Skip to main content

सावरकर आणि नास्तिकवाद

लेखक आमोद शिंदे यांनी शुक्रवार, 10/12/2010 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच मिपावर ने मजसी ने ह्या सावरकरांच्या अजरामर गीताची शताब्दी साजरी होत आहे त्या निमित्त काही विचार मनात आले. सावरकरांच्या विचारांचा चाहता असा एक मोठा गट मिपावर आहे जे मला नेहमीच सुखकारक वाटते. आजही त्यांची आणि त्यांच्या विचारांची आठवण नेमाने काढली जाते. पण त्याचवेळेस मिपावर भाविक/श्रद्धाळू असाही एक बहुसंख्य कल आहे. देवाचे अस्तित्व नाकारणारे किंवा श्रद्धावंताच्या भावनांना छेडणारे लेखन इथे नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरते. अशा लोकांना 'विचारजंत' वगैरे उपाध्याही मिपावरच जन्माला आल्या असाव्यात असे मला वाटते. तर अशावेळेस बहुसंख्य मिपाकरांना सावरकरांच्या नास्तिकवादा विषयी काय वाटते? आम्ही सावरकरांचे चाहतो आहोत पण त्या बाबतीत आम्ही पूर्ण असहमत आहोत असे साधारण मत आहे का? की सावरकरांना भक्तीरस/अध्यात्म/देव ह्या गोष्टी समजल्या नाहीत असे मत आहे? मिपावरील अनेक श्रद्धाळू, भाविक रथी महारथींचे ह्याविषयी मत ऐकून घेण्याचे कुतुहल आहे.

वाचने 17966
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by आमोद शिंदे

उद्या तुमच्याविषयीही कुणी खोटारडे आरोप केले तर मी तुमचीही बाजू घेउन निषेध करेन
आनंद वाटला. आम्हाला तर्काचे वावडे असल्याचा ''खोटारडा आरोप'' आमच्याविषयी केल्याबद्दल आमची बाजू घेऊन स्वत:चाच निषेध करावा, म्हणजे आमच्या आनंदाला चार चांद वगैरे लागतील!
बरं वादासाठी धरू की ते अ‍ॅग्नॉस्टिक होते. अ‍ॅग्नॉस्टिक म्हणजे सश्रद्ध नव्हे. तेव्हा सश्रद्धाच्या दॄष्टीकोनातून अथेइस्ट काय आणि अ‍ॅग्नॉस्टिक काय दोघांच्याही विचारांशी असहमती असली पाहिजे.
बरं. असहमती असली पाहिजे. मग? असहमती असली तर काय असहमत असलेले मत चुकीचे मानायचे का? की आपले मत चुकीचे मानून ती त्रुटी समजायची? समजा मी सश्रद्ध आहे. मग अ‍ॅग्नॉस्टिक विचारांना किंवा नास्तिक विचारांना चूक म्हणले पाहिजे का? मी नाही म्हणत. ज्याला वाटेल तसा करतो विचार. काय अडचण आहे? उद्या मी अ‍ॅग्नॉस्टिक होऊ शकतो, नास्तिक होऊ शकतो. पुन्हा आस्तिक होऊ शकतो. माणूस सतत बदलत असतो. अनुभव बदलत असतात. मन उघडे ठेऊन जगले तर विचार बदलत जातात. उदा. वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे सावरकर देखील बदलत गेलेले आहेत. सध्या आपल्याला जे काही वाटते तेच अंतिम सत्य आहे असे मानणे हे कोणत्या तर्कसंगत विचारसरणीत बसते? तुमचे जे काही विचार आहेत ते जन्मजात आहेत का? अनुभवानेच बनले ना? वेगळे अनुभव येणारच नाहीत, आणि सध्या आहेत ते विचार बदलणारच नाहीत असे म्हणता येते का? तुम्ही दिलेले दोन पर्याय असे आहेत – १) सदर व्यक्तिचे (बाकीचे) सर्व विचार पटले असले तरी काही विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे. (त्या व्यक्तीचे बाकीचे विचार महानच आहेत.. वगैरे वगैरे आहेच) २) सदर व्यक्तिच्या विचारांना चॅलेंज देण्याची माझी लायकी नाही, मला जे विचार पटत नाहीत ती मी माझी तृटी मानतो. पहिल्या पर्यायात विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे असेच कशाला असायला हवे? विचार बरोबर असूनही असहमत होता येते ना. काय एकाच प्रकारचा विचार बरोबर असतो काय? दुसऱ्या पर्यायात, चॅलेंज देण्याची माझी लायकी नाही असे जर कुणी म्हणले, तर पुढे लिहिलेले विचार पटणे हा भाग येतच नाही. विचार समजत नाहीत असे म्हणायला हवे. ‘पटत नाहीत’ असे म्हणायचे असेल तर पहिल्या पर्यायाकडे जावे. त्यामुळे या पर्यायाला अर्थ नाही.
संभोगातून समाधीकडे जाणारे किंवा गांजा ओढून अतिंद्रीय अनुभव घेणारे अध्यात्मीकच आहेत ना? माझ्या मते तो विषयच वेगळा आहे.
अध्यात्माविषयीचे आपले ज्ञान तोकडे आहे असे आपल्या या टिप्पणीवरुन वाटते असे नम्रपणे नमूद करतो. किंवा आपण सिलेक्टिव्हली काही नोंदी करता. असे काहीतरी आहे. योगदर्शनाला सेश्वर सांख्य, अर्थात ईश्वर मानणारे सांख्य दर्शन म्हणतात, अर्थात ईश्वर न मानणारेही सांख्य दर्शन आहे, आणि त्याला नास्तिक दर्शन म्हणत नाहीत. अशा प्रकारच्या अध्यात्माकडे मी लक्ष वेधले होते. असो. तुम्ही म्हणता तसे तो विषय वेगळा आहेच. सिलेक्टिव्ह किंवा तोकड्या ज्ञानावरुन सावरकरांसारख्या समृद्ध विचारवंताला ''नास्तिक'' अशा अतिशय संकुचित चौकटीत बसवून त्यांच्या ''भक्तांच्या'' मानसिकतेवर टिप्पणी करण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे. यात काही 'कुतुहल' वगैरे म्हणता तसे दिसत नाही. असो.

