सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!
सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!
कराचीहून प्रसिद्ध होणार्या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे! वाचा खाली दिलेल्या दुव्यावर!
http://www.dawn.com/2010/12/21/tendulkar-s-feat.html
Tendulkar’s feat
December 21, 2010
ताजमहालाला वीट लावण्याचा प्रयत्न न करता मी एवढेच लिहितो कीं हे वृत्तपत्र म्हणते कीं सचिनचा पराक्रम केवळ क्रीडाक्षेत्रापुरता मानणे चुकीचे ठरेल तर तो शास्त्र, कला, साहित्य या सर्व क्षेत्रातील विक्रमाच्या तोडीचा आहे. अतीशय स्पर्धात्मक अशा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात २० वर्षे खेळू शकणे हाच एक विक्रम ठरेल. सचिनच्या स्वभावाचे (temperament) आणि स्वतःच्या खेळाला परिस्थितीनुरूप बदलण्याच्या कौशल्याचे कौतुक करून या वृत्तपत्राने त्याच्या धैर्याचे, क्रिकेटच्या वेडाचे (passion) आणि मनोनिग्रही स्वभावाचेही कौतुक केले आहे.
'डॉन' म्हणते कीं अर्धी कारकीर्द झाली असतानाच त्याची तूलना सर्वश्रेष्ठ फलंदाज डॉन ब्रॅडमनबरोबर होऊ लागली होती. (सर डॉन स्वतःच त्याचा उल्लेख कौतुकाने bonzer असा करीत-मी.)
डॉन म्हणते कीं सचिनला फलंदाजी करताना पहाणे एक अहोभाग्यच होते! "आज या विक्रमवीराचा हा उत्तुंग पराक्रम समारंभपूर्वक साजरा करूया" असे म्हणत हा लेख डॉनने संपविला आहे. दिलेला दुवा उघडून मूळ इंग्रजीतील लेख जरूर वाचा.
याद्या
2759
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
कराचीहून प्रसिद्ध होणार्या
श्री. टारझन, आपल्याला मोरल
In reply to कराचीहून प्रसिद्ध होणार्या by टारझन
शेखरराव , आपल्याला काल
In reply to श्री. टारझन, आपल्याला मोरल by शेखर
वैद्याचा वेष?
In reply to शेखरराव , आपल्याला काल by टारझन
http://tinyurl.com/2bta4lq
डॉन ने काय म्हंटले त्यापेक्षा
ये तो अपनी-अपनी पसंद है!
In reply to डॉन ने काय म्हंटले त्यापेक्षा by विजुभाऊ
बातमीबद्दल धन्यवाद
वा, वा, शचिताई! सुरेख श्लोक!