आहेर किंवा भेटवस्तू देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. प्रसंगानुरुप किंवा प्रसंगाशिवाय भेटवस्तू देणं किंवा स्वीकारणं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे; इतकं अंगवळणी पडलं आहे की वस्तू काय आहे, तिची उपयुक्तता काय आहे, त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का, त्या वस्तूची किंमत किती आहे वगैरे बाबी लक्षात न घेता आहेर किंवा भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात.
आता हेच बघा ना, लग्नातला आहेर किती गमतीदार असतो. अगदी जवळच्या नात्यातलं लग्न नसेल तर आहेर विकत घेतला जात नाही; तो घरातच जुळवला जातो. कुठलीतरी आहेरात आलेली साडी, त्यावरचं ब्लाऊजपीस, असाच कुठलातरी किमान पाच घरे फिरून आलेला मळका शर्टपीस आणि पाकीटात घातलेले १०० रुपये इतक्या स्वस्तात आहेर गुंडाळला जातो.
आमचे एक काका आहेत; ते तर घरातल्या किती लोकांना जेवायला बोलावलं आहे यावर आहेर ठरवतात. एकालाच असेल तर फक्त मुख्य व्यक्तीला आहेर; सगळ्यांना असेल तर वरीलप्रमाणे सगळ्यांना आहेर असा त्यांचा खाक्या असतो. तीन-चार वर्षांपूर्वीची एखादी साडी एखाद्या नामांकित साडीच्या दुकानाच्या पिशवीत घालायची, त्यातच घडी बदलून स्वच्छ भाग वर आणलेला शर्टपीस टाकायचा आणि निघायचे. लग्नात पोहोचल्यावर पाकीटात पैसे घालायचे आणि सगळा आहेर अगदी प्रेमाने द्यायचा. जे आहेर घेतात ते देखील अगदी निर्विकार चेहर्याने तो बाजूला ठेवतात. बहुधा तेव्हाच तो आहेर कुणाला द्यायचा याचा ते विचार करत असावेत.
काही अतिउत्साही मंडळी असली पोतेरं झालेली साडी घडी मोडून मुख्य महिलेच्या अंगावर पांघरतात. दीड-दमडीच्या जुनाट साडीच्या बळावर ही मंडळी "नेसायची बरं का आमची साडी, खास पेशवाईमधून आणलीये.." असा आग्रह करून प्रेम, माया, प्रेमळ हक्क इत्यादी सगळ्या भावनांची बरसात करतात. निमूटपणे साडी पांघरून घेणारी स्त्री काही कच्च्या गुरुची चेली नसते; ती निवांत वेळ मिळाल्यावर त्या साडीला घडी करून इस्त्री करून जपून ठेवते, अशीच कुठेतरी खपवण्यासाठी! अशा प्रकारे ती साडी किमान दहा ठिकाणी 'आहेराची साडी' म्हणून मिरवल्यानंतर शेवटी कुठल्यातरी मोलकरणीला दिली जाते.
असा आहेर देतांना खूप काळजीपूर्वक द्यावा लागतो. एकदा आमच्या लग्नात कुणीतरी दिलेली साडी पुन्हा कुठल्याशा समारंभात पुन्हा त्याच व्यक्तीला दिली गेली होती. त्यावरून खूप गोंधळ उडाला होता. त्या काकू पडेल चेहर्याने साडी स्वीकारत आहेत असे जाणवल्यावर तपास सुरू झाला. त्यांच्या चेहर्यावरचे भाव टिपण्यासाठी एक वेगळी हुशारी लागते. मग बायकांमध्ये कूजबूज सुरू झाली. विश्वसनीय सूत्रांकडून त्यांनीच आहेरात दिलेली तीन वर्षांपूर्वीची साडी पुन्हा त्यांनाच दिली गेली आहे असे कळले. हे विश्वसनीय सूत्र खूप जबरदस्त असते. दहा वर्षांपूर्वी ठमीच्या लग्नात ठमीच्या आईने ठमीच्या होणार्या नवर्याच्या भावाच्या सासूबाईंना कुठली साडी दिली होती हे या सूत्रांना बरोब्बर आठवते. आज नवर्याने खर्चासाठी दिलेले हजार रुपये क्षणात विसरू शकणारी ही सूत्रे दहा वर्षांपूर्वीची साडीची देवाण-घेवाण नीट लक्षात ठेवतात. एवढेच नव्हे तर मयुरीची काकू मंदारच्या लग्नात बैंगनी हिरव्या रंगाचा शालू नेसून आली होती आणि त्या शालूला पदरावरच्या सोनेरी काठाजवळ बारीक छिद्र पडले होते हे देखील त्यांना पक्के आठवत असते.