In reply to by आळश्यांचा राजा

उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन झाले असे गृहित धरु का?
आम्हाला तर्काचे वावडे असल्याचा ''खोटारडा आरोप'' आमच्याविषयी केल्याबद्दल आमची बाजू घेऊन स्वत:चाच निषेध करावा, म्हणजे आमच्या आनंदाला चार चांद वगैरे लागतील!
हा अरोप खोटारडा आहे असे सिद्ध होण्या इतपत विदा माझ्याकडे नाही, त्यामूळे तुर्तास निषेध नोंदवू शकत नाही.
समजा मी सश्रद्ध आहे. मग अ‍ॅग्नॉस्टिक विचारांना किंवा नास्तिक विचारांना चूक म्हणले पाहिजे का?
अर्थातच. सश्रद्ध आणि अ‍ॅग्नोस्टीक हे दोन्ही विरुद्ध विचार आहेत. तुम्हाला दोन्ही बरोबर वाटत असतील तर तुम्ही कन्फ्युज्ड आहात. (त्यापेक्षा आमचा नाना बरा.)
ज्याला वाटेल तसा करतो विचार. काय अडचण आहे?
ज्याला जसा वाटेल तसा विचार करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, त्यात अडचण काहीच नाही. पण त्याचा आणि विचार चुकिचा असण्याचा काय संबंध?
पहिल्या पर्यायात विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे असेच कशाला असायला हवे?
मग? चुकिच्या विचारांशी सहमत व्हायला हवे का?
विचार बरोबर असूनही असहमत होता येते ना. काय एकाच प्रकारचा विचार बरोबर असतो काय?
ते कसे काय? एखादा विचार तुम्हाला बरोबर वाटतो/पटतो, तरी तुम्ही त्याच्याशी असहमत का व्हाल?
सिलेक्टिव्ह किंवा तोकड्या ज्ञानावरुन सावरकरांसारख्या समृद्ध विचारवंताला ''नास्तिक'' अशा अतिशय संकुचित चौकटीत बसवून त्यांच्या ''भक्तांच्या'' मानसिकतेवर टिप्पणी करण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे. यात काही 'कुतुहल' वगैरे म्हणता तसे दिसत नाही.
सावरकर सश्रद्ध होते असा तुमचा दावा आहे काय?

