Skip to main content

अमेरीकी उन्मत्तपणा

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/12/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय महीला राजदूत मीरा शंकर याना जॅकसन विमानतळावर http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-dow… ही अशी वागणूक देण्यात आली. गोर्‍या लोकांना भारतीय लोकांबद्दल हा असा आकस का असतो? त्यातून राजदूतसुद्धा सुटत नाहीत. त्या ऑफिसरने जणू साडी नेसलेली महिला कधी पाहिलीच नव्हती का? मात्र अमेरीकन अधिकारी हा मस्तवालपणा अरबांसोबत दाखवत नाहीत.

वाचने 15267
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by सेरेपी

मकरंद अनासपुरे म्हणतो ... "कोणाला कशाचं ... आणि हिजड्याला मिशांचं ... " -(खुर्चीसम्राट)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारताच्या राजदूत यावरूनच सदर व्यक्ती स्त्री आहे हे कोणत्याही मराठी भाषिकास समजावे. मुद्दाम महिलांना 'सिंगल आऊट' करण्याचा प्रकार आणि तो ही वर्णद्वेषाची तक्रार करणार्‍या धाग्यावर ओ बाई साहेब. या धाग्यात म्हंटल्याप्रमाणे मी भारतीय महीला राजदूत या वाक्यातून महीला हा शब्द काढून टाकला तर फारच अनर्थ होईल. कारण " भारतीय राजदूतानी साडी नेसल्यामुळे राजदूताना बाजूला नेऊन सुरक्षा तपासणी करण्यात आली " ही अशी बातमी काय भयंकर खळबळ माजवेल कल्पना कर. अवांतरः प्रतिभाताई पाटलाना अजूनही राष्ट्रपती असेच संबोधतात. ते त्या पदाचे नाव आहे. चेअर्मन चे चेअरपर्सन झाले तसे राष्ट्रपती चे राष्ट्रस्पाऊस असा नावबदल झालेला नाहिय्ये हे लक्षात घ्या.

In reply to by विजुभाऊ

भारतीय राजदूतानी साडी नेसल्यामुळे राजदूताना बाजूला नेऊन सुरक्षा तपासणी करण्यात आली
=)) =)) =)) =)) विजुभाऊ , आवरा !! तुम्ही स्त्रीची आजची प्रतिमा डागाळवत आहात !! आणि बाईच्या मागे साहेब लावलेला देखील मला खटकला आहे. ह्यासाठी मी तुम्हाला कोर्टात खेचिन .. खेचु का ? राखी साहेबांच्या कोर्टात !! - एकच साहेब ... बाबा साहेब

ह्या मुद्याचा बाऊ करण्यात आला आहे मुंबई कारचा वृत्त पत्राला बडे अधिकारी व दक्षिण मुंबईतील श्रीमान धेंडे ह्यांना परदेशात भारतात मिळते तशी राजेशाही बडदास्त ठेवली जावी अशी अपेक्षा असते . मुळात राजदूताचे विशेष अधिकार असतात .त्यांच्यावर दुसर्या देशात अगदी हेरगिरीचा आरोप आला तरी कोणतीही कारवाई न होऊ देता त्यांच्या मूळ मायदेशी परत पाठवण्यात येते .हाच कायदा दूतावासातील कर्मचारी वर्गावर लागू होतो .(आठवा काही वर्षापूर्वी आपण पाकिस्तानी राजनैतिक कर्मचारी भारतातून पाठविले तर त्यांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून आपला अधिकारी परत पाठवला .मुद्दा असा आहे .कि जर अमेरिकन सरकारला वाटले कि झडती घ्यावी सुरक्षितेसाठी तर घेऊ शकतात .आपली एअर इंडिया भारतात अतिमहत्वाच्या व्यक्तींना जे लाड करते तसे जगात क्वचित होतात .उदा परदेशात माझा एक मित्राचे वडील मुंबईत बड्या अधिकारावर आहेत .त्याच्या महत्वाच्या औषधे भारतातून आणायची होती .अर्थात आमचा एक भारतीय मित्र सुट्टीवर आल्या असल्याने तो आणणार होता .त्याला ह्याच्या तीर्थरूपांनी फोनोफोनी करून कुठलीही चेकिंग न करता सरळ विमानात बसवले . मला ओबामा भारत भेटीतील किस्सा आठवला .कि भुजबळ हे ओबामा ह्यांना भेटायला आले तेव्हा ओबामा ह्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची तपासणी करावयास मागितली तेव्हा माझ्या राज्यात खरेतर मीच तुमची तपासणी करायला हवी असे त्यांनी खडे बोल सुनावल्यावर मग अमेरिकन दूतावासातून माफी मागितली गेली .थोडक्यात काय परकीय भूमीवर त्यांच्या नियमाने वागणे पण आपल्या देशात त्यांना आपल्या नियमाने वागायला लावणे . अजून एक उदाहरण द्यायचं तर पूर्वी अरब जेव्हा कुलाब्यातील हॉटेलात यायचे तेव्हा त्याची सरबराई हि एका राजमहा राजासारखी करायचे विमानतळावर तोच प्रकार .आपण डी हा कराचीत गेल्यापासून म्हणा का ह्यातील काही लोकांचे अल कायद्याचे संबध उघडकीस आले म्हणा आता त्यांचे मुंबई विमानतळावर कडक तपासणी होते .पांढरा झगेवाला म्हणून विशेष लाड होत नाहीत .

