची खाजगी बाब आहे त्यावर कुणी अक्षेप घेऊ शकत नाही , पण तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलत किंवा लिहित असाल तर काळजी घेणे जरूर आहे असे वाटते.
अर्थात हे माझे मत आहे. बाकी एकेकाची समज , जाण .. इ. इ.
हॅ हॅ हॅ , काय चर्चा चालू आहे, प्रतिसाद कर्ते नको तिथे उर्जा वापरत आहेत.
देवादिकांच्या , संतांच्या अशा हजारो गोष्टी सापडतील. कोणत्याही पुस्तक भांडारात अशी अनेक पुस्तके मिळतील. एव्हाना अशी पुस्तके वाचून किंवा अशा गोष्टी ऐकून अनेक मुलांचे बळी जायला हवे होते ना .
नरसिहाची गोष्ट तर सर्वशृतच आहे. बापाने स्वतःच्या मुलाला उकळत्या तेलात टाकले, कड्यावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली दिले वगैरे. आणि भक्त प्रल्हादाची ही गोष्ट आपण मुलांना पण सांगतो.
अशा प्रकारच्या गोष्टींमधुन तात्पर्य घ्यायचे सोडून लोक नसत्या चर्चा करत बसतात.
धाग्याच तात्पर्य: बोकड आणि कोंबडी कापायला कोणाचा विरोध नाही.
( हे धाग्याचं नाही , हे तुम्ही तुमच्या समजुतीनुसार काढलेले या चर्चेचे सार आहे . )
जिवो, जिवस्य जिवनम् ..
पण म्हणून वाघ, सिंह आपल्या बछड्यांची शिकार करत नाहीत .
^^तुमच्या समजुतीनुसार
खरं आहे ही माझी समजूत आहे. केवळ वादाने विपर्यास नको म्हणून बोलत नाही. पण इतर धर्मात बोकड बळी देण्याची प्रथा आहे त्यामागील कथा एकदा वाचावि अशी विनंती आहे. बोकड कशाचे प्रतिक आहे हे एकदा कळ्ले तर बरे होईल.कथा पवित्र धर्म ग्रंथात आहे.
बाकी
सिंह केवळ आपला कळपावरील अधिकार अबाधीत रहावा म्हणून नर बछडयांना मारतो असे वाचल्याचे आठवले.
शेवटी ही कथा आहे. परीणाम साधण्यासाठी अतिशयोक्ती असण्याची शक्याता गृहीत घरावी असे वाटते.
कृपया तुम्ही तुमचे लिखाण थांबवु नका. तुमच्या मनात जे काही असेल ते इथे टंकत चला.कारण मला सनातन प्रभात विकत घेवुन वाचायला आवडत नाही.तुमचे लेख मला सनातन प्रभात ह्या शुध्द भारतिय सनातन धर्माला वाहिलेल्या प्रतिकेतील वाटतात.तुम्ही अमेरिकेतील सनातन प्रभातच्या वार्ताकंनाचे काम पाहता काय?
मला अजून एक बोथ कथा माहित आहे .आईवर प्रेम असलेला एक मुलगा लग्न झाल्यावर बायकोच्या कह्यात जातो एक दिवस बायको म्हणते तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर सिद्ध कर . मुलगा म्हणतो मी काय पण करेल तुझ्यासाठी . बायको म्हणते तुझ्या आईचे काळीज आणून दे .मुलगा धास्तावतो .पण पत्नी प्रेमासाठी आईकडे जातो .आईस वृत्तांत कथन करतो .ती माता क्षणाचा हि विलंब न करता त्याला परमिशन देते .तो आईचे काळीज घेऊन जात असताना वाटेत दगडात पाय अडकून खाली पडतो .त्याला आईचे काळीज विचारते .तुला लागल नाही ना बाळा?
(मदर डे साठी हि कथा राखून ठेवण्याचा मानस होता . त्यावर सरकारी अनुदानाने सिनेमा काढायचा बेत होता . (आई अर्थात अलका ताई) पण शोलेतील ठाकूर च्या भाषेत लोह गरम है . मार दो हतोडा.
माझ्या बोध कथेतून बोध घेऊन एखादी सून सासूचे काळीज मागेल अशी शंका घेऊ नये .. तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी .हा मतितार्थ लक्षात ठेवावा .
