नाताळ म्हटला की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टसची एकच गर्दी होते. वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, पाय, कुकीज आणि विविध प्रकारची चॉकलेटं. त्यातलाच माझा आवडता प्रकार म्हणजे ट्रफल्स. तोंडात टाकताच विरघळणारे आणि बनवायलाही अगदी सोप्पे. तसेच बेसिक रेसिपीत फ्लेवरिंग किंवा वरुन लावायचे कोटिंग बदलून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रफल्स करता येतात. खाली दिलेल्या मापात साधरण ६० ट्रफल्स होतात.
साहित्य
बेस रेसिपी
८ औस क्रिम चिज, मऊ केलेले
२ कप चॉकलेट चिप्स
२ कप आयसिंग शुगर
२ चमचे व्हिपिंग क्रिम
१ चमचा वॅनिला इसेंस
किंवा
मोठ्यांसाठी बनवणार असाल तर फ्लेवर साठी रम, ब्रॅन्डी
ट्रफल्स घोळवण्यासाठी थोडे ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको
कृती
एका मोठ्या बोलमधे क्रिम चिज फेटुन घ्या. आता त्यात थोडी थोडी साखर घालून फेटा. मायक्रोवेव मधे किंवा डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. हे वितळलेले चॉकलेट, क्रिम आणि वॅनिला क्रिम चिजच्य मिश्रणात घालुन फेटा. एकजिव झाले की तासभर फ्रिजमधे ठेवा. तासाभराने बाहेर काढुन एक गोळी करुन बघा. हाताळायला कठिण वाटल्यास जास्तवेळ फ्रिजमधे ठेवा. आता या मिश्रणाचे आपल्या तिळाच्या लाडवासारखे लाडू बनवा. हे बनवलेले लाडु ड्रिंकिंग चॉकलेट मधे घोळवा. यम्मी ट्रफल्स तयार!
बेस रेसिपीतील फ्लेवरिंग साठी वॅनिला ऐवजी आल्मन्ड किंवा पेपरमिंट वापरु शकता. तसेच ट्रफल्स घोळवण्यासाठी वेगवेगळ्या नटसचा चुरा वापरु शकता किंवा मेल्ट केलेल्या व्हाइट किंवा डार्क चॉकलेट मधे बुडवुन चॉकलेटचे आवरण बनवू शकता.

वाचने
5534
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई ग!
छानच हो !!! HR मधे राहुन
In reply to आई ग! by स्वैर परी
भारी!
In reply to छानच हो !!! HR मधे राहुन by पर्नल नेने मराठे
मस्त
स्वाती
नुसते पाहूनच किलोभर वजन
छाण दिसत आहेत गुलाबजाम !!
खल्लास स्वातीतै. जबरा प्रकार
आहा!!! मस्तच!! एकदम खास!!
धन्यवाद मंडळी! कॅलरीजची काळजी
आई गं ...स्वाती..!
अरे देवा!मी या धाग्यावर आलेच
रेवती काय हे??????????? हा हा
गोग्गोड !
माझा पत्ता देउ का? पाठवुनच
पाककृतीचं नाव वाचूनच मला कळलं
वेड पाकृ !! फोटु तर काय
मी केले.
मुम्बईत कुठे 'बरोबर' ट्रफल्स
In reply to मी केले. by कवितानागेश
शॉलिट्ट !!! शॉलिट्ट !!!