फक्त रंग, वेषभूषा इ. लक्शात घेउन वेगळी वर्तणूक कोणालाही आणि कुठेही दिली जाउ नये. दूतावासातील कर्मचारी या सुरक्षा प्रोसिजर मधून कायद्यानं वगळलेले नाहीत, तरीही ही दुर्दैवी घटना आहे. ऑफिशिअली भारतसरकारतर्फे निषेध नोंदवला जायला हवा पण तरीही मीरा शंकर यांनी 'मी परत इथे कधीही येणार नाही' अशी वक्तव्ये करण्याचे टाळावे. त्यांना निमंत्रित केलेल्या आणि त्यांच्या बरोबर असलेल्या इतर लोकांनी निषेध नोंदवला आहेच आणि रीतसर क्षमाही मागितली आहे ( त्यांचा झाल्या घटनेशी काहीही संबंध नसताना ) अवांतर : माझे काही अनुभव मला एकदा हँबर्ग विमानतळावर पासपोर्ट कंट्रोल च्या वेळी रांगेतून वेगळं काढून बाजूला उभं रहायला सांगितलं, मला वाटलं की भाषेचा प्रश्न असावा आणि कोणा आंग्लभाषिक स्टाफला बोलावतील. ५० मिनिटांनी मीच आठवण करून दिली तर मला तसच जाउ दिलं. एकदा बेलफास्ट ला गेले असताना बरोबर असणार्‍या सग्ळ्या आशियाइ वर्णाच्या लोकांना पासपोर्टवर ठपाठप शिक्के मारून, चेहर्‍याकडे एक कटाक्शही न टाकता जाउन दिलं. पण त्याच वेळी विमानातल्या इतर स्पेसिफिक नावं, तोंडावळा असणार्‍या (आयरिश कॅथोलिक) लोकांना पद्धतशीरपणे वेगळं काढून स्ट्रीप सर्च केलं गेलं. अजून एका टूरमधे बाकीचे सगळे सहप्रवासी अमेरिकन होते. एका अमेरिकन आजोबांचं (वय वर्ष ७९ ) ऑपरेशन झालं होतं आणि पायात स्टीलचा रॉड होता, तसं डॉक्टर आणि अमेरिकन दुतावासानं दिलेलं पत्रही होतं. पण प्रत्येक वेळेस त्यांचं स्ट्रीप सर्च होत असे. ते बाकीच्यांना त्रास नको म्हणून इतर सगळ्यांपेक्शा २ तास आधीच निघत. कधीकधी सिक्युरिटी जाउदे, पासपोर्टवर ठप्पा सुद्धा मारायला कोणी नसतं. लोकंच पोलिसांना शोधत फिरत असतात *. * डिट्टेल माहितीसाठी श्री. मेवे यांच्याशी संपर्क साधावा.

In reply to by शिल्पा ब

हीच योग्य वेळ आहे ह्या लोकांना जगापुढे उघडे करण्याची . सध्या प्रसारमाध्यमे जगातील त्यांच्या विरुध्ध आहेत .जनमत युरोपातील ह्यांच्या विरुध्ध आहे .व स्वताच्या कट्टर पंथीय पणात वाढ करून हि लोक स्वताच्या पायावर धोंडा पाढून घेत आहेत , ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ह्यावर माझे व माझ्या अनेक ज्यू मित्रांचे एकमत आहे .तेव्हा जमेल तशी जनजागृती करणे आपले आद्य कर्तव्य आहे . आपली प्रतिक्रिया आवडली .