आजही महाभारत व रामायणातील अनेक प्रसंग हे अतिशयोक्ती करणारे आहेत .उदा द्रौपदी ने आपले केस मोकळे सोडले .व प्रतिज्ञा घेतली कि मी माझी वेणी दुशासानाच्या रक्ताने बांधेन ,जी भीमाने त्याचे काळीज फोडून पूर्ण केली .(हा प्रसंग पाहून आज पर्यत अशी प्रतिज्ञा एकाहि महिलेने केली नाही . ) तेव्हा
भावनाको समझो .
माफ करा पण गोष्ट तितकीशी पटली नाही. म्हणजे त्यातून नक्की काय बोध घ्यायचा ते कळले नाही. मुलांना कापून त्याचे भोजन बनवणे वगैरे तर्कसंगत वाटत नाही. म्हणजे कुठलाही सहृदय माणूस अशा अघोरी कृत्याला घाबरून किंवा त्याचा निषेध करून निघून गेला तर तो 'सकाम' भक्तीचा पुरस्कर्ता कसा काय ठरू शकतो? कुठलाही मन चांगल्या विचारांनी व्यापलेला मनुष्य असल्या कृत्याचा निषेध करणारच. किंबहुना भूक लागल्यावर प्रामाणिकपणे कष्ट करून आपले व आपल्या मुलांचे पोट भरणे ही आपली शिकवण आहे. त्याच शिकवणीला छेद देणारी ही गोष्ट वाटते.
म्हणजे उद्या कुणी साक्षात्कारी पुरुष (आपल्याला साक्षात्कारी वाटलेला) आपल्या घरी आला आणि आपली परीक्षा घेण्यासाठी त्याने आपल्या पोरांना कापायची इच्छा व्यक्त केली. आणि आपण 'निष्काम' भक्तीचा हवाला देऊन त्याला परवानगी दिली आणि असल्या पोहोचलेल्या महापुरुषाने जर खरच आपली पोरे कापून त्यांचे मास शिजवायला घातले आणि आपण अगदी भक्तीभावाने हंड्यात मीठ, मसाले, कोथिंबीर, दालचिनी, काजूचे काप वगैरे टाकून ढवळत बसलो तर अशा कठीण समयी तो महापुरुष आपल्यावर प्रसन्न होऊन आपली पोरे जिवंत करेल अशी आशा बाळगायची का? आणि समजा आपली ओळख चुकली आणि त्या महापुरुषाची तपस्या फक्त परीक्षा घेण्यापर्यंतचीच असेल; पोरांना जिवंत करण्याइतकी शक्ती त्याच्यात नसेल किंवा तो असाच कुणी विकृत भामटा असेल तर मग.....? थरकाप उडतो ना?
आपण प्रतिकात्मक म्हणून जरी या गोष्टीचा विचार केला तरी प्रतिके जास्त चांगली आणि अनुरुप देता येऊ शकतात. पोरांना कापून निष्काम भक्ती सिद्ध करायची वेळ का यावी? मुळात निष्काम भक्ती म्हणजे काय? सकाम भक्ती म्हणजे काय? मी प्रामाणिकपणे कष्ट करतो, माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करतो, शक्य असेल तिथे इतरांना, प्राण्यांना, झाडांना मदत करतो, पर्यावरणाचा विचार करून ओला आणि सुका कचरा वेगळा करतो, कागद वाचवतो, पब्लिक ट्रान्स्पोर्टने प्रवास करतो, कुणाचे पाकिट सापडले तर ते त्याला प्रामाणिकपणे परत करतो, सगळी माणसे मानवजातीचे लेकरे आहेत असे मानतो आणि या बरोबरच देवाला क्षणभर हात जोडतो. त्याला सगळ्यांचं सगळं ठीक सुरु ठेवण्याची विनंती करतो आणि आपल्या कामाला लागतो. आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून माझ्या कौशल्यांना धार येण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करतो आणि माझ्या प्रगतीचा विचार करतो. थोड्याबहुत फरकाने माणसे अशीच वागतात. यात वावगे काय? निष्काम भक्तीच्या नादी लागून मी माझ्या कुटुंबाला वार्यावर सोडायचे, कामधंदा सोडून तपस्या करत बसायची आणि देवाने दृष्टांत द्यावा म्हणून अडून बसायचे हे कितपत पटण्यासारखे आहे? किंबहुना माझ्या स्वार्थासाठी मी माझ्या कुटुंबाचा बळी देत आहे, माझ्या जबाबदार्यांपासून पळून जात आहे असली पापे माझ्या माथ्यावर नाही पडणार? माझा स्वार्थ काय तर मला देवाचा दृष्टांत हवाय. समजा तो मिळाला तरी त्याने काय होणार? माझी सगळी दु:खे दूर होणार, मी जगाला मार्गदर्शन करू लागलो आणि सगळ्यांची दु:खे दूर करू लागलो किंवा सगळ्यांनीच निष्काम भक्तीचा पाठपुरावा सुरु केला तर जग चालणार कसे?
