मुलांची कोडी
शब्द कोडी मुलांकरता
माझी धाकटी नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागली तेंव्हा सर्व आजी-आजोबांच्या मनात असते तशी [निरर्थक] भीती माझ्या मनातही निर्माण झाली " आता हीच्या मराठीचे काय ?" शेजारची मुले-मुली मराठीच होती पण तीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधलीच! तेंव्हा आता ही जबाबदारी आजी-आजोबांचीच असे ठरवून एक ठरवले की तीच्याशी
बोलतांना आपण इंग्रजी शब्द टाळावयाचे. तीलाही तसेच सांगावयाचे. पण एवढे पुरेसे वाटले नाही. . वर्ष दोन वर्षे गेली. मग आम्ही एक निराळा खेळ सुरु केला. तीला तीन-चार अक्षरांचा मराठी शब्द द्यावयाचा व त्यापासून, त्यातील अक्षरे घेऊन निरनिराळे शब्द बनवावयाचे. उदा.मगर पासून मग, गर, मर, रग,गम वगैरे. सुरवातीला इंग्रजी-हिंदी शब्द करावयासही मुभा दिली. काही दिवस आम्ही शब्द देत असू व तीला शब्द बनवावयास सांगत असू. नंतर थोडा बदल केला.
शब्दकोड्यासारखे पहिल्या दोन अक्षरांपासून बनणाऱ्या शब्दाचे [clue]शोधसूत्र, तिसऱ्या व पहिल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे शोधसूत्र , इत्यादी सांगावयाचे व तीने मुख्य शब्द ओळखावयाचा. उदा. तीन अक्षरी शब्द.पहिले व दुसरे अक्षर = गरम उबदार पांघरुण, दुसरे व तिसरे अक्षर = किल्ला, पहिले व तिसरे अक्षर = भोकाड पसर. उत्तर = रगड. तीचा उत्साह वाढू लागला. व आता तीच आम्हाला कोडी घालते.
परवा तीने आम्हाला घातलेली कोडी देत आहे. तुम्हीही सोडवा.
[१] तीन अक्षरी शब्द. पहिले व दुसरे अक्षर घेतले की एक पेय,पहिले व तिसरे घेतले की अनोळखी माणसाला आपण विचारतो तो प्रश्न, दुसरे व तिसरे घेतले की बारीक तुकडा.
[२] तीन अक्षरी शब्द. पहिले व दुसरे अक्षर घेतले की पक्षाचा आवाज, दुसरे व तिसरे घेतले की खाण्याचा पदार्थ, पहिले व तिसरे घेतले की रागवा, तिसरे व दुसरे घेतले की खेळी.
पोरखेळ कसा वाटतो ?
ता.क. तीचे नाव सांगावयाचे राहिलेच ! माणसाच्या प्राथमिक गरजा घेतल्या की तीचे नाव तयार होते.
आता कोणी पेपर फोडला तरी बिघडत नाही कारण खरी मजा तुमची कोडी येथे येतील तेव्हाच येते. करा तर सुरवात.
शरद
प्रतिक्रिया
अवनी
नात खूप हुषार दिसते हो तुमची
मस्त आहे हा खेळ!!! लेकाला
छान एकदम .. उत्तर लगेच
नातीचे नाव अवनि? कोडे
मस्त खेळ आहे हा. आजच हे
मस्त, माझे कोडे
१) कानस २) मासळी
आता मी देते कोडे.
१. साधन २. बांगडी
बरोबर.
मस्त
१) तीन अक्षरी शब्द पहिले +
१. पापड २. पैयार?
पापड बरोबर. पैयार नव्हे
मस्त धागा! आता एक
पुण्यातला रस्ता
प्रभात रस्ता काय?
अरे हो हे उरलेच होते. उत्तर
उखाणेवजा पद्यात्मक कोडे छान जमले आहे.
व्वा मेवे!
घाला ना, घाला ना, अजुन कोडि
कोडे हवेय? बरं.
शिंक्याचे तुटले बोक्याचे
शेंडी हा शब्द असलेली सर्वात
मस्त धागा