In reply to by आमोद शिंदे

उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन झाले असे गृहित धरु का?
फार मुद्देसूद वाद घालत आहात. स्वतः टाळलेल्या मुद्द्यांचे काय? माझ्या अध्यात्मावरच्या मुद्द्याला बगल देऊन उपहासावर चर्चा करण्याची बरीच इच्छा दिसते. उपहास वगैरे मुद्द्यांचे खंडन झाले असे खुशाल समजा. तुम्ही काय गृहीत धरावे हे मी कशाला सांगायला हवे?
हा अरोप खोटारडा आहे असे सिद्ध होण्या इतपत विदा माझ्याकडे नाही, त्यामूळे तुर्तास निषेध नोंदवू शकत नाही.
तुमच्या वरील विधानावरुन, माझ्यावर आरोप केलेला आहे, हे तुम्ही मान्य करत आहात. माझे लेखन इथे उपलब्ध आहे. हवा तेवढा विदा मिळवू शकता, आणि आमचे तर्काचे वावडे सिद्ध करु शकता. आम्हाला तुमच्या सिद्धतेची आवश्यकता नाही हा भाग वेगळा. आपले म्हणणे खरे ठरवण्यासाठी तुम्ही अवश्य खोदकाम करु शकता.
अर्थातच. सश्रद्ध आणि अ‍ॅग्नोस्टीक हे दोन्ही विरुद्ध विचार आहेत. तुम्हाला दोन्ही बरोबर वाटत असतील तर तुम्ही कन्फ्युज्ड आहात. (त्यापेक्षा आमचा नाना बरा.)
हा अजून एक ''खोटारडा आरोप!" असो. आम्ही कन्फ्यूज्ड आहोत हे आपले 'मत' आहे. वैज्ञानिक विचारसरणीमध्ये प्रकाश वेव्ह आणि पार्टिकल अशा दोन्ही स्वरुपात असतो असे मान्य केले जाते, याला आपण वैज्ञानिक कन्फ्यूजन म्हणत असाल तरी ते आपले 'मत' असू शकते. तुमचा नाना कोण ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला दोन नाना माहीत आहेत. नाना पाटेकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील. ते दोन्ही आमच्यापेक्षा बरेच बरे आहेत हे आम्हाला माहीत आहे. ज्याला जसा वाटेल तसा विचार करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, त्यात अडचण काहीच नाही. पण त्याचा आणि विचार चुकिचा असण्याचा काय संबंध? मग? चुकिच्या विचारांशी सहमत व्हायला हवे का? आपली विचार करण्याची पद्धत हट्टाची आहे. वेगळा विचार म्हणजे चुकीचा, अशी ही पध्दत दिसते. म्हणजे तुम्ही समजा साम्यवादी असाल, तर भांडवलवाद तुमच्यामते चूक. ही तुमची विचारसरणी. आमच्यामते असे एका रेषेत विचार करणेच योग्य नाही. दोन्ही आपापल्या जागी काळ-वेळ यानुसार बरोबर असू शकतात, आणि तरीही असहमती असू शकते. एखादा विचार तुम्हाला बरोबर वाटतो/पटतो, तरी तुम्ही त्याच्याशी असहमत का व्हाल? हा तुम्ही काढलेला अर्थ आहे. चुकीचा आहे. विचार बरोबर वाटणे आणि पटणे या वेगळ्या गोष्टी आहेत. विचार बरोबर वाटतो, पण पटत नाही असे असू शकते. उदा. माझा भाऊ अमेरिकेतील चांगले करियर सोडून भारतातच सेटल व्हायचा विचार करतो. मला त्यात चूक काहीच वाटत नाही, पण तरीही पटत नाही. सावरकर सश्रद्ध होते असा तुमचा दावा आहे काय? सावरकर सश्रद्ध होते असा दावा मी केलेला नाही. माझे प्रतिसाद इथेच आहेत. मी त्यांना अ‍ॅग्नॉस्टिक मानतो. माझ्या मते वैज्ञानिक विचारसरणीचा माणूस एग्नॉस्टिकच असू शकतो. इथे कार्ल सेगनचे एक विधान आठवते - मी अज्ञेयवादी आहे; नास्तिकाला माझ्यापेक्षा खूप जास्त माहीत असते! तर सांगायचा मुद्दा असा, की सावरकर अ‍ॅग्नॉस्टिक होते असे मला वाटते. त्यांना मानणारा कुणी एखादा सश्रद्ध असू शकतो, किंवा अश्रद्ध असू शकतो. त्यात त्याची काही त्रुटी असली पाहिजे असे मला वाटत नाही, तसेच त्याने सावरकरांना चुकीचे मानले पाहिजे असेही मला वाटत नाही. यावरून मला तर्काचे वावडे आहे असा समज करुन घेतल्यास माझी काहीही अडचण नाही!