"काय मेलं लक्षण, शोभतं का हे? नवरा एवढा ओरबाडून कमवतोय, मुलगा एवढ्या नोटा छापतोय आणि शालूला छिद्र? एक नवीन शालू नाही घेता आला चंपावंन्सना..." असं बोलून हे सूत्र इतर बायकांची सहमती मिळवते. बायका माना हलवतात. असे हे विश्वसनीय 'मंगळ'सूत्र पोलीस सूत्रांपेक्षाही जास्त विश्वसनीय असते. शिवाय चंपावंन्सना नावे ठेवण्याची संधी दवडली तर बाकीच्या बायका काय म्हणतील ही भीती असतेच. असो.
साडीमुळे झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी मग "अहो, ती साडी कशी बरं आहेराच्या सामानात ठेवली गेली लक्षातच आलं नाही. घाईत तयारी केली की असं होतं बघा. माझी नेहमीच्या नेसण्यातली साडी आहे ती...." असं काहीसं बोलून वेळ मारून नेण्याची हुशारी अंगी बाणवावी लागते.
भेटवस्तू देण्याची पद्धत आता चांगलीच रुळली आहे. पूर्वी कुणाकडे खूप दिवसांनी जातांना काही घेऊन जाण्याची पद्धत नव्हती. फार तर घरी केलेले लाडू किंवा खोबर्याच्या वड्या घेऊन जायची प्रथा होती. आता मस्त चकचकीत खोक्यात घालून पेढे, मिठाई असला महागडा खाऊ नेण्याची पद्धत रुढ होत आहे. अर्थात अशी पद्धत प्रामुख्याने शहरात जास्त आढळते.
मागे आमच्या वास्तुशांतीच्या समारंभात कुणीतरी एक कुत्र्याचा मोठा मातीचा पुतळा दिला होता. मला हसावे की रडावे कळेना. कुठे ठेवणार होतो आम्ही त्याला? शेवटी आम्ही तो आमच्या घरी काम करणार्या बाईच्या मुलाला खेळायला देऊन टाकला. पुनर्वापरास अगदीच अयोग्य अशी ती भेट होती. पण तेच माझ्या मित्राच्या बायकोने एक खूप छान फायबरमध्ये घडवलेले म्युरलटाईप शिल्प दिले होते. ते इतके सुंदर होते की आम्ही ताबडतोब ते बैठकीत लावून टाकले.
खूप निक्षून आहेराला आणि भेटवस्तूंना नकार दिला तरी काही मंडळी अगदी आग्रहाने आहेर देतात. नाही स्वीकारल्यास "तुम्ही जर हे घेतलं नाही तर आम्ही तुमच्या पुढच्या कुठल्याच कार्यक्रमाला येणार नाही" अशी धमकी देतात. अगदी निकराने नाही म्हटलं तर काही लोकांना चक्क राग येतो. मग "गरीबाचं गिफ्ट तुम्ही कशाला घ्याल; तुम्ही मोठ्या लोकांचा आहेर घ्याल. आता आलं लक्षात आमच्या..." वगैरे बडबड करून वैताग आणतात. मग नाईलाजाने त्यांचं गिफ्ट स्वीकारावं लागतं. बरं एवढा आकांडतांडव करून देतात काय तर डागाळलेला शर्टपीस किंवा चुरगळलेली मातकट रंगाची बघताच झुरळासारखी झटकून टाकावी अशी साडी!
