साहित्य :
पनीर टिक्का : पनीर - २५० ग्रॅम
लाल , पिवळी, हिरवी सिमला मिरची
आले लसुण पेस्ट - १ चमचा
मीठ
लाल मिरची पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
आमचुर पावडर - १ चमचा
लिंबाचा रस - १ चमचा
घट्ट दही - १/२ वाटी
तंदुरी कलर
चाट मसाला - १ चमचा
तेल - १ चमचा
चटणी : दही - १/२ वाटी
कोथिंबीर
हिरवी मिरच्या - २
मीठ
साखर- १/२ चमचा
लसुण पाकळ्या -२
कृती :
पनीर व सिमला मिरची यांचे समान आकारचे जरा जाडसर असे काप करावेत.
एका भांड्यात दही, आले-लसुण पेस्ट, लाल तिखट , मीठ, गरम मसाला , चाट मसाला , आमचुर पावडर ,
लिंबाचा रस , तंदुरी कलर, तेल एकत्र करुन फेटुन घ्या.
ह्या मिश्रणात पनीर व सिमला मिरचीचे काप व्यवस्थीत घोळवुन घ्या व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवुन द्या.
१० मिनिटांनंतर हे सर्व काप बार्बेक्यु स्टीक्सवर एका मागोमाग एक याप्रकारे लावा.
ओव्हन १० मिनिटे प्रिहीट करुन नंतर त्यात ठेवुन १० मिनिटे ग्रील करा. घरी मिनी तंदुर असेल तर त्यावरही भाजता येईल.
चटणी : सर्व साहीत्य मिक्सरमध्ये एकजीव वाटुन घ्या.
गरमगरम पनीर टिक्का चटणी व सॅलड सोबत खायला द्या

वाचने
9029
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे..
दुरूस्ती सुचवतो.
पाकृ झकास !!
मंडईचे समोर मिळतात.
लई भारी ! धन्यवाद
In reply to मंडईचे समोर मिळतात. by चिंतामणी
प्राजक्ता
मला शेन्द्री /तन्दुरी रंग
फुड कलर , ईसेंस ज्या दुकानात
In reply to मला शेन्द्री /तन्दुरी रंग by पर्नल नेने मराठे
छान
पनीर उर्फ थर्माकोल हा पदार्थ
चला कुणी तरी भेटला पनीर न
In reply to पनीर उर्फ थर्माकोल हा पदार्थ by परिकथेतील राजकुमार
मी पण आहे...
In reply to चला कुणी तरी भेटला पनीर न by गणपा
+ ३
In reply to मी पण आहे... by मस्त कलंदर
आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ
In reply to पनीर उर्फ थर्माकोल हा पदार्थ by परिकथेतील राजकुमार
परा, नुसती रोटी बुडवून
In reply to आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ by विंजिनेर
म्मस्त यम्मि पनीर आवड्त जाम
छान !!! अप्रतिम
सह्हीच!! करेन लवकरच.
मस्तच!
आवडला
मस्त फोटु
आयला !!!