Skip to main content

मिरची लोणचे..

निवेदिता-ताई यांनी या दिवशी प्रकाशित केले.
गुंडोपंत

अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले. या वयात झेपेल की नाही ही गोष्ट वेगळी!
10/12/2010 - 08:54 Permalink
५० फक्त

निवेदिता ताई, हे लोणचे जबराच लागते आणि आपण दिलेली पद्धत सोपी आहे. अतिशय धन्यवाद. @श्री. गुंडोपंत - हे लोणचे करताना थोडे काम वाढवुन कोणत्याही वयाला झेपेल असे लोणचे करता येते. मिरच्या बारीक न चिरता त्या उभ्या चिरायच्या आणि शक्य तेवढ्या बिया काढुन घ्यायच्या, पण अगदी सगळ्याच नको. आणि थोड्या लोणच्यात नेहमीप्रमाणे लिंबाचा रस पिळा. थोडे लोणचे पुर्ण न पिकलेले पण फार आंबट नाही, संत्रे पिळुन करा, हे लोणचे खुप जास्त दिवस टिकत नाही. २-३ दिवस टिकते पण याची सुद्धा चव प्रचंड जबरा असते. हर्षद.
10/12/2010 - 11:13 Permalink
जागु

निवेदीता ताई मस्तच. मी कालच एक मिरचीच लोणच खाल्ल गणपतीपुळेवरुन आणलेल होत ते. त्यात लसुणही ठेचुन टाकलेला होता खुप छान लागल ते पण.
10/12/2010 - 11:21 Permalink
गवि

फोडणीच्या दहीभातासोबत हे खाण्याच्या कल्पनेने तोंडाला रुमाल लावून पाणी आवरावे लागले. तयार लोणच्याचा फोटो दिसत नाही तो? तो असता तर वाट लागली असती..कामातून मन उडालं असतं.. झक्क आणि चटकदार. :)
10/12/2010 - 12:01 Permalink
चिंतामणी

कृती सोपी आहे. लोणचे आवडते. पण हाय हाय मिर्ची ऊह ऊह मिर्ची उफ़ उफ़ मिर्ची फ़ूह फ़ूह मिर्ची
12/12/2010 - 17:01 Permalink
पैसा

मिरचीच्या लोणच्याने जेवणाला मस्त रंगत येते. माझी फर्माईश आहे आवळ्याच्या मोहरी फेसलेल्या लोणचाची पाकृ. बाजारात सध्या छान आवळे आहेत. बोल कधी देतेस?
12/12/2010 - 17:18 Permalink