आजकाल 'नो आहेर' ची जी प्रथा रुजतेय ती खरच स्तुत्य आहे. तुम्ही काहीच देऊ नका आणि आम्ही पण काहीच देणार नाही असा समंजसपणा असला तर रुसव्या-फुगव्यांना जागाच उरत नाही. कार्यक्रमाला जावं, मस्त जेवावं, लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना भेटावं, निवांत गप्पा हाणाव्यात आणि मजा करावी इतकाच जर स्कोप ठेवला तर समारंभाची लज्जत आणखी वाढते.
त्यातल्या त्यात आहेर किंवा वस्तू देणं-घेणं जर आवश्यक असेल तर मी रोख रकमेला प्राधान्य देतो. उगीच महागड्या वस्तू देण्यापेक्षा जर तितकीच रक्कम दिली तर तिचा विनियोग आपल्याला जशी गरज असेल तसा करता येतो. आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस आम्ही आहेर स्वीकारणार नाही असे बजावले होते पण एक छोटीशी आठवण म्हणून दहा ग्रॅमचे चांदीचे नाणे प्रत्येक कुटुंबाला दिले होते. साड्या, ब्लाऊजपीस, शर्टपीस असल्या निरर्थक गोष्टींना फाटा देऊन सुटसुटीत परंतु नेमके गिफ्ट दिल्याने सगळेच खुश झाले होते. मी स्वतः शक्य तितक्या ठिकाणी रोख रक्कमच देतो. एका गटाने एकत्र करून रक्कम दिली तर खूप मोठी रक्कम जमा होते ज्याचा हवा तसा उपयोग करणे शक्य होते. प्रत्येकाने वेगळे (कुणी कुत्रा, कुणी भिंतीवरचे घड्याळ, कुणी पुष्पगुच्छ, कुणी शर्टपीस, कुणी गणपतीची मूर्ती ) आणि तितकेच अनावश्यक गिफ्ट दिल्याने गिफ्ट देण्यामागची भावना तर कळते पण ती फक्त भावनाच राहते; तिचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. आमच्या एका मित्राच्या लग्नात आम्ही मित्रांनी रक्कम गोळा केली; ती सात हजाराच्या आस-पास होती. आम्ही आधी मित्राला विचारले की आमच्याकडे इतके पैसे आहेत, तुला कॅश हवी की एखादी वस्तू हवी. त्याने आम्हाला त्याला आवश्यक वाटणारी वस्तू सांगीतली आणि लग्नाच्या आधीच ती त्याचाघरी पोचती करण्यात आली.
गिफ्ट व्हाऊचर हा एक तसलाच निरर्थक प्रकार. मोठ्या शोरूमची किंवा मॉल्सची गिफ्ट व्हाऊचर्स तसं पाहिलं तर महाग पडतात. शंभर रुपयांचं एखाद्या मॉलचं गिफ्ट व्हाऊचर फक्त त्याच मॉलमध्ये चालतं. तिथे बाहेर ऐंशी रुपयांना मिळणारी वस्तू तुम्हाला व्हाऊचरच्या बदल्यात शंभर रुपयांना देतात; म्हणजे वीस रुपयांचा तोटा होतो. शिवाय तिथूनच काहीतरी खरेदी करण्याचं बंधन येतं हा मुद्दा निराळा. त्यामुळे गिफ्ट व्हाऊचर्सदेखील शक्यतो टाळावीत या मताचा मी आहे.
आहेर किंवा गिफ्ट देणं हे एका चांगल्या भावनेपोटी घडणारं कृत्य असतं. थोडी कल्पकता वापरून घेणार्याच्या चेहर्यावर आनंद आणता येतो. अगदीच वेळ नसला तर कॅश तो हर दर्द का अक्सीर इलाज हैं...
वाचने
32262
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज नवर्याने खर्चासाठी दिलेले
भारीच ...
+१
In reply to भारीच ... by छोटा डॉन
हा हा हा ! जबर्या लेख मालक.
