Skip to main content

पाकिस्तानी व्रुत्तपत्रांची मान खाली

पाकिस्तानी व्रुत्तपत्रांची मान खाली

Published on 11/12/2010 - 06:55 प्रकाशित मुखपृष्ठ
ही पहा आजची बातमी - http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-how-pak-media-used-wikileaks-for-india-bashing/20101210.htm पाकिस्तानी वृत्त संस्था कधी अशी दिलगिरी व्यक्त करत नाहीत. आताच हे असे कसे झाले ?

याद्या 2547
प्रतिक्रिया 9

शेखर, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाचे स्वागत आहे. मला स्वतःला राजकारण ह्या विषयावर लिहीण्या येवढी गती नसली, तरी वाचायला नक्कीच आवडते. म्हणूनच, मिपाचे प्रसिद्ध पाकिस्थान विष्लेशक सुधीर काळे ह्यांची टिप्पणी वाचायला आवडेल.

ह्याचे श्रेय आमच्या लाडक्या राजकीय व्यक्तिमत्व झरदारी साहेब ह्यांना (खा आनि खाऊ द्या ह्या उदात्त विचारसरणी असलेले ) आपल्या नैसर्गिक मित्राने वरून दम दिला असेल कारण हि बातमी विक्कीलीक्स संबंधित होती .व ह्या प्रकरणी अमेरिकाची वक्तव्ये आपल्यापुढे आल्याने त्यांची आधीच गोची झाली आहे .म्हणून भारताला खुश करण्यासाठी हि एक फुल ना फुलाची पाकळी

शेखर, मिपावर तुमचे आणि तुमच्या पहिल्या लेखाचे स्वागत आहे. मला असे वाटते की तुम्ही स्वत:चे मतसुध्दा मांडायला हवे होते. बाकी एका सहसभासदाने लिहीले आहे ते मी प्रश्ण म्हणून विचारणारच होतो. सुधीर काळे तुमचे कोण?

In reply to by चिंतामणी

@ सुधीर काळे तुमचे कोण? कुटुंब रंगलंय काव्यात च्या धर्तीवर कुटुंब रंगलंय राजकारणात (आंतरराष्ट्रीय ) असे वाटत आहे का तुम्हाला ?

यांच्या लेखांचा मी एक नियमीत वाचक आहे .. या पलिकडे अजून तरी काही नाते सापडले नाही. काळे कुलवृत्तांतात पाहून सांगतो. पण त्यांची टिप्पणी वाचायला जरूर आवडेल.

तुमचा हा पहिलाच लेख आहे त्याचं कौतुक आहे. मात्र कृपया दूवा देताना त्यासंदर्भात आपले मत सुध्दा द्यावे. किंवा बातमीची थोडी समिक्षा करावी. म्हणजे इतरांना सुध्दा त्यावर प्रतिक्रिया द्यायची इच्छा होते. बाकी याबातमी बाबत बोलायचे झाल्यास असा खुलासा येणे यासाठी अमेरिकेचा बडगा हाच एक मुख्य स्रोत दिसतो. कारण अन्य कितीतरी बातम्या भारताबाबत पाक-मिडीया छापत असतेच. येथे बदल एवढाच झाला की यावेळी संदर्भ विकिलिक्सचा आहे आणि विकिलिक्सला पाकिस्तानने सत्यसंदर्भ मानावे हे अमेरिकेला रूचले नसेल. हा माझा अंदाज आहे. - नीलकांत

शेखर काळे-जी, तुमची पोस्ट आताच पाहिली. गेले दोन-तीन दिवस घरी पाहुणे आणि फॅक्टरीत जरा अडचण आली होती त्यामुळे संगणकासमोर बसायलासुद्धा वेळ मिळाला नाहीं. त्यमुळे तुमचा लेख आताच वाचला. अर्थात् ही बातमी मी इतरत्र वाचली होती. त्यातल्या त्यात पाकिस्तानने आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा दाखविला ही मोठीच जमेची बाजू. मागे मी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीचा (बनेझीरबाईंचा) वध दहशतवाद्यांनी केलेला असल्यामुळे जरदारी स्वतःच 'अतिरेकी-पीडिता'तले एक आहेत. सर्वसाधारणपणे पाहिल्यास ते मुरब्बी राजकारणीही नाहींत. त्यामुळे अद्याप कांहींसे प्रमाणिक आहेत. (उदा. २६/११ नंतर त्यांनी ISIच्या प्रमुखांना भारतात पाठवायला दिलेली संमती जी नंतर त्यांच्या लष्कराने ऐकली नाहीं) तुम्ही उल्लेखलेल्या Express Tribune चे एक वार्ताहार श्री फासी झकी यांना मी एक मेल लिहिली होती. त्यातही मी माझी अशाच स्वरूपाची मतें मांडली होती. ती मेल खाली देत आहे: Dear Mr Zaki, I am an Indian presently working and living in Indonesia. I liked your article "Pakistan's human cockroaches" which I read today. I have long since believed that Pakistanis and Indians should forget their differences and join hands and I think if ever this dream of mine comes true, it will be because of journalists like you. There are one or two others, too. Really speaking, Pakistan should build friendly relations with India and join India in its march towards becoming a global power. It is Pakistan's elite that have let Pakistan down, not its 'man-on-the-street' population. Though he carries a lot of baggage from his past which will eternally pursue him, your President Asif Ali Zardari is a decent man at the core of his heart. He will learn on the job how to rule and will make a good President. I hope all Pakistanis help him and make him a successful democratic President. The other option of a Kayani or a Musharraf is no choice at all! Warmest regards, K B Kale, Jakarta श्री. झाकी यांनी "उलट टपाली" उत्तर देऊन मला एक सुखद धक्काच दिला. त्यांची मेलः --- On Mon, 12/13/10, Fasi Zaka wrote: From: Fasi Zaka Subject: Re: I liked your article, "Pakistan’s human cockroaches" To: "K. B. Kale" Date: Monday, December 13, 2010, 1:41 PM :), many thanks for this. lets hope for the best. Warm Regards, Fasi Zaka ---------------------------------- जरी आपल्यातले शत्रुत्व संपायला २०-२५ वर्षे लागली तरी ते संपवायच्या दृष्टीने अशी पावले टाकायलाच हवीत. असो आपला पहिला वहिला लेख आवडला. त्यावर आपण आपलेही कांहीं भाष्य केले असते तर जास्तच मजा आली असती. पण सुरुवात झकास! लगे रहो, शेखरभाई! सुधीर काळे, जकार्ता