In reply to by शिल्पा ब

नवीन लेखाची प्रतीक्षा करा धीर धरी धीरा पोटी फळे मिळती रसाळ गोमटी सब्र का फल मिठा होता है

In reply to by निनाद मुक्काम …

ह्यांच्या हिरव्या धर्मांध विचारांना लगाम भारतीय व याहुदीच करू शकतात ह्यावर माझे व माझ्या अनेक ज्यू मित्रांचे एकमत आहे
"तुम्ही आणि साने गुरूजी माझे सगळ्यात आवडते लेखक आहात", हे पुलंचं 'सखाराम गटणे'तलं वाक्य (उगाचच?) आठवलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न चांगला आहे .किंबहुना माझ्या पुढच्या लेखातून हा विषय सविस्तर मांडणार आहे . बाकी आपण परदेशात राहतो भारतात राहून लोकांना कल्पना येणार नाही कदाचित पाकिस्तानी व अरब ह्यांची मानसिकता व माजोरडे पणा व कट्टर वाद ह्यामुळे आशियायी लोकांची प्रतिमा डागाळत आहे . सध्या एवढेच सांगतो धर्मावर आधारित राष्ट्र हि संकल्पना गांधी ह्यांना मान्य नव्हती (म्हणून देशाने सेक्युलर वाद ) निवडला .पण त्यामुळे भारताने ज्यू राष्तांचे अस्तित्व मान्य केले नाही .व १९८९ पर्यत आपले ह्यांच्याशी संबंध नवहते (सरकारी पातळीवर ) ते नरसिंह राव ह्यांच्या लुक वेस्ट हे संपूर्ण वेगळ्या व स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे शक्य झाले .सध्या आपला देश त्यांच्याकडून मुसती सहस्त्रे विकत घेत नाही आहे .तर औद्योगिक दृष्ट्या सुध्धा जवळ येत आहे .सर्वात महत्वाचे त्याची हेर संस्था मोसाद जगातील १ असून सध्या त्यांचे आपल्याला प्रती दहशतवाद व आधुनिक काळातील वॉर ४थ फ जनरेशन ज्याला म्हणतात (जेथे प्रत्यक्ष युद्ध व सैनिकी कारवाई न करता ) ह्यात भारताने इजारेल कडून प्रशिक्षण सुरु केले आहे .अधिक व सखोल माहिती मी लेखात लिहीन एक मात्रा नक्की हिरव्या दहशतवाद हा इजारेल व भारताचा समान दुखरा भाग आहे .व एकत्र येऊनच आपल्याला काहीतरी करता येईल (अमेरिकत ज्यू लोकांची बलाढ्य लॉबी असून बँकिंग व प्रसारमाध्यमे ह्यावर त्यांची पकड आहे )हिलरी ह्यांचा जावई ज्यू आहे . आज भारतीय कंपन्या व अनिवासी भारतीय हे अमेरिकेत व्यापारात पुढे आहेत .(गुज्जू व ज्यू हे जगातील हिर्याचे मार्केट सांभाळतात ) तेव्हा तुमच्या इथून जगाची सूत्र हलवली जातात त्या वाईट हॉउस ची सूत्रे आपण मिळून घेऊ शकतो (हा पोकळ आशावाद नाही आहे हे माझ्या लेखातून स्पष्ट करेन )

वरील प्रकाराचा निषेध करणारे ओबामाला पत्र पत्रकाकांनी लिहावे अशी विनंती.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7075932.cms झुकती हे दुनिया झुकानेवाला चाहिये . हेच खरे आहे .मीरा शंकर ह्याचे चूक का बरोबर हा मुद्दा राहिला बाजूला ( भारताची रोजगार हमी योजना अमेरिकेत धोक्यात येऊ नये म्हणून लगेच माफी मानून मोकळे झाले )असाच मुसाद्दी पणा दाखवून लाशाक्रे तोयबाचे आर्थिक नाकेबंदी केली (स्पेन मध्ये त्यांना रसद पुरवणारे अटकेत )अर्थात अमेरिका व इजारेल व तमाम पाशिमात्या देशासोबत व्यापारी संबंध वाढवून अशाच मार्गाने काश्मीर प्रश्न सोडवावा .(हा प्रश्न वादग्रस्त नाही असे युएन मध्ये नुकतेच जाहीर झाल्याचे वाचून आहे .

तेव्हा त्यांनी भुजबळ वगैरेवर असा मस्तवालपणा करायचा प्रयत्न केला होता

( भारताची रोजगार हमी योजना अमेरिकेत धोक्यात येऊ नये म्हणून लगेच माफी मानून मोकळे झाले ) माफीनामा नको आहे. दिलगीरी व्यक्त करायला हवी आहे. X(