पालक भात !
साहित्य :
दोन वाटी तांदूळ, ४ वाट्या बारीक चिरलेला पालक, थोडेसे मसाला व कच्चे शेंगदाणे, ३-४ लाल मिरच्या, पाणी, १ चमचा धने-जिरेपूड, ४ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, २ चमचे टोमॅटो सॉस , मीठ चवीपुरते.
कृती :
हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या . तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा , त्यात अर्धा चमचा हळद घालावी. १५- ते २० मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा. म्हणजे माती पाण्यात खाली बसेल . नंतर चाळणीतला पालक धुवावा. अलगद पाणी पिळून काढावे. पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग व लाल मिरच्या फोडणीस टाकून त्यावर थोडेसे पाणी फोडणीस टाकावे. त्यात मीठ, धनेजिरेपूड, उभ्या चिरलेल्या मिरच्या,कच्चे शेंगदाणे घालावे. उकळी आली म्हणजे तांदूळ व पालक घालावे. उकळी फुटली की दोन मिनिटे ठेवून नंतर तेच पातेले कुकरमध्ये ठेवून भात शिजवावा. नंतर २-३ चमचे साजुक तूप कडेने सोडावे.
वाढताना ओले खोबरे ,थोडेसे मसाला शेंगदाणे व कोथींबिर वरून पेरावे व टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावा.
हा भात मसालेदार भाजी-आमटीबरोबर सुध्दा छान लागतो.
याद्या
4010
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
पाकृ मस्तच !
धन्यवाद !!@!!
In reply to पाकृ मस्तच ! by स्वैर परी
ओ गडगे
In reply to धन्यवाद !!@!! by संजयशिवाजीरावगडगे
छान
छान