जुनिपर बॉन्साय आणि माझी मला नव्याने ओळख
दर वर्षी प्रमाणे, या म्हणजे डिसेंबर महीन्यात ऑफीसमध्ये नाताळ पार्टीचे आयोजन केले आहे. नाताळ म्हटले की एकमेकांना भेटवस्तू देणे आलेच. यावर्षीदेखील, "व्हाईट एलीफंट" हा खेळ आम्ही खेळणार आहोत.यामध्ये प्रत्येक जण आणलेली भेटवस्तू एका मेजावर ठेवतो. मग सगळ्यांना क्रमांकाच्या चिठ्ठ्या वाटल्या जातात आणि अनुक्रमे प्रत्येक जण जाऊन भेटवस्तू उघडतो. २ नंबरपासून २ पर्याय उपलब्ध असतात - (१) नवीन भेटवस्तू उघडणे किंवा (२) आधी उघडलेल्या भेटवस्तूची मागणी करणे. यावर्षी आम्ही खूप कमी बजेट ठेवलं आहे - फक्त $७. या बजेट्मध्ये कल्पकता, हुषारी, घासाघीस कौशल्य दाखवून घसघशीत आणि नावीन्यपूर्ण भेटवस्तू आपल्याकडून आणणे ही एक कसोटीच असते.
मी जुनिपर वृक्षाचे एक बॉन्साय खूप घासाघीस करून मिळवले आहे. पण गंमत म्हणजे हा चिमुकला पण डेरेदार वृक्ष घरात ठेवल्यानंतर मलाच त्याचा इतका लळा लागला आहे की सांगता सोय नाही. हा रात्री मलूल होऊन लहान बाळासारखा झोपी जातो. तर सकाळी माझ्या आधी ताजातवाना उठून मला "सुप्रभात" करतो. सकाळी अफलातून टवटवीत दिसतो.
या पार्टीमध्ये मला स्वतःला नीर्जीव वस्तूपेक्षा एखादं रोपटं भेट मिळालेलं आवडेल. पण माझ्यासारखा विचार नक्कीच सगळेजण करत नसणार. त्यामुळे मी विचार करते आहे की हा चिमुकला वृक्ष मी भेट म्हणून देतच नाही. कारण ज्याला तो मिळेल तो त्याची नीट निगा राखेल की नाही कोणास ठाऊक :( .
एक मात्र नक्की दुसर्याला भेट द्यायच्या निमित्ताने मला माझीच एक नवी बाजू दिसली. खरच नवनवीन गोष्टी मुद्दाम, प्रयत्नपूर्वक करत राहील्या पाहीजेत ज्याला इंग्रजीत "कनेक्टींग द डॉटस" असं म्हणतात. आपल्याला आपली नव्याने ओळख होते.
प्रतिक्रिया
छान छोटे लेखन. नेहमी वेगळ्या
अगं रेवती, माझ्याकडे कॅमेरा
मला बोन्साय हा प्रकार फारसा
बरोबर आहे
माझा काका फोरेस्टात ऑफिसर
मी पारिजातकाचे बोन्साय करायचा
>>हा रात्री मलूल होऊन लहान
लेख वाचलेला आहे. आवडलेला आहे
दुट्प्पी
मी विचार करते आहे माळ्याला
वाचून खरच खूप आनंद झाला. मला
मस्त लेख! आवडला.. काही
हम्म!
१००% सहमत. आधी हे वाचल असत तर
>>बागेतल्या झाडावरची भाजी
शेतकरी?
शुचि ताई
सद्ध्या काही धागे अन त्यावरचे
साली ही इमोशनल सिस्टीम फार
बोन्साय करणे हि शुध्द विकृती आहे
हे बोन्सायविरोधी भावनिक दडपण अगदी कैच्याकै
सहमत
तुम्ही केस कापा नाहीतर नका
हं..