वा वा
In reply to हा हा हा ! जबर्या लेख मालक. by परिकथेतील राजकुमार
काही काळापुर्वी केएसचा एक
In reply to वा वा by समीरसूर
नो आहेर!
बरेच आहेर मिळालेले दिसताहेत
थोडे मिळाले
In reply to बरेच आहेर मिळालेले दिसताहेत by प्रीत-मोहर
फर्मास लेख. विश्वसनीय
वहीत लिहून घेणारा
In reply to फर्मास लेख. विश्वसनीय by नगरीनिरंजन
जबरदस्त एकदम विश्वसनीय सुत्र
मस्त लेखन !!
मस्त
छान !
मला ९९% चान्गल्याच भेटी
सासूबाईंवर खूपच जीव आहे वाटतं
In reply to मला ९९% चान्गल्याच भेटी by पर्नल नेने मराठे
मी साड्या वापरत नाही तरी लोक
In reply to सासूबाईंवर खूपच जीव आहे वाटतं by समीरसूर
एक नंबर लेखण - टारझन आमची
- टारझन आमची उपस्थिती हाच
In reply to एक नंबर लेखण - टारझन आमची by टारझन
मस्त लिहिलं आहे. चुच्सचा
मस्त..
रास्त शंका
In reply to मस्त.. by योगी९००
पुढच्या वेळी कधी समारंभ आहे
In reply to रास्त शंका by समीरसूर
+१
In reply to पुढच्या वेळी कधी समारंभ आहे by परिकथेतील राजकुमार
२०३७ मध्ये
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
तरीही असहमत
In reply to रास्त शंका by समीरसूर
काय करायचे?
In reply to तरीही असहमत by सखी
(विषय दिलेला नाही)
In reply to काय करायचे? by समीरसूर
तुमच्या भावना पोहोचल्या..
In reply to रास्त शंका by समीरसूर
अहो
(विषय दिलेला नाही)
In reply to अहो by ५० फक्त
मी अहेर म्हणुन फक्त खालील
मी अहेर म्हणुन फक्त खालील
In reply to मी अहेर म्हणुन फक्त खालील by इंटरनेटस्नेही
येवढ्या पैशात तुझे अजुन एक
In reply to मी अहेर म्हणुन फक्त खालील by परिकथेतील राजकुमार
कसला आलाय खत्री प्रतिसाद ,
In reply to येवढ्या पैशात तुझे अजुन एक by इंटरनेटस्नेही
कसला आलाय खत्री प्रतिसाद ,
In reply to कसला आलाय खत्री प्रतिसाद , by रेवती
मस्त लेख! मला इथली गिफ्ट
:-)
खरे आहे लिहीलेले. बरेचदा मी
खुसखुशीत लेख..
मस्त प्रतिसाद..
In reply to खुसखुशीत लेख.. by उपास
ग्रीटींग कार्ड
In reply to मस्त प्रतिसाद.. by योगी९००
>>त्यापेक्षा दोन इडली-चटणीची
In reply to ग्रीटींग कार्ड by समीरसूर
करेक्ट
In reply to खुसखुशीत लेख.. by उपास
लेख आवडला.
आहेर,नाहीतर बाहेर!!!
+ १
In reply to आहेर,नाहीतर बाहेर!!! by असुर
मेवे
In reply to + १ by मेघवेडा
कुठल्याश्या मॉलचे किंवा महाग
आहेर नाही पण लग्नाच्या
बेस्ट!
In reply to आहेर नाही पण लग्नाच्या by कानडाऊ योगेशु
>>लग्नाच्या पहील्या
In reply to आहेर नाही पण लग्नाच्या by कानडाऊ योगेशु
मस्त लेख अमोल केळकर
आभार
मस्त लेख! या आहेरा वरून
मीही
मस्त लेख..काहीतरी फुटकळ, अगदी
मलाही आहेर पद्धत आवडत
मस्त लिहीले आहे!
टिपीकल लग्नातले किंवा इतर
फोटो
In reply to टिपीकल लग्नातले किंवा इतर by पक्या
आहेर आणू नये या वाक्याला
आहेर लग्नातला !