काल-परवा काही कामानिमित्त सोलापूरला जाणे झाले. आता पुणे-सोलापूर प्रवास महामार्गावरुन करणे अशक्यच वाटते, त्यामुळे ट्रेनचा पर्याय निवडला.. तिकडुन येताना दुपारच्या ईंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अतिरीक्त डब्यात आरक्षण मिळाले होते. शुक्रवार त्यात मोहरम त्यामुळे गर्दी असणार हे अपेक्षित होतेच पण आरक्षणही अतिरीक्त ड्ब्यात मिळाल्याने काहिसा नाखूषच होतो.. पण पर्याय नसल्याने आत घुसून माझी जागा शोधली.. जागा मात्र खिडकीशेजारी असल्याचे बघुन जरा हायसे वाटले. (आम्ही नेहमीचे रेल्वेप्रवासी नसल्याने आरक्षण करताना ex02 म्हणजे अतिरीक्त डबा असतो हे समजले नाही त्यामुळे अगोदर हा डबा सापडायलाच पळापळ झाली !).. थोड्यावेळाने माझ्याशेजारी एक मुस्लीम महिला येऊन बसली (तिच्या बुरख्यामुळे कळले !). तिच्यासोबत एक ५-६ वर्षांचा लहान मुलगाही होता..दिसायला चुणचुणीत होता. प्रवास सुरू होऊन थोडा वेळ जाताच त्या मुलाने माझ्याशी संभाषण सुरू केले. ते अशाप्रकारचे होते..-
तो मुलगा- "आप कहां जा रहे हो?"
मी- "पुणे जा रहां हू , तुम कहां जा रहे हो?"
"मै भी पुणे जा रहां हू, आपका पुणे कब आयेगा ?"
"अरे बेटा, पुणे एकही है, ६ बजेतक पुणे आ जायेगा", ईति मी..
"नही, हमारा पुणे एकदम रातको आयेगा !", मग त्याच्या मम्मीकडे वळून, "है ना अम्मी?".. त्याच्या अम्मीचा डोळा लागला होता. डोळे अर्धवट ऊघडत ती पुटपुटली, "बेटा ऊन्हे परेशान मत करो" अन तिने परत डोळे झाकले. त्यानंतर तो मुलगा शांत बसला.. ५ मिनिटे गेल्यावर मीच त्याला विचारले, " अच्छा? तो पुणे मे किसके पास जा रहे हो?"
तो मुलगा- "मामू के पास, मामू को लडकी हुइ है ना, ईतनीसिच है !"
"तुम्हारा नाम क्या है?", मी.
"शिराज ! मेरे मामूनेही रखा है नाम."
" अच्छा तुम्हारे मामा कितने बडे है?"
"मामा नही, मामू ! वो तुमसेभी बडे है" नंतर बाहेरच्या झाडाकडे बोट दाखवत, " वो पेड जितने बडे है !"
मला हसू आलं. मी म्हणालो, " मेरे मामा भी ईतने बडे है."
मग ह्या पिल्लाने आकाशाकडे बोट दाखवून मला म्हणाला, " मेरे मामू तो अल्ला जितने बडे है."
अल्ला शब्द ऐकल्याने मी त्याला सहज विचारले, "अल्ला मतलब क्या?" "नही पता, पर वो सबसे ज्यादा ताकतवर होता है!".. "हम्म..." , मी विचारले, " तुम्हे ईश्वर पता है?" "नही." मी नंतर जरावेळ शांत बसलो.. माझ्या हातात माझा मोबाईल होता, त्यात स्क्रीनसेव्हरला मी गणपतीचा एक अप्रतिम फोटो सेट केलाय, त्याकडे शिराजचे लक्ष गेले अन तो मला म्हणाला, "मुझे ये गणपती पता है!"
"अच्छा तो बताओ गणपती कौन है?", ईति मी.
"गणपती भी अल्लाह है !"
त्याच्या ह्या ऊत्तराने मी अवाक झालो. त्याला विचारले, " ये तुम्हे किसने बताया?"
" मेरी अम्मीने", त्याच्या अम्मीच्या कुशीत शिरत शिराज म्हणाला....
त्या चिमुरड्याच्या ह्या निरागस ऊत्तराने मी भारावलो होतो... पण त्याला असे संस्कार देणार्या त्याच्या अम्मीलाही मी मनोमन प्रणाम केला...
दांभिक धर्मनिरपेक्षतेचे पांघरुण घालून हिंडणार्या अन समाजात तेढ निर्माण करणार्या लांडग्यांपेक्षा मला शिराज अन त्याची अम्मी धार्मिक ऐक्याचे खरेखुरे निरागस राजदूतच वाटले......
वाचने
3969
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला. धरमाच्या नावाने
मनभावन कहाणी. पण तरीही
+१ बाकी लेख अन त्या मुलाच्या
In reply to मनभावन कहाणी. पण तरीही by नगरीनिरंजन
कृपया माझा वरील प्रतिसाद
In reply to मनभावन कहाणी. पण तरीही by नगरीनिरंजन
काही
In reply to कृपया माझा वरील प्रतिसाद by नगरीनिरंजन
हम्म हे चांगले उदाहरण आहे.
In reply to काही by क्रेमर
लेख आवडला..
बरीच वर्षे झालीत.
In reply to लेख आवडला.. by योगी९००
दुपारी २-६ सोलापुर -पुणे
In reply to बरीच वर्षे झालीत. by चिंतामणी
सारे हिंदू भारतात येशू
दांभिक धर्मनिरपेक्षतेचे
शिराजची अम्मी मोठी हुषार
हा खरा अनुभव असेल तर त्या
+१
In reply to हा खरा अनुभव असेल तर त्या by गणपा
कोणता प्रतिसाद वाचून त्या
In reply to हा खरा अनुभव असेल तर त्या by गणपा
+१०००० सहमत
In reply to हा खरा अनुभव असेल तर त्या by गणपा
जर मनात आलं तर सगळे( अ ते झ )
माझ्या मते 'अ' कोन्ताच धर्म
In reply to जर मनात आलं तर सगळे( अ ते झ ) by टारझन
आई महान असते..शिराज माता महान
चांगला आहे हा अनुभव. मलाही
कोणाचे भक्त व्हा नाहीतर नका
In reply to चांगला आहे हा अनुभव. मलाही by प्राजु
एक साधी घटना मी एक निरक्षण
In reply to कोणाचे भक्त व्हा नाहीतर नका by शिल्पा ब
!!!!!
मस्त!
Rishikesh Chindarkar likes
ग्रेट !!
हाहाहा प्रसंग आवडला.