In reply to by आळश्यांचा राजा

माझ्या अध्यात्मावरच्या मुद्द्याला बगल देऊन उपहासावर चर्चा करण्याची बरीच इच्छा दिसते.
उपहासाच्या मुद्यावर चर्चा लांबावयाची नाही म्हणूनच त्याचे खंडन झाल्याची खात्री करुन घेतली. अध्यात्माचा विषय वेगळा आहे ह्या माझ्या मतावर तुम्ही सहमती दाखवल्याने मला त्यावर अधिक चर्चा करायची इथे गरज वाटत नाही.
तुमच्या वरील विधानावरुन, माझ्यावर आरोप केलेला आहे, हे तुम्ही मान्य करत आहात.
आरोप हा शब्द तुम्ही वापरला आहे. मी तुमच्यावरती टिप्पणी केलेली आहे ती तुम्हाला आरोप वाटत असेल तर मी कोण ते अमान्य करणारा.
वैज्ञानिक विचारसरणीमध्ये प्रकाश वेव्ह आणि पार्टिकल अशा दोन्ही स्वरुपात असतो असे मान्य केले जाते, याला आपण वैज्ञानिक कन्फ्यूजन म्हणत असाल तरी ते आपले 'मत' असू शकते.
तुमचा क्वांटम फिजिक्सचा अभ्यास दिसतो. असे असेल तर तुम्हाला 'काँप्लिमेंटॅरीटी'चे तत्वही माहितीच असेल. प्रकाश हा वेव्ह किंवा पार्टीकल अश्या दोन्ही स्वरुपात असू शकतो पण तो एकाच वेळेस दोन्ही स्वरुपात असणे अशक्य आहे असे नील्स बोहरने दाखवून दिले आहे.
म्हणजे तुम्ही समजा साम्यवादी असाल, तर भांडवलवाद तुमच्यामते चूक. ही तुमची विचारसरणी. आमच्यामते असे एका रेषेत विचार करणेच योग्य नाही.
ज्या कुणा साम्यवादी व्यक्तिला भांडवलवाद चूकिचा वाटत नाही (किंवा वाइस वर्सा) त्या व्यक्तिला साम्यवाद/भांडवलवाद समजलाच नाही असे माझे मत आहे.
तर सांगायचा मुद्दा असा, की सावरकर अ‍ॅग्नॉस्टिक होते असे मला वाटते. त्यांना मानणारा कुणी एखादा सश्रद्ध असू शकतो, किंवा अश्रद्ध असू शकतो. त्यात त्याची काही त्रुटी असलीच पाहिजे असे मला वाटत नाही, तसेच त्याने सावरकरांना चुकीचे मानले पाहिजे असेही मला वाटत नाही.
असे विचार सश्रद्ध आणि अ‍ॅग्नोस्टीक असे दोन्ही विचार पटणारा माणूसच करू शकतो. माझ्या मते असा माणूस गोंधळलेला आहे.
विचार बरोबर वाटणे आणि पटणे या वेगळ्या गोष्टी आहेत. विचार बरोबर वाटतो, पण पटत नाही असे असू शकते. उदा. माझा भाऊ अमेरिकेतील चांगले करियर सोडून भारतातच सेटल व्हायचा विचार करतो. मला त्यात चूक काहीच वाटत नाही, पण तरीही पटत नाही.
भावाने भारतात परत येणे हा विचार तुम्हाला बरोबर वाटत असेल तर त्यात न पटण्यासारखे काहीच नाही. कदाचित व्यावहरीक दृष्ट्या हा विचार खरंच बरोबर आहे का ह्याची तुम्हाला खात्री नसावी आणि म्हणून तुम्हाला ते पटत नसावे. थोड्क्यात तुमचा पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे.
यावरून मला तर्काचे वावडे आहे असा समज करुन घेतल्यास माझी काहीही अडचण नाही!
हे म्हणजे एखाद्याने सगळे कपडे काढून बसल्यावर 'मी नागडा आहे, असा समज करुन घेण्यास हरकत नाही' असे म्हणण्यासारखे झाले.