जग हे मूलतःच समतोल आहे. चांगले आहे, वाईट आहे. वाईट आहे म्हणून चांगल्याची किंमत आहे. अंधार आहे म्हणून दिवसाचे महत्व कळते. माझ्याकडे पैसा कमी आहे आणि माझ्या मित्राकडे जास्त आहे म्हणून माझ्या मनात जास्त पैसे कमविण्याची ईर्षा आहे. म्हणून मी जास्त काम करतो, जास्त शिकतो, जास्त खर्च करतो आणि मी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे कितीतरी कारखाने चालतात, कुटुंबे पोसली जातात. कुठेतरी विकृती आहे म्हणून सकृतीला महत्व आहे. विकृती आहे कारण लोकांना विकृतीचे परिणाम कळावेत आणि त्यांनी शहाणे व्हावे म्हणून. असे सगळे जग हे एका समतोल तराजूने तोलले गेले आहे. आपण आपला दृष्टीकोन आणि विचार कसे ठेवतो यावर भक्तीचे, आराधनेचे सत्व ठरते असे मला वाटते.
अर्थात ही माझी मते आहेत. कुणावरही लादण्याचा विचार आजिबात नाही. :-) कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
--समीर
जबरदस्त प्रतिसाद.
शब्द न शब्द मनातला..
>>>>>>
आपण प्रतिकात्मक म्हणून जरी या गोष्टीचा विचार केला तरी प्रतिके जास्त चांगली आणि अनुरुप देता येऊ शकतात..
>>>>>>
+१००००
प्रतिक्रिया
मिपा संपादकांना प्रश्न
>> परंतु या लेखिकेचा असे लेख
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती
शुचि ताई ...
माझा प्रतिसाद
भक्ती करताना ती काही तरी
नाहि !!
या कारणांपलिकडे देखील एक कारण
इंटरनेटस्नेही
अर्धवटराव
हो आणि नाहि !!
अर्धवटराव
मुळात कोणतीही क्रिया निष्काम
करेक्ट !!
अंधश्रद्धा !!
जाहीर माफी
"कोणताच" धागा परत निघणार नाही माझ्याकडून
सहमत आहे
डोण्ट वरी
याला निष्काम ईमोशनल
केशवसुनीत?
केशवसुनीत = केशवसुमार +
क्षमस्व."मिपावरती मी
माफी नको
एक नंबर गोष्ट ... आवडली
(विषय दिलेला नाही)
तिने एक चूल मांडून तीवर एक
समजले
माझा आक्षेप संपादकांना
हा हा... असं असेल तर मग
हू केअर्स? "पोरेही कापून
आणि स्वतःची चूक दुसर्यांनी (
श्री गुरुदेव दत्त...
सगळ्यांनी अशा कथा वाचल्या
कथा वाचल्या / ऐकल्या आहेतच.
भर पडायला नको असे
तुम्हाला नाही, मदनबाण यांना
वोक्के सर..
ह्म्म... वरील काही प्रतिसाद
हॅ हॅ हॅ , काय चर्चा चालू
अतिशय टुकार आणि वादग्रस्त
धाग्याच तात्पर्य: बोकड आणि
धाग्याच तात्पर्य: बोकड आणि
वाघ, सिंह आपल्या बछड्यांची शिकार करत नाहीत
^^तुमच्या समजुतीनुसार खरं
प्रिय शुची काकु
मला अजून एक बोथ कथा माहित आहे
पटले नाही
जबरदस्त प्रतिसाद. शब्द न शब्द
__/\_ बेस्ट प्रतिसाद!