In reply to by आळश्यांचा राजा

वा. एक नंबर प्रतिसाद आहे. @ श्री. शिंदे, तुम्हाला बुद्धिप्रामाण्यवाद (ज्याची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच कड घेतली) मान्य आहे काय ? तुमचा 'अथक तर्कटी' या शब्दाला आक्षेप घेतला आहे. मी तर यापुढे जाउन असंही म्हणेन की स्वा. सावरकरांचे काही विचार म्हणजे शुद्ध आचरटपणा आणि अतिरेक वाटतो. अर्थात असं म्हटल्यामुळे त्यांच्या महनीयतेला बाधा येते असे मानण्याचे कारण नाही. त्या महापुरुषाने एक विशिष्ट आणि श्रेष्ठ ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याच्या पूर्ततेसाठी असीम त्याग केला ही गोष्ट तर त्यामुळे बदलू शकत नाही ना ? मग त्यांची प्रत्येक विचारसरणी ही पूजनीय असलीच पाहिजे हा अट्टहास कशासाठी ? आणि खरं सांगायचं झालं तर त्यांचे विचार पूजनीय आहेत किंवा नाहीत हा निष्कर्ष काढण्याचा आपल्या कोणाला अधिकार आहे का याचा विचार केला पाहिजे. ज्याने जन्मात हातामध्ये बॅटसुद्धा धरली नाही त्याने सचिन तेंडुलकरच्या बॅटींगचं परीक्षण करायचंच कशाला ?

In reply to by अप्पा जोगळेकर

मग त्यांची प्रत्येक विचारसरणी ही पूजनीय असलीच पाहिजे हा अट्टहास कशासाठी ?
असा हट्ट माझाही नाही. तुम्ही त्यांचे न पटणारे विचार म्हणजे शुद्ध आचरटपणा आणि अतिरेक असे दिले आहे (अर्थात कोणते विचार ह्यावर काही लिहिलेले नाही) पण तुम्ही जे मनातले स्पष्ट लिहिले आहेत तसे बाकीच्यांनीही लिहावे हा ह्या चर्चेचा उद्देश आहे.

सावरकर आस्तिक होते का नास्तिक हे समजून चर्चाप्रस्तावक (आणि/किंवा इतर प्रतिसादक) पुढे नक्की काय होणार, करणार? ता.क. इतर कोणीही आस्तिक आहे का नास्तिक यावरून माझे या बाबतीतले विचार बदललेले नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सावरकर आस्तिक होते का नास्तिक ह्याचा शोध घेण्यासाठी हा चर्चा प्रस्ताव नाही. माझ्या मते ते नास्तिकच होते. चर्चा विषय वेगळा आहे. कृपया पुन्हा वाचून पाहा.
ता.क. इतर कोणीही आस्तिक आहे का नास्तिक यावरून माझे या बाबतीतले विचार बदललेले नाहीत.
ह्याचा इथे काय संबंध तेही समजले नाही.

In reply to by आमोद शिंदे

पहिलंच वाक्य थोडं बदलूनः सावरकरांच्या आस्तिक/नास्तिकतेविषयी लोकांचे काय विचार आहेत हे समजून(खरंच?) चर्चाप्रस्तावक नक्की काय करणार हे न समजल्यामुळे पास!
ह्याचा इथे काय संबंध तेही समजले नाही.
अवांतरः ता.क. हा शब्दप्रयोग अवांतरासाठी वापरला होता. थोडा जुना आणि/किंवा वेगळा शब्द आहे, कदाचित तुम्हाला आठवण करून दिल्यावर समजेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चर्चाप्रस्तावक नक्की काय करणार
ओबामाला पत्र लिहावे म्हणतो :) ह.घ्या. अहो मी काहीही करणार नाहीये. निव्वळ एक कुतुहल म्हणून चर्चा टाकली आहे. साधा विषय आहे: एखाद्याच्या व्यक्तिचे जेव्हा आपण परमभक्त असतो पण तरीही त्या व्यक्तिच्या काही विचारांशी असहमत असतो तेव्हा माझ्या मते दोनच शक्यता उद्भवतातः १) सदर व्यक्तिचे (बाकीचे) सर्व विचार पटले असले तरी काही विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे. (त्या व्यक्तीचे बाकीचे विचार महानच आहेत.. वगैरे वगैरे आहेच) २) सदर व्यक्तिच्या विचारांना चॅलेंज देण्याची माझी लायकी नाही, मला जे विचार पटत नाहीत ती मी माझी तृटी मानतो. ह्यापैकी मिपाकर कुठला पर्याय निवडतात हे पाहायचे होते. ता.क.: ता .क. चा नविन अर्थ समजावून सांगितल्याबद्दल आभारी आहे. मला माहित नव्हता.

मिपावरील अनेक श्रद्धाळू, भाविक रथी महारथींचे ह्याविषयी मत ऐकून घेण्याचे कुतुहल आहे.
जाड ठसा माझा. मत ऐकून घ्यावयाचे आहे अशी माझी समजूत होती. पण हे नेहमीचेच आहे. मला कळतच नाही काहीही. :~

सावरकर नास्तिकच होते. विश्च निर्माण करणारा जो त्याला ते देव मानीत आणि त्याच्या अगाध कर्तृत्वाचे कौतुक करीत. पण हा देव माणसांच्या इच्छा आकांक्षा, सुख-दु:ख यांच्याशी संबंध नसलेला देव आहे असं ते म्हणत. तेव्हा माणसाने आपल्या हितासाठी या देवाला भजून उपयोग नाही. “मनुष्याचा देव व विश्चाचा देव” या लेखात त्यांनी आपली देवाविषयीची कल्पना स्पष्ट केली आहे. “ ऐश्वर्ये भारी या अशा, महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी” या कवितेत(गाण्यात) या देवाचे वर्णन आहे. “दोन क्षितिजांची चाकं असलेल्या रथातून हा देव जातो. तेव्हा नक्षत्र कणांचा धुरळा उडतो. कित्येक शुभ्रपथांच्या (आकाशगंगा) मशाली जळत आहेत. कित्येक धुम्रकेतुंचे बाण सरसरत सुटत आहेत इ. ” सावरकरांची देवाविषयीची कल्पना अशी भव्य होती. सावरकर कर्मकांडांचे कडवे विरोधक होते. पण सावरकर हे एक असे विचारवंत आहेत की ज्यांना दुर्दैवाने ( सावरकर दैव मानीत नाहीत) मिळालेले बहुसंख्य भक्त, अनुया्यी, शिष्य इ. ना विज्ञाननिष्ठ सावरकर कधीच स्विकारता आले नाहीत. त्यांनी सावरकरांचा पराभवच केला. सावरकर कर्मकांडाचे कडवे विरोधक व टिकाकार होते.पण त्यांच्या पहिल्या स्मृती दिनाच्या दिवशी “हिंदुहृदय” नावाचं एक मासिक सुरू करण्यात आलं. त्याच्या पहिल्या पानावर सावरकरांचा फुल पेज फोटो होता आणि शेवटच्या पानावर फुल पेज जाहिरात होती ज्यात म्हटलं होतं “ भारतारिष्ट निवारणार्थ पंधरा कोटी ॐ नम: शिवाय. सकाळी उठून स्नान करून सोवळे नेसून सुवाच्य अक्षरात ॐ नमशिवाय हा मंत्र जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा लिहून पाठविणे. असे १५ कोटी ॐ नम: शिवाय जमविण्याचा आमचा इरादा आहे जेणेकरून भारतावरील सर्व अरिष्टांचे निवारण होईल !” आता याला काय म्हणणार ? त्यामुळे सावरकरशिष्यांची आता भितीच वाटते.

In reply to by नितिन थत्ते

हेच म्हणतो. अविनाशकदम यांचा प्रतिसाद अतिशय प्रामाणिक आणि या विषयावरचा नेमका वाटला.

In reply to by अविनाश कदम

सावरकर नास्तिकच होते.
विश्च निर्माण करणारा जो त्याला ते देव मानीत आणि त्याच्या अगाध कर्तृत्वाचे कौतुक करीत.
एक नंबर प्रतिसाद.